Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारतात अनागोंदी माजू शकेल का?

श
शाम भागवत
Wed, 01/14/2026 - 11:41
🗣 80 प्रतिसाद
https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1 काल वरचा व्हिडीओ पाहिला. विचार करण्यासारखा वाटला. मग मी सारांश लिहून काढून मग तो मिसळपाववर टाकावा असे ठरवले. अर्घ्यातासाचा व्हिडीओ पहायला फारसा लोकांना वेळ नसतो. पण थोडक्यात कोणी सांगत असेल तर मात्र लोकं तयार असतात. हाच विचार करून हा प्रयोग करून पाहातो आहे. :) ०:०० ते १२:५१ १.पूर्वी आपण नोटा छापायचं काम करण्यासाठी प्रिंटिंग प्लेट्स वापरायचो. विशीष्ट प्रकारचा कागद बाहेरून मागवून तो वापरायचो. या प्रकाराला प्लैट बेड पध्दत म्हटले जायचे. पाकिस्तानला हा कागद मिळवता आला आणि त्या प्रिंटिंग प्लेटस् बनवता आल्या की पाकिस्तानला खोट्या नोटा बनवणं अगदी सहज शक्य होते असे. नोटबंदीनंतर पाकिस्तानने उभारलेला हा उद्योग बंद पडला. पण हा तात्पुरता फायदा होता. नविन डिझाईन नवीन प्रकारचा कागद इपोर्ट करून नवीन नोटा छापून हा प्रश्न आपण काही काळासाठी सोडवला तरी पाकिस्तान यावर तोडगा काढणार हे आपल्याला माहीत होतं. कारण कागद बाहेरून मागवला होता व त्याची माहिती पाकिस्तानला मिळवणं अशक्य नव्हतं पण अवघड होतं. त्यामुळे काही काळ उसंत मिळणार होती. मात्र आता आपण नवीन तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. त्याला सिलींडरिक मोल्ड पध्दत म्हणतात. या सिलिंडरमधे नोटांचे सर्व सुरक्षीततेचे तपशील भरलेले/खोदलेले असतात. कागद बनवायचा लगद्यामधे हा सिलिंडर टाकला जातो व त्यांत फिरवला जातो. म्हणजे लगदा त्या सिलिंडरवर जमा होऊन कागद तयार होतो. त्यामुळे कागद तयार होणे व त्यावर नोटेचे सगळे तपशील उमटणे एकदमच होते. हे आधुनिक तंत्रज्ञान फक्त चार ठिकाणीच वापरलं जातंय. इतकं ते नवीन आहे. त्यामुळे पाकिस्तानला खोट्या नोटा बनवणं सहज सोपं राहिलेलं नाही. शिवाय नोट छापायचा खर्च आता खूपच कमी झालाय. वेग प्रचंड वाढलाय. तसेच खोट्या नोटा शोधणं फारच सोपं झालंय. एकवेळ पाकिस्तानला भरपूर प्रयत्नाअंती कागद तयार करणं जमू शकेल पण सिलिंडर बनवायला अतिशयच अवघडं आहे. कारण तो सिलिंडर आपण बनवला आहे व त्याचे डिझाईन आपल्याकडेच आहे. १६:०५ ते १७:५८ २. देशांत अतिरेकी तयार होणे, आंदोलने, त्यात जाळपोळ, हिंसाचरा होऊन देशांत अंधाधुंदी माजणं ह्या गोष्टी अर्थव्यवस्था ठीक नसल्यामुळे होतं असतं. नजीकच्या इतिहासात बघता हेच दिसतंय. प्रथम श्रीलंका, मग बांगला त्यानंतर नेपाळ मधे असंच घडलंय. इराणमधे तर आपण सध्या अनुभवतच आहोत. भारताताही विरोधी पक्ष असं काही व्हावं म्हणून प्रयत्न करत असूनही, काहीही होत नाहीये, कारण भारतातली अर्थव्यवस्था एकदम ठीक आहे. सतत वाढतीय. रोजगार वाढतोय. परदेशी गुंतवणूक येत राहतीय. तंत्रज्ञान येत राहीलंय. जेन जी ला मुद्रा लोन मिळतंय. मुख्य म्हणजे मुद्रा लोनमधे बुडीत खात्याचं प्रमाण कमी कमी होत चाललंय. मुद्रा लोनमधील सरकारी बॅंकांचे पैसै बुडण्याचं प्रमाण ३-४ टक्के इतकच आहे. तर खाजगी बॅंकांत ०.९५ टक्के इतकंच आहे. आणि २०१५ ते २०२५ या कालावधीत एकूण ३३ लाख कोटी एवढं कर्ज दिलं गेलंय. निरनिराळ्या छोट्या उद्योगांसाठी हे दिलंय व ह्या एकूण उद्योगांची संख्या आता ५२ कोटी झालीय. गंमत म्हणजे राहूल गांधींना वाटतंय की हे जेनजी उठाव करतील. मोदींना पळवून लावतील. पण तसं काहीच होत नाहीये. आंदोलने होताहेत. पदयात्रा निघताहेत. आरोप होताहेत. पण वावटळ जाओ साधा वाराही वाहात नाहीये. १९:०९ ते २१:३८ ३. चीन बॉर्डरकडे आपण दुर्लक्ष केलं. का? तर चीन नाराज होईल. भारताचे माजी संरक्षण मंत्रीॲटंनी म्हणतात की, आमच्या काळात चीनने सिमेवर कुरबुरी केल्या नाहीत. आता मात्र चीन कुरबुरी करतोय. कारण एकच. मोदींचं धोरण चुकतंय. पण चीनने बॉर्डरपर्यंत सहा लेनचे रस्ते बनवले. रेल्वे आणली तरी आपण काहीच करायचं नाही? ते एका दिवसांत बॉर्डरवर येणार. आपल्याला पोहोचायला ३ आठवडे लागणार. कुमक पोहोचेपर्यंत सिमेवरील सगळे सैनिक गारद झालेले असणार. गलवान झालं. डोकलाम झालं. पण का झालं? आपण सिमेवर रस्ते व पूल उभारायला लागलो म्हणूनच झालं ना? जर शत्रूला आपलं वागणं योग्य वाटत नसेल तर आपण योग्य तेच करतोय असंच समजायला पाहिजे. आता आपणही एक दिवसात मोठी कुमक सिमेवर पाठवू शकतो. काही ठिकाणी तर सहा तासात पोहोचू शकतो. रणगाडे नेणारी विमाने उतरवू शकतो. तशा सोयी झाल्या आहेत. सिमेवरच्या सैनिकांचे मनोधैर्य आता किती उंचावले असेल याची कल्पना करून पहा. ही सैन्यशक्ती भारतात अराजक माजले तर मोदींना सोडून राहूल गांधीच्या बाजूला वळेल? २२:०८ ते २४:१७ ४. २०१४ च्या अगोदर गरीब लोकांकडे बॅंकखाती नव्हती. असा समज होता की खात्यात पैसे ठेवायला त्यांच्याकडे पैसे कसे असतील? २०२५ पर्यंत ५६ कोटी गरीबांची झीरो बॅलन्स खाती उघडली गेली आहेत. २०२५ च्या शेवटी त्यांत २.६७ लाख कोटी रूपये शिल्लक होती. ह्या खातेदारातील ६७ टक्के ग्रामीण/ निमशहरी भागातील आहेत. पूर्वी एखाद्या गावातील कोणाला एखाद्या स्कीममधून पैसे मिळायचे असतील तर प्रधानमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री कार्यालयाकडे, मग चीफ सेक्रेटरीकडून अर्थखात्याच्या सेक्रेटरीकडे, मग डिव्हीजिनल कमीशनर, मग डिस्ट्रिक्ट मॅजिस्टेट म्हणजे कलेक्टर, मग तिथून सीडीओ, जिल्हा परिषद मग गावप्रमुख व ग्रामसेवक अशी उतरंड असे. प्रचंड वेळ खाऊ पध्दत होती ती. शिवाय प्रत्येक टप्यावर भ्रष्टाचार होत असे. राजीव गांधींनी तर सांगितले होते की, केंद्रातून एक रूपया ग्रामिण लाभार्थीसाठी दिला गेला तर त्यातले १४ पैसे लाभार्थ्याला मिळतात. उरलेले ८६ पैसे मधल्यामधे गडप होतात. आता पूर्ण रुपया लाभार्थीला मिळतो व तो ही तात्काळ. पूर्वीची पध्दत व आत्ताच्या पध्दतीमधील फरक कळणारा आंदोलने करून मोदींना सत्तेवरून खाली खेचायला मदत करेल ? ‌ २४:२५ ते शेवट ५. असं म्हटलं जातं की, मोदी सरकार इडीचा खूप वापर करते. पण लक्षात घ्या युपीएने जरी इडीचा कायदा केला असला तरी ते त्याची अंमलबजावणी करण्यात कमी पडले. युपीआय पेमेंट सिस्टिम आल्यावर कॅशमधे मोठे व्यवहारच होत नाही. जर झाले तर तात्काळ ते नजरेस येतात. डिजीटायझेशनमुळे आर्थिक व्यवहारांचे ट्रेस शोधणे खूप सोपे झाले आहे. घोटाळे झटकन उघडकीस येतात. बेनामी कंपन्यांचे जाळे उभे करून भुलभुलैय्या निर्माण करणे आता इतके सोपे राहिलेले नाही. याचा फायदा मोदींना होतो हे कोणी लक्षातच घेत नाहीये. तेलगी घोटाळे आता होऊच शकत नाहीत. लपवाछपवी आता करताच येत नाही. आता अर्थव्यवस्थेचे जाळे तुकड्या तुकड्यात विणले जात नाही. ते आता एकसंध झालंय. कागदी नोटा, डिजिटल करन्सा,स्टँप पेपर, सेंट्रल बँक, इतर सरकारी व खाजगी बँका, सरकारी मुद्रणालय, सरकारी प्रेस सगळे एकत्र काम करतात. पण हे सगळं मोदींनीच केलंय ना मग त्यांना गुन्हेगार अगोदरच्या सरकारपेक्षा भरभर सापडतात हा दोष त्यांचा कसा काय ? https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5976 views

🗣 चर्चा (80)
क
कपिलमुनी Wed, 01/14/2026 - 12:51 नवीन
बॅट का ग्रीप.. फक्त आरोपी म्हणा आणि ईडी ने शाबीत केलेले गुन्ह्याची टक्केवारी शोधा. गुन्हा शाबित झाल्याशिवाय गुन्हेगार नसतो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 01/14/2026 - 13:35 नवीन
गुन्हेगार शब्दप्रयोग चुकलाय. “घोटाळे“ हा शब्द योग्य वाटतो. पण हे सगळं मोदींनीच केलंय ना मग त्यांना घोटाळे अगोदरच्या सरकारपेक्षा भरभर सापडतात हा दोष त्यांचा कसा काय ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 01/14/2026 - 12:57 नवीन
रोचक लेख... सकारात्मक मुद्द्यांमुळे छान वाटले... भारतात अनागोंदी माजू शकण्याची शक्यता सध्यातरी नाही हा विचारांने दिलासा मिळाल्या सारखे वाटले. आणि अवांतर सांगायचं म्हंजे आपण म्हन्जे मी सामान्यजन असल्याने अनागोंदी साठी कुठं काय कटकारस्थानं होत आहेत याची कल्पना येणं कठीण आहे....
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 01/14/2026 - 14:42 नवीन
तेलाची भानगड वाढली तर आपली श्रीलंका होऊ शकते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 01/14/2026 - 14:49 नवीन
समजून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 01/14/2026 - 23:06 नवीन
तेल महागले की अर्थव्यवस्था ढासळू लागेल. मग फक्त राजकीय सत्ता मिळवणे ही चढाओढ लागेल. जी कायम चालूच असते. परंतू देश चालवणे मात्र कुणालाच जमणार नाही. अनागोंदी सुरू होईल. हल्लीच काही इतर देशांत ही अनागोंदी सुरू झालेली दिसत आहे. त्या देशांकडे नाहीत विशेष उद्योग किंवा विशेष खनिज साठे. केवळ पर्यटनावर पैसे मिळत होते तेही बंद पडू लागले. आपल्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आपले अन्नधान्य आपणच पिकवणे हे मोठा मूलभूत उद्दिष्ट आहे. तेलाच्या किंमती वाढल्या तर ते अन्नधान्य देशातच वितरित करणेसुद्धा परवडणार नाही. बाहेरून मागवणेही महागच पडेल. कोणतीही राजकीय सत्ता आली तरीही यातून मार्ग काढू शकणार नाही. आमच्याकडे पूर्वीची सत्ता चांगली होती आणि तीच आता तारेल असं काही होणार नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 00:14 नवीन
युक्रेन रशिया युध्द सुरू झाल्यावर तुम्ही म्हणताय तसं तेल आयातीवर अवलंबून असलेल्या सर्व देशांत झालंय. युरोपचं तर कंबरडं मोडलंय. महागाई या सर्व देशात वाढलीय. जीडीपीचा दर घसरलाय. परकीय चलनाची गंगाजळी आटत चाललीय. फ्रान्स सारखे देश तर आयएमएफ कडे लोन मागायला लागले आहेत. युध्द सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनंतरची स्थिती आहे ही. अपवाद भारताचा आहे. या सगळ्या आघाड्यावर भारताची स्थिती भक्कमच राहिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तेलाच्या ३ वर्षाच्या राजकारणांत भारताने पैसे कमावले आहेत. गमावलेले नाहीत. रशियाला कोंडीत पकडायची अमेरिकेचे धोरण साफ फसलंय. युक्रेन हरत चाललंय. रशिया जिंकतच चाललंय, मला तरी कुठेच निराशा वाटावी असं तेलाचं संकट दिसत नाही आहे. मागील ३ वर्षात १. सलग घट: थोडक्यात सांगायचे तर २०२२-२५ या काळात महागाई नियंत्रणात आणण्यात यश आले असून, २०२५ मध्ये त्यात लक्षणीय घट झाली आहे. २. सलग वाढ: भारत सलग तिसऱ्या वर्षी ७% पेक्षा जास्त जीडीपी वाढ नोंदवण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान मजबूत झाले आहे. २०२६ मधे म्हणजे चौथ्या वर्षात ७.४ टक्के वाढेल असा अंदाज आहे. ३. सलग सातत्य: परकीय चलन साठ्यासंबंधात भारत सतत पहिल्या पाच देशांमधे राहीला आहे. आजचा नंबर चौथा आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड फक्त पुढे आहेत. ११ महिन्याची गरज भागेल एवढा साठा भारताकडे आहे. मला वाटते १९९१-९२ ची स्थिती असल्यासारखे घाबरून जाण्याची स्थिती नक्कीच नाही. आज भारत सोन व चांदी विकणारा नव्हे तर विकत घेणारा देश बनला आहे.. तसेच यापुढेही गरज भासेल त्याप्रमाणे भारत रशियाकडून तेल घेतच राहील. त्यामुळे पुढेही भारत तेल संकटाला यशस्वीपणे तोंड देत राहील असे वाटते. मी तरी भारताविषयी सकारात्मक आहे. :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 03:51 नवीन
>>भारत रशियाकडून तेल घेतच राहील.>> इराणकडूनही घेतो आपण. आता इराणचं अमेरिकेशी बिघडलंय. रशियाशी बिघडलं तर काही अडचण नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 04:39 नवीन
भारत जवळपास ४० देशांकडून तेल घेत असतो. त्यातील ९ टक्के तेल इराणकडून घेतो. त्यामुळे खूप मोठा अडचणीचा सामना भारताला करावा लागेल व त्यातून अनागोंदी निर्माण होईल असे वाटत नाही. भारताची सप्लाय चेन खूप मोठी आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 06:41 नवीन
आकडेवारी कळली. धन्यवाद. आपली अर्थव्यवस्था विविध उद्योगांवर आधारित आहे त्यामुळे तीव्र धक्का बसत नाही. नोकरीसाठी परदेशी असणारे लोकही पैसे पाठवतात. पण तेल महाग झाल्यास व्यवस्था नक्कीच ढासळेल. शिवाय अमेरिका फारच ढवळाढवळ करत आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/15/2026 - 06:51 नवीन
मनमोहन सिंग यांनी दबून ठेवलेला डॉलर रुपया दर सुद्धा मोदी साहेबांच्या प्रयत्नाने ५०- ६० वरून १०० वर पोचला आहे. ग्रोथ असावी तर अशी !
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 08:40 नवीन
रुपया दाबण्याची कला फक्त ममोंनाच माहीत असेल तर आपल्याकडे कल्पनांचं दारिद्र्य आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 01/14/2026 - 15:27 नवीन
मतदारसंघ पुनर्रचना होउ द्या मग कळेल
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 01/14/2026 - 15:34 नवीन
लोकसंख्या कमी होईल.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 01/14/2026 - 16:51 नवीन
निरनिराळ्या छोट्या उद्योगांसाठी हे दिलंय व ह्या एकूण उद्योगांची संख्या आता ५२ कोटी झालीय.
१४० की १५० कोटी लोकसंख्येतला जवळपास प्रत्येक 'तिसरा' माणूस आज उद्यमी झालाय हे वाचुन डोळे पाणावले...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 01/14/2026 - 18:03 नवीन
इथं गणित उपयोगी पडणार नाही. १. एक व्यक्ति वेगवेगळ्या उद्योगासाठी एकापेक्षा जास्त कर्जे घेऊ शकतो. २. एक व्यक्ति तोच धंदा आणखी वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकतो. ३. एक व्यक्ति शिशु, किशोर, तरुण, तरुण+ या चार श्रेण्यांमधे आपली श्रेणी अपग्रेड करून परत कर्ज मिळवू शकतो. पण असं काही करता येत नाही असं तुमचं मत असल्यास, तुमचा मुद्दा बरोबर असल्याचं तुम्ही गृहित धरायला माझी काहीच हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 01/14/2026 - 16:55 नवीन
अनागोंदी? भारतात ? कब्बी नै l अशी शंका फक्त देशद्रोह्यालाच येऊ शकेल. :) :) :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/15/2026 - 04:31 नवीन
गुंड, मवाली, सत्तेच्या उच्च पदावर बसले आणि प्रशासकीय गुंडगीरीच्या बळावर लोकांना जेलात घालणे, गुन्हे दाखल करणे, आवाज दाबणे यामुळे तरी शक्यता नाही. बाय द वे, देशात अनागोंदी माजू शकते अशी शक्यता फक्त देशद्रोह्यांनाच वाटू शकते याच्याशी सहमत. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 04:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 01/14/2026 - 17:39 नवीन
भारतात अनागोंदी माजू शकेल का?
इंपॉसीबल इज नथींग ! पण भारतात अनागोंदी माजू नये ही मनापासून इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 01/14/2026 - 18:07 नवीन
मोदी सतत ट्रंपचा उपयोगच करून घेत आले आहेत. ट्रंपच्या प्रत्येक खेळीत भारत सशक्त होताना मला दिसतो आहे. टॅरिफ प्रकराणतही ट्रॅफ फसतोय असं माझं मत आहे. पण ते लक्षात यायला अजून थोडा अवकाश आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 01/14/2026 - 18:08 नवीन
जिंकले तर मोदी , हरले तर नेहरू ! मग कशाचि काळजी .
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 01/14/2026 - 18:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 01/14/2026 - 18:42 नवीन
शाम सर, जरा हलकेच घ्या हं. मुळात असा तद्दन डाव्या पुरोगामी लोकांना पडणारा प्रश्न तुंम्हाला पडला हे वाचून तुमचेही अर्नबायझेशन झाले की काय अशी शंका आली होती. पण कर्ज घेणार्‍या लोकांची तुंम्ही दिलेली आकडेवारी पाहिली आणि जीव भांड्यात पडला. त्यावर टर्मिनेटर साहेबांचा प्रश्न व तुंम्ही दिलेले उत्तर (इथे गणित उपयोगाचे नाही..) वाचून तुमची खुंटी अजून बळकट असल्याची खात्री पटली. असो. भारतात अनागोंदी माजू शकेल का? याचे उत्तर आत्ता मग अनागोंदी नाही तर काय आहे? असे असू शकेल. अनेक डेटा पॉईंट्स दाखवता येतील उदा. सुप्रीम कोर्टात निकाल द्यायला ३२४ वर्षे लागतील इतके खटले पडून आहेत संदर्भः (https://en.wikipedia.org/wiki/Pendency_of_court_cases_in_India). गुगल जेमीनी: December 2024: Data from the National Judicial Data Grid showed 82,972 pending cases. आता यालाच सुव्यवस्था म्हटले की झाले. किंवा भारतात अनागोंदी माजू शकेल का? याचे उत्तर कधीही नाही असे असू शकेल. बेडकाला एकदम उकळत्या पाण्यात टाकले तर तो जीवाच्या आकांताने बाहेर उडी मारतो. पण सर्वसाधारण तापमान असलेल्या पाण्यात टाकले व हळू हळू तापमान वाढवत नेले तर तो उडी न मारता मरून जातो पण उडी मारत नाही. हा सिध्दांत बहुधा आपल्या समाजाचा अभ्यास करूनच काढला गेला असावा असे वाटते. पानीपतचे युध्द खूप महिने चालले होते पण त्याच्या शेजारीच तिथले स्थानिक लोक रोज आपआपले शेत कसत असत म्हणे. आत्ताच्या काळात मणीपूरमध्ये इतकी जाळपोळ, अत्याचार, दंगे उद्रेक झाले. आपल्या राज्यकर्त्यांनी त्या राज्याला भेट द्यायला सुध्दा अनेक महिने लावले तरी बहुसंख्य लोकांनी ना कसला जाब विचारला न मतपेटीतून काही उत्तर दिले. त्यामुळे भारतात कधीही अनागोंदी माजू शकत नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 00:24 नवीन
मोदी असोत की राहूल गांधी, कोर्ट केसेसचा मुद्दा बदलणारा नाही. :) तसेच पेंडिंग कोर्ट केसेसमुळे आंदोलने होऊन मोदींना सत्तेवरून खेचून राहूल गांधींना सर्वेसर्वा केल जाईल असं मला तरी वाटत नाही. तसेच भारताला तुम्ही बेडूक म्हणा की काही अन्य. पण भारतात अनागोंदी माजणार नाही हे तुम्ही मत मांडल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/14/2026 - 20:58 नवीन
एवढा मोठा लेख वाचायचे ७० रुपये पडतील! :)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 01/14/2026 - 23:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/15/2026 - 06:49 नवीन
भारतीयांचे मानसिक स्वास्थ्य वेगाने ढासळत आहे. त्याची अनेक कारणे देता येतात. लेखकाने हा मुद्दा अजिबात विचारात घेतला नाही याची गम्मत वाटली.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 01/15/2026 - 07:13 नवीन
काहींना आपल्या लाडक्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते बाहेरून आलेल्या बलात्कारी, भ्रष्ट आणि गुंडांसाठी सतरंज्या टाकत आहेत, उचलत आहेत ह्यातच आनंद मानत आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 08:35 नवीन
कारणे वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 01/15/2026 - 08:39 नवीन
चेहरे वाचता आले तर सहज कळेल. :) :) :) :) :) :)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 09:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/15/2026 - 11:33 नवीन
श्री० शाम भागवत ० हवामानबदलाने उभी केलेली आह्वाने ० काही देशात वाढत असलेला भारतद्वेष आणि त्यामुळे परत फिरणार्‍या भारतीयांची कुतरओढ ० लोकसंख्येच्या ताणाने वाढलेल्या मोठ्या शहरातील समस्या ० वाढता धार्मिक उन्माद (कल्पकतेला घातक ठरतो) हे सर्व घटक मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतात, हे आपणास ठाऊक असणे अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 12:18 नवीन
आता यामुळे भारतातील अनागोंदी वाढून भारतातले लोकनियुक्त सरकार कसे खाली खेचले जाईल ते समजावून सांगाल का?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/15/2026 - 07:22 नवीन
AI म्हणतोय लेखक असे सांगत आहेत की: भारताने अर्थव्यवस्था, सुरक्षा, तंत्रज्ञान व गरीबांच्या कल्याणासाठी अनेक मजबूत पावले उचलली आहेत. ही सुधारणा देशाची प्रगती सुनिश्चित करणारी व भविष्याला सुरक्षित करणारी आहे. त्यामुळे विरोधकांना कोणत्याही प्रकारचे अराजक निर्माण करणे कठीण झाले आहे. लेख प्रचारकी आहे,एम! :)
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/15/2026 - 07:23 नवीन
हा हा हा हा!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 08:36 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/15/2026 - 08:43 नवीन
कधी एकदा अनागोंदी येतेय आणि दूध का दूध पानी का पानी होतंय याची ओढ लागली असेल तर होऊन जाऊ द्या एकदा अनागोंदी. इतकी आक्रमणं आली, हे आणखी एक.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 09:32 नवीन
तो सगळा इतिहास झाला. त्याची पुनरावृत्ती होणार नाही एवढे बहुसंख्य लोक सुजाण झाले आहेत व त्यांची संख्या वाढतच चालली आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/15/2026 - 10:29 नवीन
रायसीनचा वापर हा मास टेररसाठी केला जाणार होता, हा केमिकल वॉरफेअर चा जीवघेणा प्रकार! केवळ दैव बलवत्तर आणि सुरक्षा यंत्रणांना योग्य वेळी सुगावा लागला म्हणुन मोठा अनर्थ टळला.इतका भयानक प्रकार उघडकीस येऊन देखील जर कोणी देशात सामान्य स्थिती असल्याचे समजत असेल तर मग हे असचं घडतं राहणार! देशात लोक तर आता पाणी पिऊन देखील मरत आहे, कोणाला फरक पडतो, मोदी है तो कुछ भी मुमकीन है. गोदी मिडिया हा शब्द प्रयोग आता सर्वांना माहित आहे, त्यामुळे मिडीया जो लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो तोच सरकारी सेवेत राहुन मेवा खाण्यात व्यस्त आहे. सर्व प्रकारचे कर इतके झाले आहेत की सामान्य मध्यम वर्गीय माणसाचे जगणे कठीण होऊन बसले आहे, यात वीज, पेट्रॉल आणि गॅस देखील महाग. जगण्यासाठी लागणारा अर्थाजनाचा कणा मोडुन कढाण्यात सरकारी व्यवस्थेला यश आले आहे. यात आर्थिक काळ कठीण असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना नारळ दिला आहे, तसेच काही कंपन्यांनी पगार वाढ केलीच नाही किंवा केल्यास तो तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असतो. जरी तुमच्याकडे आरोग्य विमा असला तरी तुमचे आर्थीक स्वास्थ बिघणार नाही याची खात्री आजच्या घडीला नाही. Amit Shah Promises Free Gas Cylinders for Eid and Muharram During Jammu and Kashmir Election Rally How middle class pays more taxes than corporates, and gets ignored too India’s Unequal Tax Structure: The Rich Pay Less, The Rest Get Less The Hidden Disparity: How 3% of India’s Middle-Class Pays More in Direct Taxes Than All Corporates Combined LPG price hike: Commercial cylinder becomes Rs 111 costlier—check new prices for major cities Ayushman Bharat and the False Promise of Universal Healthcare Haryana to Manipur—private hospitals struggle with Ayushman Bharat. Govt owes Rs 1.2 lakh cr TCS to keep firing employees if needed, in 6 months has let go of 30,000 TCS cuts down jobs of more than 30,000 employees, has significantly reduced its workforce हे कमी आहे की काय म्हणुन देशात दर वर्षी लाखो स्त्रिया गायब होत आहेत! पण कोणाला पडली आहे त्याची? 13.13 lakh girls, women went missing between 2019 and 2021: Govt data 61% Of Delhi's Missing People In 2025 Are Women: Police 4.5 Crore Missing Women in India: The Silent Emergency No One Sees देशात तरुणांना नोकर्‍या मिळत नाहीत, बेरोजगारीचा मोठा प्रश्न देशा समोर उभा आहे आणि जेव्हा कुठल्या पदासाठी इंटरव्हू होतात तेव्हा अजुन विदारक चित्र पहायला मिळते. Thousands have to write exam on a runway 8,000 applicants for 187 home guard posts, exam held on airstrip in Odisha जाता जाता: तुमचा पंतप्रधान जर अजैविक असेल आणि विविध प्रकारचे फोटो सेशनसाठी सात्यत्याने विविध प्रकारची वेशभुषा परिधान करुन कधी गुहेत तर कधी चर्च मध्ये दिसत असेल, मदर तेरेसा सारख्या विखारी आणि मरणासन्न व्यक्तीचे देखील धर्मातर करणार्‍या अश्या राक्षसी महिलचे कौतुक करत असतील तर, अश्या व्यक्तीचा उदोउदो करुन तुम्हाला काय मिळणार आहे? त्यांनी चांगली कामे केलीत त्याचे कौतुक आहे पण मुस्लिम तुष्टीकरणाचा रेकॉर्ड देखील त्यांनीच कायम केला आहे. वक्फ कायदा आणि बोर्ड हा राष्ट्र विरोधी आणि हिंदू विरोधी असुन देखील त्याला फंडिंग केले व हा कायदा पुर्णपणे नष्ट करण्याच्या जागी त्यात दुरुस्ती आणली गेली.मुंबई बांग्लादेशी मुसलमानांनी भरुन चालली आहे व राजकारण्यांना त्याची काहीही पडलेली नाही. देशात अफुच्या नशे पेक्षा मोदींची नशा इतकी घातक असेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नसेल!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/15/2026 - 11:21 नवीन
हा प्रतिसाद वाचून मदनबाण म्हणजेच माई कुरसुंदीकर का असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/15/2026 - 13:07 नवीन
हा प्रतिसाद वाचून मदनबाण म्हणजेच माई कुरसुंदीकर का असा प्रश्न पडला. हा,हा,हा... मला माई कुरसुंदीकर हा नाना [ नाना चेंगट ] असल्याचे वाटते! माई खरयं का?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू गुरुवार, 01/15/2026 - 11:44 नवीन
देशात अफुच्या नशे पेक्षा मोदींची नशा इतकी घातक असेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नसेल! विसाव्या शतकात हिंदूंना गांधींची नशा चढली होती, एकवीसाव्या शतकात हिंदूंना मोदींची नशा चढली आहे. दोघांनीही अंतिमतः हिंदूंचे पार वाटोळे केले आहे.
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू गुरुवार, 01/15/2026 - 11:44 नवीन
देशात अफुच्या नशे पेक्षा मोदींची नशा इतकी घातक असेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नसेल! विसाव्या शतकात हिंदूंना गांधींची नशा चढली होती, एकवीसाव्या शतकात हिंदूंना मोदींची नशा चढली आहे. दोघांनीही अंतिमतः हिंदूंचे पार वाटोळे केले आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 13:06 नवीन
मला वाटते मी तुम्हाला इथे उत्तर दिलेले आहे. भारतात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला लागतो. जनमत अनुकूल करावे लागते. तसे ते झाले की मग कार्यवाही करायची असते. त्यामुळे हे पेशन्सचे वेळखाऊ काम आहे. असो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 13:44 नवीन
तसेच माझ्या प्रतिसादाला चंसूकु यांनीही प्रतिसाद इथे दिलेला आहे. तोही वाचनीय आहे. पण माझ्या एक लक्षात आले आहे की मोदींइतका पेशन्स जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत मोदी आपल्याला कळू शकणार नाहीत. निदान आपला पेशन्स सतत वाढवत नेला तर तसतसे मोदी आपल्याला कळू शकतील व विरोधकांचा उपयोग मोदी कसा करून घेतात ते कळू शकेल. विरोधकांनी मला दगड मारले. पण मी त्या दगडांचाच वापर करून इमारत बांधली हे मोदींचे वाक्य आहे. वरवर ते अलंकारिक वाटेल. प्रत्यक्षात मोदींचा यशाचा तो राजरस्ता आहे. जबरदस्त पेशन्स असलेला माणूसच या वाक्याचा अर्थ लावू शकेल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/15/2026 - 14:01 नवीन
रस्ता बांधायला अदानी , अंबानी हे दोन गवंडी होते म्हणे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 14:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 01/15/2026 - 16:03 नवीन
>> मोदींइतका पेशन्स जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत मोदी आपल्याला कळू शकणार नाहीत. निदान आपला पेशन्स सतत वाढवत नेला तर तसतसे मोदी आपल्याला कळू शकतील तुमचे विशफुल थिंकींग चांगले आहे पण जर तुंम्ही बायोलॉजिकल असाल तर त्यांची बरोबरी कशी करणार?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 01/15/2026 - 17:01 नवीन
मी सामान्य माणूस असल्याने, फक्त समारात्मक विशफुल थिंकिंग करू शकतो व मला जे येतं तेवढंच मी करतो. :) ते थिंकिंग लोकांना पटावे अशी इच्छा असली तरी त्यात माझी अपेक्षा घालत नाही. आग्रह तर अजिबातच नाही. त्यामुळे विरोधात येणाऱ्या कोणत्याही प्रतिक्रियांना अगदी शांतपणे सामोरे जाऊ शकतो. बरेच जण मला म्हणतात की तुझी अपेक्षाच नसेल तर लिहितोच कशाला? :) पण बऱ्याच वेळेस सोमीवर लिहिल्याने चांगले मुद्दे लक्षात येतात. उदा. कंकाकांमुळे मी आणखी सविस्तर लिहिले. कपीलमुनींमुळे झालेली चूक दुरूस्त करू शकलो. टर्मिनेटरसाहेबांमुळे माझा मुद्दा आणखीन स्पष्ट करू शकलो. मदनबाण वगैरेंमुळे मोदींबाबत विचार मांडू शकलो. मायबोलीवर भरत यांनी प्रचंड विरोध केला तरीही त्यातून एक मुद्दा मिळालाच. मुद्रा लोनची रिकव्हरी नीट होत नाही असं त्यांनी कॉटेक्स सोडून दिलेले संदर्भ दिले. पण त्यामुळेच मी आरबीआय स्त्रोताद्वारे २०२१ ते २०२५ ची आकडेवारी देऊन मुद्रा लोन एनपीए कसा कमी होत चाललाय हे दाखवून देऊ शकलो. शिवाय हे सर्व करताना या सर्वांची मदत झालेली असल्याने सर्वांबद्दल मनांत एक कृतज्ञतेची भावना जन्माला आलेली असते. विरोधकांचा शांतपणे उपयोग करता यायला लागला की, पेशन्स वाढवायची खुबी साधते असं मला वाटतं. :) पण काही झालं तरी “विरोधकांच्या विरोधाला” विरोधकांनी दगड मारले असं मात्र मी म्हणणार नाही. कारण त्याचा उपयोग करण्यासाठी माझ्याकडे अदानी अडाणी कुठे आहेत? :) :) :) असो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा