Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

फस्क्लास भेळ !!

ड
डॉ.प्रसाद दाढे
Sat, 02/02/2008 - 17:59
💬 26 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 13193 views


वाचनखूण लावा
| 13193 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (26)
इ
इनोबा म्हणे Sat, 02/02/2008 - 18:04 नवीन
प्रसादराव, लॉ कॉलेज जवळच्या कॅनॉल रोडवर गणेश भेळवाला आहे,तिथे एकदा भेट देऊन बघा.काय मस्त भेळ आहे! (पक्का पुणेरी)-इनोबा
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/02/2008 - 18:06 नवीन
हो हो..तीही मी खाल्लीय!! सॉलीड आहे..!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 02/02/2008 - 18:10 नवीन
कल्पना
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 02/02/2008 - 18:13 नवीन
आमच्या कोल्हापूरच्या राजाभाऊची भेळ खाऊन पहा... या सगळ्या भेळी विसरून जाल.. - (राजाभाऊ भेळप्रेमी)प्राजु
  • Log in or register to post comments
र
रम्या Mon, 02/04/2008 - 10:24 नवीन
अगदी बरोबर प्राजु, मी राजाभाऊंची भेळ एकदाच खल्ली आहे. पण खाताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो आहे. या भेळीसाठी कांदा कापणार्‍या माणसा समोर मोबाईल स्टॉपवॉच सुरू केला. पठ्ट्याने १५ सेकंदात एक पुर्ण कांदा बारीक कापला!! रम्या
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 02/06/2008 - 03:13 नवीन
प्राजु आणि रम्या! सहीच रे. राजाभाउ भेळ बेष्टच. रंकाळ्याला गेला की सगळ्या गाड्यांवर राजाभाउ लिहिलेल आहे. मी एकाला विचारल तर तो फक्त हसला होता. :) चव मात्र चांगलीच होती. (कोल्हापुरात भेळ वाला मराठीच असतो) आणि आता इथे पुण्यात मात्र भैयाने बनवलेली भेळ खाववत नाही. :( मी आताशा भेळ खाण बंदच केलय पुण्यात. हा गणेश भेळेच नाव फार ऐकल आहे. त्यांच्या पुण्यात १७ शाखा आहेत अस वाचलय मी. तिकडे एकदा खावुन बघाव म्हणतो :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/02/2008 - 18:58 नवीन
भेळ आमच्या मुंबईच्या विठ्ठलची. व्ही टी स्थानकाजवळ! असो, दाढेसाहेब, तुम्ही मिपावर उत्तम मिसळ, भेळ मिळणार्‍या ठिकाणांचे संकलन करण्याचे हे जे काही सत्र आरंभले आहे ते अत्यंत स्तूत्य आहे...! :) उतम मिसळ मिळणार्‍या ठिकाणांच्या संकलनासोबतच उत्तम भेळ मिळणार्‍या ठिकाणांचेही संकलन आता होऊ द्या! आपला, (आवडत्या स्त्रीसोबत निवांत अश्या समुद्र किनारी मावळतीचे रंग पाहात पाहात भेळेची मजा लुटणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/03/2008 - 06:25 नवीन
फार पूर्वी फडके रोड, डो॑बिवली येथे 'रसना' नावाचे हॉटेल होते, तेथे भेळ फार झकास मिळत असे..पण ते दुकान (का कुणास ठाऊक?) ब॑द पडले आणि जिवास चुट्पुट लावून गेले.. पुणे- ब॑गळूर महामार्गावर खेड्-शिवापूर येथे 'वनपत्रे ब॑धू' या॑ची छान सुकी भेळ मिळते. वाटेत था॑बून ती सोबत बा॑धून घ्यावी आणि भेळीच्या फक्क्या मारत पुढील ड्रायव्ही॑ग करावे..
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 02/03/2008 - 06:34 नवीन
१) सिक्कानगर - गिरगांव २)ढोले पाटिल रोड.. पुणे ३) सुखसागर - मुंबई आणि बँगलोर ४) क्लेअर रोड - नागपाडा ५) बाभई नाका - बोरिवली (मंगेश वडापाव वाल्या समोर) तसेच दक्षिण-मध्य मुंबईत डोक्यावर टोपलि घेउन प्रत्येक चाळीत फिरणारे भय्ये सुद्धा चांगलि भेळ बनवतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 02/03/2008 - 09:20 नवीन
१५-१६ वर्षा॑पूर्वी सारसबागेबाहेरसुद्धा भेळ चा॑गली मिळत असे..आता माहीत नाही, खूप दिवसात खाल्ली नाही.. पुण्यात चा॑गले व रसाळ 'राय्-आवळे' हमखास कुठे मिळतात हो? मी खूप शोधतो आहे..मीठ मसाला लावलेले चन्या-मन्या बोरे, राय आवळे हे कॉम्बिनेशन म्हणजे लहानपणात परत गेल्या सारखे वाटते..शाळेतून परत घरी येताना (कि॑वा शाळा बुडवून पिक्चर पाहताना) खाण्याचा खाऊ असायचा तो..
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 02/03/2008 - 19:25 नवीन
मंडईत, मंडईच्या बाहेर रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांपाशी मिळतात. पण ते सिझनल आहेत, वर्षभर कधीही असे मिळत नाहीत. मला वाटतं नवरात्रीनंतर येतात, तरी मंडईतल्या भाजीवाल्यांनाच विचारून खात्री करावी. (खट्टामीठा) पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 12:05 नवीन
आमच्या कोल्हापूरच्या राजाभाऊची भेळ खाऊन पहा... जशी झणझणीत मिसळ प्रसिद्ध तशीच चमचमीत भे़ळ...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/04/2008 - 15:07 नवीन
सरदवाडीला सुकी भेळ (तिथे भेळभत्ता असा शब्द आहे) फार छान मिळते. नगरला लालटाकी जवळ (हा रस्ता पुढे शिर्डी कडे जातो) "अंबिका" भेळ - केवळ सुंदर! (चुकून "जगदंबा" असे लिहिले होते -आमच्या सौं.नी लगेच दुरुस्त केले!) त्याच्याकडची पाणी-पुरी सुद्धा हाय हाय..! चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 02/03/2008 - 18:38 नवीन
पूर्वी शुक्रवार पेठेत काळ्या हौकाकडून बुरुड आळी कडे जाताना लागणार्‍या गल्ली मधे एक सोमणी नावाचे वृद्ध गृहस्थ भेळेचे दुकान चालवायचे ती भेळ मला फार आवडायची.... डॉक्टरसाहेब याबद्दल आपल्याला काही माहीती आहे का? बरेच दिवसात त्या बाजूला गेलो नाही. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 02/04/2008 - 03:35 नवीन
क्षमस्व, मला ते ठिकाण माहित नाही..
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 02/04/2008 - 06:48 नवीन
शिवाजीनगर स्टेशन : झटका भेळ .... निगडी : जय महाराष्ट्र भेळ .... अतिशय फर्मास व कमीत कमी २ प्लेटा हाणल्याशिवाय जिभेची आग शांत होत नाही .... ता.क.: आम्ही भेळ खल्ल्या नंतर त्यावर "चहा आणि सिगारेट " याला पहिली पसंती देतो .........
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 02/04/2008 - 14:40 नवीन
१ नंबर असते ही भेळ.....पहिलाच घास खाल्ल्यावर जोरदार शॉट बसतो..... आणि संपुर्ण भेळ खाइस्तोपर्यंत तर नाकातोंडातून वाफा येवू लागतात....... बाकी नाजूक लोकांनी या वाटेला न गेलेलेच बरे.......त्यांसाठी टिळक रोड वरील 'कल्पना' बरी. (ही भेळ साजूक तुपात बनवतात म्हणे) तसेच माझ्या लहानपणी अप्पा बळवंत चौकात नुमवि जवळ आणि चितळेबंधूंच्या जवळ मस्त भेळ मिळायची.......त्याचं नाव आता आठवत नाही..... - छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 02/04/2008 - 15:08 नवीन
बाकी नाजूक लोकांनी या वाटेला न गेलेलेच बरे.......त्यांसाठी टिळक रोड वरील 'कल्पना' बरी. (ही भेळ साजूक तुपात बनवतात म्हणे) ह. ह.पु.वा.. चित्तोपंतांनी आम्हाला स्वारगेट ते फडके हाऊद दरमान कुठेतरी एका गाड्यावर अप्रतिम मटकी भेळ खायला घातली होती. खूपच भन्नाट होती ती भेळ (एक सुचना: हातगाडी आणि बनवणार्‍या माणसाला न बघता ही भेळ खावी लागते..)
  • Log in or register to post comments
र
रम्या Mon, 02/04/2008 - 10:31 नवीन
'झणझणीत' या शब्दाचा अर्थ कळाला तो जळगाव स्टेशन बाहेरच्या हॉटेलात मिसळ खाताना. मी कोल्हापूरचा असूनही मिसळ खाताना तोंडाला घाम फुटला. पण खाताना खूप मजा आली. (तिखट प्रेमी)
  • Log in or register to post comments
स
सख्याहरि Mon, 02/04/2008 - 15:48 नवीन
संभा ची भेळ खावा ...सांगली मधे... आम्रुतातेहि पैजा जिंके... स्वर्गीय अनुभव... इथल्या जर्मन लोकन्ची कीव येते... त्यंना चव कशाशी खातात तेच माहित नहि. आपन किति नशीबवान आहोत.. आपल्या कडे खाण्याचा केवढा मोठा वारसा आहे!!! मराठी,पंजाबी , गुजराती, दक्षिणात्य... कित्ती खाऊ काय खाऊ... -सख्याहरि भेळ पुराण ऐकुन.. भुकेने व्याकूळ....परदेशस्थ भारतीय
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 02/06/2008 - 01:14 नवीन
पुष्करीणी भेळ , लक्ष्मी रोड... गणेश भेळ !! - कर्नाटक हायस्कुल वरून अलंकार पोलीस चौकीच्या दिशेनी गेले की लागते.. अफलातून भेळ, पाणीपुरी!! यांच्या शाखा पण आहेत, अर्थात पुण्यात "गणेश भेळ" चिक्कार असल्याने ट्रेडमार्क पाहूनच जावे.. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 02/06/2008 - 04:25 नवीन
ब॑डगार्डन जवळ एक मस्त भेळ मिळते, तीच ही गणेश भेळ आहे काय?
  • Log in or register to post comments
प
पिस्तुल्या गुरुवार, 04/17/2008 - 19:56 नवीन
आमच्या बाणेरमधली भेळ खाऊन बघा तो॑डाला पाणी सुटेल नाही सुटले तर नका खाऊ.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 20:43 नवीन
रास्तापेठेतली अपोलो जवळची इन्टरव्हल भेळ. यात चना जोर गरम वर जोर असतो.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 04/18/2008 - 15:39 नवीन
>>>कल्याण भेळ, बिबवेवाडी-को॑ढवा रोड (पुणे) येथे अतिशय सुरेख भेळ मिळते, ती खाल्ल्यावर तिथलेच 'पान्-पट्टी' आईसक्रीमसुद्धा खावे, म्हणजे जिवास बरे वाटते. अहो पुण्यातील आमच्या घराला लागुन म्हणजे एका मिनिटावर कल्याण भेळ आहे, आ.हा.. हा... सर्वा॑नी ती खाऊनच पाहिली पाहिजे. (मला जाहिरातीसाठी काही कल्याण भेळवाला भेळ खाऊ घालणार नाही आहे ) कोल्हापुरच्या राजा भाऊची ही छान , पण कल्याण भेळ ही अप्रतिमच !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 04/19/2008 - 15:36 नवीन
कोल्हापुरी भेळ (भडंग घातलेली )तर एकदम जबरदस्त लागते,,,,,(त्यात कैर्‍यांचे छोटे छोटे तुकडे झकास लागतात) रंकाळ्यावर मिळणारी ही भेळ मस्तच..... आणि आत्ताच चोरगे,,,,,मोहन्,,,,,आणि फडतरें ची मिसळी ला चापुन आलो आहे.... (भेळ व मिसळप्रेमी)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 19 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 25 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा