Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?

क
कपिलमुनी
Mon, 06/30/2025 - 18:31
💬 72 प्रतिसाद

तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली. यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वापर करून उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला खीळ घातली.उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद भूषवताना शिवसेनेची पारंपरिक मराठी-केंद्रित भूमिका बदलून सर्वसमावेशक आणि सर्वसमाजाला आकर्षित करणारी प्रतिमा निर्माण केली होती. विशेषत: मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरी भागात हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. मात्र, देवाभाऊने या प्रतिमेला धक्का देण्यासाठी राज ठाकरे यांच्या मराठी-केंद्रित आणि काही काळापूर्वी उत्तर भारतीयविरोधी भूमिकेशी उद्धव यांना जोडले.हिंदी मुद्द्याचा वापर हा खरा मुद्दा की राजकीय हत्यार म्हणून वापरले हे विरोधकांना शेवट पर्यंत कळले नाही.., "हिंदीचा मुद्दा कधीच नव्हता, फक्त वापरून घेतला." हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाविषयी संभ्रम निर्माण करण्यासाठी हा मुद्दा उचलला. राज ठाकरे यांच्या MNS ने भूतकाळात मराठी अस्मितेच्या नावाखाली उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे हिंदी भाषिक मतदारांमध्ये MNS बद्दल नाराजी होती.देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या MVA आघाडीतील महत्त्वाचा घटक मानला जातो. उद्धव यांच्या प्रतिमेला खीळ घालून MVA च्या एकजुटीला आणि व्यापक मतदार आधाराला धक्का दिला. हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदार MVA साठी महत्त्वाचे आहेत, आणि त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न यातून झाला.कउद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचा एकत्रित प्रभाव कमी करण्यासाठी ठाकरे गटाला मराठी-केंद्रित पक्ष म्हणून चित्रित करून त्यांचा सर्वसमावेशक चेहरा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे MVA च्या निवडणूक अजेंड्यावर परिणाम होणार. आता राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.


  • Log in or register to post comments
  • 11436 views


वाचनखूण लावा
| 11436 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (72)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/08/2025 - 19:14 नवीन
शिवसेनेबद्दल जालावर ढिगभर माहिती पडलेली आहे, आपले 'शाब्दिक पोचारे' म्हणजे काही जगातलं पहिलं ज्ञान नसतं, नाही. आपल्याकड़े असलेली माहिती मिळवलेलीच असते. असलेल्या माहितीवर विश्लेषण व्यक्तिगणिक चूक बरोबर असते. आपण काही त्या काळातील प्रत्यक्ष साक्षीदार नसतो. आपले काही विशेष संशोधनही नसते. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे, राजकारणातील आपल्यालाच फार कळते,असेही अजिबात समजू नका. उन्नीस बीस सगळेच जाणते असतात. आपल्या सारखे भक्त सगळीकडेच असे उथळ माथळ करीत असतात त्यामुळे उगा आपल्याला राजकारणातली फार समजते असेही समजू नये असे वाटते. बाकी, लोकसभेच्या विश्लेषणात आपलं राजकारण आणि विश्लेषणातील घण्टागाडी उलथी-पालथी पाहिलेली आहे, तेव्हा उगाच शेखी मिरवू नका. =)) थेट, निर्भीड दिलादार स्व. बाळासाहेब कायम आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/09/2025 - 06:10 नवीन
@चंद्रसूर्यकुमार कुठे त्या बिरुटे मास्तरांच्या नादाला लागताय?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/09/2025 - 06:58 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा खरे काका. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/09/2025 - 06:58 नवीन
काल मुंबई मराठी माणसाचा एकत्रीत असा महामोर्चा निघाला. 'हिंदीसक्ती'च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना एका मिठाईविक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी मोठ्या संख्येने मराठीजन मिरा-भाईंदरच्या रस्त्यावर उतरले. सुरुवातीला मोर्चाची परवानगी नाकारण्यासह पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईमुळे तणाव निर्माण झाला. मात्र, नंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याने हजारोंच्या संख्येने मराठीजनांनी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकूणच मराठी भाषा, मराठी माणूस विरुद्ध अमराठी असे वातातवरण धुसमुसायला लागले आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस राजकारणासाठी जरी विषय असला तरी येत्या काळात हे मुद्दे अधिक तीव्र होतील असे वाटते. भाषिक मुद्याची तीव्रता कमी करण्यासाठी हिंदू धर्म खतरेमेचं पिल्लू सोडून मराठी भाषा, मराठी माणूस यात दूही माजवण्याचं षडयंत्र सुरु होईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/09/2025 - 08:09 नवीन
मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. कुठे रुग्णवाहिका उपलब्ध करून दे किंवा रिक्षात हरवलेलय गोष्टी मिळवून दे सारख्या ताबडतोब दिसणाऱ्या गोष्टी सोडल्या तर. त्या मानाने शरद पवार विखे पाटील पतंगराव कदम सारख्या नेत्यांनी साडे तीन का होईना जिल्ह्यांत सहकारी तत्त्वावर साखर कारखाने, सूतगिरण्या शिक्षण संस्था सारखे उद्योग सुरु करून स्थानिक मराठी माणसासाठी थोडी फार तरी कामे केली. मोर्चे काढणे, शक्तिप्रदर्शन करणे सोडून काही भरीव कार्य केले तरच शिवसेनेला काही भवितव्य आहे माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो. त्याच्या कडे ४० ते ५० कामगार काम करतात. आजतागायत केवळ मराठी माणसानाच त्याने कामावर ठेवले आहे. दांड्या मारणे, उत्सवासाठी चार दिवस गावी जाऊन परत येतो सांगून १० दिवसांनी उगवणे, लोकांकडून उसने पैसे घेऊन परत न करणे असे केले तरी अजून तरी त्याने भैय्या लोकांना कामावर ठेवलेले नाही. पण भूमिपुत्र म्हणून माज दाखवण्यापलीकडे मराठी कामगारांनी फार काही नाव घेण्यासारखे केलेले नाही. मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/09/2025 - 14:56 नवीन
दुर्दैवाने हे खरं आहे. याच कारणांमुळे मराठा साम्राज्य अस्तास गेलं असावं असं मला कधीकधी वाटतं. पण नक्की सांगता येत नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 07/09/2025 - 20:04 नवीन
माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो.
आणि
मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही
खरे सर .दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटताहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/16/2025 - 05:04 नवीन
>>>>मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. आपल्या मताचा आदर आहेच. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या 'मार्मिक' मधील व्यंगचित्रापासून ते महाराष्ट्रातला सत्ता काळ हा मोठा कालखंड आहे. शिवसेनेने मराठी माणसांठी काय केले हा खरं तर एखादा 'खंड' होईल इतका तो लेखनाचा मोठा विषय आहे. एका शांत, संयमी व्यंगचित्रकाराचा प्रवास, मराठी माणूस ते शिवसेनेचा जहाल पक्षाकडे प्रवास कसा होत गेला. साठच्या दशकातील महाराष्ट्राचं राजकारण, मराठी माणसाच्या रोजगारासाठीच नव्हे तर, मराठी माणसाठी खासगी कंपन्यात आणि सरकारी नोक-यात आरक्षण मागणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असावा. मराठी माणसाच्या मुद्याकडून हिदूत्वाकडे झालेला प्रवास. शिवसेना स्थापनेच्या अगोदरही मार्मिकमधून 'अमराठी' लोकांची यादी प्रसिद्ध करुन 'वाचा आणि थंड बसा' असे म्हणून मराठी माणसांमधे जनजागृतीच केली नाही तर, वाचा आणि उठा अशी हाक मारली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार कसा होत गेला. आपला पक्ष, राजकारण, पाठींबा देणे, नेते, बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण कायम वेगळं राहिलं. चित्रपटसृष्टीवरही कसा दबदबा निर्माण केला. देशभर ठाकरेंचं कसं वलय होतं. गावखेड्यात गावोगावी शिवसेनेचे फलक असायचे. गावागावात भगवे उपरणे घालून कार्यकर्ते अभिमानाने शिवसैनिक म्हणून कसे मिरवायचे. बाळासाहेबांचे वक्तृत्व आणि त्यांचा एक मोठा वर्ग. मोठा विषय. शिवसेनेच्या राजकारणाच्या यश अपयशाची चर्चा होत राहील. पण भरीव काही दिसलं नाही, इतकं सहज बोलून शिवसेना पक्षाची बोळवण होऊ शकत नाही. पुस्तक वगैरे वाचत असाल तर, स्व. बाळ ठाकरेंवर, वैभव पुरंदरेचं एक चांगलं माहितीवजा पुस्तक आहे, कधी मिळालं तर नक्की वाचा. शिवसेनेचा सविस्तर प्रवास वाचायला मिळेल. मराठी माणसासाठी काय काय केलं आणि शिवसेनेचा पक्ष स्थापनेपासून ते त्यांचा राजकारणाचा प्रवास चांगला समजून घेता येईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/16/2025 - 08:40 नवीन
भरीव काही दिसलं नाही तुम्हाला भरीव काही दिसलं का? तसं असेल तर मांडा कि इथे. उगाच बोलाचीच कढी आणि बोलाचा भात कशाला
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/16/2025 - 10:17 नवीन
प्रिय काका. आज मुंबईत जो मराठी माणूस दिसतो त्याचं श्रेय शिवसेनेला दिलं पाहिजे. अमराठी लोकांच्या काळात मराठी माणसाला रोजगार दिला. मुंबैत शिवसेना बेरोजगार तरुणांना खासगी कंपन्यात नोक-या मिळाव्यात यासाठी तरुणांच्या नोंदवह्यात नोंद करुन तरुणांना, प्रशिक्षण, देऊन पात्रताधारक व्हावा म्हणून युवकांचे मेळावे, अभ्यासिका, फिस भरणे हे राजकीय पक्षाने केले त्याचं नाव शिवसेना. मराठी माणसाला अमराठींच्या भाऊगर्दीत जिथे जिथे रोजगाराच्या संधी नाकारली तिथे तिथे मराठी माणसाला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मराठी माणसावर अन्याय अत्याचार तेव्हाही होत होता, त्यांच्यासाठी संघटन उभारले त्यांच्या हक्कासाठी लढा उभा केला. महाराष्ट्रातील माणूस एकजूट केला. गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. शिवसेनेची मार्गदेशक पाहिल्यावर मराठी माणसाला तो आपला पक्ष वाटला. महाराष्ट्रीयन उद्योगपतींनी मराठी माणसाला नोकरी द्यावी. वगैरे महाराष्ट्र गृहनिर्माण महामण्डलाची 80 टक्के घरे महाराष्ट्रातील माणसाला आरक्षित ठेवली पाहिजे ही मागणी केली. राज्यातील सरकारी नोक-या मराठी लिहिता वाचता येते त्याला मिळाली पाहिजे अशी मागणी केली पाठपुरावा केला. मराठी माणसाच्या हक्कासाठीच प्रस्थापित राजकारण्यांना शह देत ठाणे-मुंबई महापालिकेत यश मिळवले. सामान्य माणसांना अगदी वडा-पाव विकणा-यांना राजकारणात प्रतिनिधीत्व दिले. तळागाळातील लोकांचा आणि त्यातून आलेल्या सामान्य माणसाचाच पक्ष असतो हे पुढेही राजकारणात पहिल्यांदा शिवसेनेमुळेच घडले. एक ना हजार गोष्टी शिवसेनेच्या आहेत. कधीतरी त्यावर स्वतंत्र लेखन करीन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 07/16/2025 - 11:28 नवीन
+१ शिवसेना म्हणजे मराठी माणूस, मराठी माणूस म्हणजे शिवसेना असेच एकत आलोय, नी जेव्हा जेव्हा मराठी किंवा मराठी माणसावर संकट आले तेव्हा शिवसेनाच उभी राहिली हे ही दिसलेय. कोवळ्या मुलांवर हिंदी लादण्याचा भाजपचा डाव उधळून लावला तो शिवसेना मनसे मराठी एकीकरण समिती ह्यांनीच! शिवसेनेचे चिन्ह घेऊन उभी राहिलेली खोटी शिवसेना ह्यावेळी उघडी पडली. शिवसेनेची सगळ्यात मोठी चूक म्हणजे भाजपला महाराष्ट्रात वाढवले, मातोश्रीवर येऊन पाया पडून, ११७ जागा “मागून” मागून मोठे झालेले पक्ष आता शिवसेनेवरच उलटलेत! भविष्यात सेनेने सावध राहावे व भाजपला लवकरात लवकर महाराष्ट्रातून उपटून फेकावे, व मुंबईत मराठी माणूस वा शिवसेना वाचवावी!
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 07/16/2025 - 11:59 नवीन
मला शिवसेनेबद्दल फार राग-आणि लोभ नाही (त्यांच्या वैचारिक उड्या फार लांब पडत नाहीत). पण कुणी एक नांदगावकर नावाच्या शिवसैनिकाच्या क्लिप्स अधूनमधून फेबुवर बघायला मिळतात. त्यांचा जनता दरबार सेनाभवनात भरतो. सामान्य लुबाडले गेलेले गरीब लोक, विशेषतः ज्यांना पोलिसांकदून मदत होत नाही असे, त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि हे गृहस्थ वेगवेगळे मार्ग अवलंबून न्याय, मदत मिळवून देतात. वसंत मोरे नावाचे गृहस्थ असेच धडक कारवाई साठी प्रसिद्ध आहेत. माझ्यामते हे खुप मोठे भरीव कार्य आहे...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/17/2025 - 09:44 नवीन
ते नितीन नांदगावकर आहेत, त्यांच्याकडे पोलिसदेखील समस्या घेऊन येतात. मागे एका पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता, त्या पोलीस हवालदाराने सगळीकडे हेलपाटे मारले पण काहीही झाले नाही शेवटी नितीन नांदगावकरांच्या एका फोनवर काम झाले.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 07/31/2025 - 02:11 नवीन
काय पण करतात लोक. त्यावर अजुन उदो उदो. व्यवथा चालयला हवी .. असली रिकाम्टेकडी थेरे फक्त भारतात चालतात. पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता यात काय गोची होती? कोण कुणाची अडवणुक करत होते .. त्यावर रितसर खटला टाकुन व्यवस्थेवर सरळ करायचे सोडुन असल्या राजकारणी लोकांच्या आश्रयाला जाणे वर त्याचा उदो उदो करणे हे लोकशाही चे लक्षण नाही. असली कोणती चेकलिस्ट होती त्यात नांदगावकरांचा फोन आला तरच घराचा ताबा मिळेल असे लिहिले होते? व्यक्ती पुजा अजुन किती करावी ...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/31/2025 - 06:59 नवीन
तो खटला वर्षानुवर्षे चालला असता नी पोलिसाला असता नी बिल्डरने तोंडाला पाने पुसली असती. सिस्टीम जर स्ट्राँग असती तर का म्हणून नांदगावकरांकडे ते पोलीस आले असते? एका फोनवर काम झाले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/23/2025 - 07:54 नवीन
बिरुटे मास्तर आपण लिहिलेल्या बहुसंख्य गोष्टी ऐकीव आहेत त्यातून भरीव असे काहीही निष्पन्न झाले नाही हि वस्तुस्थिती. आमचे सर्व नातेवाईक मुंबईच्या सर्व विभागात विखुरलेले आहेत आणि आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झालेले आहेत आणि आमच्या चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना हक्क मिळवून द्यायच्या जितक्या वल्गना केल्या त्याच्या १० % जरी काम झालं असतं तरी ते मी मान्य केलं असतं. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या जागा बळकावून तेथे शिववडापाव झुणका भाकर केंद्रे आपल्या शिवसैनिकांना ( अनधिकृत असली तरी ) मिळवून दिली ती त्यांनी परप्रांतीयांना विकून दौलत केली. याला तुम्ही भूमिपुत्रांसाठी लढा म्हणत असाल तर बोलणंच खुंटलं. एक तरी शिक्षणसंस्था ,उद्योग धंदा, रुग्णालय किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे दूरगामी काम केलेले दाखवता येईल का? कम्युनिस्टांची युनियन जाऊन शिवसेनेची युनियन आल्यामुळे कोणत्या कारखान्यात कामगाराला फायदा झाला हे सांगता येईल का? गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. याला काही पुरावा? राष्ट्रीय मिल मजदूर संघ हि काँग्रेस प्रणित संघटना होती तिचा कम्युनिस्टांशी संबंध नाही. त्यांच्या जागी श्री दत्ता सामंत आले आणि गिरणी कामगार संपाची वाताहत झाली. निदान नीट माहिती घेऊन लिहीत चला आमचे वडील त्या काळात ३६ वर्षे एच आर मॅनेजर होते आणि एकंदर शिवसेनेच्या युनियनच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तेंव्हा तुमचं चालू द्या
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/23/2025 - 09:48 नवीन
डॉ. खरे काका. नावडतीचे मीठ अळणी असते त्यामुळे तुम्हाला काहीही पचने तसे अशक्य आहे. शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला त्याचं थोडं वाचन करा. आपल्या प्रतिसादातील विधानं ही परस्पर विरोधी आहेत त्यामुळे आपल्याला समजून घेणे कठीण होत आहे, अर्थात वाढत्या वयात आणि वयपरत्वे असं होतं असतं आम्ही समजून घेतो. आपल्या मुंबईतील आदरणीय चार-पाच पिढ्यांकडूनही आपणास त्या काळातील योग्य माहिती मिळाली नाही असे दिसते. आपण गंभीरपणे माहिती घेतली असती तर, विविध पक्ष, कामगार संघटनेच्या काही गोष्टी, माहिती झाल्या असत्या. पण काही मुलं लहानपणी 'ढ' असतात पुढे त्यांचं कधी कधी एवढं भारी जमून जातं की आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं. बाय द वे, त्यांनी आपणास काही गोष्टी सांगितल्या नसाव्यात त्यामुळे त्याबद्दल काहीही माहिती नाही हे, लक्षात आले आहे. मुंबई हा कम्युनिष्टांचा बालेकिल्ला होता. शिवसेनेला आपली ताकद वाढवायची तर शिवसेनेला आपला संघर्ष कम्युनिष्टांशी करावा लागणार होता. शिवसेनेची आपली स्वतःची कामगार संघटना उभी केली पाहिजे हा बाळ ठाकरेंच्या मनात विचार आला आणि आणि त्यांनी ९ ऑगष्ट १९६८ रोजी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. पहिले अध्यक्ष होते दत्ताजी साळवी तर, सरचिटणीस होते अरुण मेहता. कम्युनिष्टांना विरोध करुन शिवसेनेने मराठी माणसाचा कसा फायदा करुन दिला आणि शिवसेनेला पक्ष म्हणून कसा फायदा झाला हाही मोठा विषय आहे. तर, पहिली गोष्ट विविध कारखान्यांमधे रिक्त जागांची माहिती शिवसेनेकडे यायला लागली. शिवसेनेच्या बेरोजगार तरुणांना माहिती मिळायला लागली. बाळ ठाकरेंनी शिवसेनेत रोजगार विनिमय केंद्र सुरु केलं. हा झाला रोजगाराचा पहिला भाग. दुसरा भाग विविध कंपन्यामधे भारतीय कामगार सेनेने आपली पाळंमुळं रोवण्यासाठी जी काही रणनिती आखली होती त्याबाबत मतभेद होतील पण त्यावेळच्या संघटनांना शह देण्यासाठी त्यांची भूमिका योग्यच अशी होती. बाकी आपलंही चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/23/2025 - 15:08 नवीन
या सगळ्या फापटपसाऱ्यात शिवसेनेने मराठी माणसासाठी ठोस असं काय केलं ते लिहायला विसरलात. आणि कम्युनिस्टांना विरोध केल्यामुळे मराठी माणसाला कसा काय फायदा झाला बुवा? शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला याचा सामान्य माणसाशी काय संबंध एक डांबरट काढून दुसरा आणल्यामुळे काय होतं? बाकी आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे आपली चिडचिड होत आहे हे स्पष्ट आहे. मुळात नीट न वाचता प्रतिसाद लिहिल्यामुळे पितळ उघडं पडलं कि अशी चिडचिड होते असू द्या चालायचंच
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 07/09/2025 - 20:00 नवीन
मुंबईत मला वाटते शिवसेनेनी स्थानीय लोकांच्या रोजगारासाठी झुणका-भाकर केंद्रे उघडली होती, परंतु पाचएक वर्षांतच त्यांची मालकी दक्षिण व उत्तर भारतीयांकडे गेली. झुणका - भाकरी लुप्त होऊन त्या ठिकाणी वडा - सांभार, इडली - डोसा, पाणीपुरी वगैरे मिळू लागली होती. आता ह्याचे श्रेय कोणाला द्यायचे किंवा खापर कोणावर फोडायचे हे मिपावरचे जाणकारचं सांगू शकतील .
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 07/17/2025 - 06:12 नवीन
देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला पहिली पासून हिंदी शिकवायचीच आहे असं दिसतंय. अत्ता समितीला पुढे करून निर्णय घेतला जाईल. बचवासाठी ते ठाकरे आणि इंग्रजीचा आधार घेत आहेत. ह्यांची स्वतः ची मुलगी इंग्रजी मिडीयम मध्ये होती.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/23/2025 - 16:50 नवीन
मूल मुद्दा बाजूला पडतोय
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/30/2025 - 21:53 नवीन
धागे का काश्मीर होव्या मूळ मुद्दा बाजूमेच पड्या
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा