Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कॉपल पांडे जी एस - भाग ३

श
शशिकांत ओक
Fri, 05/23/2025 - 19:52
💬 3 प्रतिसाद
वायुसेनेतील आठवणी -

कॉपल पांडे जी एस – भाग ३

“कला आणि करुणेचा साक्षात सिपाही – कॉपल पांडे”

"मेन लाईक जीएस पांडे आर जीनियस अँड दे आर अबव्ह ऑल एक्सपेक्टेशन्स."

(“जीएस पांडेसारखे माणसं असामान्य बुद्धिमत्तेची असतात आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडे जातात.”) माझं मन पुन्हा भूतकाळात हरवलं… दुपारी २ वाजता मी ऑफिसमधून बाहेर पडत होतो. पवार, ऑफिस बॉयने माझ्या कारमध्ये ब्रीफकेस ठेवली. रियर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर कुणीतरी सावधपणे माझ्या दिशेने येत होतं. मी चेहरा थोडा उग्र केला, आणि त्याने लगेच सॅल्यूट करत म्हटलं: “गुड आफ्टरनून सर, धिस इज कॉपल पांडे रिपोर्टिंग!” “यस कॉपल पांडे, आता काय हवं आहे तुला?” मी विचारलं. “नथिंग सर, आय वॉज वेटिंग फॉर यू. आय वॉज लिटिल अफ्रेड टू कम टु युवर ऑफिस. सर, आय नो… व्हेनेव्हर आय मिट यू, समथिंग हॅपन्स… अँड देन युअर फेस डझन्ट लूक हॅपी!” (“काही नाही सर, मी तुमची वाट बघत होतो. तुमच्या ऑफिसमध्ये यायला थोडा घाबरत होतो. सर, मला माहीत आहे… मी तुम्हाला जेव्हा भेटतो, आणि मग काहीतरी होतं… आणि मग तुमचा चेहरा आनंदी दिसत नाही!”) त्याच्या मिश्किल पण प्रामाणिक उत्तरावर मी हसलो. "खरं आहे!" “गुड न्यूज सर! टुमारो इज सॅटरडे. बालगंधर्व कला दालनात आमच्या अभिनव कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आर्ट एक्झिबिशन आहे. सर, आय हॅव कम विथ इन्विटेशन… बट नो कार्ड. प्लीज कम इन युअर युनिफॉर्म सर.” त्याच्या उत्साहामुळे मी म्हणालो: "ओके, मी येतो." दुसऱ्या दिवशी मी पोहोचलो. पांडे स्मार्ट सिव्हिल ड्रेसमध्ये मला रिसीव्ह करायला उभा होता. माझ्या युनिफॉर्मकडे बघून तो म्हणाला: “सर, यू लुक व्हेरी हँडसम!” प्रदर्शन अतिशय कलात्मक होतं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेची उत्तम मांडणी केली होती. पण काही वेळात पांडे गायब झाला! काही वेळाने तो कॉलेजच्या फॅकल्टी स्टाफसह परत आला. "सर, धिस इज अवर स्टाफ. दे हॅव हेर्ड ए लॉट अबाउट यू. आय टोल्ड देम एव्हरीथिंग अबाउट द एअर फोर्स अँड यू!" (“सर,हा आमता टीचिंग स्टाफ आहेत. त्या शिक्षकांपैकी एक म्हणाले: एक म्हणाले आम्ही एअर फोर्सबद्दल आणि तुमच्याबद्दल सगळं ऐकले आहे जीएसकडून.”) “GS मुळेच आम्हाला मॅनेजमेंटशी लढण्याचं धाडस मिळालं.” दुसरे म्हणाले: “आजचं आयोजन GS मुळेच शक्य झालं.” ते पुढे म्हणाले: “GS ला आम्ही फक्त विद्यार्थी म्हणून पाहत नाही. तो आम्हाला स्टाफ मेंबरसारखाच वाटतो. त्याचे विचार, संवादकौशल्य… तो बोलतो तेव्हा एखाद्या प्रशिक्षकाने वर्ग घेतोय असंच वाटतं. अहमद गुलाम कुम्हार या कुंभाराला त्याने दिलेलं पाठबळ आम्ही कधीच विसरू शकत नाही.” मी पांडेला शोधत होतो… पण तो पुन्हा गायब! शेवटी, पांडे आला आणि म्हणाला: "सर, प्लीज कम विथ मी." त्याने मला एका कोपऱ्यात नेलं, जिथे अहमद गुलाम कुम्हार या म्हाताऱ्या कुंभाराचं प्रदर्शन होतं. त्याने अनेक मातीची भांडी मांडली होती. हात जोडून वाकत तो म्हणाला: “सलाम साहब… (“ते आमचे साहब आहेत – त्यांच्या मुळे तुम्ही आज इथे आहात.”)(“मेहरबानी जनाब.”) त्याचं कौतुक म्हणून मी माझ्या खिशाला झेपेल अशी एक मातीची कलाकृती विकत घेतली. ... (काही दिवसांनी एक दिवस पांडे माझ्या घराच्या दरवाज्याशी हजर झाला. चेहऱ्यावर चिंता.) (“सर, एक तातडीची गरज आहे. आत यायला हरकत नसेल तर?”) मी म्हणालो, इथे नको ऑफिसात ये. पण त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती. बर बैस म्हटल्यावर तो अंग चोरून बसला. (“सर, मला तुमच्याकडून एक पत्र लिहून घ्यायचं आहे.”) (“माझी मदत फक्त तुम्हीच करू शकता.”) माझ्याशिवाय या जगात तुला कोणी सापडत नाही का मी फटकारले. "फर्स्ट, हॅव टी. आणि बोल." पांडे म्हणाला: "सर, यू आर द ओन्ली वन हू कॅन हेल्प मी. आय मेट धिस ओल्ड मॅन – अहमद कुम्हार – हू लॉस्ट हिस फॅमिली इन भुज अर्थक्वेक. ही वॉज स्ट्रगलिंग. ही नीडेड क्ले अँड इंस्ट्रुमेंट्स टू स्टार्ट मेकिंग पॉटरी अगेन. ही डिड नॉट टेक आल्म्स. सर, विथ युअर रेफरन्स लेटर, आय कॅन रीच पीपल लाईक अनु आगा मॅडम, राहुल बजाज सर..." मी डिक्टेशन सांगायला लागलो. त्याने शेवटी विचारलं: "सर, मे आय अ‍ॅड वन लाइन?" "गो अहेड. बट ब्रिंग द टाईप्ड लेटर टुमारो मॉर्निंग फॉर सिग्नेचर." "डोंट वरी सर. ७:३० ला टेबलवर असेल." सकाळी ऑफिसमध्ये गेलो तर एक सुंदर पॅडवर अत्यंत सुबक प्रिंटसारखं वाटणारं हँडरिटन पत्र होतं. वाचलं. शेवटी लिहिलं होतं: “We the armed force personnel can appreciate the art. But we need the assistance of those who are lovers of writers, painters, sculptors and admirers of artists and their arts. If you don’t come forward, who will?” (“आम्ही सैन्यात असूनही कलेची प्रशंसा करू शकतो. पण अशा कलाकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतींना आपल्या सारख्या बड्या श्रीमंत कला रसिकांनी पुढे आणलं नाही, तर मग कोण येईल?”) हे वाचून मी थक्क झालो. आणि सगळं समजूनही गेलो... त्या सुंदर अक्षरातील पत्रावर जपून सही केली की त्यामुळे ते विद्रूप दिसणार नाही! त्या पत्राचा खूप प्रभाव पडला. अहमद कुम्हार आनंदाने आपल्या गावी गेला. ... आर्ट एक्झिबिशनच्या कार्यक्रमात, मी फक्त पाहुणा म्हणून आलो होतो. पण आयोजकांनी मला व्यासपीठावर बसवलं – ते ही डॉ. भटकर यांच्या शेजारी! डॉ. भटकर मंचावर आले आणि माझ्या युनिफॉर्मवरच्या नावाच्या पट्टीकडे पाहून म्हणाले: “अरे, तुम्ही विंग कमांडर ओक आहात? मी तुमचं नाडी शास्त्रावरचं पुस्तक वाचलंय – अप्रतिम आहे!” त्यांनी पारितोषक वितरण करून आयोजकांना विनंती केली – मी भाषण आधी करतो. त्यांनी कलाविषयावर बोलून थोडक्यात विषय वळवला: "स्टुडंट्स, यू मे नॉट नो – धिस पर्सन हॅज रिटन द फर्स्ट मीनिंगफुल बुक ऑन नाडी शास्त्र. इट्स अ‍ॅन अमेझिंग सायन्स. (“विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कदाचित माहित नसेल – पण या व्यक्तीने नाडी शास्त्रावर पहिलं सखोल पुस्तक लिहिलं आहे. हे एक विलक्षण शास्त्र आहे. ते याबाबत अधिक चांगलं समजावून सांगतील. ही विल एक्सप्लेन बेटर." मी. आय रिक्वेस्ट हिम टू डिस्ट्रिब्युट रेस्ट ट्रॉफीज. असे म्हणून ते निघून गेले! मी आश्चर्यचकित झालो. भाषणाला तयार नव्हतो. पण नाईलाजाने उभा राहिलो! (“माफ करा – मी कधीही ब्रश हातात घेतलेला नाही. पण आज मला चित्रकलाकारांचा गौरव करायला सांगितलं गेलं आहे… तरी मी बोलतो – मराठीत.”) भाषणाच्या शेवटी मी म्हणालो: (“तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे.”) भाग ३ पूर्ण क्रमशः

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1415 views

💬 प्रतिसाद (3)
श
शशिकांत ओक गुरुवार, 05/29/2025 - 20:56 नवीन
शशी, तुमची विनंती निश्चितच मान्य आहे. 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेतील भाग ३ वर माझा अभिप्राय आणि त्यातून शिकण्यासारखे काही मुद्दे खालीलप्रमाणे: भाग ३: कला, करुणा आणि नेतृत्वाचा आदर्श या तिसऱ्या भागातून कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अधिक ठळकपणे समोर येतात, जे केवळ त्यांच्यातील एका सैनिकालाच नव्हे, तर एका संवेदनशील, कलाप्रेमी आणि दूरदृष्टीच्या माणसाला अधोरेखित करतात. प्रारंभी, कॉर्पल पांडेचा विंग कमांडर ओक यांना भेटण्याचा आणि 'मी तुम्हाला जेव्हा भेटतो, तेव्हा काहीतरी होतं आणि तुमचा चेहरा आनंदी दिसत नाही!' असे मिश्किलपणे बोलणे, हे त्यांच्यातील मोकळेपणा आणि निखळ स्वभाव दर्शवते. यातून त्यांच्यातील मानवी संबंध जपण्याची हातोटी दिसून येते. बालगंधर्व कला दालनातील आर्ट एक्झिबिशनमध्ये विंग कमांडर ओक यांना गणवेशात बोलावण्याची पांडेची विनंती, हे त्याच्यातील अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे. तो केवळ एक विद्यार्थी नाही, तर आपल्या संस्थेचा आणि आपल्या कलेचा अभिमान बाळगणारा एक सच्चा कलाप्रेमी आहे. प्रदर्शनात आल्यावर कॉलेज स्टाफने पांडेबद्दल व्यक्त केलेले गौरवोद्गार महत्त्वाचे आहेत: "GS मुळेच आम्हाला मॅनेजमेंटशी लढण्याचं धाडस मिळालं" आणि "आजचं आयोजन GS मुळेच शक्य झालं." यातून पांडे केवळ कलाकृती करणारा कलाकार नाही, तर एक प्रभावी संघटक, नेतृत्वकर्ता आणि इतरांना प्रेरणा देणारा व्यक्ती असल्याचे सिद्ध होते. त्याचे संवादकौशल्य आणि विचार स्पष्ट करण्याची क्षमता पाहून त्याला 'प्रशिक्षकासारखा' मानला जातो, हे त्याच्या बौद्धिक क्षमतेचे द्योतक आहे. या भागातील सर्वात हृदयस्पर्शी आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अहमद गुलाम कुम्हार या भूज भूकंपग्रस्ताला पांडेने दिलेला पाठिंबा. स्वतः सर्वस्व गमावलेल्या एका कलाकाराला पुन्हा उभे करण्यासाठी पांडेची धडपड, हे त्याच्यातील उत्कट करुणा आणि सामाजिक बांधिलकी दाखवते. त्याने 'आल्म्स' (भिक्षा) न घेणाऱ्या कुंभाराला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य मार्ग दाखवला, हे त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचेही दर्शन घडवते. विंग कमांडर ओक यांच्याकडून मोठमोठ्या उद्योगपतींना (अनु आगा, राहुल बजाज) शिफारसपत्र घेण्याची त्याची कल्पना, हे त्याच्या दूरदृष्टी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची चतुराई दर्शवते. पत्राच्या शेवटी पांडेने स्वतःच्या सुंदर अक्षरात लिहिलेली ओळ — "आम्ही सैन्यात असूनही कलेची प्रशंसा करू शकतो. पण अशा कलाकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतींना आपल्यासारख्या बड्या श्रीमंत कला रसिकांनी पुढे आणलं नाही, तर मग कोण येईल?" — हा या भागाचा आत्मा आहे. ही ओळ केवळ एक विनंती नसून, कला आणि कलाकारांप्रती समाजाची जबाबदारी अधोरेखित करणारी एक सशक्त भावनिक साद आहे. ही ओळ पांडे यांच्यातील कवी मन, त्यांच्या भावनांची खोली आणि कलेविषयीची त्यांची तळमळ स्पष्ट करते. लेखकाला यामुळे पांडेचे मोठेपण पूर्णपणे समजून येते आणि ते थक्क होतात, हे साहजिकच आहे. अखेरीस, आर्ट एक्झिबिशनमध्ये डॉ. भटकर यांनी विंग कमांडर ओक यांच्या 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकाची प्रशंसा करणे आणि त्यांना भाषण देण्यास सांगणे, हा प्रसंग अनपेक्षित असला तरी, तो लेखकाच्या ज्ञानाची आणि प्रतिभेची ओळख करून देतो. पण या प्रसंगाचा मुख्य उद्देश म्हणजे विंग कमांडर ओक यांनी पांडेबद्दल व्यासपीठावरून व्यक्त केलेले उद्गार: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे. या भागातून शिकण्यासारखे काय काय आहे? * नेतृत्व केवळ उच्च पदांवर नसते: कॉर्पल पांडेने दाखवून दिले की, नेतृत्व हे केवळ पदाने येत नाही, तर ते कृतीने, विचाराने आणि इतरांना प्रेरित करण्याच्या क्षमतेने सिद्ध होते. तो केवळ एक कनिष्ठ सैनिक नसून, एका कला प्रदर्शनाचा यशस्वी आयोजक आणि स्टाफला प्रेरणा देणारा व्यक्ती आहे. * करुणा आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व: पांडेने भुज भूकंपातील पीडित अहमद कुंभाराला केलेली मदत, हे केवळ गरजूंना मदत करण्यापलीकडचे, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपले काम पूर्ण झाल्यावर तो फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजातील दुर्बळ घटकांसाठीही तो संवेदनशील असतो. * कला आणि मानवता यांचा संगम: पांडेने कलेचा उपयोग केवळ स्वतःच्या आनंदासाठी न करता, सामाजिक बदलासाठी आणि इतरांच्या उन्नतीसाठी केला. त्याचे पत्र कलेच्या माध्यमातून समाजाला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. * प्रभावी संवाद आणि दूरदृष्टी: मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने लेखकाकडून शिफारसपत्र मागितले, हे त्याच्या दूरदृष्टीचे आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. त्याच्या बोलण्यातला आणि पत्रातल्या शब्दांतील प्रामाणिकपणा समोरच्या व्यक्तीला प्रभावित करतो. * आत्मसन्मान आणि साधेपणा: 'आल्म्स' न घेणाऱ्या कुंभाराला मदत करणे आणि स्वतःच्या पदावर असूनही (कॉर्पल) लेखक त्याला मित्र मानतात, ही बाब त्याला सर्वोच्च सन्मान वाटते, हे त्याच्यातील आत्मसन्मान आणि साधेपणाचे दर्शन घडवते. * अनपेक्षित क्षमतेची ओळख: विंग कमांडर ओक यांना 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकामुळे मिळालेली अनपेक्षित ओळख, हे दर्शवते की आपले काम आणि कर्तृत्व कधी-कधी अनपेक्षित मार्गाने समोर येते आणि त्याची दखल घेतली जाते. हा भाग कॉर्पल पांडेच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उंचावतो आणि वाचकाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण करतो. ही केवळ एका सैनिकाची कथा नाही, तर एका असामान्य माणसाच्या संवेदनशील आणि कर्तृत्ववान प्रवासाची गाथा आहे. पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे, आपला विद्याधर
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 05/30/2025 - 07:54 नवीन
हा भागपण आवडला पुभाप्र
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 06/01/2025 - 21:21 नवीन
: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे.“
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा