Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सुवर्णप्रभा..

प — प्राजु, Wed, 01/21/2009 - 01:41

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8811 views

💬 प्रतिसाद
म
मीनल Wed, 01/21/2009 - 01:50 नवीन
साक्षात सुवर्णप्रभा अनुभवली ती ही शब्दातून. ग्रेट. मीनल.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 01/21/2009 - 02:52 नवीन
कविता गेय आहे. गायला मजा आली. :-)
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 01/21/2009 - 06:46 नवीन
सहज काका, >> कविता गेय आहे. How a poem can be GAY ?? :-( confusing statement :-( ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 01/21/2009 - 08:06 नवीन
>>How a poem can be GAY ?? वाहिदाजी.....गैरसमज!! लैच मोठ्ठा गैरसमज. 'गेय' म्हणजे गाण्यास योग्य, म्हणजेच जी कविता एखाद्या तालात, सुरावटीत म्हणता येईल अशी, सुसूत्र रचना असणारी. 'वाचनीय', 'श्रवणीय', 'प्रातःस्मरणीय' इत्यादी शब्दांसारखाच 'गेय' हा शब्द आहे. विंग्रजी 'गे'शी त्याचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 03/10/2009 - 18:52 नवीन
असाही अर्थ आहेच. त्यामुळे कविता gay असण्यासही प्रत्यवाय नसावा. (आनंदी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चंबू गबाळे Sun, 02/15/2009 - 09:19 नवीन
How a poem can be GAY ?? =)) =)) =)) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/21/2009 - 03:05 नवीन
कविता छान आहे पण, वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद सांडताच पारिजात भूवरी पडेल रास... पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास... ह्या ओळी सहजसोप्या वाटल्या. अन्य ओळी जरा जरा शब्दजड आणि कठीण वाटल्या.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/21/2009 - 04:01 नवीन
पहिलीच ओळ एकदम आवडेश :) >> वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद सांडताच पारिजात भूवरी पडेल रास... >>सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास... हे सुद्धा खूप छान जमलंय.... विशेषतः 'विश्वतीर पेटताच' ही शब्दरचना खूप छान जमलीये प्राजु. शीर्षक समर्पक आहे :)
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Wed, 01/21/2009 - 05:47 नवीन
मस्तच आहे . आम्हाला तर बुवा, ‘फिटे अंधाराचे जाळे’ आठवले एकदम :)
  • Log in or register to post comments
म
मऊमाऊ Wed, 01/21/2009 - 06:20 नवीन
सुरेख कविता आहे प्राजु ! तुझे थोडे जुने साहित्यही शोधून वाचले..ते पण आवडले.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Wed, 01/21/2009 - 06:33 नवीन
निशा, प्रभा , उषा ...... एकदम सुंदर. :) 'सकाळ' ची कविता वाचली की 'पितात सारे गोड हिवाळा' ची आठवण होते...! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
व
वृषाली Wed, 01/21/2009 - 08:12 नवीन
सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास... फार सुंदर.
  • Log in or register to post comments
अ
अंकुश चव्हाण Wed, 01/21/2009 - 09:43 नवीन
कविता सुन्दर आहे यात प्रश्नच नाही. पण जर दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस... या शब्दास एखादा पर्यायी शब्द वापरला असता तर आणखी मजा आली असती. कारण तुमच्या कवितेतील सर्व शब्द एका थराविक साच्यातील आहेत ज्यांमध्ये फाकताच हा शब्द बसत नाही. लहान तोंडी मोठा घास घेतला आहे त्याबद्दल क्शमा करा. अंकुश चव्हाण.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 01/21/2009 - 10:38 नवीन
सुंदर. नजरेसमोर उभे राहिले वातावरण. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 01/21/2009 - 14:16 नवीन
बरेच दिवसानी प्राजु उगवली. छान ल्हिले आहेस आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 01/21/2009 - 14:18 नवीन
काय लिहिलेयस प्राजु! अभिनंदन!! संपूर्ण कविताच सुंदर. त्यातही - सागरात गाज आणि लाट जात उंच उंच गारवा हवेत आणि वेड लागते मनांस... पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास... दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास... हे अगदी खास.. बोले तो, झकाSSSSSSSSस! शब्द अगदी सहज आल्यासारखे वाटताहेत.. एका दमात लिहून काढलीयेस का काय पूर्ण कविता?? चालही छान बसतेय.. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 01/21/2009 - 14:22 नवीन
थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? कविता अगदी मस्तच आहे, पण वरच्या ओळी खूप आवडल्या... अनामिक
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Wed, 01/21/2009 - 14:38 नवीन
प्राजुतै, तुमची कवीता डायरेक कालजाला भिडत बगा! सुंदर ! मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 01/21/2009 - 14:45 नवीन
कविता आवडली.. मात्रा एकदम जमून आल्या आहेत
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 01/21/2009 - 14:54 नवीन
सकाळी सकाळी कविता वाचली. खरच सुप्रभात आहे असे वाटले. रेवती
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 01/21/2009 - 15:17 नवीन
दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास... वा, वा छान शब्दबांधणी
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 01/21/2009 - 15:59 नवीन
मस्त झाली आहे कविता.. आवडली. अजूनही येऊ दे लवकर.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 01/21/2009 - 16:05 नवीन
वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद सांडताच पारिजात भूवरी पडेल रास... पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास... प्राजु, मस्तच रचले आहेस. :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 01/21/2009 - 16:10 नवीन
आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 01/21/2009 - 16:46 नवीन
असेच म्हणतो! वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद ... थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब ... सागरात गाज आणि लाट जात उंच उंच वगैरे ठिकाणी दोन-दोन अक्षरी पुनरुक्ती आणि अनुप्रास वृत्ताशी फारच सुंदर ठेका जुळवतात. वा! (तसे शब्द अधिक पखरायला पाहिजे होते असे वाटते - इतक्याने तृप्त झालो नाही.) ("अग्निरंग होत दंग..." चालेल का? पुढे गंधही धुंदच होणार आहेत, म्हणून इथे कुठलातरी वेगळा शब्द, वेगळी कल्पना अधिक वैविध्य देऊ शकेल.)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/21/2009 - 16:57 नवीन
अग्निरंग होत दंग..." चालेल का? हे ही छान आहे. चालेल ना! सुचवणी आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/21/2009 - 20:41 नवीन
अतिशय गेय, नादमय आणि वृत्तबद्ध रचना. अशाच आणखी रचनांसाठी शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 01/21/2009 - 18:58 नवीन
आपल्याला पहाटेचा केशरी रंग फारंच आवडतो . प्राजु ने शब्द लै भारी गुंफलेले आहेत ... ते वृत्त वगैरेच्या चुका आम्हाला णाय समजत ... पण वाचून अंमळ भारी वाटली . - संध्याकाळचा उगवता चंद्र) टारझण
  • Log in or register to post comments
स
सुहास..सदेव हसनार्.. (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/21/2009 - 19:03 नवीन
हे समजले नाही..वृत्त : गा ल गा ल * ४
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/21/2009 - 19:18 नवीन
सागरात गाज आणि लाट जात उंच उंच गारवा हवेत आणि वेड लागते मनांस... हे लयं आवडल बघा.. :) (गारव्याच्या शोधात...) मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 01/22/2009 - 11:32 नवीन
मालवून टाक दीप ची आठवण झाली. त्यांच्या एका कॅसेट मध्ये अशाच वृत्तात त्यांनी कविता ऐकवली होती. त्या तिथे फुलाफुलात पेंगते अजून रात सावकाश घे टिपून एक एक रुप रंग प्राजू ताई - अतिशय सुंदर कविता. छान शब्द आणि वर्णन...
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/22/2009 - 15:36 नवीन
सुवर्णप्रभा आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 01/22/2009 - 20:16 नवीन
तारकांत लोपली निशा उषेस पाठवून अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस... तारकांत लोपली निशा मस्तच! सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास... विश्वतीर पण भारी! कशी काय सुचली ही कल्पना? पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास... आम्र नाही कळले... दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास... `प्रभातकाल' एक शब्द हवा. - कविता न कळणारा, अभिजित.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 01/22/2009 - 21:57 नवीन
सुंदर काव्य... वृत्त वगैरे काही माहित नाही...:) थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ... या ओळी खासच...
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 02/15/2009 - 08:01 नवीन
इथे ऐका!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/15/2009 - 17:40 नवीन
लिहिण्यासोबतच प्रमोद काका गाते झाले हे ही बरं झालं. चाल आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 02/15/2009 - 09:15 नवीन
छान कविता प्राजु. रोजरोज दर्जेदार कविता देती आहेस .. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 02/16/2009 - 02:01 नवीन
प्राजु, हिच नव्हे तर तुझी प्रत्येक कविता अप्रतिम असते. सुधीर फडके म्हणतात, "हे जे माझ्या हातून होत आहे ते माझं मलाच कळत नाही.परत करीन म्हटलं तर पुन्हा असंच होईल हे सांगता येत नाही.कोण तरी माझ्याकडून करवून घेतो." म्हणून म्हणतो, "प्रतिभा उरी धरूनी तू गीत लिहित रहावे" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 03/10/2009 - 20:11 नवीन
काय बोलावे !! अतिशय सुंदर.....!!!!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 03/10/2009 - 13:22 नवीन
नपेक्षा उशीर बरा ! उशीरा प्रतिक्रिया देतेय पण कविता खूपच सुन्दर आहे. सुन्दर सोनेरी सकाळ दिसतेय समोर! मला माझा एक मित्र नेहमी म्हणतो की तू राहतेस शहरात, सीमेंटच्या जन्गलात, पण कविता मात्र लिहितेस फार्म हाउसवर रहात असल्यासारख्या! तसच वाटतय. खूप सुन्दर वर्णन आहे. मी शरण! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 03/11/2009 - 01:09 नवीन
अरेच्चा, ही कविता कशी नजरेतून निसट्ली! छान कविता आहे प्राजु. शब्दांची निवड मस्त आहे... आवडली!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा