Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

"मेड इन चायना'पाठीमागचे रहस्य यात आहे!

म — मीनल, Mon, 02/25/2008 - 14:51

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5193 views

💬 प्रतिसाद
स
सुधीर कांदळकर Mon, 02/25/2008 - 15:55 नवीन

मुख्य म्हणजे संशोधकाचा आव न आणता. साधे सोपे व सहज. एवढा कठीण विषय आणि एवढी सोपी मांडणी. हे सोपे नाही महोदया. 

चिनी व्यापारी तसे चतुर आहेत. चीनमध्ये स्थानिक मिळणा-या वस्तूंचा दर्जा व निर्यात केल्या जाणा-या वस्तूंचा दर्जा यात तफावत केली जाते. शिवाय प्रत्येक देशात जाणा-या मालाच्या प्रकारात व दर्जात विषमता जाणवते. स्पष्ट करून सांगायचे म्हणजे चीनने अमेरिकेला पाठवलेला माल व भारतात पाठवलेला माल यांच्यात बराच फरक असतो.

हे निरीक्षण उल्लेखनीय. ठाऊक नव्हते. अभिनंदन व शुभेच्छा.

  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 02/25/2008 - 17:00 नवीन

आपली स्वतःची चीनी भाषा सोडता इतर कोणत्याही भाषेचा गंधही नसलेले चीनी उद्योजक, त्यांचे प्रचंड कारखाने, दहा वर्षांनंतरचे चित्र डोळ्यापुढे ठेवुन केलेली जागा/ यंत्रसामुग्री यातील गुंतवणुक हे निश्चितच थक्क करणारे आहे.

चीन मध्ये उत्कृष्ठ, चांगल्या, बर्‍या आणि सुमार अशा चार दर्जाच्या वस्तू बनतात असे माझे निरिक्षण आहे. कोणत्याही ग्राहकाला नाही म्हणायचे नाही हे त्यांचे धोरण. बि.एम.डब्ल्यु/ बेंझ सारख्या मोटारी, संगणक चीन मध्ये बनतात. डिसेंबर मध्ये गेलो असता २१ तारखेला सर्व प्रसारमाध्यमांना एकच विषय होता- शांघायच्या प्रदर्शनात ठेवेलेले ७२ आसनी ए आर जे २१ विमान! येत्या काही वर्षातच ही संपूर्ण देशांतर्गत बांधणीची विमाने अंतर्गत वाहतूकीपैकी ६०% वाटा उचलतील अशी अपेक्षा आहे!

प्रचंड संख्येने उत्पादन, तुलनेने स्वस्त श्रम, कमी आयात कर, अधिकाधीक कच्चा माल/ यंत्रे देशातच उपलब्ध, अत्यंत प्रगत अशी वाहतूक व्यवस्था, सुसज्ज बंदरे, अत्याधुनिक साधने यामुळे (व एके काळी सरकारकडुन कर्ज घेउन बुडविण्याची असलेली सवलत) यामुळे त्यांची उत्पादने स्वस्त नसली तरच नवल. शिवाय अनुसंधानावर युरोप्-अमेरिकेच्या तुलनेने नगण्य खर्च (तुम्ही शोधा आम्ही बनवतो:)) यामुळे किमतीच्या बाबतीत हे किफायती ठरतात.

ब्रुक बॉण्डचा चहा अगदी रुपया-दोन रुपयाच्या पाकिटातही मिळतो. ज्याच्या खिशात रोज सकाळी असलेल्या पाच रुपयात चहा-साखर-दूध हे समिकरण बसवायचे आहे त्याला चहाची किंमत किती रुपये किलो हे गौण असते तर त्याला असलेल्या रुपयात चहा मिळणे हे महतत्त्वाचे असते तदवत ५० रुपयांना विजेवर चालणारी आगगाडी अगदी गरिबालाही परवडणारी असते हे ओळखून अशा वस्तू दर्जावर तडजोड करून अशा ग्राहकांचे प्राबल्य असलेल्या बाजारपेठांसाठी आवर्जुन बनविल्या जातात. या वस्तु विकत घेणार्‍याला त्या फार टिकणार नाहीत हे माहित असते पण खिशाला परवडणार्‍या किमतीत त्याला आपल्या पोराना निदान चार दिवस का होइना पण आनंद देता येतो हे महत्त्वाचे असते. शिवाय मुले खेळणी हाताळणार आणि मोडणार तेव्हा भारीची खेळणी आणुन मुलांना खेळु न देता दुरुन पाहायला लावण्यापेक्षा वा मोडल्यावर ओरडण्यापेक्षा अशी खेळणी आणुन देणे अनेक पालक पसंत करतात. तीच गोष्ट दिवाळिच्या विजेवर चालणर्‍या माळांची. हल्ली घरात वसू जोंबाळायला जागा व वेळ नसतो. ४० रुपयंची माळ आणली आणि एक सण साजरा झाला तरी पैसा वसूल!

अनेकदा व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्याकरीत जाणुन बुजुन कमी दराच्या व अर्थातच कमी प्रतिच्या व उत्पादन बंद होउ घातलेल्या वस्तू मागतात. यात आपले दिल्लीचे व्यापारी आघाडीवर. मात्र तुमची दोन पैसे अधिक द्यायची तयारी असेल तर तुमच्या तपशिलाबरहुकुम व मागाल त्या दर्जाच्या वस्तू चीनमध्ये मिळतात.

जगात काय चालते आहे, कशाला मागणी आहे हे पाहण्यासाठी चीनी उद्योजक देशोदेशी प्रदर्शने पाहायला जातात, बाजारपेठांमध्ये काय वस्तु व किती किमतीला विकल्या जातात ते पाहायला जातात व आपल्या देशात त्याच वस्तू अल्पदरात बनवुन त्याच देशांना देउ करतात.

तात्पर्य सरकार, उद्योजक व कामगार या तिघांनीही प्रगतिचा ध्यास घेतलेला आहे असे दिसते.

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 17:08 नवीन

जगात काय चालते आहे, कशाला मागणी आहे हे पाहण्यासाठी चीनी उद्योजक देशोदेशी प्रदर्शने पाहायला जातात, बाजारपेठांमध्ये काय वस्तु व किती किमतीला विकल्या जातात ते पाहायला जातात व आपल्या देशात त्याच वस्तू अल्पदरात बनवुन त्याच देशांना देउ करतात.

हे अगदी खरे. मिनल तुझे निरिक्षण खूप जबरदस्त आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 02/26/2008 - 01:44 नवीन
अग, ते माझे निरिक्षण नाही.
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 02/25/2008 - 17:39 नवीन

ज्यांनी चीन पहीला आहे त्यांना तो आश्चर्य कारक वाटतोच.ज्यांनी पाहिला नाही त्यांनाही चीनचे कुतुहल असते असे मला वाटते. तेव्हा आणि आत ही माझी चीनची background कुणाला सांगितली की भुवया उंचावतात. हो ,अय्या ,कसं,काय अश्या अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु होतो.

आपण भारतीयांनी चीनचा फारसा अभ्यास केलेला नसतो. खोल इतिहास ही महिती नाही.शिवाय बरेच वर्ष तो देश `closed ` होता. आता ची प्रगती पाहुन चीनचे सर्वांना  कुतुहल  आहे.

त्यामानाने ब्रिटीश म्हणा ,अमेरिका म्हणा आपल्याला चांगलीच परिचयाची आहे.त्यामुळे त्याचे काहींना  आकर्षण असले तरी  कुतुहल  नाही.

चीनचे  कुतुहल  आहे पण   आकर्षण नाही. दोघातिघांना विचारल की अमेरिका जातोस की चीनला? तर प्रगती झालेला देश आणि प्रगती करणारा देश हा मुद्दा सोडला तर कुणीही चीन म्हणणार नाही.

मी बीजिंगला राहिले.It was very luxurious life .but I knew Chinese well. I mean at least communicable .Otherwise daily life  is also difficult even after living there for years.

But I feel it this is valid for any NonEnglish speaking countires.German,Russia ,French-- all same !You must know their language well to make your life not luxurious but easy.

Compared to that English speaking countries are easy to get in  routine and to settle.

Typing in English is faster ,so used English  words!

sorry for  that.

 

 

  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/25/2008 - 19:12 नवीन
"मागणीनुसार उत्पादन' हे समीकरण अचूक अवलंबले गेलेले दिसते. जपानसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंचा शोध लावणा-या देशाकडून माहिती मिळवणे, त्यातील बारकावे समजून घेणे व त्याची चक्क नक्कल करण......

भारतीय बाजारातील अनेक चीनी वस्तु पाहुन मनोमन याची खात्री पटते.

-------------------------------------------------------------------------------
फेंगशुई (आर्ट ऑफ प्लेसमेंट) या वस्तूंच्या रचनेच्या कलेचा वापर आपल्या समृद्धी व उत्कर्षासाठी करण्याचे फॅड भारतातही एवढे पसरले आहे की आपले भारतीय वास्तुशास्त्र सोडून लोक या चिनी कलेच्या नादी लागले आहेत.
------ १००% सहमत..... बांबुची रोपे,लाफिंग बुद्धा, तोंडात नाणे घेतलेला बेडुक,,,,पाण्याच्या थाळील कासव,,,,(हे अनेक व्यापार्र्‍यांकडे दुकानात ठेवलेले पाहीले आहे.) आणि आपल्या घरा समोरील तुळ्स मात्र कुठेतरी हरवली आहे.
-----------------------------------------------------------------------
सरकारनेही अंतर्गत राजकीय खेळी न खेळता, स्वहिताचे उद्दिष्ट गुंडाळून ठेवून जनहिताचे कार्य चालू ठेवले----------
आपले नेता मंड्ळी (विधान सभा ,राज्यसभा इथे कश्या प्रकारे कुस्ती खेळतात हे अनेक जणानी पाहीले असेलच्.....एक मेकांवर फेकलेले मईक आठवा.) या ड्ब्लु ड्ब्लु एफ साठी कोण्ता बेल्ट द्यायचा यांना?
---------------------------------------------------------------            
कडक नियम, नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाई व त्वरित शिक्षा यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे सोपे झाले.:--------
 आपल्या इथे :----- काय द्यायच ते बोला !!!!!(हे सोप्या भाषेत समजवणे फार कठीण आहे.)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 46 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 58 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा