किडकी प्रजा - सायकोपथी

सायकोपथी हा गुंतागुंतीच्या समाजघातक वर्तनाला कारणीभूत ठरणार्या व्यक्तीमत्वातील बिघाडांचा समूह मानला जातो. अशा बिघडलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या लोकांना सायकोपॅथ अशी संज्ञा आहे. अशा व्यक्तींची ठळक वैशिष्ट्ये अशी असतात-
० अनाठायी आत्मविश्वास,सतत लबाडी आणि काड्या करायची प्रवृत्ती (ability to manipulate)
० स्वत:बद्दल अवाजवी कल्पना, उद्धटपणा
० स्वत:च्या फायद्यासाठी सतत लबाडी आणि फसवेगीरी
० शोषण, गैरफायदा घ्यायची प्रवृत्ती, अपराधीपणाचा अभाव
० जबाबदारी स्वीकारायला नकार
अशा व्यक्तीमत्त्वाच्या लोकांचे आजुबाजुचे वातावरण जर खतपाणी घालत असेल तर हळुहळु गुन्हेगारात रुपांतर होते. भ्रष्टाचार करणार्या व्यक्ती सहसा सायकोपॅथच असतात.
सायकोपथी आणि मानवी मेंदूचे आकारमान (घट/क्षय) यांच्या सहसंबंधाचा अभ्यास करणारा एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
Pieperhoff, P., Hofhansel, L., Schneider, F. et al. Associations of brain structure with psychopathy. Eur Arch Psychiatry Clin Neurosci (2025). https://doi.org/10.1007/s00406-025-02028-6
मेंदूच्या ज्या भागात हा क्षय दिसला ते भाग या प्रमाणे - subcortical areas such as the basal ganglia, thalamus, and basal forebrain, as well as parts of the brainstem (pons), cerebellum, and cortical areas in the orbitofrontal and insular regions.
महत्त्वाची गोष्ट अशी की मेंदू आक्रसण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात त्यात आनुवंशिक कारणांशिवाय व्यसने, ताण, चयापयाशी संबंधीत, रक्तदाब मधुमेहा सारख्या व्याधी, विषद्रव्यांचा मारा, कुपोषण इ० मुळे पुढील गोष्टी घडून येतात -चेतापेशींचा मृत्यु, चेतापेशींच्या जोडण्यांचा क्षय, चेतापेशींच्या शाखांचा क्षय, चेता तंतूंचा क्षय, चेतापेशींच्या आवरणाचा क्षय, चेतापेशींचे रक्षण करणार्या ग्लाया पेशींचा क्षय इ०
"किडकी प्रजा" या शब्दांनी अपमानित किंवा दु:खी होणार्यांना आणखी काय पुरावा हवा आहे? जसंजसं ताजं संशोधन वाचनात येईल तसं लिहायचा प्रयत्न करीनच...
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments