Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आम्ही कोण?

ध — धोंडोपंत, Sun, 02/10/2008 - 14:18

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11243 views

💬 प्रतिसाद
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2008 - 14:25 नवीन
अपुरे ते अन्न | भूक वरदान तरी समाधान | चित्तालागी || ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग असे अंगसंग | कैवल्याचा || जसे शांतपणे | आलो या जगात जाऊ ही स्वर्गात | शांतपणे || वा, सुदंर ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 14:26 नवीन
हवी आंम्हा फक्त | थंडीला शेकोटी गांडीला लंगोटी | आम्ही सुखी || भोजना मिळू दे | दोन वेळा भात पान आणि कात | थुंकायला || वा धोंड्या! भरून पावलो रे तुझी कविता वाचून...! शिंच्या धोंड्या तुझ्यासारखं, त्या रांडच्या केशवासारखं मलाही लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं रे! लेको, तुमचा हेवा वाटतो रे! :) असो, उत्कृष्ट काव्य! क्या बात है... आपला, तात्या देवगडकर.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 02/10/2008 - 14:40 नवीन
पंत कोकणासारखीच सुंदर कविता.येऊ द्या अजून. (मूळचा कोकणवासी) -इनोबा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 14:52 नवीन
आम्ही फणस काटेरी, आतुन गोड गर्‍यासारखे शेलक्या शिव्या देणारे, परि काही न मनी ठेवणारे! :) (शिवराळ) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/10/2008 - 15:04 नवीन

लै भारी लिव्हलंय.... कोकणाचं शब्दचित्रं डोयासमोर उभ राह्यलं.
असच लिव्हीत राव्हा :)

सा-याच वळी जब्रा हायेत पर.........
आमी आमचा माथा खालच्या वळीवर टेकला.

ज्ञानियाची ओवी | तुक्याचा अभंग
असे अंगसंग | कैवल्याचा ||

पंताचा स्नेही प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हैदर अली Sun, 02/10/2008 - 15:07 नवीन
वा पंत वा !! क्या बात है !! सुंदर ! आणखी वाचायला नक्की आवडेल. आपला हैदर अली
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 15:16 नवीन
आनंदाचा क्षण | येता जरी पहा पिऊ अर्धा चहा | टपरीत || नाही परदेशी | केले पर्यटन आमुचा कोकण | आंम्हा प्यारा || रेवस पावस | खेड चिपळूण लांजा मालवण | स्वर्ग आंम्हा || किर्र किर्र वाजे | खळ्यात रहाट नागमोडी वाट | समुद्राची || हे एकदम छानच अथांग सागर | कोकणा लाभल जगाला वाटला | हेवा त्याचा || समृद्धी सुबत्ता | येई ना कोकणा हाचि परगणा | दुष्काळाचा || माझ्या स्वप्नातले कोकणांतले घर.. समोर अथांग सागर पसरलेला आणि मी घराच्या अंगणात खुर्ची टाकून गरम चहाचा कप हातात घेऊन त्या समुद्राकडे पहात बसले आहे.. वा..वा.. - प्राजु
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 15:18 नवीन
विसरलात की काय? गजालीशिवाय कोकण नाही महाराजा. पण कविता सुरेखच. मलादेखील तात्यांप्रमाणे आपला हेवा वाटतो.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sun, 02/10/2008 - 15:41 नवीन
फार छान. तुमचा हेवा वाटला पंत... (कोकण नशीबात नसलेला कोकणस्थ) अविनाश ओगले.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 04:27 नवीन
पंत! अगदी सहजसुंदर काव्य. त्यात माझी मोडकी तोडकी भर. तुमच्या पद्धतीने सुधारून घ्या. माडांच्या बनात | निवांत बसून कराव्या गजाली | वार्‍याच्या कानात||
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 02/11/2008 - 06:06 नवीन
कराव्या गजाली | बसून निवांत | माडांच्या बनांत | वार्‍यासंगे ||
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/11/2008 - 06:24 नवीन
कराव्या गजाली | बसून निवांत | माडांच्या बनांत | वार्‍यासंगे || सुंदर...! :) (गजालिकार) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 02/11/2008 - 04:51 नवीन
आम्ही नक्की कोण आहोत आणि कसे आहोत, ते या कवितेतून उलगडेल असे वाटते. हो तसे उलगडल्यासारखे वाटतेय नक्की. कोणाला कसाही वाटो किंवा आवडो न आवडो, पण कोकणावर, कोकण संस्कृतीवर भरभरून प्रेम करणारा, प्रपंच, कला, संस्कृती मधे रमणारा, बडेजाव न मानणारा तसेच बडेजाव न दाखवणारा, कोकणाच्या मातीत पाय घट्ट रुजलेला रोख ठोक माणुस आम्ही पाहीला. पंत तुमची भर ही आवडली. कोकणाची लज्जत चाखवावी क्लांत मने शांत करावी सहल लवकर घडावी आमुच्या धोंडोपंतांच्या गावी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/11/2008 - 05:15 नवीन
सहजराव, मिसळपावच्या संस्काराने रसिक कविता करु लागले आहेत असे म्हणायचे का ? ( ह. घे. ) कोकणाची लज्जत चाखवावी क्लांत मने शांत करावी सहल लवकर घडावी आमुच्या धोंडोपंतांच्या गावी आपलीही इच्छा आहे, आमच्या पंताच्या कोकणात जायची, एक दिवस मुक्काम करु, त्यांच्या गझला ऐकू , काही ज्योतिषाचे किस्से ऐकू , धूम करु च्यायला. पंत, आपणास वेळ आहे ना ? :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 02/11/2008 - 10:06 नवीन
पंत.. एकदम, सहज, सोपी, सुंदर कविता..खूप आवडली इथे राणीच्या देशात समुद्र आहे पण ते साला कोकणची मजा नाय... आम्ही इथे कशा कशाला मुकतो आहोत ह्याची जाणीव करून दिल्या बद्दल धन्यवाद.. (राणीच्या देशातला कोकणस्थ) केशवसुमार
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/11/2008 - 15:22 नवीन
कोकणचा राजा | आंबा हा हापूस | वाटे मज खास | स्वर्गीय हा || काटेरी तरी ह्या | फणसाचे गरे | खातातरी बरे | लागतात|| जरा दिसे तोही | काजूचा आकडा| थोडा तो वाकडा | फेणी देई || शहाळेही मोठे | गोड खोबर्‍याचे | पाणी थंडगार | तृप्त करी || कोकमेही लाल | घेता सरबत | जातात निघून | उन्हाळे ही || किती सांगू तुम्हा | कोकणचा मेवा | भरुन तो ठेवा | अंतरंगी || कोकणी माणूस | असेल लहान | परि तो महान | कर्तृत्वाने || कोण तो रे आता | विचारी आम्हास | कोकणाचे मित्र | आम्ही कोण?|| 'धोंडो' केले काव्य | कोकणाची ओवी || स्फुरल्या ह्या ओळी | 'चतुरंगे || चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/11/2008 - 15:52 नवीन
चतुरंग, तुमचे पाय धरावे वाटतात. किती अप्रतिम काव्य केले आहे..! आजपासून मी तुमची शिष्या... जरा दिसे तोही | काजूचा आकडा| थोडा तो वाकडा | फेणी देई || शहाळेही मोठे | गोड खोबर्‍याचे | पाणी थंडगार | तृप्त करी || आणि 'धोंडो' केले काव्य | कोकणाची ओवी || स्फुरल्या ह्या ओळी | 'चतुरंगे || शब्दच नाहित.. सुंदर.... - प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/11/2008 - 16:07 नवीन
लाजवू नका हो! कुणालाही शिष्यत्व वगैरे देण्याएवढा मी महान नाही हो! साधा कोकणी माणूस मी, मि.पा.वर लुडबुडतो झालं. इथल्या सगळ्या प्रतिभावंतांचा सहवास मिळून त्याचा थोडा सुवास मलाही चिकटला असावा, श्रीखंडाला हापूसचा स्वाद लागल्यावर त्याचं आम्रखंड होतं ना, तसा! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 02/11/2008 - 16:24 नवीन
धोंडोपंतांनी छान काव्य केले आहे. कोकण वर किती प्रेम आहे ते कळते. चतुरंग यांनी कमालच केली.छुपे रुस्तम निघाले. प्राजु चे कौतुक करायला तर माझेकडे शब्द्च नाहीत. तिला इतक्या छान छान कविता आणि चारोळ्या कशा सुचतात? याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. :))
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/11/2008 - 17:19 नवीन
धोंडोपंत, कविता अतिशय आवडली.. अगदी कोकणात असल्यासारखं वाटलं :) अजून येऊ द्या -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 02/11/2008 - 17:45 नवीन
फारच सुंदर! वाचताना हसुही येत होते आणी आनंदही वाटत होता. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा