Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

र
राघवेंद्र
गुरुवार, 06/26/2025 - 22:13
💬 2 प्रतिसाद
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसं ‘कंट्या’चे रोजचे उद्योग, शाळेतील वावर, गावातील विक्षिप्त वागणं, आणि नंतर त्यात झालेला बदल आणि त्याचे कारण , हळूहळू तो गावाचा लाडका बनतो... — हे सगळं खूपच भावतं. आणि शेवटी — एक पूर्णपणे अनपेक्षित शेवट! फक्त २०० पानांची ही ग्रामीण भाषेतील गोष्ट, एका बैठकीत वाचून पूर्ण केली! ‘कंट्या’ वाचायलाच हवं असं वाटणारं एक अनुभवसंपन्न पुस्तक! कंट्या लेखक गणेश बर्गे New Era Publishing House

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1018 views

💬 प्रतिसाद (2)
अ
अभ्या.. Mon, 06/30/2025 - 10:03 नवीन
छान, वाचायलाच पाहिजे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 18:46 नवीन
कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा