Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हे राम ! हे शाम !!

J
JAGOMOHANPYARE
Mon, 01/19/2009 - 07:16
🗣 13 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4865 views

🗣 चर्चा (13)
क
कशिद Mon, 01/19/2009 - 10:15 नवीन
वा सुंदर सुक्ष्मदुर्ष्टि आहे ..!!!!
  • Log in or register to post comments
म
मयुरा गुप्ते Tue, 01/20/2009 - 23:00 नवीन
आम्हिही कालच सिनेमा बघितला. तेथे मी आणि माझा नवरा सोड्ल्यास बाकी सगळे 'गोरे अमेरीकन' होते. हिन्दि भजनाचे डिटेल्स आम्हि सोडल्यास बाकी सगळ्यान च्या डोक्यावरुन गेले. असे बरेच प्रसंग आजुबाजुच्या प्रेक्षकंना कळ्त नव्हते . बाकी चित्रपट किती सिरीअस्ली बघायचा हे ज्याने त्याने ठरवावे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 01/20/2009 - 23:26 नवीन
छान विषय, पहीला मुद्दा पटला. दुसराही मुद्दा पटला पण इथे तर 'गोपालसिंग नेपाली' या गाण्याचे लेखक आहेत असे म्हटले आहे. असो आपल्या सूक्षनिरीक्षणाचे कौतुक वाटले. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/21/2009 - 00:12 नवीन
मी अजून हा चित्रपट पाहू शकलेलो नाही, पहाणार तर नक्की आहे. मात्र आपली निरीक्षणे मला अयोग्य वाटत नाहीत. यात अजून एक न बघता बघितलेल्यांच्या संदर्भात निरीक्षण सांगतो: विविध प्रांतातील भारतीयांबरोबर एका कामानिमित्त मिटींगला भेटलो होतो - त्यात जरा जास्तच भडक आणि हिंसक दाखवले आहे हे मान्य करत असूनही सर्वांना तो आवडला. त्यात विशेष काही गैर वाटले नाही. किंबहूना वास्तव वाटले... आमच्या घरी काही अमेरिकन्स जेवायला आले होते. त्यांनी देखील हा चित्रपट पाहीला होता आणि भारावले होते. मात्र मला पहीला प्रश्न विचारला की खरेच हिंदू असे मारतात का? (त्या प्रश्नाचा सूर हा कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते अशा पद्धतीत होता). या संदर्भात पण थोडे अवांतर आठवले: फारूख शेख आणि शबाना आझमीचा "तुम्हारी अमृता" म्हणून दोनपात्री केवळ पत्रवाचनावरून पुढे जाणारी प्रभावी एकांकीका होती. अमेरिकेत पण त्याचे ९३-९४ साली प्रयोग गाजले. मला ती बघता आली नाही पण परत चांगले रिपोर्ट्स ऐकल्याने हुरहुर लागली... त्याचे थोडक्यात कथानक असे: अमृता ही हिंदू मुलगी, फारुख शेख (नाटकातील नावावरून) मुसलमान मुलाची बालमैत्रीण. मला वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम असते. मात्र नंतर घरचे हलल्यामुळे का कशाने, पण ते लांब जातात तरी मैत्री पत्रातून राहते. हा मुलगा एकदम सुसंस्कृत/खानदानी होतो. मात्र अमृता बिघडते, व्यसनी होते आणि मला वाटते शेवटी मरते देखील... दोन समर्थ कलाकारांमुळे हे नाटक गाजले आणि आवडले. मला देखील कथा ऐकल्यावर काही गैर वाटले नाही. मात्र त्यातील हा हिंदू मुलीचे वाया जाणे आणि मुसलमान मुलाचे खानदानी वागणे वगैरे, न्युयॉर्क मधील एका भारतीय वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या नजरेत आले, आणि त्याने शबानाला प्रश्न विचारला की जर हे उलटे असते (वाया गेलेली मुलगी मुसलमान आणि ससंस्कृत मुलगा हिंदू) तर तू यात काम केले असते का? तर तीने नाही असे उत्तर दिले... असो.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/21/2009 - 11:40 नवीन
मात्र मला पहीला प्रश्न विचारला की खरेच हिंदू असे मारतात का? (त्या प्रश्नाचा सूर हा कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते अशा पद्धतीत होता). होय, डोळ्यावर झापड ठेवून हिंदूंचे गुणगौरव करणार्‍या सगळयांना एक महत्वाची माहिती: हिंदू देखील असेच मारतात. मारण्याची विद्या हिंदूंनी देखील कधीच आत्मसात केलेली आहे. कारंण हिंदू कुठलीही विद्या आत्मसात करण्यात मागे नाहीत. ह्या एका कलेत हिंदूंना मागे ढकलण्यात इतर धर्मियांची साजिश आहे हे नक्की !! -- सर्किट
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/21/2009 - 13:06 नवीन
होय, डोळ्यावर झापड ठेवून हिंदूंचे गुणगौरव करणार्‍या सगळयांना एक महत्वाची माहिती: हिंदू देखील असेच मारतात. अहो साहेब, मी कधी नाही म्हणले? डोळ्यावर झापड ठेवून फक्त हिंदूंवर टिका करण्यासंबंधात मी म्हणले होते/आहे. म्हणूनच माझे वाक्य परत एकदा खाली वाचा...
मात्र मला पहीला प्रश्न विचारला की खरेच हिंदू असे मारतात का? (त्या प्रश्नाचा सूर हा कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते अशा पद्धतीत होता).
माझे त्यावरचे माझ्या अमेरिकन मित्र-मैत्रिणींस उत्तर असेच होते की, "असे हिंसक हिंदूपण असू शकतात. मात्र, ज्या पद्धतीत त्यांनी चित्रपटात दाखवले आहे असे मला तुझ्या (त्यांच्या) बोलण्यातून समजतयं, तसे ते एकतर्फी नाही. आणि अशा हिंसेला जर कोणी जबाबदार असेल तर ते या संबंधातील राजकारण आणि असमतोल वागणूक आहे." अजून याचा अर्थ समजून हवा असल्यास अवश्य नवीन धागा सुरू करा अथवा खरड पाठवा, म्हणजे येथे अवांतर नको. (अथवा, माझे या संबंधातील येथेल्या विकीबरोबरचे संवाद शोधून वाचा.) असो.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 01/21/2009 - 16:35 नवीन
कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते
मी तरी तुमच्या मित्राला हा प्रश्न विचारला असता, "बाबारे काल्पनिक कथेवर आधारीत मसाला पटातल्या एका अर्ध्या मिनिटाच्या सीन वरुन इतका मोठा निष्कर्ष कसा काय काढलास ?" पुढच्या वेळेस हा मित्र भेटेल तेव्हा त्याला 'साऊथ पार्क' नावाच्या मालिकेत जे दाखवतात ते पाहून, 'अमेरिकेतील प्राथमिक शाळेतील मुले अशी असतात ?' असा प्रश्न विचारा. बाकी चित्रपटातुन धार्मिक भावना दुखावलेल्यांनो, चित्रपटातील हीरो लहानपणी अमिताभला भेटण्यासाठी संडासातुन उडी मारुन बाहेर येतो असे दाखवले आहे आणि तो मुसलमान देखिल आहे, ह्यावरुन तुम्ही मुसलमानांची पोरं अमिताभला पहाण्यासाठी संडासात उड्या मारतात असा निष्कर्ष काढून टाका.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/21/2009 - 17:11 नवीन
"बाबारे काल्पनिक कथेवर आधारीत मसाला पटातल्या एका अर्ध्या मिनिटाच्या सीन वरुन इतका मोठा निष्कर्ष कसा काय काढलास ?" अहो कसा म्हणून काय विचारता? "...कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते.." इतके स्पष्टपणे लिहीलेले असून देखील, "धर्म आणि जाती विषयक चर्चात आम्ही सहभागी होत नाही.." असे म्हणणारे पण, "डोळ्यावर झापड ठेवून हिंदूंचे गुणगौरव करणार्‍या सगळयांना एक महत्वाची माहिती.." ताबडतोब माहीती देऊ लागतात आणि ती तितकीच झापड लावून इतर सहमत देखील होतात. तिथे इतरांचे काय घेऊन बसता? :-) बाकी ज्या अमेरिकन्सना हा प्रश्न पडला आणि ज्यांनी विचारला त्यांना ते दृश्य एकांगीच वाटले होते म्हणून तसे विचारले आणि खात्री करून घेतली. बाकी मी सुरवातीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, या चित्रपटाच्या मी काही विरोधात नाही, कारण असे समाजातील वाईट गोष्टी दाखवणारे चित्रपट सर्वत्र सर्वांवरच काढतात, तसा तो मुंबईतील वाईट गोष्टींवर काढला म्हणून काही गैर नाही, गैर काय असू शकते तर ज्यातून चुकीची एकांगी मते तयारहोऊ शकतात अशी दृश्ये! असो.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 01/21/2009 - 15:26 नवीन
डोळ्यावर झापड ठेवून हिंदूंचे गुणगौरव करणार्‍या सगळयांना एक महत्वाची माहिती: हिंदू देखील असेच मारतात. सहमत!!
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 01/21/2009 - 16:58 नवीन
कोलबेर पंत व सर्किट महाशय, अभिनंदन! आम्ही वाटच पहात होतो की अजून कसे कोणी आले नाही. तशी हुरहुर येथे व्यक्त पण केली होती. येथे निराश नाही केलेत याबद्दल अभिनंदन! बाकी मुहंमदाचे व्यंगचित्र काढल्याने भावना दुखवतात... रामाला कृर/विकृत वगैरे दाखवल्याने काही फरक पडत नाही हा जागतिक दृष्टिकोन का बनत आहे याचे एक उदाहरण दखवलेत हे ही बरे केलेत. आता "कोणी काही दाखवल्याने कमीपण येणारा हा आपला धर्म नाही, राम नाही" वगैरे वकीली पद्धतीची वाक्ये सुद्धा येऊ द्यात. आपला, (नेभळटांच्या सहवासाला व करंटेपणाला फाट्यावर मारणारा दुखावलेला रामभक्त) भास्कर
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 01/21/2009 - 17:01 नवीन
नेभळटांच्या सहवासाला व करंटेपणाला फाट्यावर मारणारा दुखावलेला रामभक्त
भास्कर महोदय, फाट्यावर मारणारे लोक दुखावत वगैरे नसतात! ही विसंगती झाली. भावनांना आवर घाला... वरती तुम्हाला एक उपाय देखिल सांगीतला आहे. (भास्कररावांच्या व्याखेने नेभळट) कोलबेर
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sun, 05/10/2009 - 13:54 नवीन
Namaste Dr Kagalkar ji, We have already posted the news at http://www.hindujagruti.org/news/6162.html And a protest letter is sent.(see below) You can send your protest letter also Shubhkamnaye Narendra www.hindujagruti.org
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Fri, 01/23/2009 - 11:35 नवीन
खरंच फार सुंदर चरचा सुरु आहे. मला काल पासुन ह्या विशयावर लिहायचं होत, म्हणुन आजच माझ्या बलोग वर एक पोस्ट टाकलंय..आपण भारतिय ह्या ऑस्कर ला देशा पेक्शा जास्त महत्व देतोय असं वाटतं काय? दुसरी गोश्ट म्हणजे, आपलं सुप्रिम कोर्ट सुध्दा हुसेन च्या भारतमाते च्या नंग्या चित्राला जेंव्हा कला अभिव्यक्ती म्हणते तेंव्हा इतरांकडउन काय अपेक्शा करायची? शुध्द लेखनाच्या चुंकांबद्दल क्शमस्व. http://kayvatelte.wordpress.com/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा