Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

AI , विजेची गरज , वीज कंपनी , गुगल आणि अडाणी

त
ताजे प्रेत
Wed, 01/14/2026 - 17:26
🗣 8 प्रतिसाद
आज गुगल ने त्यांच्या डेटा सेंटर ची विजेची प्रचंड मागणी लक्षात घेऊन एक वीजनिर्मिती कंपनी विकत घेतली एक भीषण गोष्ट लक्षात आली का ? कोणी AI बद्दल काहीही ऐकले नसेल तेंव्हा २००४/५ मध्ये अडानी ने प्लान केला आणि २००६ मध्ये पहिला पॉवर प्लांट उभारला आणि अडानी पॉवर ने बराच विस्तार केला अगदी विदेशातून कोळसा आणण्याचा पर्यंत केला अगदी AI कोणी ऐकले नव्हते तेंव्हा २०१९ मध्ये अडानी ने डेटा सेंटर बिझनेस मध्ये प्रवेश केला . कोणी त्यांना माहिती दिली असेल ? कशी त्यांना माहिती मिळत असेल ??? माझा थरकाप होत आहे इकडे मात्र लोक टाटांबद्दल काहीही बोलत नाहीत टाटा सगळ्यात खतरनाक छुपा रुस्तम आहेत त्याची १९१९ मध्ये टाटा पॉवर ची स्थापना केली - १९१९ मध्ये!!! आणि १९६८ मध्ये टीसीएस कि स्थापना केली आजही टाटा AI किंवा डेटा सेंटर मध्ये नाहीत असे लोक समजतात पण खरे तर तेच गेम मध्ये आधीपासून आहेत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1042 views

🗣 चर्चा (8)
ध
धर्मराजमुटके Wed, 01/14/2026 - 17:44 नवीन
एआय ने सध्या संगणक क्षेत्राची चांगलीच (पाचर) मारुन ठेवली आहे. रॅम, हार्ड डिस्क, प्रोसेसर, कॉपर केबल चे भाव रोजच्या रोज बदलत आहे. एक टीबी हार्ड डिस्क सहा महिन्यांपुर्वी मी रुपये ३८०० ला विकत घेतली होती तीच मागील आठवड्यात ५८०० ला घेतली. (जीएसटी वेगळा). आज एक टीबी हार्ड डिस्क गायबच झाली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/15/2026 - 12:52 नवीन
जरा विनोदांचा दर्जा वाढवा, व्हॉट्सअप समूहात वाहवा मिळाली म्हणून लागेच उतावीळपणे धागे काढू नका असे सुचवून खाली बसतो!
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 13:31 नवीन
नक्की विषय काय? तर मोठे दूरदर्शी उद्योजक वेळीच धंद्यात निर्यात. नवनवीन क्षेत्रे गुंडाळतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/16/2026 - 07:12 नवीन
उद्योगपती दूरदर्शी असतात. नवनव्या कल्पना आणि त्यावर अधिराज्य करणे यासाठी त्यांच्याकडे कल्पना असतात. पन्नास वर्ष पुढे पाहतात ही गोष्ट पूर्वीच्या काळातही वाखाण्न्याजोगी आहे. आजच्या काळातही ते पुढील पन्नास वर्षातील नव नवे उद्योग आणि क्षेत्रे शोधत असतीलच ही मोठी आणि नवी आणि तोंडात बोट घालायला लावणारी गोष्ट आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/15/2026 - 13:49 नवीन
एआय क्षेत्रात सध्या बरीच मोठी मारामारी चालु आहे, कोणी कोणाच्या कर्माचार्‍यांना पळवतोय, कोण कोणाच्या चीप / प्रोसेसर तज्ञाला पळवतोय. ३८ ट्रिलीयन कर्जात असलेल्या अमेरिकेला डेटा सेंटर मधुनच बर्‍या पैकी आर्थीक मिळकत मिळत आहे. गुगल सध्या तरी या क्षेत्राय लिड घेईल असे मला वाटते. याचे मुख्य कारण त्यांच्याकडे इतर कंपन्यां पेक्षा अधिक डेटा सेट आहे शिवाय ते स्वतः प्रोसेसर बनवतात. किमान पुढील ५ वर्ष एआय त्याचे स्वरुप बदलत राहील असे दिसते. साधारण ५ वर्षा नंतर त्याचे स्वरुप आणि त्या स्वरुपाचा कसा आणि कुठे वापर केला जाईल हे पाहणे अधिक रोचक ठरेल. डेटासेट महत्वाचा असतो कारण जसा आणि ज्या प्रकारचा डेटा सेट त्यानुसार त्याचा वापर शक्य होतो. अनसेंसर्ड डेटासेट / एआय हा आपली जागा कायम ठेवेल. डाव्या हाताच्या व्यक्तीचे चित्र काढ असे एआयला सांगितले तरी तो उजव्या हाताच्या व्यक्तीचेच चित्र काढतो कारण त्याच्या डेटा सेट मध्ये असलेला इमेज डेटा हा मुखत्वे उजव्या हातानी लिहणार्‍या व्यक्तींचा असतो. एअआय आणि सावधानता: कुठलेही एआय [ विशेषतः चायनीज ] ब्राऊजर वापरण्याचे टाळावे कारण तुमच्या ब्राऊजर मधुन नक्की कोणता डेटा एआय वापरेल आणि त्याच्या मालकाला परत पाठवेल याची निदान आजच्या घडीला शाश्वती नाही! कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत डेटा एआयला फिड करु नका, त्याचा वापर एआय नक्की कसा करेल हे सांगता येत नाही. गुगलच्या नॅनो बनाना ची मध्यंतरी क्रेझ आणली गेली होती [ अशी क्रेझ जनरेट केल्या शिवाय लोक मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करणार नाहीत आणि बहुतांश वेळी कुठलाही विशेष विचार न करता व्यक्तीगत डेटा अश्या एआयला पुरवतात. ] मी नॅनो बनानावर एक गोष्ट करुन पाहत होतो त्यावेळी मला आश्चर्य कारक गोष्ट कळली! माझ्या वडिलांचे एक जिगरी मित्र आहेत, त्यांच्या परवानगी ने मी त्यांच्या एक फोटो घेतला त्यांना मी सांगितले की एआयच्या वापरासाठी मी काही फोटो वापरले त्याचे थ्रीडी मॉडलवाले फोटो एआय बनवुन देतो. मला फक्त त्यांचाचा थ्रीडी फोटो बनवुन त्यांना परत द्यायचा होता पण त्यांनी जो फोटो दिला होता त्यात त्यांची सौभाग्यवती देखील होत्या, मग तो फोटो मी एडिट करुन कॉर्प करुन वेगळ सेव्ह केला व तोच नॅनो बनानाला अपलोड देखील दिला. नॅनो बनाना ने मला जे काही आउटपुट दिले त्यात एकात त्यांची पत्नी देखील त्याने जशीच्या तशी रेखाटुन एकत्र चित्र बनवुन दाखवले.याचा अर्थ एडिट केलेल्या फोटोतुन देखील त्याने काही मिळवली होती! तसेच त्याच्या डेटासेट मध्ये त्या दोघ्या पती-पत्नींचे फोटो असण्याची शक्यता होती? जरी एडिट केलेला फोटो अपलोड केला होता आणि ज्यात एकच व्यक्ती होता तर मग एआयला दुसरी व्यक्ती सुद्धा चित्रात घेऊन का चित्रीत करावी वाटली असेल? असो... बरेच दिवसात मी जेलब्रेकवाले प्रयोग केले नाहीत, आधी केले होते ते मिपावर दिले होते. वेळ मिळाल्यास यावर काही जमते का ते पाहिन. जाता जाता: एआयचा वापर करताना मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगा, आता तर त्याचा वापर करुन हॅकिंग सुद्धा वेगात होते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 01/22/2026 - 09:57 नवीन
याचा अर्थ एडिट केलेल्या फोटोतुन देखील त्याने काही मिळवली होती!
तुम्ही AI ने फोटो क्रॉप करा, बॅकग्राऊंड ब्लर किंवा काढून टाका आणि फोटो सेव्ह करा. पुढे कधी तोच फोटो AI व्हिडिओ साठी वापरला तर व्हिडिओत कधीकधी मूळ बॅकग्राऊंड क्षणभर दिसतो. AI काहीच फेकून देत नाही. जुने नवे सगळे हिशोब चुकते करतो. डरना जरूरी है l :)
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 01/16/2026 - 03:17 नवीन
नॅनो बनाना ने मला जे काही आउटपुट दिले त्यात एकात त्यांची पत्नी देखील त्याने जशीच्या तशी रेखाटुन एकत्र चित्र बनवुन दाखवले. संमिश्र भावनांनी अंगावर काटा आला. पण मीही अशा तर्‍हेचे अनुभव वेगळ्या संदर्भात घेतले आहेत.
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 01/16/2026 - 03:24 नवीन
मिठाचा व्यापार की डेटा ट्रान्सफर? आपल्याला वाटते ते फक्त 'टाटा मीठ' आहे. पण विचार करा, मीठ हे 'सोडियम क्लोराईड' असते. त्यातला Cl म्हणजे रसायनात क्लोराईड म्हणजे खरं तर Cloud Computing चा कोड वर्ड तर नाही ना? आपण जेवण चविष्ट करतोय आणि तिकडे टाटा आपल्या चवीचा डेटा 'सिंक' करतायत! माझा तर आता चमचा उचलतानाही थरकाप उडतोय! टाटांची 'टाईम मशीन' १९१९ मध्ये टाटा पॉवर? १९६८ मध्ये टीसीएस? ही साधी प्रगती नाही, हे टाइम ट्रॅव्हल आहे! रिलायन्स आणि अदानी आजच्या बातम्या वाचून गुंतवणूक करतात, पण टाटांकडे नक्कीच २०९९ चं वर्तमानपत्र आजच येत असणार. माझा तर आता आजचा पेपर उचलतानाही थरकाप उडतोय! खतरनाक ए आय शांतता लोक विचारतात, टाटा ए आय मध्ये का नाहीत? अरे वेड्यांनो, TATA या शब्दातच दोन वेळा 'A' येतो. हे 'Artificial Intelligence' चे सर्वात मोठे आणि जुने प्रतीक आहे हे कोणालाच कसे समजत नाहीये? ते गप्प आहेत कारण त्यांनी पूर्ण जगाचा 'बॅकअप' घेऊन ठेवलाय! माझा तर आता माझेच लिखाण वाचतांना थरकाप उडतोय!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 20 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा