Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ...

छ
छोटा डॉन
Tue, 02/12/2008 - 17:52
💬 12 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14919 views

💬 प्रतिसाद (12)
स
स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 18:02 नवीन
यालाच जीवन म्हणतात...
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 02/12/2008 - 18:16 नवीन
कितीतरी मुलींचही होतंच की..मुलाचे आईवडील लग्नाला होकार देत नाहीत..मग तो शेवटी नाही म्हणतो लग्नाला...शिवाय लग्न करून त्याचे आईवडील छळ करतात ते मुलींचेच... मुलाने त्यांचं न ऐकता प्रेमविवाह केला म्हणुन... आता त्याने प्रेम केलं तसंच तिनंही प्रेम केलं असेल पण ते प्रॅक्टीकल नव्हतं..तिला वाढवलेल्या आई वडिलांच्या इच्छेचा तिने आदर केला ही तिची चूक का? मग तिथूनही बोलणार कशा या मुली पळून जातात म्हणून.. हे कुणाच्याही बाबतीत होतं कितीतरी मुलं खूप भटकल्यावर सांगतात माझ्या घरी कधीच चालणार नाही टाटा बाय बाय... स्वाती म्हणते तेच खरं हेच आयुष्य आहे...लोक भेटत रहातात कधी चांगले तर कधी वाईट वागत रहातात आणि आपण पुढे जात रहातो..जमेल तेव्हा मदत करतो पण म्हणून परतफेडीची अपेक्षाच करणं चुकीचं असतं ह्यात मुलं आणि मुली असा सुर नका हो लावू...तुमच्याच ओळखीत कितीतरी साध्या आणि असं न करणार्‍या मुली असतील की.....
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 16:25 नवीन
आपण वर व्यक्त केलेली सर्व मते मला मान्य आहेत पण हे सर्व होणार ही शक्यता जवळजवळ माहीत असून सुध्धा मुलाकडून अथवा मुलीकडून ही चूक घडतेच. हे पण बरोबर आहे की 'प्रेमाच्या कल्पनेच्या मनोराज्यात रमणे" व "प्रॅक्टिकल लाईफ " यात खूप अंतर आहे. कारण शेवटी "लाईफ इज ऍन ऍडजस्टमेंट ". प्रत्येक केलेल्या मदतीबद्दल परतफेडीची अपेक्षा करणे चूकच आहे. पण मला असे वाटते की "जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्ण तन / मन / धन लावून जर कूणावर प्रेम करत असेल आणि त्याची जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थीत कल्पना असेल तर ती व्यक्ती इतक्या 'पोलाईटपणे नकार ' कसा देऊ शकते ???" तीच्या मनात काहिच भावना नसतील काय ? नसतील तर आत्तापर्यंत झाले ते सर्व "नाटकच " म्हणावे लागेल ......
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 19:32 नवीन
मस्त वास्तवदर्शी कथानक -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 02/13/2008 - 16:57 नवीन
जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्ण तन / मन / धन लावून जर कूणावर प्रेम करत असेल आणि त्याची जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थीत कल्पना असेल तर ती व्यक्ती इतक्या 'पोलाईटपणे नकार ' कसा देऊ शकते ???" तीच्या मनात काहिच भावना नसतील काय ? नसतील तर आत्तापर्यंत झाले ते सर्व "नाटकच " म्हणावे लागेल ...... आता हे समोरच्या व्यक्तीला माहीत आहे हे कशावरून हा पहीला प्रश्न मला पडतो..काही जण अगदी सहज मैत्रीण म्हणूनही मदत करणारे भेटतात्...आणि खरोखर खूप मदत करतातही..तिने कसं समजावं की नक्की हा आपल्यावर प्रेम करतो... दुसरी गोष्ट ती कदाचीत तितकंच प्रेम करतही असेल त्याच्यावर पण तिला माहीती आहे की ह्याचा अंजाम चांगला होणार नाहीये...तिला माहितेय की हे सगळं अजिबात शक्यच नाहीये..मग हेच रडून आहे रे माझही प्रेम पण हे नाही जमणार असं सांगितलं की तो म्हणणार तू तयार असशील तर आपण पळून जाऊ जे तिला करायचं नाहीये...काही मुलं त्याही वर जाऊन तिला प्रेशराईज करू शकतात्...त्यातुन तिच्या आई वडिलांना मनस्ताप होऊ शकतो..तिच्या घरी कुणी हार्ट पेशंट असु शकतं....त्यासाठी तिला हे सगळं टाळायचंय्....मग ती काय करेल? सांगेल माझं प्रेमच नाहीये...मग हे जास्तं सोप्प होईल ना.... ह्या सगळ्या शक्यता झाल्या...असंच असेल असं नाही पण वाद टाळण्यासाठी खोटं बोलणं अगदीच काही चुक नाही...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/13/2008 - 17:28 नवीन
वरदा, तुझे दोन्ही प्रतिसाद आवडले, छान मनमोकळे वाटले. छोट्या डॉन साहेबांनीही छान लिहिलं आहे. स्वातीताईशी सहमत.. छोटे डॉनराव, और भी लिख्खो.. तात्या.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/13/2008 - 19:10 नवीन
तू मांडलेल्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत ..... जन्मभर मनस्ताप करून घेण्यापेक्षा एकदा खोटे बोलणे कधीही उत्तम .....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/13/2008 - 18:28 नवीन
ह्या सगळ्या शक्यता झाल्या...असंच असेल असं नाही पण वाद टाळण्यासाठी खोटं बोलणं अगदीच काही चुक नाही... हे मात्र अगदी खरं आहे. बर्‍याच वेळेला खोटं बोलावं लागतं. वरदाच प्रतिसाद आवडला. - प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/14/2008 - 05:19 नवीन
'त्याने' आणि 'तिने' डोळस प्रेम करावे. जेंव्हा तो तिच्यासाठी इतकं काही करतो आहे आणि तीही आनंदाने ते करवून घेते आहे तेंव्हा (आजकालच्या जमान्यात तरी) 'तिला' 'त्याच्या' भावनांची अजिबात कल्पना नव्हती, नसेल असे मानणे दांभिकपणाचे होईल. मुलांपेक्षा मुलींना 'सिग्नल्स' जास्त झटकन कळतात हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. जो पर्यंत 'त्याने' प्रेम शब्दांत व्यक्त केलेले नाही तो पर्यंत आपणही 'नकार' शब्दात व्यक्त करायचा नाही. पण त्याच्या 'त्या' भावनांचा पुरेपुर फायदा मात्र करून घ्यायचा ह्याला स्वार्थ ह्या शिवाय दूसरा पर्यायी शब्द नाही. हे असे ,मुलाने किंवा मुलीने, कोणीही वागणे गैरच ठरावे. आपल्या घरात ज्याचा/जिचा स्विकार होऊ शकेल किंवा होऊ शकणार नाही, आपल्या घरातील एखाद्याला हार्टचा त्रास आहे किंवा नाही ह्याची त्याला/तिला पूर्वकल्पना असतेच. त्यानुसारच स्वतःचे वर्तन ठेवावे अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. ज्याचे/ जिचे ज्याच्यावर/जिच्यावर प्रेम असते त्याने/तिने त्याच्या/तिच्या जवळ ते लवकरात लवकर व्यक्त करावे आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जात नाही आहोत ह्याची खात्री करून घ्यावी. प्रत्यक्ष आयुष्यातही एखादा पत्ता शोधताना आपण इतरांना विचारत विचारत आपण चूकीच्या रस्त्यावर तर जात नाही नं ह्याची खात्री करीत पुढे जातो. प्रेमाच्या गावी जातानाही 'त्या' व्यक्तीला विचारुन आपण योग्य त्या वाटेवर आहोत ह्याची खात्री करून घ्यावी म्हणजे अतिदूर गेल्यावर 'पत्ता चुकल्याच्या' भावनेला आपण अडखळून तोंडघशी पडत नाही. मुलींनीही जो मुलगा आवडत नाही, ज्याला आपल्या घरात स्विकारणार नाहीत किंवा आवडत असला तरी ज्याच्याशी लग्न केल्याने आपल्या घरातील कोणास हार्ट ऍटॅक येण्याचा ECG रिपोर्ट आपल्या हाती असेल तर, त्या मुलास उभयतांच्या नात्यातील स्वतःच्या भूमिकेची स्व्च्छ कल्पना द्यावी, अंधारात ठेवू नये. शुद्ध मैत्रीचे प्रपोजल मांडावे. ते स्विकारले तर उत्तमच आहे आणि नाकारले तर भिन्न मार्ग (दोघांनीही) अनुषंगावे. मुलांनीही ज्या मुलीत त्यांना तसा इंटरेस्ट असतो त्यांनी लवकरात लवकर आपल्या भावना स्पष्ट शब्दात तिच्या जवळ व्यक्त करून तिचा कल समजून घ्यावा. तिने तुम्हास प्रियकर म्हणून स्विकारले तर नंतरची कांही वर्षेतरी दोघांनाही स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असा अनुभव येईल परंतु कुठल्याही कारणाने तिने नकार दिला तर खचून जाऊ नये. मनात राग धरून आपल्या तथाकथित प्रेमातील उथळपणाचे प्रदर्शन तर अजिबात करू नये. तुमच्या इतकीच तीही एक व्यक्ती आहे आणि तिलाही तिची स्वतःची मते आहेत. (कदाचीत तुम्हाला न पटणारी) त्यांचा आदर करावा. मुलीने नुसत्या मैत्रीचा आग्रह धरला तर, ती म्हणाली नाही तरी त्यात, शारीरिक सुखाला यत्किंचितही जागा नसते/नसावी हे ध्यानात असू द्यावे. पण त्या मैत्रीच्या नात्यात मुलीने जर शारीरिक संबंधांना हिरवा सिग्नल दाखवला तर मात्र अशा मुली पासून चार हात दूरच राहावे. (इथे मनाचा निग्रह भयंकर लागतो) एवंच काय तर प्रेम डोळे उघडे ठेवून करा.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 02/14/2008 - 07:14 नवीन
बरेच वेळा थोड्याफार फरकाने अगदी असच घडत...
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 02/14/2008 - 13:57 नवीन
की एक कुणी दोशी असेल असं नाही...फक्त मुलीच असं करतात हे म्हणणं चूक आहे. माझ्या कॉलेजमधल्या एका मुलाचे ३ वर्षे एका मुलीबरोबर अफेअर होते आणि शेवटच्या वर्षात अचानक तो दुसर्‍या मुलीशी लग्न करून कॉलेजला आला. सगळेच चमकले. का तर म्हणे त्याची आजी खूप म्हातारी होती आणि तिला नातवाचं लग्न बघायचं होतं तेही त्यांच्याच नात्यातल्या कुणी मुलीशी...त्याने तिला साधी कल्पनाही दिली नाही की तो लग्न करणारे ह्याची. हे असं मुलंही करतात..तिचं बिचारीचं अभ्यासातंलं लक्ष एवढं उडालं की १ वर्ष वाया गेलं...
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 15:56 नवीन
त्याने प्रथम ही मदत सौजन्य म्हणून देखील केली असेल. ती शहरात नवीन असल्यामुळे. तिचे रूप, तिचे विचार, तिचा स्वभाव त्याला आवडले की नाही हे दिलेले नाही. केवळ मुलगी आहे म्हणून कोण उठसूठ प्रेमात पडत नाही. त्या चा देवावर विश्वास नसताना तो तिच्यासाठी तिच्याबरोबर देवळात जायचा. हे विचित्र वाटले. पुरूष एवढा बदलू शकतो? तो एवढा कणाहीन आहे? तिने त्याच्यासाठी काय केले? काही नाही? मग ती स्वार्थी आहे. आणि तो मूर्ख आहे. आणि तिचा निर्णय अपेक्षितच आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा