Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

काय होणार होतो.....आणि काय झालो.....!

झ
झेल्या
Fri, 01/16/2009 - 06:53
🗣 34 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8385 views

🗣 चर्चा (34)
र
रम्या Fri, 01/16/2009 - 10:41 नवीन
मला व्हायचं होतं नासामध्ये वै़ज्ञानिक :D पण झालो सोफ्टवेअर इंजिनिअर ! #:S आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 01/16/2009 - 10:46 नवीन
मला व्हायचे होते सोफ्टवेअर इंजिनिअर पण झालो हार्डवेअर इंजिनिअर संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/16/2009 - 10:47 नवीन
सर्व्व सॉफ्टवेअर इंजिनीयर होतात ते पाहुन हार्डवेअर इंजिनीयर झालो. आता म्हणतो : कोण होतास तु, काय झालास तु आधी नेमका कोण होतो बरे?
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 01/16/2009 - 12:06 नवीन
मला माणुस होउन स्वच्छंदीपणे जगायचं होतं......पण झालो गुलाम! :( - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
M
mamuvinod Sat, 01/17/2009 - 10:45 नवीन
१००% सहमत
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Fri, 01/16/2009 - 12:13 नवीन
मला व्हायचे होते एक C.A झालो मेक्यानिकल इंजिनिअर आणि काम करतो एका सोफ्टवेअर इंजिनिअरचे...... भविष्यात काय करणार ते माहित नाहि...
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 01/16/2009 - 12:23 नवीन
http://www.misalpav.com/node/3391 ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Fri, 01/16/2009 - 14:01 नवीन
असो असो! याची आम्हांस कल्पना नव्हती. पण इतर काही संकल्प आणि त्यांच्या सिद्धींची (लागलेली) वाट हे मात्र नक्कीच नव्याने चर्चिले जाऊ शकेल असे वाटते.. पाहूया कोण कोण काय काय म्हणतंय...! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/16/2009 - 14:34 नवीन
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
झेल्या भौ .... एक लंम्र इणंती ... ही सिग्नेचर आमच्या खरडवह्यांमधे वारंवार टाकून आमचं टाळकं सटकवू णका म्हणजे झालं .. - फेक्या (टार्‍या)
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Fri, 01/16/2009 - 15:02 नवीन
बाकी या सिग्नेचरने तुमचं टाळकं सटकतं म्हणजे कमालच आहे... असो. मित्रा, तुझी 'इणंती' काही विचारार्ह वाटत नाही. क्षमस्व... :( तू मोठ्या मणाचा दिसतोस्..(ह. घे.).. क्षमा करशील अशी आशा आहे...! तुझी 'ण' ची ष्टाईल लै भारी रे...! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/16/2009 - 15:21 नवीन
बाकी या सिग्नेचरने तुमचं टाळकं सटकतं म्हणजे कमालच आहे...
तुम्हाला कमाल वाटते याचीच कमाल वाटली ... बाकी मिपाच्या नियमित लोकांपैकी १० लोकांना विचारा मी ते काय म्हंटलो ते .. तुम्हाला पुन्हा कमाल वाटेल .. मग आम्ही तुम्हाला "कमाल अकमाल" किंवा "कमाल खाण" म्हणू ;)
तुझी 'इणंती' काही विचारार्ह वाटत नाही. क्षमस्व...
ती सिग्णेचर खरडीत जा लोकांना रोज .. तुम्हाला कळेलच
तू मोठ्या मणाचा दिसतोस्..
ह्म्म ... मुलगा असुन तु "चांगल्या स्वभावाचा" वाट्टोस .
क्षमा करशील अशी आशा आहे...!
आशा क्षमा करेल का पण ?
तुझी 'ण' ची ष्टाईल लै भारी रे...!
धण्यवाद रे .. णाकाचं हाड वाढलं की असं होतं .. आणि माझी हाडं वाढलीत ;) -दयावान ) टारझन
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 01/16/2009 - 14:55 नवीन
लहानपणी दर १५ दिवसांनी बदलायचं काहीतरी. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. बाकी प्रवास नेति नेति पद्धतीचा.. साधारण ८-९ वी मधे जाहीर करून टाकलं की डॉक्टर वा इंजिनियर होणार नाही. वकील होणार नाही. शाळामास्तरीण होणार नाही. सी ए, एफ आय सी डब्लू ए ( हे मला तेव्हाही म्हणता येत होतं! :) ) असंही काही करणार नाही एवढा नन्नाचा पाढा जोडला होता. त्याबरोबर घरीच बसणार नाही हे ही नक्की होतं. १० वी नंतर मग मला काळजीने ऍप्टिट्यूड टेस्ट ला पाठवलं गेलं होतं. तिथे त्या लोकांनी 'कॉम्प्युटर प्रॉग्रॅमिंग' असं लिहून कळवलं होतं. (त्या काळात हे म्हणजे काहीतरी सॉल्लिड नवीन आहे असं वाटायचं सगळ्यांना!) त्यांना काही येत नाही हे मला तेव्हाच कळलं होतं. हवाई दलात फायटर पायलट व्हायचं असं वाटल्याने एन सी सी एयरविंग ला गेले होते. पण मुलींना घेत नाहीत आणि कमर्शियल पायलट लायसन्स च्या ट्रेनिंगसाठी अति प्रचंड फी आहे जी बहुतेक परवडणं शक्य नाही हे कळल्यावर इंटरेस्ट संपला. मग १२ वीच्या सुट्टीत नागपूरला कॉस्मेटॉलॉजी मधे बी टेक करण्याचाही विचार करून झाला होता. पण १२ मधे माझे मार्क इतके उच्च होते की ते जमलंच नाही. खरंतर हे माझंच सुदैव... साधारण एस वायच्या दरम्यान नाटकाचा किडा चावला आणि हळूहळू टी वाय पर्यंत लक्षात आलं की हेच माझं पंढरपूर. त्यात मधेच विक्रम गायकवाडकडे शिक्षण घेणं पण सुरू केलं होतं. किडा मोठा होऊन नाटकाबरोबर चित्रपटाचाही झाला होता. माझ्या पंढरपुराचा जिल्हा झाला होता पण या पंढरपुरातली नक्की आपली आळी कोणती याचा निर्णय मात्र लागत नव्हता. मग एम ए -नाटक, एम एफ ए - कॉश्च्यूम डिझाइन.. असं मेकप्-कॉश्च्यूम चं शिक्षण घेऊन व्यावसायिकरित्या तेच करते आहे तरीही लेखन-दिग्दर्शन आणि क्वचित अभिनय सुद्धा अश्या गल्ल्यांमधे उंडारत असतेच मी. असं सगळं चालू आहे.. अजून खूप काही व्हायचंय करायचंय त्यामुळे श्टोरी पूर्ण झालेली नाही - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/16/2009 - 15:55 नवीन
मला आळशी व्हायचं होतं. जरा जास्तच आळशी झालो :)
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Mon, 01/19/2009 - 11:14 नवीन
आळशी होण्यासाठी आपण घेतलेल्या अथक परिश्रमांचं चीज झालं म्हणायचं... :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Fri, 01/16/2009 - 16:16 नवीन
मला शिक्षक व्हायचे होते आणि आपल्याच शाळेत शिकवायचे होते- ज्यांनी ज्यांनी मला हाणले आहे त्यांची मुले पण एक दिवस माझ्या शाळेत येतील आणि मी त्यांना बदड बदड बदडीन असे स्वप्न होते. नंतर विसरलो आणि काम्पुटरवाला झालो
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/16/2009 - 16:53 नवीन
ज्यांनी ज्यांनी मला हाणले आहे त्यांची मुले पण एक दिवस माझ्या शाळेत येतील आणि मी त्यांना बदड बदड बदडीन असे स्वप्न होते. :-D हे मला अजूनही वाटतं. आता बहुतेक शिक्षकांची मुलं नाही पण नातवंडं असतील बालवाडीत, अजून आहेत काही वर्ष! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 01/16/2009 - 16:54 नवीन
आमचे भविश्य पडले आहे मला ना सगळ्यात जावेसे वाटते कधी नाटक करतो कधी लेखन ,कधी काव्य ,आणि कधीतरी अभ्यासही करावासा वाटतो असो पण काहितरी चांगले करायचे आहे स्वतःसाठी आणि जगासाठीदेखील बघु भगवंत काय घडवतोय माझ्याहातुन विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/16/2009 - 17:37 नवीन
कारण हल्ली मुलंच शिक्षकांना बदडतात असं ऐकिवात येतं! :T तुम्हाला शिक्षकांचा आणि त्यानंतर त्यांच्या मुलांचाही मार खावा लागला असता तर जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं नसतं का? ~X( (ह.घ्या.) चतुरंग
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Fri, 01/16/2009 - 18:45 नवीन
हा हा हा, वाटच लागली असती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/16/2009 - 17:25 नवीन
आम्हाला खरेतर दर्जेदार लेखक बनायचे होते. पण जालावर फुटकळ आणि अवांतर प्रतिसादच देत बसलो. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 01/16/2009 - 18:12 नवीन
>>आम्हाला खरेतर दर्जेदार लेखक बनायचे होते. पण जालावर फुटकळ आणि अवांतर प्रतिसादच देत बसलो. =))
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 01/16/2009 - 18:12 नवीन
शेवटी वेताळ झालो. पण आपण त्यातपण खुश आहोत. वेताळ
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Mon, 01/19/2009 - 11:06 नवीन
'राम राम..' अशी तपश्चर्या करण्याऐवजी 'मरा मरा..' अशी तपश्चर्या केलीत की काय? (ह. घ्या) :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 01/17/2009 - 04:28 नवीन
मला मिल्ट्रीतला जवान व्हायचे होते( कारण टी.व्ही. वरची मालिका परमवीरचक्र ) पण झालो आयटी हमाल. बसलोय कळफलक बडवत. :) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
भ
भिडू Sat, 01/17/2009 - 07:29 नवीन
मला हॉटेल टाकायचे होते पण आय.टी. वाला झालो
  • Log in or register to post comments
स
सचिन Sat, 01/17/2009 - 16:51 नवीन
हा विषय निघाला म्हणजे मला लहानपणीचा एक मजेशीर प्रसंग आठवतो. मी पाचेक वर्षांचा असेन......असेच एका पाहुण्यांनी विचारले "तू मोठा झाल्यावर कोण होणार ?" मी उत्तरलो, "मी बाबा होणार !". ....आणि योग्य वेळी हे स्वप्नही सत्यात उतरलं. आता ते कर्तव्य शेवटपर्यंत आनंदाने पार पाडायचं !
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 01/17/2009 - 16:53 नवीन
१ नंबर! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 01/19/2009 - 09:55 नवीन
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sun, 01/18/2009 - 15:11 नवीन
मला डॉक्टर व्हायच होत आणि तेच झालो :(
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/19/2009 - 02:16 नवीन
आम्हालाही डॉक्टर व्हायचं होतं! :)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 01/19/2009 - 12:58 नवीन
मला लहानपणी बस कंडक्टर व्हायचं होतं, कारण त्याच्याकडे खूप पैसे (तेव्हा खूप सारी नाणी म्हणजे खूप पैसे असं वाटायचं) असतात असं वाटायचं....पण नंतर झालो काहीतरी वेगळंच.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 01/19/2009 - 13:09 नवीन
कंडक्टरच व्हायचं....त्यांना रिसेशनचा काही त्रास नाहीये ;) -टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! जाताजाता : आजकाल मला पेन्शनर व्हावसं वाटतयं :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 01/19/2009 - 18:30 नवीन
मला बीई Computer,लायब्ररीयन, पुस्तकं-कपड्यांची दुकानदार.. इत्यादी इत्यादी व्हायचे होते.. :)) माझं एकंदरीत अभ्यासावरील 'प्रेम' पाहून आई म्हणायची होम सायन्सला जा! :) बाबांना मी त्यांच्यासारखी सीए व्हावे असं वाटायचं.. इतक्या गोंधळातून मी शेवटी कंप्युटर इंजिनिअर झाले.. ! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 01/20/2009 - 09:17 नवीन
मला पोलिस व्हायचे होते पण झालो software engg :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा