Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

21 जून योग दिवस : उद्यानातिल स्वास्थ्य साधक

व
विवेकपटाईत
Fri, 06/20/2025 - 02:57

(हा लेख लिहण्यापूर्वी उद्यानात सकाळी पाच ते आठच्या दरम्यान अनेक स्वास्थ्य साधकांशी वार्तालाप केला आहे.)

माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले. त्याकाळी मोरीगेट ते यमुने पर्यन्त अनेक मोठी उद्याने होती. नंतर 35 वर्षे उत्तम नगर इथे राहिलो. जवळच्या जनकपुरी इथेही मोठे-मोठे उद्यान आहेत. बालपणापासून मला पासून उद्यानात फिरण्याची सवय आहे. गेल्या ऑगस्टच्या सुरवातीला ग्रेटर नोएडा इथल्या एका हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट झालो. मुलाला 22व्या माल्यावरचा फ्लॅट विकत घ्यायला भाग पाडले याचे एकमेव कारण या भागातील उद्यान बाल्कनीतून समोर दिसते. सकाळी उठल्यावर बाल्कनीत बसून चहा पिता-पिता उद्यानात फिरणार्‍यांना पाहून फिरण्याचा आनंद ही सहज मिळतो. हे उद्यान मोठे आहे, पादचारी ट्रेक ही जवळपास एक किलोमीटरचा असेल. आठवड्यातून तीन ते चार दिवस तरी सकाळी उद्यानात फिरायला जातो. उद्यानाचे तीन ते चार चक्कर मारतो. या उद्यानात किमान 250 चम्पाचे झाडे असतील. पूजेसाठी भरपूर फुल ही तोडतो, त्यामुळे सौ. प्रसन्न राहते. मला उद्यानात फिरताना समवयस्क आणि तरूणाशी गप्पा मारताना जाणवले, जिथे 20-25 वर्षांपूर्वी उद्यानात फक्त छोटी मुले खेळण्यासाठी, काही क्रिकेट खेळणारे आणि म्हातारे लोक उद्यानात फिरायला यायचे, आज मोठ्या संख्येत युवा शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी रोज सकाळी उद्यानात येतात.

आजकाल उन्हाळा असल्यामुळे सकाळी 5 वाजण्यापूर्वी स्वास्थ्य साधक उद्यानात फिरायला येतात. अधिकान्श तरुण मुले कानाला मोबाइलचे स्पीकर लाऊन पादचारी ट्रेकवर धावतात किंवा जोरात चालतात. त्यात मुलींची आणि महिलांची संख्या ही भरपूर आहे. आमच्या सारखे सीनियर सिटीजन ही चालताना गप्पा मारत टाईमपास करतात. सकाळी आठ वाजे पर्यन्त उद्यानात लोकांची वर्दळ असते. हिवाळ्यात मात्र सकाळी दहा-अकरा पर्यन्त लोक उद्यानात फिरायला उद्यानात येतात. सुट्ट्यांच्या दिवशी सकाळी आठ नंतर क्रिकेट खेळणारी मुले येतात. या शिवाय एक संघाची शाखा इथे नियमित लागलेली दिसते. रोज पाच ते सात लोक असतात. पण रविवारी ही संख्या जास्त असते. सकाळच्या तीन-चार तासांत सात ते आठ जागी छोट्या-छोट्या ग्रुप मध्ये स्वास्थ्य साधक योग आणी व्यायाम करताना दिसतात. एक योग शिक्षक फी घेऊन योग शिकवितो. त्याच्याशी बोलताना कळले तो ग्राहकांच्या सुविधांनुसार ऑनलाइन कक्षा ही घेतो. बाकी आज त्याच्या सारखे हजारो योग शिक्षक ऑनलाइन किंवा ऑफ लाइन योग कक्षा घेतात. हजारो योग शिक्षकांना रोजगार आणि योगासाठी लागणारे साहित्यांचे उद्योग ही मोठ्या प्रमाणात देशात सुरू झाले आहे.

या शिवाय एक योग कक्षा सकाळी पाचला सुरू होते आणि साडे सहा सात पर्यन्त चालते. पावसाळा असो किंवा घोर हिवाळा ही नियमित लागते. आजकाल किमान 25 ते 30 स्त्री पुरुष इथे योग आणि व्यायाम करताना दिसतात. ते महिन्यातून एकदा आर्यसमाज पद्धतीने हवन(यज्ञ) ही करतात. योगगुरूच्या प्रेरणेने देशात अश्या लाखाच्या जवळपास योग कक्षा चालतात.

अधिकान्श लोकांचे उद्यानात येऊन फक्त फिरण्याएवजी योग आणि व्यायाम करण्याचे मुख्य कारण औषधांवर होणारा वाढता खर्च. आजच्या युवा पिढीला वाटते आजारी झाल्यावर लाखांच्या पॅकेजची नौकरी ही जाऊ शकते. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकडे तरुणांचा कल वाढत चालला आहे. जे उद्यानात येत नाही ते जिम मध्ये जातात.

उद्यानाच्या दुसर्‍या बाजूला रस्त्यावर एक माणूस ठेल्यावर विभिन्न स्वास्थ्यवर्धक ज्युसेस विकतो. सकाळी तीन-चार तासांत त्याच्या भरपूर धंधा होतो. आजच्या घटकेला देशात हजारों ज्यूस विक्रेता सकाळी बाग-बगीच्यांच्या समोर स्वास्थ्यवर्धक ज्यूस इत्यादि विकतात. फार्मा कंपनीत काम करणार्‍या एक तरुण मुलगा सकाळी गप्पा मारताना, एका योग कक्षाकडे पाहत म्हणाला, योगगुरू मुळे लोकांची स्वास्थ्य प्रति जागरूकता वाढली आणि लोक योग आणि व्यायामाकडे लक्ष देऊ लागले आहे. त्यामुळे फार्मा कंपन्यांना दरवर्षी किमान लाख कोटींचे अंदाजे नुकसान होत आहे. भविष्यात हे वाढतच जाणार. आयएमए योगगुरू मागे झपाटलेल्या प्रेता सारखा लागलेला आहे, त्याचे मुख्य कारण हेच आहे. गेल्या पंचवीस वर्षांत योगगुरू ने शेकडो योग शिविर घेऊन आणि आस्था चॅनल वर रोज नियमित अडीच तास योग कक्षा घेऊन लोकांमध्ये स्वास्थ्य प्रति जागृती वाढविली. त्यांच्या प्रयत्नांमुळे 21 जून हा जागतिक योगदिवस ठरला. आज योग एक उद्योग झाला आहे आणि योग आधारित अनेक नवीन उद्योग आणि लाखो रोजगार ही निमित झाले आहे. योगदिवस योगगुरू प्रति कृतज्ञता प्रगट करण्याचा दिवस ही आहे.


  • Log in or register to post comments
  • 628 views


वाचनखूण लावा
| 628 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 32 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 39 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा