आवडले चित्र...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मस्त आहे कला़कृती.अगदी बारकावेही दाखवले आहेत,म्हणजे झाडाच्या फांद्या,गळलेले पान.अतिशय सुंदर. =D> =D> =D>
अवांतर-सुरुवातीला 'माझी कलाकृती... फॉल कलर्स...' शीर्षक वाचून फॉल कलर्स म्हणजे साडीच्या फॉलचे कलर्स वाटले. :/ म्हटलं ही काय भानगड आहे? :? मग टिचकी मारल्यावर माझा वेडेपणा लक्षात आला. #o
राग आला असेल तर माफ करा.
फॉल ऋतू म्हणजे आपला शिशिर. हे चित्र पहाताना मला मर्ढेकरांच्या शिशिरागमन या कवितेची आठवण झाली. फार सुंदर कविता आहे. सर्वांसाठी ही कविता देत आहे:
शिशिर ऋतूच्या पुनरागमे
एकेक पान गळावया
का लागता मज येतसे
नकळे उगाच रडावया॥
पानात जी निजली इथे
इवली सुकोमल पाखरे
जातील सांग आता कुठे
निष्पर्ण झाडीत कापरे?
फुलली असेल तुझ्या परी
बागेतली बकुलावली
वाळुत निर्झरी बासरी
किती गोड ऊब महितली
येतील ही उडुनी तिथे
इवली सुकोमल पाखरे
पानात जी निजली इथे
निष्पर्ण झाडीस कापरे!
पुसतो सुहास स्मरुनीया
तुज आसवे, जरी लागले
एकेक पान गळावया
शिशिर ऋतूच्या पुनरागमने॥
- नाटक्या
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी