Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार

B
Bhakti
Wed, 06/04/2025 - 13:15
💬 9 प्रतिसाद
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार मनोदेवता प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्‌ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्‌सद्विवेकबुद्‌धी आहे- -आधिदैवतपक्ष. या सदविवेकबुद्‌धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय." -वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे. वेदःस्मृतिः सदाचारः स्वस्थ च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्रा.. साक्षाद्‌धर्मस्य लक्षणम् ।। मनोदेवतेचेखंडण-आधिभौतिकवादी पण ही सद्‌सद्विवेकबु‌द्धि सदाकाळ सारखी असू शकत नाही. कोणाची बुद्‌धी कमी असेल, तर कोणाची अशिक्षित किंवा अपुरी वाढलेली असेल, इतकाच भेद आहे, कोणतीही गोष्ट जलद-करता येणे हे सवयीचे व अभ्यासाचे फळ आहे. मनाच्या ज्या स्वाभाविक शक्ति आहे. त्या पलीकडे सद्‌सद्विचारशक्ती म्हणून निराळीच स्वतंत्र व विलक्षणशक्ती मानण्याचे कारण नाही. भारतीय प्राचीन 'मन' 'बुद्धी' संज्ञा विचार- #क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, क्षेत्र-शरीर क्षेत्रज्ञ- आत्मा मन - ज्ञानेंद्रियांच्याद्वारे बाहेरचा माल देहाच्या कारखान्यांतील मन या कारकुनाकडे येतो, आणि हा कारकून मग त्याची तपासणी करितो. #मनोव्यापाराचे तीन विभाग १.ज्ञानेंद्रियांनी बाह्य पदार्थाचे ज्ञान होऊन त्या संस्काराची जुळवाजुळव किंवा तुलनेसाठी व्यवस्थित मांडणी करणे २.ही जुळवाजुळव झाल्यावर त्यांच्या बऱ्यावाईटपणाचा सारासार "विचार करून कोणती गोष्ट ग्राह्य कोणती अग्राह्य याचा निश्चय करने. २.हा निश्चय ‌झाल्यावर ग्राहय वस्तु प्राप्त करण्याची व अग्राह्य वस्तु सोडून देण्याची इच्छा त्याप्रमाणे प्रवृत्ति होणे. एखादी गोष्ट कशी आहे हे बुद्‌िध इंद्रिय करते. -मन एखादी गोष्ट अशी आहे (संकल्प), किंवा उलटपक्षी तशी आहे (विकल्प) इत्यादी कल्पना बुद्‌धीपुढे निर्णयाला मांडतात त्यास #संकल्पविकल्पात्मक म्हणतात. -मनास संस्कृतमध्ये व्यापार व्याकरण (विस्तार करणे) असे नाव आहे. -आमच्या कल्पानांचा सारासार विचार मन करत नाही. हा सारासार विचार करून ज्ञान आल्यास करून वस्तु कशी याचा निश्चय करणे अनुमान वा निर्णय करणे हे सर्व व्यापार पाहून निश्चित बु‌द्धीचे आहेत, संस्कृतात या व्यापारांस व्यवसाय । #अध्यवसाय म्हणतात "व्यवसायात्मिका बु‌द्धी: मनो व्याकरणात्मकम् ।।" ' बुद्‌धी हे व्यवसाय करणारे म्हणजे सारासार विचार करून निश्चय करणारे तर मन (धाकटे) व्याकरण म्हणजे विस्तार अगर पुढील अवस्था करणारे प्रवर्तक इंद्रिय आहे. २.४४, म.भा. शां२५१.११) -बुद्धी व मन' यालाच #अंतःकरण व #चित्त हे दोन शब्द आहेत. पैकी अंतःकरण शब्दाचा धात्वर्थ आंतले करण म्हणजे इंद्रिय आ मन बाहय विषयांचे ग्रहण म्हणजे चिंतन करू लागले हणजे ते चित्त होय. बुद्धी- 'मनसस्तु परा बुद्धिः' - मनापेक्षा बुद्‌धी-श्रेष्ठ किंवा पलीकडची होय (गी ३.४२) कोणत्याही गोष्टीचे व्याकरण' करितांना बु‌द्धीचा हुकुम कोणत्या रीतीने पार पडेल याबद्‌दल कधी कधी संकल्पविकल्पहि मनास करावे लागत असतात. व्यवसागत्मक बुद्‌धी. व वासनात्मक बुद्धी (Pure Reason and practical reasons) कार्याकार्याचा निकाल करणे हा ज्या ( व्यवसायात्मक) बुद्‌धिंद्रिंयांचा व्यापार आहे, हे इंद्रिय ताळयावर असले म्हणजे मग भलभलत्या वासना (बु‌द्धी) मनांत उत्पन्न होऊन मन बिघडत नाही. म्हणून प्रथम व्यवसायत्मिक बुद्धि शुद्ध व स्थिर केली पाहिले, असा गीतेतल्या कर्मयोगशास्त्राचा पहिला सि‌द्धांत आहे (गी २.४१) ही स्थिर करण्यासाठी पातंजल योगशास्त्राची मदत घ्यावी. (समाधी, भक्ती, ज्ञान किंवा ध्यान) बुद्‌धीचेप्रकार - पूर्वकर्माने, पिढिजाद संस्कारामुळे अगर शिक्षणादि अन्य कारणांनी ही बुद्‌धी कमीजास्त सात्विक, राजस किंवा तामस असू शकते. गीतेच्या १८ व्या अध्यायांत एकाच बुद्‌धीचे सात्विक राजस व तामस भेद सांगितले आहेत. च अभिप्राय मनांत आणून गीतेच्या अठराव्या अध्यायात एकाच बुद्धीचे सात्त्विक, राजस व तामस असे तीन भेद करून सांगितले आहे. प्रवृत्ति च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ।। "कोणती गोष्ट करूं लागावें, कोणती करूं लागू नये, कोणतें कृत्य करण्यास योग्य व कोणतें अयोग्य, कशास भ्यावें। कशास भिऊं नये, बंध कशांत आहे व मोक्ष कशानें होतो, हें ज्या बुद्धीस (यथार्थ) समजतें ती #बुद्धिसात्त्विक होय" (१८. ३०), असें सांगितल्यावर यया धर्ममधर्म च कार्य चाकार्यमेव च । अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ।। "धर्म व अधर्म किंवा कार्य व अकार्य यांचा यी यथार्थ निर्णय करीत नाहीं म्हणजे चुकते ती #बुद्धिराजस" (१८. ३१), आणि अखेरीस - अधर्म धर्ममिति या मन्यते तमसावृता । सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ।। "अधर्मालाच धर्म म्हणणारी किंवा सर्व बाबतींत विपरीत म्हणजे उलटा निर्णय करणारी #बुद्धितामस होय," असें अर्जुनाला भगवंतांनीं सांगितलें आहे (गी. १८.३२). या विवेचनावरून केवळ चांगलें वाईट निवडण्यास सांगणारी म्हणजे सदसद्विवेकबुद्धिरूप स्वतंत्र निराळी देवता गीतेस संमत नाहीं हें उघड होतें. नेहमीं चांगलें निवडणारी बुद्धि कधींच असूं शकत नाहीं असा याचा अर्थ नाहीं. तर बुद्धि एकच असून चांगल्याची निवड करणें हा सात्त्विक धर्म त्या एकाच बुद्धींत पूर्वसंस्कारानें, शिक्षणानें, इंद्रियनिग्रहानें किंवा आहारादिकांनीं येत असतो. -" आपली बुद्‌धी सात्विक करणे हे प्रत्येकाचे काम होय आणि इंद्रियनिग्रहाखेरीज ले काम होऊ शकत नाही. बुद्‌धीला मन आणि इंद्रिये यांच्या ताब्यात जाऊ न देता उलट मन व इंद्रिये तिच्या ताब्यांत येतील अशी व्यवस्था आपण करायला हवी. [ गी. २.६७, ५८; ३७,४१; ६.२४-२६] ॥ आत्मनिष्ठबुद्धी- व्यवसायात्मिक बुद्‌धी पातंजल योगशास्त्र समाधी, भक्तीने, ज्ञानाने किंवा ध्यानाने परमेश्वर स्वरूप ओळखून सर्व मनुष्यांत एकच आत्मा आहे हे तत्व बुद्‌धीत ठसून गेले पाहिजे .ही प्राप्त झाल्यावर वासनात्मक बुद्‌धी आपोआप शुद्‌ध ब पवित्र राहुन शु‌द्ध सात्विक कर्मांकडे देहेंद्रियांची साहाजिकरित्याच प्रवृत्ति होते म्हणजे कर्मयोगशास्त्राचे रहस्य आहे. हेच सर्व सदाचरणाचे मूळ आहे. गीतेमध्ये ही आत्मनिष्ठ बु‌द्धी नित्य शु‌द्ध कशी ठेवावी यासाठी आत्म्याचे ज्ञान होणे गरजेचे आहे हे पुढे सांगितले. पण वेदांत टीकाकारांनी हेच ज्ञान प्राप्त करणे गीतेचे उद्‌देश आहे असे जे सांगितले आहे हे बरोबर नाही. आत्मा आत्म्याचा विचार दोन बाजूंनी करता येतो. १.स्वतःच्या पिंडाच्या, क्षेत्राच्या किंवा शरीराच्या व मनाच्या व्यापाराचे परीक्षण करून त्यावरुन क्षेत्रज्ञ रुपी आत्मा कसा निष्पन्न होतो याचे विवेचन करणे हा पहिला प्रकार आहे (गी.अ.२३) यास शारीरिक किंवा #क्षेत्रक्षेत्रज्ञविचार ही संज्ञा आहे. वयाच कारणास्तव वेदांत सूत्रांस शारिरीक (शरीराचा विचार करणारी] सूत्रे असे म्हणतात. स्वतःच्या शरीराचा व मनाचा याप्रमाणे विचार झाल्यावर मग... २.त्यांतून जे तत्त्व निष्पन्न होते, ते त्याभोवती जी दृश्य सृष्टि म्हणजे ब्रम्हांड आहे त्याच्या निरीक्षणाने जे तत्त्व निष्पण्ण होते ते, मिळून दोन्ही एक आहे की भिन्न हे पहावे लागते. अशा रीतीने केलेल्या सृष्टीच्या परीक्षणास #क्षराक्षरविचार किंवा #व्यक्ताव्यक्तविचार असे नाव आहे क्षर किंवा व्यक्त म्हणजे सृष्टीतील नाशवंत पदार्थ आणि अक्षर । अव्यक्त म्हणजे सृष्टीतल्या या नाशवंत पदार्थाचे सारभूत नित्य तत्त्व होय (गी. ८.२१,१५, ७८) (८.२०)या दोहोंच्या पलीकडे तत्त्व आहे ते- परमात्मा. क्षेत्रक्षेत्रज्ञविचार क्षेत्र-मानसिक आणि शारीरिक सर्व द्रव्यें व गुण यांचा प्राणरु‌पी विशिष्ट चेतनायुक्त जो समुदाय त्याचे नाव क्षेत्र.' क्षेत्रय - क्षेत्राचा (शरीराचा] मालक क्षेत्रय हा '#आत्मा' होय. चेतना, मन आणि बुद्धी था परतंत्र व एकदेशीय कामगारांच्याहि पलीकडे राहून त्या सर्वांच्या व्यापारांचे एकीकरण करणारी व त्यांनी काय करावे याचे त्यांस धोरण लावून देणारी, किंवा त्यांच्या कर्माला नित्य साक्षीभूत होणारी, अशी त्यांच्याहून अधिक व्यापक व समर्थ शक्ति या चेतना विशिष्ट सजीव देहांत म्हणजे क्षेत्रांत वास करीत असते. '#मीआहे' अशी जी त्याची प्रत्येकास होणारी साक्षात् प्रतिती तीच त्याच्या अस्तित्वाचा उत्कृष्ट पुरावा होय (गी ३.४२) बाहय सृष्टीचे यासोबतचे नातेही अबाधित आहे त्यास ब्रम्हांडाचा -क्षराक्षर विचार नाव आहे. क्षेत्रक्षेत्रज्ञविचाराने क्षेत्रांत [म्हणजे देहांत किंवा पिंडांत) कोणते मूलतत्त्व (क्षेत्रज्ञ किंवा आत्मा) आहे याचा निर्णय होतो आणि क्षराक्षर विचाराने बाहय सृष्टींतील म्हणजे ब्रम्हांडातील मूलतत्त्व समजते. हे सर्व पिंड व ब्रम्हांड एकच आहेत.... 'जेपिंडीतेब्रम्हांडी' - हेच चराचर सृष्टिचे सत्य आहे. -संदर्भ - श्रीमद्भगवद्गीता अथवा कर्मयोगशास्त्र -बाळ गंगाधर टिळक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2362 views

💬 प्रतिसाद (9)
क
कंजूस Wed, 06/04/2025 - 17:14 नवीन
जडजंबाळ विषय सुरू केले आहेत. एवढं लिहून गप्प बसतो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 06/04/2025 - 17:26 नवीन
:) :) गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक इतकी वर्षे सहन केली.पण टिळकांच्या श्रीमद्भगवद्गीता -कर्मयोगशास्त्र ग्रंथाने खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले.गीतेचा कर्मयोग समजला.माझी ग्रंथातील ११ प्रकरण वाचून झाली आहेत.इथे निवांत देत आहे.मी लोकमान्यांची खुप मोठी भक्त झाले आहे _/\_
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 06/05/2025 - 02:43 नवीन
अभ्यास सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी होण्यासाठी मदत म्हणून एकदा राजीव साने चा हा गीता दृष्टीकोण सुद्धा विचारत घ्यावा इतके बोलून खाली बसतो. https://youtu.be/drwrrWyLoGg?si=TW1vX9KqJs7U871a
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 04:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 06/05/2025 - 17:23 नवीन
खुप असंबद्ध मुद्दे वाटत आहे.माफ करा ,पण यांनी गीतारहस्य नीट वाचलेलं वाटत नाहीये.गीतारहस्य नीट वाचल्यावर असे प्रश्न पडणारच नाही.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 06/05/2025 - 03:19 नवीन
गीता ही भक्तीपर मार्गाची आहे, निवृत्ती साहाय्यक आहे.असे सांगितले गेले ही फसवणूक हे साफ चुकीचे आहे असे माझे मत. गीता सांगणायाचा मुळ उद्देश अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच होता. अर्जुनाचा संभ्रम दूर करताना भगवंताने उतप्ती ते अंतापर्यंत सर्व गुह्ये सांगीतली आहेत. भक्तिमार्ग, कर्मयोग आणी संन्यास योग आचरताना शरिर धर्म पालन करावाच लागतो. इथे निवृत्ती कुठेही सांगीतली नाही. कर्मयोग सांगताना सांख्ययोगातील पाचवा श्र्लोकात म्हणले आहे की कोणताही शरीरधारी प्राणी एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगीतले आहे. न हि कश्र्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत| कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणौ||५|| अल्पमती ज्ञानदास.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 03:37 नवीन
गीतेचे ऐतिहासिक स्वरूप बघता अर्जुनाविषादयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे मूळ भारतातले असावेत असे वाटते. बाकी अध्यायांची भर नंतर पडली असावी.
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 06/05/2025 - 10:57 नवीन
गीते मध्ये तो पर्यन्त लोकप्रिय झालेल्या विविध तत्वे विचारधारा schools चा समावेश करून एक भेळ एक मिश्रण तयार केलेले आहे. ते अनेकं परस्परविरोधी शाखांचे मिश्रण असल्याने त्यात पुनरुक्ती,परस्परविरोध, विस्कळीतपणा, आणि बऱ्यापैकी confusion निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणून ती अत्यंत परस्परविरोधी विचार असलेल्या व्यक्तींना "आपली" वाटते. कारण ज्याला जी school प्रिय त्याला त्याच्या आवडत्या स्कूल चे मटेरियल त्यात प्राप्त होते.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 06/05/2025 - 17:23 नवीन
बरोबर!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 3 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 4 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 7 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 10 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा