Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

बाली

न
नंदू
Sun, 09/13/2009 - 19:21

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11793 views

💬 प्रतिसाद
ब
बेसनलाडू Sun, 09/13/2009 - 19:26 नवीन
याबरोबरच बाली मधील आपल्या वास्तव्यादरम्यान आपल्याला आलेले संस्कृती, लोकजीवन, राहणीमान इ. बद्दलचे काहीसे सविस्तर निरीक्षण/अनुभवकथन वाचायला आवडेल. (पर्यटक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 09/13/2009 - 21:35 नवीन
सहमत. जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 09/14/2009 - 10:49 नवीन
खुप सुंदर छायाचित्रे ! अनुभव जरुर लिहा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Sun, 09/13/2009 - 19:30 नवीन
छान फोटो! बसल्या बसल्या बालीची सहल झाली:-)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/13/2009 - 20:30 नवीन
आपली बाली ट्रिप छानच झालेली दिसते. फोटो चांगले आलेत. वेगळं राहणीमान आणि चालीरिती फोटूतून का होइना पहायला मिळाल्या. रेवती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 09/13/2009 - 20:54 नवीन
आहाहा ... फोटू तर के व ळ प्र ति म आहेतंच .. पण नृत्यांगणा तर " ह्यांच्यावर आमचा फार जीव " म्हणण्यासारख्या आहेत ... जायलाच हवं एकदा ;) -(णृत्यांगणाप्रेमी) टारोबा डांसर
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/13/2009 - 21:01 नवीन
सुंदर चित्रप्रवास. अभिनंदन. एकूण बालीच्या ट्रीप बद्दल एखादा लेख पाडावा. खर्चासहित बित्तंबातमी मिळाली तर बालीला भेट देण्यासंबंधी कांही ठोस निर्णय घेता येईल. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sun, 09/13/2009 - 21:52 नवीन
सुरेख फोटो, ते जोडपं, नृत्यांगना, बांबूची आरास आणि मुख्य म्हणजे इतक्या वस्तुंनी भरलेली दुकानं :D , सगळंच एकदम मस्त.... दिपाली :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 09/13/2009 - 22:04 नवीन
आलेत सगळेच फोटोज. अधिक विस्ताराने प्रवासाबद्दल लिहिलेत तर फारच छान.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 09/14/2009 - 00:00 नवीन
सुंदर बाली !! आशिया मधे खूप काही बघण्यासारख आहे ज्या पुढे अमेरिका/ युरोप पार थिट पडत. मीनल.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Mon, 09/14/2009 - 00:24 नवीन
सगळे फोटो अव्वल! बाकी सगळे म्हणतात तसंच आपले शब्दांकित अनुभवही वाचायला आवडतील :) आशिया किती colorful आहे असं पुन्हा वाटून गेलं. मला वाटतं की विनिता म्हणजे गरुडाची आई...कारण गरुडाला संस्कृतमधे वैनतेय म्हणतात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/14/2009 - 06:35 नवीन
खरं आहे ... फोटो पाहिल्यावर हेच वाटत होतं, आशिया खूपच रंगीबेरंगी आहे ... बालीला जायलाच हवं, एकदातरी. अदिती
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 09/16/2009 - 04:55 नवीन
असेच म्हणते. बाली आवडले. नवपरिणित जोडप्याची वेषभूषा आणि चेहर्‍यावरचे भाव आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/14/2009 - 01:59 नवीन
डोळ्याचं पारणं फेडणारे फोटो...! अतिशय सुरेख!! यासोबत आपल्या प्रवासाचं वर्णनही वाचायला आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/14/2009 - 03:30 नवीन
डोळ्याचं पारणं फेडणारे फोटो...! अतिशय सुरेख!!
नेमके हेच बोल्तो.... नंदूशेठ, जियो....! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/14/2009 - 16:38 नवीन
बाकी छान फोटोज.. सू हा स...
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 09/14/2009 - 02:53 नवीन
आपले बालीचे फोटो फारच आवडले.दुसर्‍या लेखात तिथले वर्णन वाचायला आवडेल.पु.लंच्या भाषेत्'बाली हा समुद्रात फेकलेल्या पाचूंच्या बेटांतील कंठ्यातील कंठमणी' ! इथून जवळ असल्यामुळे तिथे जाण्याचा विचार आहे,आपल्या फोटोंमुळे तो पक्का झाला.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 09/14/2009 - 03:23 नवीन
फोटो अप्रतिम आहेत. फारच आवडले. बालीतील केचक नृत्याबद्दल यापूर्वी वाचले होते आता फोटोंतून बघताही आले. सोबत अनुभवही असते तर आवडले असते. विनिता हे देवीचे नाव आहे का विनता हे? विनता ही गरुडाची आई. सर्पजमातीची प्रत्यक्ष नसली तरी गरुडामुळे शत्रू. चित्रातील देवीच्या पायाशी सर्प आहेत असे दिसते पण ती त्यांवर विजय मिळवते असे दर्शवले आहे की ते तिचे वाहन, भक्त इ. आहेत हे कळून येत नाही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/14/2009 - 03:31 नवीन
विनता आहे त्यामुळे तो वैनतेय. हिंदी विकीवरचा संदर्भ. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/14/2009 - 04:35 नवीन
विनता आहे त्यामुळे तो वैनतेय.
करेक्ट! वैनतेयाची भरारी काय मशका साधते का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते... संदर्भ - गीत रामायण. आपला, (गदिमा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/14/2009 - 03:32 नवीन
सर्वच फोटो सुंदर आहेत... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 09/14/2009 - 04:41 नवीन
वाचल्यापासून मलापण बाली बघायची खूप इच्छा आहे. हे फोटो पाहून या पाचूच्या बेटाला भेट द्यायची इच्छा अजुन प्रबळ झाली. फोटो जबरदस्त.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/14/2009 - 04:33 नवीन
फोटो उत्तम. उलूवाटू जवळच्या माकडांनी काही त्रास दिला का? अजुन कुठले बालीनीज खाद्यप्रकार "इकान बाकार" वगैरे? गिटगीट धबधबा बघीतला का? किती जणांनी भारतातुन आलात ऐकल्यावर शाहरुख, बॉलीवूड हॅ हॅ हॅ केले? :-) अभिनेता शाहरुक खानवर भारी जीव हो बालीनीज बायकांचा :-) लोक एकंदर अतिशय हसतमुख, मदतीला तयार. हिंदू धार्मीक इतकी स्वच्छ देवळे व त्यांची सुंदर सजावट, देखरेख, पुजापाठ तर मी भारतात पण.... हॅ हॅ हॅ फूल्ल परवानगी आहे भौ बाली आमचे बहुसंख्य हिंदू नगर आहे, काय समजलात! आहाहा! काय आठवणी जाग्या केल्यात नंदूभौ! एक दिवस तर सगळ्यांना केचक डॉन्स, बाजारहाट पाठवुन मी व बाप्पा आमच्या अलिशान व्हिलामधे जीवनाचा आनंद लुटत होतो. कोण आहे रे तिकडे, समोरच्या झाडावर चढून शहाळे काढून द्या, कोण आहे रे तिकडे संध्याकाळच्या बारबेक्यु भोजनाची व्यवस्था करा इ इ बाली मधे पूलसाईड एकांत ओहोहो मंडळी स्वर्ग स्वर्ग... बाकी बालीमधील चिमणी अगदी भारतातल्या चिमणीसारखीच दिसली. काही लहान पोरं शेतात पतंग उडवत होती. हिरवीगार डौलदार भातशेतं, खड्डेविरहीत रस्ते, कष्टकरी शेतकरी, शेतात बुजगावणी, सहज उपलब्ध बियर बिंतांग, उत्कृष्ठ भोजन, प्रायव्हेट स्पा वॉचिंग सनसेट, वगैरे वगैरे :-)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 09/14/2009 - 07:23 नवीन
निस्ते हॅ हॅ हॅ करुन सहमतीच्या परतिक्रिया देता कधी कधी लिव्हा पण..म्हंजी कळल आमच्यासारक्या अडाण्यांना कुट काय असतं ते.. नंदुभौ... दिल खुश !!!!! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 09/14/2009 - 04:38 नवीन
एकदम मस्त फोटू की रं बाला! ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 09/14/2009 - 05:33 नवीन
वाह ! अतीसुंदर ! आवडले बरं का बालीदर्शन ;)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 09/14/2009 - 07:10 नवीन
सुंदर छायाचित्रे. बाली-इंडोनेशियातील हिंदु संस्कृतीबद्दल आणखीन माहिति अर्थातच तिथल्या चालीरिती, सण वगैरे ह्याबद्दल व तसेच इथे पिढ्यानपिढ्या पोसलेला जाती आधारित हिंदु धर्म भारताबाहेर थेट बाली मध्ये कोणत्या अवस्थेत आहे का तिथेहि जातपात वगैरे भानगडी आहेत का हे वाचायला आवडेल. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 09/14/2009 - 07:15 नवीन
अ प्र ति म !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Mon, 09/14/2009 - 08:51 नवीन
फोटो फारच छान आहेत्.बाली विषयी वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 09/14/2009 - 10:53 नवीन
तानालॉट हे बहुदा शेषनाग आणि विष्णु चे मंदीर आहे .. आम्ही तेथे अनुभवलेला सूर्यास्त अविस्मरणीय होता ..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/14/2009 - 11:25 नवीन
अतिशय अप्रतिम. अजून नीट लिहा हो बाली बद्दल. छायाचित्रं पाहून जबरी दिलखुश झाला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/14/2009 - 11:48 नवीन
मस्तच हो नंदुशेठ ! बसल्याजागी समग्र बालीदर्शन घडवलेत, धन्यवाद. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/14/2009 - 13:00 नवीन
'बालीदर्शन' असे घरबसल्या व्हायचा योग येईल असे वाटले नव्हते! अतिशय नयनरम्य फोटू आहेत. वरती अनेकजणांनी विनंती केली आहे तसेच म्हणतो की तिथल्या संस्कृतीबद्दल, रहाणीमानाबद्दल, चालीरीतींबद्दल लिहिता आले तर फारच उत्तम. (विमानतळाचं नाव 'देनपसार' किती छान आहे ना? मी आधी 'प्लेनपसार' असं वाचलं. ;) ) ('बाली'मय)चतुरंग
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 09/14/2009 - 14:39 नवीन
सुरेख फोटो! विनिता देवीची मूर्ती तर केवळ अप्रतिम आहे! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Mon, 09/14/2009 - 16:51 नवीन
सुंदर फोटो, बालीची सफरच घडवून आणलीत. आता आपले अनुभवही लिहावेत. अजिंक्य.
  • Log in or register to post comments
न
नंदू Mon, 09/14/2009 - 17:01 नवीन
तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल मन:पुर्वक धन्यवाद. माझं हे पहिलच लिखाण (याला लिखाण का म्हणावं हा पण प्रश्नच आहे म्हणा) असल्यामुळे जरा गंम्मत वाटतेय. असो. मला लिहीताना पण हे जाणवतच होतं की माहिती फारच त्रोटक होत्येय. लवकरच माझ्या या बाली प्रवासावर एक छोटासा वर्णनात्मक लेख नक्क्कीच लिहीन(पाडीन). तुमच्या दिलखुलास प्रतिक्रियांनी उत्साहित नंदू
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Tue, 09/15/2009 - 14:59 नवीन
at and post : janadu.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा