Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एका ऑफिस सेक्रेटरीची कैफियत

श
श्रीकृष्ण सामंत
Sun, 01/18/2009 - 04:24
💬 19 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4239 views

💬 प्रतिसाद (19)
स
सुनील Sun, 01/18/2009 - 04:40 नवीन
छान लेख सामंतकाका! कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं माझी स्वाक्षरी पहावी!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वृषाली Sun, 01/18/2009 - 09:28 नवीन
"कामावर प्रेम केलं तरच आपला वेळ मजेत जातो.म्हणून कोणी काही म्हणो ज्यात आपला वेळ जातो तेच काम करावं" सहमत छान लेख. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
  • Log in or register to post comments
प
प्रिंस Sun, 01/18/2009 - 12:16 नवीन
ज्यात आपला वेळ जातो तेच काम करायला सगळ्यांना आवडेल, पण ज्यांना कामात रसच नाही आणि निव्वळ पोटासाठी ते काम करतात त्यांच काय ..? ज्याला तुम्ही Job satisfaction नाही असे म्हणु शकता... माफ करा पण बर्‍याच जनांना Unsatisfied Job करावे लागतात. तर त्यांचा त्यात वेळ कसा जाईल ते सांगा....
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 01/18/2009 - 18:29 नवीन
हलो सनि, आपल्या विचाराशी मी सहमत आहे.पण काय आहे बघा,एखाद्दा कामात रस नसला म्हणजे सहाजीकच त्यावर आपण प्रेम करणार नाही हे उघडच आहे.आणि निव्वळ पोटासाठी करायचं झाल्यास ते पोटाच्या प्रेमासाठी -म्हणजेच आपल्या जीवनासाठी-आपण ते काम करणार.आज ना उद्दा ते काम सोडून आवडणार्‍या कामाच्या शोधात आपण असणार.आणि ते शक्य झालं नाही तर "आपली ग्रह दशा "असं समजून काही मंडळी समाधान करून घेतात.जीवनात सर्वच मनासारखं होत नसतं.म्हणून म्हणतो, "दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव मनासारखे मिळे काम जरी आनंदाला मग अवीट गोडी" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/18/2009 - 16:35 नवीन
लेख अगदी जमला आहे. सेक्रेटरीची म्हणजे ऑफीसमध्ये टाईमपास करतात, बॉसला खुप ठेउन आपला कार्यभाग साधुन घेतात असा एक मुक्त प्रवाह लोकांत आहे. तो बराचसा खरा आणि खोटा आहे. सगळ्यांना एकाच पारड्यात तोलु नये. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 01/18/2009 - 18:31 नवीन
हलो सखाराम गटणे, आपल्याशी मी पूर्ण सहमत आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 01/18/2009 - 16:54 नवीन
लेख आवडला. सेक्रेटरीचा जॉब खरं तर कौशल्य पणाला लावणाराही असतो हे विसरता कामा नये. आणि जे काही विचित्र आपल्या कानावर येतं ते करण्यात सगळ्याच सेक्रेटरींना रस असतो असेही नाही. आवडीप्रमाणे जॉब करायला मिळणं हेच मोठं भाग्य म्हणायला हवं, मग तो कोणताही जॉब असो. माझ्या घरी दर पंधरा दिवसांनी सफाई करण्यासाठी जी मुलगी येते, तिला तिचे काम अतिशय आनंदानं करताना बघते. गाणं गुणगुणत आनंदानं घराची स्वच्छता ती करत असते. काही महिन्यांपूर्वी इंधन महागल्यावर तिने पैसे जास्त देण्यास सुचवले व त्याप्रमाणे मी ते केले. जेंव्हा इंधन स्वस्त झाले तेंव्हा आपण होऊन तिने पैसे कमी घेण्यास सुरूवात केली. त्याची आवश्यकता नाही असे सांगितल्यावर ती म्हणाली की तिला तसे करणे तिला बरे वाटणार नाही व कामावर परिणाम होईल. मला वाटलेले आश्चर्य अजून कमी झालेले नाही. रेवती
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 01/18/2009 - 18:36 नवीन
हलो रेवती, "आवडीप्रमाणे जॉब करायला मिळणं हेच मोठं भाग्य म्हणायला हवं" हे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.गुणगुणंत काम करणं म्हणजेच आपल्या कामावर प्रेम असणं हे आपल्याकडे येणार्‍या मुलीचं उदाहरण अगदी समर्पक आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 01/18/2009 - 18:26 नवीन
हलो सुनील आणि वृषाली, आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Sun, 01/18/2009 - 20:57 नवीन
लेखाचा विषय योग्यच आहे. तसाच तो एका कधीही न सुटलेल्या प्रश्नाबद्दलही आहे. खरे तर किती लोकांना मनासारखे काम करायला मिळते या प्रश्नाचे बहुतेकाना नाही असे असावे! मला एक गमतीदार गोष्ट आठवते; कुठे ऐकली ते माहीत नाही. चर्च मधे एक नवीन मुलगा सेवेकरी म्हणून लागला. त्याला काम मिळाले शौचगृह सफाईचे. २ दिवसांनी त्याला विचारले - 'काय कसे चालले आहे काम? मजा येतेय ना?' तो: 'मला हे काम का दिले आहे? मला अजिबात पसंत नाही.' पुढचा आठवडाभर त्याच्याकडे तेच काम राहिले. पुढच्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा तोच प्रश्न, आणि उत्तरही! त्याच्या सहयोग्यानी त्याला बाजूला घेऊन समजावले. 'तू नवीन आहेस इथे. नवीन येणार्‍या प्रत्येकाला प्रथम हेच काम मिळते. तू सांग काम आवडले. मजा येतेय. लगेच तुझे काम बदलते की नाही पहा!' तो: 'पण मी असे का करू? मला हे काम खरेच पसंत नसताना खोटे का सांगू?' मित्रः 'ठीक आहे बाबा! पहिलाच असा भेटलास! पुन्हा सल्ला नाही द्यायला येणार तुला!' पुढच्या आठवड्याच्या शेवटी मात्र याचे काम बदलले! त्याचे असे झाले, की आठवड्याच्या शेवटी याने खरे खरे सांगून टाकले! म्हणाला, 'पहिले ८-१० दिवस या कामातून सोडवून घ्यायला पाहात होतो. पण मग हे काम सुटत नाही असे पाहिल्यावर मात्र मनापासून सगळे करू लागलो. आणि नवल असे, की आता मला हे काम खरेच आवडू लागले. नुसते येऊन बघा शौचगृहात. सगळे कसे चकचकीत झाले आहे. आता मला हेच काम राहूद्या!' अनेकदा, कामाबद्दल आपली भावना बदलली की कामाबद्दलची विरोधाची भावना कमी होत असावी.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 01/19/2009 - 01:32 नवीन
हलो शशिधर केळकर, "अनेकदा, कामाबद्दल आपली भावना बदलली की कामाबद्दलची विरोधाची भावना कमी होत असावी." अगदी लाखातलं एक लिहलं आहे. आपली गोष्ट तर खूपच आवडली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 01/19/2009 - 12:07 नवीन
सामंतकाका, आपला लेख आणि केळकरांचा प्रतिसाद आवडला. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/18/2009 - 21:07 नवीन
आवडणारं काम करायला मिळणं खरंच भाग्याचं असतं. मला माझं रेडीओचं काम खूप आवडतं. त्यामुळे मी ते अगदी मनापासून करते आहे. ते करताना, माझ्या कार्यक्रमात लोकांना नविन काहीतरी ऐकल्याचा आनंद मिळावा यासाठी नवे नवे प्रयोग मी करत असते. आणि जेव्हा खूप मेहनत घेऊन केलेला कार्यक्रम जेव्हा लोकांना आवडला असं कळतं तेव्हा मनात कुठेतरी समाधान मिळालेलं असतं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 01/19/2009 - 01:36 नवीन
हलो प्राजु, तुझ्यासारखंच मला वाटतं. खूप वाचनं करून इकडचा तिकडचा संदर्भ आणून मेहनत घेऊन लेख लिहिल्यावर जेव्हा वाचकाना लेख आवडतो ना,तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी समाधान मिळतं. प्राजु, तू तर कुणाचाही आवडलेला लेख -माझाही-न चुकता "लेख आवडला" म्हणून लिहितेस हे मी निरक्षलं आहे.खरंच,घेण्यासारखं आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/19/2009 - 02:24 नवीन
सामंतशेठ, छोटेखानी लेख छान आहे, औरभी आने दो.. तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 01/19/2009 - 05:00 नवीन
तात्याराव, अवश्य,अवश्य. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Mon, 01/19/2009 - 10:33 नवीन
छान लेख आहे. kinnari . एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sun, 02/01/2009 - 08:22 नवीन
कुठेतरी वाचलेलं आठवलं. आवडीचं काम करायला मिळणं चांगलंच, पण मिळालेलं काम आवडीने करणं हे महत्वाचं! अवांतर : अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा भागल्या की माणूस साहीत्य, समाधान, शांती वगैरे वगैरे गोष्टींकडे वळतो. ---आपल्या कामात आनन्दी -स्वानन्द
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sun, 02/01/2009 - 09:29 नवीन
सेक्रेटरी संपुर्ण विश्वासु असणे अतिशय आवश्यक आहे अन्यथा भरपुर प्रॉब्लेम्स येउ शकतात. लंच टाइम मधे गॉसिप करतांना काँफिडॅंशिअल इन्फों आउट करुन भरपुर पंचाइत करु शकतात. पुर्वी च्या काळी कम्प्युटर्स नव्हते. सगळ्या गोपनिय गोष्टी टाइप्रायटर वर टाइप व्हायच्या. हे सगळं टाइअपिंग सेक्रेटरीच करायच्या.सगळ्या गोपनिय बातम्या लंच टाइम मधे लिक करण्याचे महत्वाचे कार्य ह्या सेक्रेटरिज करायच्या. अगदी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटींग मधे किती डिव्हिडंड डिक्लिअर झाला इथपर्यंत गोष्टी लिक व्हायच्या. कम्प्युटर्स आल्या पासुन मात्र बराच बदल झाला आहे. सेक्रेटरीज चा कन्सेप्ट इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही जेंव्हा इंजिनिअर होतो, तेंव्हा आमच्या बॉस ला पण सेक्रेटरी होती. पण आता सेक्रेटरिज फक्त टॉप ब्रास लाच असतात..कमित कमी भारतात तरी......
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा