ख ल्ला स..!
तूर्तास इतकेच म्हणतो...!
संतमंडळी म्हणतात, 'मनात मोह, माया. लोभ यांना थारा देऊ नका.'
अहो पण या अश्या पा कृ वाचल्यावर कसं जमायचं हो हे?! :)
असो..
स्वातीताई, तुमच्यामुळे आणि प्रभाकरपंतांमुळे मिपाचं स्वयंपाकघर दिससेंदिवस समृद्ध होत आहे एवढं मात्र खरं!...
आपला,
(तृप्त!) तात्या.
एकाच दिवशी कोलंबी भात आणि कोंबडी- वडे अशा दोन दोन फर्मास पाककृत्या दिल्यावर काय करावे बरे....?
काय करावे ह्याचा निर्णय न झाल्याने आजचा रविवार उपासच घडणार असे दिसते.
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती. कोंबड्याच्या तळलेल्या, उकडलेल्या , भाजलेल्या पीसाचे आम्ही चाहते. आपली पाककृती " आमच्या किचनचा मुड " पाहून बनवायला सांगीन. बाय द वे, चिकनच्या पीसला जे पेष्ट लावतात तळण्यासाठी, ते हरभ-याचे पीठ त्याबरोबर आणखी काय असले पाहिजे ?
अवांतर :) आम्ही आमच्याकडे नॉन व्हेज रेसेपीचे दोन चार पुस्तके आणलेली आहेत. पण कोणाची नजर लागते कोणास ठाऊक. आम्ही अनेकदा प्रयत्न केलेत, पण पुस्तकातल्या पाककृतीची टेस्ट प्रत्यक्षात कधी आलीच नाही :(
डॉ. बिरुटे सर,
वरील पाककृती दिली कारण मी जशी करते तशी पाककृती मी अगोदर दिली आहे तरी पण आता देत आहे.
तशी केलीत तर मस्त टेस्ट येईल.
१/२ किलो चिकन, २टे.स्पून तीळ,१ टे.स्पून खसखस,२ टे.स्पून सुके खोबरे,२ टे.स्पून ओले खोबरे,२+१ कांदे, १/२ टी.स्पून लसूण,१/४ टी.स्पून आले, १/४ टी.स्पून हळद, १ टी.स्पून गरम मसाला.२टी.स्पून तेल, मीठ चवीनुसार
प्रथम खोबरे, तीळ्,खसखस, कांदे भाजून घ्यावे. आले,लसुण कोथिंबीर वाटून घ्यावे
एका पातेल्यात तेल घालून १ कांद बारीक चिरून त्यात घालावा,नंतर तिखट घालावे व परतावे. नंतर वरील बारीक केलेल मसाला घालून तेल सुटे पर्यंत परतणे.नंतर चिकन घालून शिजवणे.चवीनुसार मीठ घालणे. रस्सा जास्त पातळ नको.
स्वाती..
'मिसळपाव' म्हंटले की, केवळ कोल्हापूरी मिसळच आठवते तसेच मिसळपाव . कॉम म्हंटले की कोल्हापूरी पाककृतीच आठवायला लागल्या आहेत.
इतकी मस्त रेसिपी दिली आहेस ना इथे.. काय सांगू?
आता तात्याना, इथे कोल्हापूर दरबार नावाचा एक पाककृतींचा टॅग बनवायला सांगायला हवा.
- (कोल्हापूरी मिरची) प्राजु
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती.
कोंबड्याच्या तळलेल्या, उकडलेल्या , भाजलेल्या पीसाचे आम्ही चाहते.
आपली पाककृती " आमच्या किचनचा मुड " पाहून बनवायला सांगीन.
बाय द वे, चिकनच्या पीसला जे पेष्ट लावतात तळण्यासाठी, ते हरभ-याचे पीठ त्याबरोबर आणखी काय असले पाहिजे ?
अवांतर :) आम्ही आमच्याकडे नॉन व्हेज रेसेपीचे दोन चार पुस्तके आणलेली आहेत. पण कोणाची नजर लागते कोणास ठाऊक.
आम्ही अनेकदा प्रयत्न केलेत, पण पुस्तकातल्या पाककृतीची टेस्ट प्रत्यक्षात कधी आलीच नाही :(