Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गोफ (ऐसी अक्षरे २९)

B
Bhakti
गुरुवार, 06/19/2025 - 17:44
💬 1 प्रतिसाद
१ गौरी देशपांडे क कर्वे घराण्यातील तिसरी पिढीतही स्त्रीयांच्या प्रश्नांवर डोळसपणे पाहण्याचे बाळकडू लाभलेल्या #गौरीदेशपांडे! पारंपारिक नीती अनीतीच्या पलीकडे स्त्रीला वागण्याची, समजून घेण्याची मुभा असायलाच पाहिजे हे ओळखूनच 'स्त्री' 'व्यक्ती' म्हणून कांदबरीत दाखवली, गौरी देशपांडे यांची अशी 'गोफ' ही कादंबरी वाचली. वसुमती आणि मां यांच्यातला गोफ सुलक्षणमुळे विणला गेला पण तो दुर्दैवाच्या फेऱ्यातून या जगातून निघून गेला. तेव्हा हा धाँगा-गोफ तुटक तुटक होऊ लागला. तेव्हा भंते या सर्वस्वी ऋषीतूल्य व्यक्तिमत्त्वाच्या जाणकार विचारांमुळे या दोघीतला गोफ पुन्हा घट्‌ट होऊ लागला. वसुमती व सुलक्षणा मुलगा आदित्य, ज्याला वसुमतीने कठोर होत, वडिलांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी लांब केलेच होते. पण पण सुलक्षणच्या या अवस्थेच्या आई म्हणून मां जबाबदार?असे वसूला वाटत तर सुलक्षणमध्ये ही करारी वसुमती बदल का करू शकली नाही? हा संभ्रम मां यांना पपडे. या आपपल्या अपराधी /कमी पडलेल्या भावनेतच दोघी समाजाच्या चौकटीत नांदायचे म्हणून एकत्र येतात. परंतू लवकरच दोघींना एकमेकींचा लळा लागतो. त्यातच जसपालचा मदतीचा आणि वसुमतीसाठी भावनिक गरजेची साथ मिळत राहते. अशाच मधल्या टप्प्यावर 'आनंदाची' मां च्या मानलेल्या मुलाच्या येण्याने अजून 'सुलक्षण' सगळ्यांत उलगडू लागतो. सारे काही स्थिर होताना, आनंदाकडे पाठ न करता त्याला आपल्यात आणूनच वसुमती जसपालसी पुन्हा लग्नगाठ बांधायचे ठरवते या साऱ्यात वसुमतीच्या स्त्रीच्या खंबीर भूमिकेचे अनेकदा दर्शन होते. इतर साचेबद्ध कादंबरीप्रमाणे ती परिस्थितीची शोषिक वगैरे कुठेच हे पात्र रेखाटलेले दिसत नाही. स्त्री-पुरुष असे खूप मोठी नेहमीप्रमाणे दरीच दाखवली नाही. निखळ मानवी जीवन त्यांच्या भावनांची अस्तर त्याची उतरंड दाखवली आहे. पुढे प्रत्येक टप्प्यावर सुखदुःखातही वसुमती कशाप्रकारे आणखीन चैतन्याने उमलत जाते हे वाचायला मजा येते. कधी कधी वाटते अशी कथा आजूबाजूला कुठेतरी घडलेली पाहिली, ऐकली आहे. परिस्थितीच्या रेट्यात स्त्रीची केवळ कीव न करता, तिच्या वागण्यातल्या मानवी संदर्भ मांडणाऱ्या अत्यंत दुर्लभ मांडणीतील अशा कादंबरीपैकी हा गोफ वाचण्यासारखीच आहे. -भक्ती नक्की लाईक करा. https://youtu.be/ZlrEnGFDlWk?si=ncng1Xhyb5xbw-_a

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 793 views

💬 प्रतिसाद (1)
ह
हेमंतकुमार Fri, 08/29/2025 - 13:10 नवीन
छान ओळख.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 18 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा