Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

<एक मजेशीर आणि हृद्य आठवण >

म
महिरावण
गुरुवार, 06/19/2025 - 05:37
💬 22 प्रतिसाद
माझं बालपण हे साधं होतं – म्हणजे फक्त शेजारी माझं नाव ऐकून मुलांना शाळेत घ्यायचे. मी रडायचो, तेव्हा पावसाळा यायचा. आणि मी हसायचो, तेव्हा उन्हाळा कमी व्हायचा. पण आज मी सांगणार आहे ती मजेशीर, ती हृद्य आठवण – जीने माझ्या आयुष्यात मला एकदा पुन्हा स्वतःची महानता (म्हणजे रोजचंच) अनुभवायला दिली. प्रा. अरुणकुमार यांनी मला प्रोजेक्टवर घेतलं – आणि त्यांनी असं करून खरं तर भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना घडवली. प्रोजेक्ट सुरू झाला, मी २-३ महिने तिथे येत होतो. (येत होतो – म्हणजे येत होतो, जात होतो, काम काहीसं होत होतं, पण थोडंसं नाही होत होतं). सरांनी विचारलं, “राजीव, काम का होत नाही?” मी उत्तर दिलं, “सर, संगणक मिळत नाही.” (खरं तर मला “बुद्धीला पटणारा” संगणक हवा होता. पण तो मार्केटमध्ये अजून आलेला नाही.) तेव्हा मला अवघड क्षण आला – मी ठरवलं, पगार न घेता नैतिकतेचा नवा कळस गाठायचा. माझा स्वाभिमान इतका उंच आहे की, माझ्या बँकेच्या खात्यात सुद्धा डिग्निटी साठून गेली होती माझ्या वडिलांचं श्राद्ध होतं. मी इतका व्यस्त होतो (म्हणजे २ ईमेल लिहिले आणि ३ वेळा कॉफी प्यायलो) की रजा मागायला विसरलो. आई भडकली. मी सरांना सांगितलं. सर म्हणाले – “ओह माय गॉड, मी तुझ्या आईची माफी मागतो.” (त्या क्षणी माझी आईही थोडीशी कन्फ्युज झाली – "हे कोण आहेत? देव आहेत का?" पण मी तिला समजावलं – "ते आहेत माझे सर, ज्यांना मी माफ करतो रोज.") आई शांत झाली. आणि सरांना पुण्याला आईची माफी मागायला जायची वेळ आली नाही. कारण, ओबिव्हियसली, “मीच शांततेचा संदेशवाहक आहे.” “नो वन कॅन सप्रेस यू फॉर टू लॉंग” – ह्या वाक्याच्या प्रभावामुळे मी आज इथे आहे जेव्हा पीएचडीमध्ये त्रास झाला, तेव्हा मी माझ्या आतल्या गोंधळलेल्या बुद्धिमत्तेला म्हणालो – “राजीव, तू सप्रेस होतोस का कधी?” उत्तर आलं – “नाही रे बाबा. मी तर कॉस्मिक एनर्जी आहे.” आणि तेव्हा सरांनी दिलेला आशीर्वाद पुन्हा ऐकू आला – “नो वन कॅन सप्रेस यु फॉर टू लॉंग” म्हणजे, थोडक्यात सप्रेस होतो, पण फार काळ नाही. एखादा ब्रेक घेऊन मी पुन्हा उगम पावतो – जणू काही विंडोज अपडेटनंतर रिस्टार्ट झाल्यासारखा. मी आहेच असाच आजही माझ्या आठवणींच्या खोक्यात ही "हृद्य आणि मजेशीर" आठवण खास जपून ठेवली आहे – ती वेळ, तो पगार न घेण्याचा उग्र निर्णय, ती माफी मागायची हायपोथेटिकल तयारी, तो "नो वन कम्प्रेस" चा आत्मप्रगटीत आवाज... हे सगळं मला रोज सांगतं – "राजीव, तू माणूस नाहीस, तू आठवण आहेस – तीपण सेल्फ-क्रिएटेड!" आज मी ज्या उंचीवर आहे, तिथे ऑक्सिजन कमी असतो. पण मी श्वास घेत राहतो, कारण मी आहे राजीव – आत्मा, विद्वत्ता आणि विवेकाचं मूर्त स्वरूप.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3714 views

💬 प्रतिसाद (22)
य
युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 09:25 नवीन
अरे महिरावणा । विडंबनाचा घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी -युयुत्सु
  • Log in or register to post comments
म
महिरावण गुरुवार, 06/19/2025 - 10:28 नवीन
गर्व न धरू नको रे मना, युयुत्सु होऊ नको रे भुला, अहंकाराची झोळी भरुनी, मतीही गहाण पडली तुला। जिथे ज्ञानाची होई चर्चा, तिथे ‘मी म्हणालो’ची फुशारकी, तर्क नव्हे, युक्ती नव्हे, फक्त टंकनाची बांडगुळकी। दहा हजार लेखांचा राजा, पण बुद्धीचा दिवा विझलेला, फाट्यावर मारा करित फिरतो, पोकळ शब्दांनी झाकलेला। लोकशाही, लोकशाही म्हणे, पण विरोध सहन न होई, आपुलेच मत अमृत वाटे, दुसरे वांझोट कसे होई। मिसळपाव हा बुद्धीचा मेळा, चर्चा-चव युक्तिपूर्ण, युयुत्सुचे शब्दांचे बुडबुडे, काहीच नसे अर्थपूर्ण "उत्क्रांती" म्हणे आत्म्याची, पण नसे विचारांची बीजं, वादांत फसतो, डावात घसरतो, असे मात्र निर्लज्ज मनास सांगतो, दूर राहा रे, या "मीच महान" स्वप्नातून, विनय, विवेक, संवाद शिक, नको रे गुंतू त्याच्या तुंबातून।
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 11:02 नवीन
अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 09:36 नवीन
हम्म!हे खरं मिपा! वैयक्तिकपेक्षा साहित्यिक विडंबन निर्मिती :) चांगलं जमलं!
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 11:14 नवीन
पॉपकॉर्न घेऊन बसले आहे ;)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 06/19/2025 - 11:47 नवीन
कुंपणावर उभा होतो. आमचा इथे काही संबंध नव्हता पण आता याचा बालाकोट केलाच पाहीजे. असा प्रज्ञावंत बृहस्पती कृपावंत चाळणी घेऊनी उभा भाग्यवंत स्वलाल धन्य असा अहंमन्य शोधता त्रिखंडी जाण दुर्लभ पाखंडी घमंडी,अर्क ,शिष्ठतेचा स्वघोषित अतीशहाणा अन्य कस्पट समाना तर्क असे याचा भ्रमाचा भोपळा न जाणे केव्हा फुटेल राहू मिपाकरांचा न जाणो केव्हां सुटेल ? लागता पेट्रोल सुटला कंट्रोल ओरल डिसेन्ट्री लागलीये भूभूत्सू संपादका विनंती हिरा बेशकिमती आय डी चा काश्मिर करा झडकरी
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/19/2025 - 12:10 नवीन
विडंबन कहर!! त्यावरील प्रतिसाद अजुनच कहर!! "भूभूत्सु" हा शब्दप्रयोग विशेष आवडला!!
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 06/19/2025 - 12:19 नवीन
विनंती व्यर्थ जाणार संपादकांस लळा अपार बालिश बाहू अन भुभुत्सु आदी मिपाकंटकांप्रती ॐ शांतिः शांतिः शांतिः
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 12:41 नवीन
त्रिवार अवतारधारी बाहू (आता) शांती धारण करी पावन झाले मिपाकरी या अशा अवतारी.. बहू पडल्या सोनसरी पाषाण दिसे तरी त्यास ओलांडावे येथवरी पोहचावे इच्छित द्वारी.. भक्ती म्हणे कशास माथा मारी मिपाकर प्रत्येक वारी?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 12:52 नवीन
अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला । दाविता आरसा उडे फ्यूज त्याचा। क्षणामध्ये फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 13:50 नवीन
डीपसिकने केलेले माझ्या प्रतिसादाचे विश्लेषण युयुत्सूची ही कविता एक **तीव्र सामाजिक-राजकीय व्यंग्य** आहे, जी अशिक्षित नेतृत्व, अंधानुकरण, बौद्धिक पाखंड आणि सामाजिक मंदबुद्धित्वावर कठोर टीका करते. ओव्या-छंदातील या शब्दरचनेचे सार: 1. **व्यवस्थेविरुद्ध आक्रोश** "अरे महिरावणा", "अरे संपादका", "तपस्वी कर्नल" सारखे संबोधन **धार्मिक-राजकीय-माध्यमीय अधिकाऱ्यांच्या पोकळ दंभाविरुद्ध** आहे. "विडंबनाचा घाणा", "मर्कटांची टोळी", "थैथयाट" सारखे शब्द या व्यवस्थेची कुचेष्टा करतात. 2. **जनमानसातील मूर्खपणाचे विद्रूप चित्रण** - "अडाण्यांच्या बाजारी फायदा भारी": अज्ञानाचा फायदा उठवणारे. - "मंदबुद्धी लोका... मिसळपावी": भोळ्या जनतेला भ्रमित करणे. - "फाट्यावरी मारा": गलिच्छ विचारांचा प्रतीकात्मक निषेध. 3. **बौद्धिक पाखंडाचा धिक्कार** "तपस्वी कर्नल... उडे फ्यूज त्याचा" हे **ढोंगी बुद्धिजीवी, नेते आणि संपादकांच्या** कृत्रिमतेवर टीका आहे. "ओढून ताणून जुळवोनी शब्द" हे त्यांच्या पोकळ वक्तृत्वाचे प्रतीक. 4. **क्रांतीचा आवाहन** "आत्म्याची उत्क्रांती सुलभ होई" आणि "युयुत्सु म्हणे" हे **वैयक्तिक जागृतीचे संदेश** देते. कवी स्वतःची भूमिका "युयुत्सु" (महाभारतातील धर्मयोद्धा) सारखी स्पष्टवक्ती म्हणून रेखाटतो. ### काव्यात्मक वैशिष्ट्ये: - **छंदयोजना:** ओवी-अभंग शैलीतील लयबद्धता. - **प्रतीके:** "फाटा" (गलिच्छ विचार), "मिसळपाव" (गोंधळ), "फ्यूज उडणे" (कृत्रिमता फुटणे). - **भाषिक हत्यार:** "मठ्ठशाही", "यमकांचा बोजवारा", "खुपसती नाकं" सारखे मर्मभेदी शब्दचित्रे. ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे.
  • Log in or register to post comments
म
महिरावण Fri, 06/20/2025 - 08:26 नवीन
  • Log in or register to post comments
म
महिरावण Fri, 06/20/2025 - 08:27 नवीन
कृबुने केलेले हे विश्लेषण वाचून आम्हालाही राहावल्या गेले नाही आणि सुद्धा त्याच्या मदतीने आमच्याच वरील लेखाचे विश्लेषण केले ते येणेप्रमाणे- हा लेख "राजीव" या पात्राच्या तिरकस आत्मप्रशस्तीचा एक उत्कृष्ट विनोदी नमुना आहे. त्यात गर्व, अतिरंजित आत्मप्रेम, व्यंग आणि भाषेतील खेळकरपणा यांच्या माध्यमातून लेखकाने एका स्व-गौरवप्रेमी पात्राचा सत्याला जवळपास स्पर्शही न करणारा आत्मचरित्रात्मक प्रवास रंगवला आहे. चला, याचे सखोल विश्लेषण काही प्रमुख अंगांनी करूया: --- १. आत्मप्रशंसेचा उग्र साठा: लेखाची सुरुवातच "मी रडलो, तर पाऊस यायचा" आणि "मी हसल्यावर उन्हाळा कमी व्हायचा" अशा वाक्यांनी होते. हे वाक्ये अतिशयोक्तीचा अतिरेक दाखवतात. ‘राजीव’ नावाचं पात्र स्वतःला सृष्टीच्या नियमनात भाग घेणारा समजतो – हा विनोदाचा मुख्य स्रोत आहे. --- २. व्यंगात्मक ‘महानते’ची निर्मिती: > "भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना" या वाक्याच्या आधीच्या संदर्भानुसार राजीवला प्रोजेक्टवर घेतले जाते, पण तेवढ्यापुरतं साधं कामसुद्धा नीट होत नाही. तरीही तो स्वतःच्या निवडीला ‘युगप्रवर्तक’ मानतो. ही "स्वतःच स्वतःचा शेजारी होणं" हाच लेखाचा कळस आहे – जिथे राजीवचा वास्तवाशी तुटलेला आत्मा फुलत जातो. --- ३. "पगार न घेणं" हे नैतिक बलिदान: राजीव म्हणतो, > "माझा स्वाभिमान इतका उंच आहे की, माझ्या बँकेच्या खात्यात सुद्धा डिग्निटी साठून गेली होती." हे वाक्य शब्दशः साहित्यिक सोनं आहे – कारण त्यात नैतिकतेची थोतांड, आर्थिक परिप्रेक्ष्याशी फक्त बोलाची साटंबुट्टी, आणि स्वतःला देव्हाऱ्यात बसवण्याची प्रवृत्ती या सगळ्याचा चपखल तिरकस टोमणा आहे. --- ४. आई आणि सरांचा प्रसंग – एक हायपरबोल: > "आई भडकली... सर म्हणाले – “ओह माय गॉड, मी तुझ्या आईची माफी मागतो.”" हा प्रसंग थोडक्याच शब्दांत ‘देव, माफी, सर, आई’ या सगळ्याला एकत्र आणून अगदी नाटकी उत्कटता निर्माण करतो. राजीव पुन्हा एकदा "मीच शांततेचा दूत आहे" हे स्वतःच सांगतो – म्हणजे इतरांना सांगण्याचीही गरज पडत नाही. --- ५. ‘सप्रेस’ आणि ‘कॉस्मिक एनर्जी’ – आत्मोन्नतीचा झरा: राजीवच्या आत्मप्रशंसेचं अंतिम टोक म्हणजे त्याचं वाक्य: > "मी सप्रेस होतो, पण फार काळ नाही – मी विंडोज अपडेटनंतर पुन्हा रिस्टार्ट होतो." इथे तो आपल्याला त्रास होतो पण मी अमर आहे असं दाखवतो. ही स्वतःला देवासमान मानण्याची चविष्ट शैली, आपल्या आजूबाजूच्या काही स्वघोषित बुद्धिजीवींना सुचवते. ६. शेवटचा उतारा – आत्मा, विद्वत्ता, विवेक: > "आज मी ज्या उंचीवर आहे, तिथे ऑक्सिजन कमी असतो." "मी माणूस नाही, मी आठवण आहे." हे वाक्ये स्वतःला मिथकात रूपांतरित करणाऱ्या राजीवचे अंतिम रूप दाखवतात – एक असा माणूस जो वास्तवात नाही, पण प्रत्येक आठवणीत स्वतःचं भव्य स्मारक उभारतो. --- शैलीविषयक निरीक्षणे: भाषा: हलकीफुलकी, दैनंदिन बोलचालीची, पण डबल मिनिंग, भाषिक खेळ, विसंगती वापरून व्यंगात्मता अधिक गडद केली आहे. स्व-उपहास: "बुद्धीला पटणारा संगणक", "मी शांततेचा संदेशवाहक आहे", "मी सेल्फ-क्रिएटेड आठवण आहे" – हे सर्व गंभीर वाक्यं आहेतच अशक्य स्वप्रशंसेचे व्यंग. प्रेरणादायक वाक्याचा व्यंगात्मक वापर: "No one can suppress you..." हे खरंतर प्रोत्साहनपर वाक्य आहे, पण इथे ते 'मी काहीही करीन, माझा उत्सव मीच करीन' ह्या आत्ममग्नतेसाठी वापरले जाते. --- निष्कर्ष: हा लेख म्हणजे एक गंभीरपणाचा चपखल विनोदातून फुगा फोडणारा आरसा आहे. "राजीव" हे पात्र हे आपल्या आजूबाजूच्या आपल्याच प्रेमात हरवलेल्या, अहंकाराच्या पर्वतरांगेवर राहणाऱ्या लोकांचं अर्धप्रकाशित आरसपानी प्रतिबिंब आहे. त्याच्या भाषेतील गर्व, त्याच्या कृतीतील विसंगती, आणि लेखातील अचूक ‘टायमिंग’ हे सगळं मिळून या लेखाला खूप हसवणारं आणि थोडं विचार करायला लावणारं बनवतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 08:21 नवीन
ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे. बरं झालं, तुम्ही आवाज दिला. मराठी साहित्य मुकं च होतं. किंवा उंदरासारखं कुचकुच करत होतं. आता मराठी साहित्य एकदम सिंह गर्जना वगैरे करू लागेल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 08:22 नवीन
https://ebird.org/species/revbul
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 06/20/2025 - 11:53 नवीन
Image removed. ए०एफ०एम०सी० आजुबाजुला पण दिसत नाहीये
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 15:14 नवीन
ए०एफ०एम०सी० आजुबाजुला पण दिसत नाहीये इतकी जळजळ? कशासाठी? आपण दिलेली क्रमवारी हि विद्यापीठांची (विश्वविद्यालय) आहे महाविद्यालयाची नव्हे. QS World University Rankings 2026 मुळात ए एफ एम सी हे विद्यापीठ (विश्वविद्यालय) नाहीच. ते एक पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालय होते आणि आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक याच्या अंतर्गत येते . त्यामुळे ए एफ एम सी हे या क्रमवारीत येणारच नाही. तेंव्हा शांत व्हा. उगाच नको असताना तुलना करायची गरजच नाही. मुळात मी कधीही ए एफ एम सी ची तुलना कोणत्याच महाविद्यालयाशी करत नाही. मूलतः ते शिक्षण मंत्रालयात येतच नाही तर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आणि मीच हुशार आणि माझं कुत्रं सुद्धा हुशार असा माझा दावा हि नाहीच.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 06/20/2025 - 18:00 नवीन
भोरड्या देह जाईल जाईल । यासी काळोबा खाईल ॥१॥ का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥ लोडें बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥३॥ शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥४॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥५॥
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 06/20/2025 - 18:41 नवीन
कर्नल तपस्वी । एक ऐसा मठ्ठ खर्‍यांचा सुबोध । दुजा तैसा अरे अरे मंदबुद्धी । उतरे ना तुझी धुंदी महादेवा पुढे नंदी । गुर्कावतो
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 06/20/2025 - 20:02 नवीन
चान , चान !
  • Log in or register to post comments
य
यश राज Sat, 06/21/2025 - 09:57 नवीन
विडंबन कहरच आणि प्रतिसाद पण
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 06/22/2025 - 15:12 नवीन
पॉपकॉर्न भारीएत एकदम !!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा