Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन !!!

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/17/2009 - 14:55
💬 24 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8782 views

💬 प्रतिसाद (24)
प
प्रमोद देव Sat, 01/17/2009 - 16:17 नवीन
डॉ. आनंद यादव ह्यांचे अभामसासंनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 01/17/2009 - 16:35 नवीन
चांगली आणि धावती ओळख आवडली. डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 01/17/2009 - 16:43 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वामि Sat, 01/17/2009 - 18:08 नवीन
आनंद यादव हे अत्यंत ब्राम्हणद्वेष्टे आहेत.आजवरचे त्यांचे लिखाण हे दुय्यम दर्जाचे व टाकाउ आहे.त्यांचे अध्य़क्षपद हे शरद पवारांच्या ब्रा.विरोधी धोरणाचा भाग आहे.आठवा तो बोकड बळी,अरुण साधुंचे टिळकांबद्द्लचे वक्तव्य,निळु फुलेंचि समाजवाद्यांवर ब्रा. म्हणुन टीका.कमीत कमी ब्रा.तरी अशा लोकांचं उदोउदो करणं थांबवावं.दिपक टिळक फुलेंचा सत्कार काय करतायत,मेधा पाटकर आर.आर.चे गुण काय गातायत,म्हणे ब्रा.द्वेष 'वगेरे वगेरे'.जणु काही ब्रा.चा तिरस्कार ही एक किरकोळ गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/18/2009 - 03:37 नवीन
आजवरचे त्यांचे लिखाण हे दुय्यम दर्जाचे व टाकाउ आहे. डॉ. आनंद यादवांचे सर्वच साहित्य आम्ही काय वाचलेले नाही. जे काही वाचले आहे, ते बरेच समिक्षात्मक स्वरुपाचे वाचलेले आहे. पण त्यांचे लेखन दुय्यम दर्जाचे आहे, हा शोध आपण कशावरुन लावला. आणि समजा तसे असलेच तर ते त्यांच्या साहित्य लेखनातील कोणत्या पुस्तकात दुय्यम / टाकाऊ लेखनाचा अनुभव येतो, ते संदर्भासहीत पटवून द्यावे ! उगाच विरोध करायचा म्हणून काहीही लिहू नये असे वाटते. ( असे लिहिण्यामागे आपल्याशी संवाद व्हावा, याच भूमिकेतून लिहिले आहे. हेही नम्रपणे नमूद करतो.) स्वतःच्या मालकीची शेती नाही. दुसर्‍याच्या शेतावर कूळ म्हणून राबणार्‍या कुटूंबात जन्मलेल्या आनंद यादव यांना शिक्षणाचे कोणतेच वातावरण नव्हते. गुरा-ढोरांमागे, शेतीकामेकरुन शिक्षणाची आवड जोपासली. आपला मुलगा शिक्षणाच्या नादी लागला तर आपले पोटाचे हाल होतील असे वाटून शिक्षणाच्या आड येणार्‍या वडिलांची मर्जी सांभाळली. शेतीची कामे सांभाळून अभ्यास करत राहिले. अशा वेगवेगळ्या अडी-अडचणीतून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षणासाठी गाव सोडले. थोरामोठ्यांच्या मदतीने एम. ए झाले. पुढे प्राध्यापकही झाले पण शहरात बसून खेडेगावाचे चित्रण करुन शहरी वाचकाला त्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. जे जे अस्सल ग्रामीण होते, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखनामधून व्यक्त केले. त्यामुळे ग्रामीण साहित्यासाठी वाहून घेतलेल्या (या पूर्वी निवडणूकीत पराभव झाल्यामुळे त्यांनी काही कडवट भाष्य केल्याचे वाचनात आले, पण ती एक सहज प्रतिक्रिया असते असे वाटते) माणसाचा हा एक मोठा गौरव आहे, असे आम्हाला तरी वाटते !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 01/18/2009 - 07:06 नवीन
स्वतःच्या मालकीची शेती नाही. दुसर्‍याच्या शेतावर कूळ म्हणून राबणार्‍या कुटूंबात जन्मलेल्या आनंद यादव यांना शिक्षणाचे कोणतेच वातावरण नव्हते. गुरा-ढोरांमागे, शेतीकामेकरुन शिक्षणाची आवड जोपासली. आपला मुलगा शिक्षणाच्या नादी लागला तर आपले पोटाचे हाल होतील असे वाटून शिक्षणाच्या आड येणार्‍या वडिलांची मर्जी सांभाळली. शेतीची कामे सांभाळून अभ्यास करत राहिले. अशा वेगवेगळ्या अडी-अडचणीतून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षणासाठी गाव सोडले. थोरामोठ्यांच्या मदतीने एम. ए झाले हे सर्व 'झोंबी'त आलेले आहे. ह्या प्रसंगानिमीत्त 'झोंबी' चे पुनर्वाचन करून त्यातील अस्सल धगीचा 'आनंद' मी परत एकदा घेईन म्हणतो. डॉ. यादव व डॉ. पानतवणे ह्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच ह्या निमीत्ताने इथे डॉ. यादवांवर एक छोटेखानी परंतु माहितीपूर्ण लेख लिहील्याबद्दल डॉ. बिरूटेंना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 01/18/2009 - 08:49 नवीन
>तसेच ह्या निमीत्ताने इथे डॉ. यादवांवर एक छोटेखानी परंतु माहितीपूर्ण लेख लिहील्याबद्दल डॉ. बिरूटेंना धन्यवाद. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/18/2009 - 16:56 नवीन
प्रदिपराव आपण डॉ. आनंद यादवांचे 'झोंबी' आत्मचरित्र वाचलंय तेव्हा डॉ. आनंद यादव यांना वाचणारा माणूस भेटल्याचा आनंद झाला . मात्र मी काही 'झोंबी' आत्मचरित्र वाचलं नाही. माझ्यावर संस्कार आहे ते डॉ.रवींद्र ठाकुर यांच्या 'आनंद यादव व्यक्ती आणि वाड;मय' या पूस्तकाचे !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sun, 01/18/2009 - 05:55 नवीन
शरद पवारांचे ब्रा विरोधी धोरण म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 01/18/2009 - 06:21 नवीन
=)) असेच विचारतो.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 01/18/2009 - 06:50 नवीन
श्.प. ब्रा. विरोधी आहेत काय?
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sun, 01/18/2009 - 06:59 नवीन
त्यांना काय जातय ब्रा. विरोधी व्हायला..त्यांची जात पुरुषाचीच :)
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sun, 01/18/2009 - 07:47 नवीन
असो या ब्राह्मण विवादात आपण पडायलाच नको पण एक वाचक म्हणून त्यांचे अभिनंदन बाकी त्यांचे लिखाण ,काय आम्ही वाचलेले नाही असो वाचल्यवर चर्चा करु आपला (चुकुन माकुन पुस्तके वाचणारा) विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/18/2009 - 16:40 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3991200.cms मातीतला माणूस ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/18/2009 - 16:46 नवीन
गटणेसेठ 'मातीतला माणूस' मटाचा चांगला दुवा दिला ! आभारी आहे ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 01/18/2009 - 16:59 नवीन
डॉ. आनंद यादवांचे वैशिष्टे ज्याची नोंद मला महत्वाची वाटते की, त्यांच्या काळातील ग्रामीण कथा वाचतांना पात्रांचे संवाद बोलीतून व्यक्त होत होते, तर निवेदन प्रमाण मराठीतून व्यक्त होत होते, (लेखक निवेदनामधून बोलत होते) तेव्हा आनंद यादवांनी आपल्या ग्रामीण कथेत ग्रामीण माणूसच निवेदनाद्वारे बोलतांना वाचकांसमोर उभा केला.
आनंद यादवांची छान ओळख करुन दिलीत. यादवांचे अभिनंदन. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 01/19/2009 - 03:40 नवीन
शृंगारावर 'स्पर्शकमळे' सारखे पुस्तक लिहुन हा नाजुक विषय लीलया हाताळणार्‍या डॉ. आनंद यादवांचे अभिनंदन. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/19/2009 - 05:07 नवीन
मराठी ललित लेखनात शृंगाराच्या बाबतीत जरा सोवळेपणाच असावा असे वाटते ! त्यामुळे मिळाले तर डॉ. आनंद यादवांचे 'स्पर्शकमळे' वाचावे असे वाटत आहे. त्यांच्या ललित लेखनाबद्दल अधिक माहिती टाकता आली तर टाका राव ! स्त्री-पुरुष आणि त्यांच्या शृंगारिक भावना ललित लेखनाद्वारे कशा व्यक्त केल्या असतील याची अंमळ उत्सुकता लागून राहिली आहे ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 01/19/2009 - 04:22 नवीन
डॉ. आनंद यादवांचे मन:पूर्वक अभिनंदन. यादवांच्या साहित्याची चांगली ओळख करून दिल्याबद्दल बिरुटे सरांनाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/19/2009 - 05:12 नवीन
असेच म्हणतो --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Fri, 03/08/2013 - 15:21 नवीन
फारच संमिश्र प्रतिसाद ! आणि यादव यांच्याबद्दल दोन्हीप्रकारची टोकाची मते आहेत लोकांची असे दिसते मिपावर
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 03/08/2013 - 17:16 नवीन
झोंबी, घरभिंती, नांगरणी, काचवेल.. ही पुस्तकं वाचली आणि आवडली आहेत. आत्मचरित्रपर लेखनाचे हे वेगवेगळे भाग आहेत. उत्तम आणि वाचनीय साहित्यकृती आहेत. नुकतंच डवरणी वाचलं पण ते तितकं विशेष वाटलं नाही.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Sat, 03/09/2013 - 21:07 नवीन
आणि नटरंग
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 03/11/2013 - 06:03 नवीन
झोंबी आणि घरभिंती वाचली आहेत मी. ती वाचल्यावर असं वाटतं की आपण त्यांच्या तुलनेत फारच सोपं आयुष्य जगतोय. लिहिण्यची शैली पण छान आणि त्यांचे अनुभव तर केवळ सुन्न करणारे...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा