Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

जोधा अकबर

आ
आनंद घारे
Tue, 02/19/2008 - 07:21
💬 10 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6875 views

💬 प्रतिसाद (10)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/19/2008 - 08:51 नवीन
जोधा अकबर चित्रपट अजून काही पाहिला नाही, पण आपल्या परिक्षणाने तो पाहण्याचा उत्साह निर्माण झाला आहे. तटस्थपणे केलेले परिक्षण आवडले हे सांगणे न लगे !!! अवांतर :- जोधा ही अकबराची सून होती आणि पत्नी सुद्धा अशी एक चर्चा आहे, आपणास काय वाटते ?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 09:54 नवीन
पण आपल्या परिक्षणाने तो पाहण्याचा उत्साह निर्माण झाला आहे. तटस्थपणे केलेले परिक्षण आवडले हे सांगणे न लगे !!! हेच म्हणतो! चांगलं लिहिलं आहे... अवांतर- राम राम आनंदराव. आमचं मनोगत सुटल्यापासून आज बर्‍याच दिवसांनी आपली भेट होते आहे! तशी एकदा ठाणे कट्ट्याला आपली प्रत्यक्ष भेटही झाली होती. असो, मिसळपाववर आपल्याला पाहून आनंद वाटला. आता इथेही लिहा निवांतपणे आणि स्वच्छंदपणे... आपला, (एक्स मनोगती) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Tue, 02/19/2008 - 17:57 नवीन
आंतर्जालावर मी गोगलगायीच्या वेगाने भ्रमण करतो. त्यामुळे मला मिसळ पावाचा इतके दिवस पत्ताच लागला नव्हता. आज पहिल्यांदा हे ठिकाण सापडले तेंव्हा त्याचे नांव वाचूनच मला सर्वात आधी तुमची आठवण झाली. तुम्ही नक्की इथे भेटणार असे वाटले. आता मिसळपावाच्या मेजवानीबरोबर कोणता राग ऐकवता आहात?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:04 नवीन
आज पहिल्यांदा हे ठिकाण सापडले तेंव्हा त्याचे नांव वाचूनच मला सर्वात आधी तुमची आठवण झाली. तुम्ही नक्की इथे भेटणार असे वाटले. हो, खरं आहे तुमचं आनंदराव! मलाही जालावर भ्रमंती करताना हे नांव वाचून खूप आनंद झाला आणि मीदेखील लगेचच या संकेतस्थळाचा सभासद झालो! ;) आता मिसळपावाच्या मेजवानीबरोबर कोणता राग ऐकवता आहात? आता आहात इथेच तर बोलूया निवांतपणे रागदारीवर. आपणही आपल्या सवाईच्या वगैरे आठवणी इथे लिहा.. तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Tue, 02/19/2008 - 09:16 नवीन
इतिहासकथांवर चित्रपट काढणार म्हणजे वाद हे होणारच. आजकाल जात, धर्म या विषयी पूर्वीपेक्षा जास्त संकुचित आणि संवेदनशील झाले आहेत. दिवानेआम आणि दिवानेखास हे वेगवेगळ्या लोकांशी शहेनशहाला भेटण्यासाठी असणारे कक्ष होते. आणि ते बहुधा प्रत्येक किल्ल्यात किंवा महालात/राजवाड्यात असायचे. उदा आग्रा किल्ला, फतेपूरसिक्री, लालकिल्ला. सकाळमध्येही श्रीपाद ब्रम्हे यांनी अनुकूल लेख लिहीला आहे. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Fri, 02/22/2008 - 05:53 नवीन
तेंव्हा इतिहास व भूगोलाचे ओझे मनावर न बाळगता एक काल्पनिक कथा म्हणून हा चित्रपट पाहिला तर ते नक्की आनंददायी ठरेल. चांगला आहे. भव्यता साधली आहे. राजस्थानी थाट मनात भरण्यासारखा आहे. जोधा-अकबरची जोडी ऐश्वर्या-रोशन यांनी जिवंत केली आहे@@ काही वेळा "नाट्य" ओढूनताणून आणल्यासारखे वाटते पण एकूण कथानकास इतिहासाचा टेकू नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 03/05/2008 - 14:14 नवीन
इतिहासात जोधाबाई हे व्यक्तित्व होते की नाही याबद्दल कांही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर वादविवादही सुरू आहेत. सम्राट अकबराने अ॑बरच्या (कछवाह घराणे) राजा बिहारीमलच्या सुस्वरूप कन्येशी विवाह केला होता जिचे नाव इतिहासास अज्ञात आहे. तिच्यापासूनच अनेक नवसा-सायासाने झालेला पुत्र म्हणजेच 'सलीम उर्फ जहा॑गिर' होय. ही राजपूत कन्या राजा भगव॑तदासाची बहिण व मानसि॑गाची आत्या होती. ती अकबराची लाडकी बायको असून तिला त्याने हि॑दू आचारधर्म वगैरे पाळण्याची पूर्ण मुभा दिली होती. अकबराला आणखी सुद्धा राजपूत राण्या होत्या. पुढे अकबराच्या शेवटच्या दिवसात सलिमने गादीसाठी बापाविरूद्ध ब॑ड पुकारले तेव्हा मानसि॑गाने सलिमच्या विरूद्ध त्याच्या मुलाची (खुश्रु) बाजू घेतली. तेव्हा मुलाची बाजू घ्यावी की भावाची अशा स॑भ्रमात पडलेल्या त्या राजपूत कन्येने को॓डमारा असह्य होऊन अफू खाऊन आत्महत्त्या केली (१६०४)
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Wed, 03/05/2008 - 16:01 नवीन
आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. सध्या या विषयावर जो गजहब चालला आहे, कांही राज्यात हा चित्रपट दाखवलासुद्धा जात नाही आहे . या पार्श्वभूमीवर मी खालील वाक्य लिहिले आहे. इतिहासात जोधाबाई हे व्यक्तित्व होते की नाही याबद्दल कांही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर वादविवादही सुरू आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 03/05/2008 - 16:29 नवीन
सोळाव्या शतका॑त घडलेल्या गोष्टी॑बद्दल आज वाद घालणे मला तरी अर्थहीन वाटते..अर्थात तो ह्या लेखाचा विषय नाही. अकबराबद्दल समग्र माहिती 'रवि॑द्र गोडबोले लिखीत 'सम्राट अकबर' ह्या पुस्तकात मिळेल. तुम्ही परिक्षण छान लिहिले आहे..अभिन॑दन
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/05/2008 - 19:08 नवीन
इतिहासात जोधाबाई हे व्यक्तित्व होते की नाही याबद्दल कांही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर वादविवादही सुरू आहेत. तसेच अकबर बादशहा हा खरोखरीच तेवढा महान नव्हता. हिंदू जनतेची दिशाभूल करण्यासाठी इंग्रजांनी त्याला महानपण चिकटवले असा आरोपही कांही लोक करतात. अकबर हा सम्राट होता. आणि मोंगलांच्या परंपरेला तडा जाणारे अनेक निर्णय त्याने त्याच्या कारकिर्दीत घेतले होते. जसा त्याने जिझिया कर रद्द केला तसेच हिंदूंवर लादला गेलेला यात्रा करही त्याने रद्द केला होता. आणि जिझिया हा कर रद्द केला म्हणजे मुस्लिम धर्म शास्त्रांत त्याने ढवळाढवळ केली असे म्हणावे लागेल. ज्या हिंदूस्थानात आपण आलो तिथे आधीपासून राहणारे हिंदू हे आणि नंतर आलेले आणि स्थायिक झालेले मुस्लिम यांना एकत्र ठेवायचे असेल तर त्यासाठी धर्मशास्त्रही बदलाण्याइतका काळाच्या पुढचा विचार करणारा अकबर होता. इतकेच नव्हे तर अकबराने स्वतः निरक्षर असूनही हिंदू-मुस्लिम, ख्रिश्चन पारशी अशा धर्मांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. त्याच्या "इबादत खाना" या वास्तूमध्ये धार्मिक चर्चा घडत. या चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वधर्मांच्या विद्वानांना आमंत्रणे दिली जात. जनतेच्या हितासाठी त्याने मुस्लिमधर्म गुरूंचे अधिकारही कमी केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. सगळ्या धर्मांच्या अभ्यासातून त्याने स्वतःचा असा दिन्-ए-इलाही हा पंथ स्थापन केला होता. पण तो धर्म्/पंथ स्विकारण्याची त्याने कोणावरही सक्ती केल्याचा पुरावा अथवा उल्लेख इतिहासात नाही. .. म्हणूनच जोधा-अकबर मध्ये घेतलेले प्रसंग किंवा उल्लेख हे काल्पनिक असावेत असे नाही म्हणता येणार. त्यामुळे या सिनेमावर बंदी घालणे किंवा त्यावर वाद-विवाद होणे म्हणजे एका चांगल्या कलाकृतीला मुकण्यासारखेच आहे. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 49 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 1 minute ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 5 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 9 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा