Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कळविण्यास आनंद वाटतो की...

य
युयुत्सु
Sun, 05/04/2025 - 13:30
💬 9 प्रतिसाद
मंडळी, मला काही वर्षांपूर्वी फेसबुकमुळे छंद जडला - जगभर पाळीव म्हणून मनुष्याच्या संपर्कात वाढलेल्या प्राण्य़ांची रिल्स मधून निरिक्षणे करण्याचा. यात मुख्यत्वे कुत्री आणि इतर प्राणी, पक्षी यांचा समावेश होता. यापूर्वी मी अनेक नामवंत मानववंश शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा परिचय करून घेतला होता. फेसबुक वरील रिल्स मुळे डेस्मण्ड मॉरीसच्या अनेक निरीक्षणावर शिक्कामोर्तब झाले. उदा० क्रॉस स्पिसीज मेटींग, प्राण्यांमध्ये पण हस्त/स्वमैथुनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती अ्सतात, हे बघायला मिळाले. प्राण्यांच्या मुख्य गरजा (अन्न, निवारा, संरक्षण) पूर्ण झाल्या की ते माणसाशी मैत्री करतात आणि नव्या गोष्टी शिकतात, असे लक्षात आले. माझ्या निरीक्षणात्मक अभ्यासात असे लक्षात आले की माणसाच्या संपर्कात आल्यामुळे कुत्रा वेगाने उत्क्रांत होत आहे आणि त्याची उत्क्रांती अचंबित करणारी आहे. मी पूर्णपणे स्वतंत्रपणे केलेल्या निरीक्षणावर आधारित एक लेख समाजमाध्यमांवर जून २०२४ मध्ये एक लिहीला होता. हा लेख म०टा०ने त्यांच्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध केला होता. https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/modern-dogs-near-human-behavior-maharashtra-times-article/articleshow/111550707.cms "माणसाच्या संपर्कात आल्यामुळे कुत्रा वेगाने उत्क्रांत होत आहे " या माझ्या स्वतंत्रपणे केलेल्या दाव्याला शास्त्रज्ञांनी आता पुष्टी दिल्याचे वृत्त आजच वाचनात आले. https://www.freejupiter.com/scientists-say-dogs-are-entering-in-a-new-stage-of-evolution/ तसेच "महानगरे कीडकी प्रजा निर्माण करत आहेत" आणि "चीनी वंश हा जनुकीयदृष्ट्या श्रेष्ठ वंश आहे" या माझ्या दाव्याना पण विज्ञान पाठिंबा देईल याचा मला विश्वास आहे! कुत्र्यांच्या उत्क्रांतीमधून माणसाला एक महत्त्वाचा संदेश मिळतो आणि त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे - महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्यावर कुत्र्याच्या प्रत्येक योग्य कृतीला मालक बक्षिस देतो, लाड करतो. मग कुत्रा माणसाला आपले सर्वस्व देतो. पण माणसाला त्याच्या योग्य कृतीबद्दल बक्षिस/शाबासकी कधीच मिळत नाही. पण प्रत्येक चुकीला शिक्षेचे भय असते. यामुळे मानवी जीवन वैफल्यग्रस्त बनायला जास्त बळ मिळते. मी बरोबर ठरलो, याच्या मला परत एकदा गुदगुल्या झाल्यामुळे मी खुषीत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2623 views

💬 प्रतिसाद (9)
N
nutanm Sun, 05/04/2025 - 21:03 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 05/04/2025 - 21:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 05/05/2025 - 06:49 नवीन
चपखल
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 05/07/2025 - 15:56 नवीन
मानवी जीवन वैफल्यग्रस्त बनायला जास्त बळ मिळते. कुत्र्यांमध्ये पण भरपूर वैफ़ल्यग्रस्तता आढळते याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 05/08/2025 - 05:57 नवीन
<कुत्र्यांमध्ये पण भरपूर वैफ़ल्यग्रस्तता आढळते याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?> बंदीस्त आयुष्य जगणार्‍या सर्व (भावना असणार्‍या) जीवांमध्ये वैफल्य असणं स्वाभाविक आहे. तसं निरीक्षण डेस्मण्ड मॉरीसने आपल्या "ह्युमन झू" या पुस्तकात नोंदवले आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 05/07/2025 - 16:41 नवीन
कृपया लिंक तपासावी.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 05/08/2025 - 07:07 नवीन
<कृपया लिंक तपासावी.> तुमच्या गैरसोईबद्दल दिलगीर आहे. पण माझ्याकडे लिंक उघडत आहे. लेखाची असंपादित आवृत्ती इथे टाकायचा प्रय्त्न करतो.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/17/2025 - 22:26 नवीन
मॉस्कोमधील काही भटके कुत्रे अन्नशोधार्थ मेट्रोतनं वेगवेगळ्या ठिकाणी जायला शिकलेत. संबंधित इंग्रजी लेख : https://www.iflscience.com/dogs-in-moscow-know-how-to-use-metro-trains-and-theyre-now-part-of-commuting-life-80034 रोचक वाटला म्हणून लेख उद्धृत केलाय. -गा.पै.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 07/18/2025 - 04:15 नवीन
रोचक! आणि या दुव्याबद्दल धन्यवाद! हा प्रकार अनेक ठिकाणी दिसतो. हे त्यांना कुणी शिकवलेले नाही. हे जुळवून घेणं आहे (अडाप्टेशन) आहे. चीनमध्ये कुत्र्यांसाठी शाळा पण आहेत- https://www.youtube.com/watch?v=_i8rcXFDogk तसेच त्यांना शाळेत नेण्याआणण्यासाठी बसेस पण असतात-https://youtu.be/zN2YnElLQv0?si=Lu4OzMLP6kJCqFab
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा