सहीए हे!! न्हाव्याचा हात, वस्तरा, त्या शेजारच्या माणसाची दाढी वगैरे भारी जमलेय !!
कसं शिकलात हो? मलाही शिकायचेय.. जमतच नाही.. एकदा वॉटरकलर ट्राय केले, लहान मुलाने काहीतरी फासून ठेवलंय असं वाटण्याइतपत वाईट दिसत होते...
हे हे भाग्यश्री, तु म्हणतेस तसेच आहे माझे.
लहानपणी चित्रकला अतिप्रिय होती, बर्यापैकी चांगली जमायची सुद्धा, मग काळाच्या ओघात सर्व हरवुन गेले ...
आता नोकरीला लागल्यावर आतल्या चित्रकारने पुन्हा एकदा उचल खाल्ली, मस्त फॉर्ममध्ये १५००-२००० रुपयांचे चित्रकलेचे लै भारी व ऑथेंटिक सामान आणले, पण आता काढलेल्या चित्रांकडे बघु वाटत नाही. तसे मुड येईल तसे चालुच असते ... ;)
बाकी विसुनाना, चित्र अगदीच उत्तम आहे.
रंगसंगती व ब्रशचे फटकारे एकदम उच्च आहेत.
अजुन येऊद्यात असेच, आम्हालाही प्रेरणा मिळेल कदाचित ...
------
( हौशी एम्.एफ्. हुसेन )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
>>( हौशी एम्.एफ्. हुसेन )छोटा डॉन
अच्छा !! आत्ता कळले .. म्हणुन गणपतीचे स्वेटर काढायच्या मागे लागले होते का ?
असो .. हा प्रासंगिक विनोद झाला.
बाकी चित्र छान जमले आहे, एलिमेंट्री ड्रॉइंगच्या परिक्षांची आठवण झाली. प्रकाशछटांचा बॅलॅन्स संभाळणे छान जमलेय.
जलरंग हे सगळ्यात तरल आणि अवघड माध्यम आहे.
आकृतींच्या नेमके पणापेक्षा सूचक गोष्टी, रंगसंगती, छायाप्रकाशाचा वापर, छटा, आणि ओले रंग एकमेकांत अर्धवट मिसळून निर्माण केलेला आभास असं वेगळंच आहे.
तुम्ही लिहिलेल्या पार्श्वभूमीप्रमाणे मस्तच जमलंय!!
अवांतरः दुर्दैवाने हैदराबाद सोडून परत आल्याने आता येता येणार नाही. नाहीतर नक्की आलो असतो शिकायला...
तुमच्या तयारीला आणि छंदाला अनेक शुभेच्छा! अशीच वेगवेगळी चित्रं करून इथे आमच्या सोबत शेअर करा ( मराठी ?)...
नवशिक्यांकडून असे चित्र करवुन घेतले म्हणजे तुमचे मास्टरजी महान!
त्यांना विचारुन त्यांच्या काही कलाकृती देखील येउ दे.
यावरुन आठवले रामदास सर तुम्ही शार्दुल कदम यांना भेटुन एकदा लिहायचा आग्रह करा. व काही चित्रही दाखवा अजुन.
जलरंग वापरायला कठीण. तैलरंगावर एका ब्रशच्या फटकार्यावर दुसरा मारता येतो पण इथे शक्यतो एकदाच, नाहीतर पोत बिघडतो.
पांढर्या रंगासाठी कागदाचाच यथोचित वापर करता येणे हे जलरंगातले आणखी एक वैशिष्ठ्य तुम्ही चांगले साधले आहे.
छायाप्रकाशाचा खेळ सुंदर! अजून येऊदेत. :)
चतुरंग
कणण्याकुमारीला गेल्तो तव्हा ज्योतिषाने आमच भवितव्य उज्वल असुन आमाला लई पैशे भेटतीन आस सांगितलय. आमी बी आता नव्या पुलाव पंचांग घेउन बसाव म्हंतो.
From समाज
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
चित्र आवडले. एसीसी लिहीलेली पाटी ही रंगामुळे अधिक नजरेत भरते आहे, पण ते वस्तुस्थितीप्रमाणे असावे. न्हाव्याचे दुकान मात्र एकदम खास. चित्र छानच जमले आहे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी