अयोध्या काशी यात्रा!
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली यांना अयोध्या-काशी जाण्याचा योग आला!
काही कामानिमित्त मला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जावे लागले. काम आटोपून १ दिवस होता म्हणून जवळच १३४ किमीवरील अयोध्येतही जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून बस पकडून अयोध्येत पोहोचलो. राममंदिराबद्दल आस्था होती आणि बाबरी कांडाबद्दल बरेच काही ऐकून असल्याने उत्सुकता होतीच.
अयोध्येत पोहोचल्यावर राममंदिराच्या दिशेने जाणारा “रामपथ” पाहिला – अतिशय छान बनवलाय, वॉकिंग ट्रॅकसह! घरांचे अतिक्रमण तोडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. रस्ता मोठा केल्याचे आवडले. त्यामुळे रहदारीला व परिसराला शोभा आली. २ बॅटरी ऑपरेटेड गाड्या बदलत, कुणाला १० तर कुणाला २० रुपये देत शेवटी मंदिराजवळ पोहोचलो.
आता पुढे मोठं दिव्य होतं. इथपर्यंतचा प्रवास त्रासदायक नव्हता, तेवढं दर्शन महाभयंकर होतं. दुपारी १२ वाजले होते. ऊन कडक होतं. मंदिराकडे मुख्य रस्त्यापासून वळालो. दूरदूरपर्यंत मंदिर किंवा कळस दिसेना. बराच चालून गेल्यावर चप्पल काढायचं लॉकर मिळालं. तिथे चप्पल तर काढली, पण चालायला एक लांबलचक नि रुंद सतरंजी अंथरलेली होती. सतरंजीवर जागा मिळाली तर ठीक, नाहीतर जळणारे पाय घेऊन पळत सुटावं लागलं.
फक्त चप्पल काढण्यासाठीच २००–४०० मीटरचा मोठा U-टर्न ठेवलेला. लोक घामाघूम होऊन चालत होते, पाय जळत होते. पुन्हा बरंच चालल्यावर सिक्युरिटीने सांगितलं – मंदिरात मोबाईल अलाउड नाही (अरे बाबानो, असा बोर्ड आधी लावायचा ना?) मग पुन्हा जिथे चप्पल काढल्या तिकडे लॉकरला मोबाईल ठेवायला यावं लागलं. सिक्युरिटी चेक करून झाल्यावर मंदिराच्या दिशेने निघालो. पुन्हा बरंच चालल्यावर मंदिर एकदाचं आलं.
मला वाटलं होतं – “रामजन्मभूमीचं राममंदिर” किती भव्यदिव्य असेल? पण नाही! जैन मंदिरांसारखं पांढऱ्या फरशीचं मंदिर, बाहेर छोट्या छोट्या मूर्ती, आणि गावातील एखाद्या २ नंबर कमावणाऱ्या माणसाने मंदिर बांधावं इतकंच छोटंसं प्रत्यक्ष राममंदिर होतं. एकतर राममंदिरापर्यंत पोहोचताना अनेक भाविक गळून पडले होते. सुरुवातीला "जय श्रीराम"च्या घोषणा देणारे चडिचूप झाले होते. म्हातारे–कोतारे सावली मिळेल तिथे बसत होते.
तर हो, छोटेखानी मंदिर अजूनही पूर्ण झालेलं नाही. बांधकाम अजूनही सुरूच आहे. मागच्या वर्षी सत्तालालसेपोटी हिंदूंच्या भावनेची कदर न करता उद्घाटन रेटलं गेलं होतं. बरं, एक अक्षरधामसारखं भव्य मंदिर बांधले असते तर ठीक पण नाही छोटं मंदिर बांधलंय, नि त्याच्या आजूबाजूला आणखी ४ मंदिरांचं बांधकाम सुरू होतं. माती, धूळ उडत होती.
मंदिरात प्रवेश केला. आता इतक्या दूर भक्तगण थकून आलेत, आपण त्यांचे इतके हाल केलेत – तर दर्शन तरी सुखाने होईल? पण नाही! सरकारने हाल केल्यानंतर दर्शनही सुखाने होऊ नये अशी चोख व्यवस्था केलीय. एकतर मूर्ती अतिशय छोटी – ३ ते ४ फुटांची. त्यात भक्त आणि मूर्तीमध्ये इतकं जास्त अंतर की मूर्ती नीट दिसतही नाही. कसं तरी दर्शन आटोपून लोक बाहेर पडले. पुन्हा तीच छोटी सतरंजी नि जळणारे पाय.
कसंतरी लॉकरपर्यंत पोहोचलो. मोबाईल घेतले. गरम फरशीवरून पळत जाऊन चप्पल मिळवली. रस्त्यात ठिकठिकाणी हाल होऊन म्हातारे लोक सावली पाहून पडले होते. स्त्रिया कुठेही फोटो काढायला जागा नाही म्हणून सिक्युरिटीशी भांडत होत्या. अनेक लोकांना बाहेर जायचा रस्ता सापडत नव्हता म्हणून पुन्हा जिथून आले तिथे परत जात होते आणि सिक्युरिटीशी भांडत होते. सिक्युरिटी त्यांना पीटाळत होती.
मध्ये मध्ये पाणी पिण्याची व्यवस्था होती – तेवढंच काय ते सुख. जाताना प्रसाद दिला. राममंदिरात येऊन गेल्याचा पुरावा म्हणून फोटो घेण्याची एकही जागा नव्हती.
मला वाटतं, एवढे हाल जर मुस्लिमांच्या ताब्यात रामजन्मभूमी जमीन असती तरी त्यांनी देखील हिंदूंचं केलं नसतं, तेवढं योगी सरकारने केलंय. शिर्डीचं मंदिर व्यवस्थेच्या बाबतीत कितीतरी पटीने आदर्श आहे!
तर असे कसेबसे दर्शन आटोपून पुन्हा गोरखपूरकडे वळालो. अयोध्येबद्दलचे सगळे भ्रम तुटले. इतर कुठे फिरायची इच्छा राहिली नाही! उगाच नाही अयोध्यासाठी अनेक शहरांमधून सुरू करण्यात आलेल्या फ्लाईट्स बंद पडल्या. मुळात देवदर्शन करायला म्हातारे लोक जास्त येतात. त्यांचेच कसे हाल होतील नि जिरतील याची उत्तम व्यवस्था रामजन्मभूमी मंदिरावर करण्यात आली आहे. ना कुणी फोटो काढू शकतो, ना नीट दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे अयोध्याधाम जास्त प्रसिद्ध पावलेले नाही. उत्तरोत्तर इथे भाविक कमीच होत जाणार, आणि मोठी पब्लिसिटी होणारच नाही.
ज्याला कुणाला जायचे असेल त्याने सोबत एनर्जी ड्रिंक, ओआरएस, टोप्या, गोळ्या, औषधे असा लवाजमा बरोबर असू द्यावा. आपण मंदिरात नाही तर ट्रेकिंगला जातोय, अशा तयारीने जावे.
गोरखपूरला येऊन गोरक्षनाथ मंदिरात दर्शन घेतले
पुढे गोरखपूरमधले काम आटोपून २०० किमीवरील वाराणसीला जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून रेल्वे नव्हती, म्हणून ४० किमीवरील “देवरिया सदर”ला जाऊन रेल्वे पकडली.
रेल्वे स्टेशनवर वेळ होता म्हणून बाहेर जाऊन कॉफी प्यावी असा विचार केला, पण बाहेर भयंकर प्रमाणात कत्तलखाने होते. तिथला वास नि वातावरण पाहून भयंकर मळमळ झाली. परत आता २ महिने तरी नॉनव्हेज खाल्ले जाणार नाही.
रेल्वेत AC चेअर कार मिळाले होते. बाजूला एक कुठल्यातरी कॉलेजचा गप्पिष्ट प्रोफेसर येऊन बसला. त्याने त्याची विंडो सिट मला दिली नि त्या बदल्यात भयंकर गप्पा मारल्या. कानातला हेडफोन पुन्हा पुन्हा काढून तो काय सांगतोय ते ऐकत बसावे लागायचे. असे ४ तास गेले. मधल्या काळात त्याने थोडाफार वेळ दिला, तोपर्यंत वाराणसीच्या हॉटेल आणि घाटांची माहिती युट्यूबवर घेतली. युट्यूबवरील व्हिडिओ पाहून भयंकर उत्सुकता लागली. केव्हा पोहोचेल वाराणसीला, असे झाले.
दशाश्वमेध घाट ते नवा बनलेला नमो घाट पहावाच, असे ठरवून तयारीला लागलो. युट्यूबवर “रांझणा” सिनेमाच्या गाण्यांवर अनेक व्हिडिओ होते, त्यात सुंदर गंगा नि घाट दिसत होते. हा सिनेमा मी कॉलेजमध्ये असताना थिएटरमध्ये पाहिला होता.
रात्री १० वाजता वाराणसी जंक्शनला पोहोचलो. रिक्षावाल्याला १०० टेकवून “तीर्थ गेस्ट हाऊस”ला निघालो. हे गेस्ट हाऊस मी रेल्वेत असतानाच बुक केले होते — ६०० रुपयांत काशी विश्वेश्वर मंदिराला लागूनच रूम मिळाली. गंगेकिनारीही गेस्ट हाऊस आहेत, सकाळी गंगा घाट थेट दिसेल असे.
१२ पर्यंत जेवण आटोपून, चेक-इन करून मी गंगेकडे सुटलो.
दशाश्वमेध घाटापासून सुरुवात करून मी एकेक घाट ओलांडत जात होतो. मनकर्णिका घाट अखंड प्रेते जाळत होता.
इतर घाट — पेशवे घाट, गणेश घाट, भोसले घाट, मनकर्णिका घाट ओलांडत मी जात होतो. पुढे लोक नव्हते. दशाश्वमेध घाटाजवळ लोक झोपले होते पण पुढे शुकशुकाट होता. एक फॉरेनर मुलगी आणि मीच फिरत होतो. ती मला घाबरली असावी, कारण प्रचंड जोरात चालत होती. मी मागे चाललो असतो तर तिचा पिच्छा करतोय असे तिला वाटले असते, म्हणून स्पीड वाढवून तिला ओव्हरटेक केले नि पुढे गेलो.
भोसले घाटावरचा हा दरवाजा मला विशेष आवडला, तिथे फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.
बऱ्याच ठिकाणी पोलीस होते. ते कुणालाही घाटाजवळ येऊ देत नव्हते. जिथे पोलीस नव्हते, तिथे लोक आंघोळी उरकत होते. दीड तास चालल्यावर दमलो. नमो घाट अजूनही अर्धा तास दाखवत होता, मग परत फिरलो.
मंदिर पहाटे २.३० ला उघडेल, असे कळले होते. तोपर्यंत ज्ञानव्यापी मशिद पाहू म्हणून G-मॅप लावून १ वाजता निघालो. अचानक “श्री काशी विश्वनाथ मंदिराचा बोर्ड” दिसला. तिथे फोटो घेतले. तिथल्या पोलिसाने माहिती दिली की मंदिर पहाटे ४ वाजता उघडेल. २५० रुपयेचे तिकीट काढून वेगळी रांग असते, त्याने लवकर दर्शन होते.
एक महाराष्ट्रातील स्त्रियांचं पथक २ वाजेपासून मंदिराबाहेर रांगेत बसले होते. परत रूमवर आलो — जवळच होता. अतिशय अरुंद बोळातून रस्ता होता. bhinti छान चित्रानी रंगवल्या होत्या. २ वाजता झोपलो. ४ वाजता उठून आंघोळ करून मोबाईल रूमवरचा ठेऊन मंदिरात आलो. रांग मोठी नव्हती, पण रांगेत उभे राहिल्यावर लक्षात आले की फार हळूहळू पुढे सरकतेय.
टीव्ही स्क्रीन्सवर लोक पिंडीला हात लावून दर्शन घेताना दिसत होते. हिंदूंचे मक्का म्हणावे असे सर्वात पवित्र मंदिर आणि थेट पिंडीला हात लावणे हे सौभाग्य — तर त्र्यंबक, भीमाशंकर, घृष्णेश्वर कुठेच मिळत नाही — म्हणून आनंदलो.
पण माझा नंबर आला तेव्हा ५ वाजून गेले होते आणि ५ वाजेपर्यंतच सर्वसामान्यांना पिंडीला हात लावता येतो. नंतर VIP ना प्रवेश (११०० रुपये देऊन).
मला मंदिर फार आवडले. अतिशय छान आणि छोटे. आपल्या अहिल्याबाईंनी बांधलेले म्हणजे आपण पिंडीपासून पाच फूटावरून गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेतो. पण गाभारा तेवढेच मंदिर! उगाच जास्तीचे बांधकाम नाही. सोन्याच्या (?) पत्र्याने मढवलेले.
हा पत्रा राजा रणजितसिंहांनी दिला, असे वाचले होते. मंदिर परिसर पांढऱ्या फरशीने केलेला, अतिशय स्वच्छ होता.
थोडक्यात, मंदिर असावे तर असे! नाहीतर खूप मोठे बांधकाम अजिबात नको.
पिंड मला नीट दिसली नाही कारण स्त्रिया मध्ये होत्या पोलीस पुढे ढकलत होते. एक पोलिसाला माझी दया आली नि त्याने २ मिनिटे थांबून स्त्रिया उठून जाण्यापर्यंत रांग होल्ड केली नि मला दर्शन घेऊ दिले.
तोपर्यंत आतल्या पुजाऱ्याने पिंडीवरील हार उचलून माझ्या गळ्यात घातला. मंदिर परिसरात थोडा वेळ बसलो. माकडे भरपूर होती, माणसाना घाबरत नव्हती.
Exit वर पोलिसाला सांगितले की मला ज्ञानव्यापी मशीद पाहायची आहे. त्याने मला दुसऱ्या बाजूला जा सांगितले. तिकडे गेल्यावर नंदी दिसला — त्याचे दर्शन घ्यायलाही रांग होती. नंदीचे तोंड ज्ञानवापीच्या दिशेने आहे.
ज्ञानव्यापीच्या दिशेने गेलो. ज्ञानव्यापी मागून पाहता यावी अशीही व्यवस्था आहे. मागच्या बाजूने मंदिराचे अवशेष असलेले खांब स्पष्ट दिसतात. मंदिर आणि मशिदीच्या दरम्यान जाळीच्या लोखंडी भिंती आहेत. पलीकडे मशिदीत सैन्याचे शस्त्रधारी सैनिक.
मशिदीच्या खाली, नंदीच्या समोर एक भुयार खोदला आहे जिथे जुन्या मंदिराचे खांब स्पष्ट दिसतात. कोर्टाच्या आदेशाने वर्षभराआधीच ते सुरू झाले आहे. तिथे मंदिर स्थापन केले आहे. असे तिथल्या पुजाऱ्याने सांगितले.
सगळं दर्शन घेऊन बाहेर आलो. लोक अन्नपूर्णा मंदिर, कालभैरव वगैरे मंदिरात जात होते, पण मला तिकडे जायची इच्छा झाली नाही. मी सॅक घेऊन होटलवाल्याचा टॉवेल आत टाकून , थेट दशाश्वमेध घाटावर पोहोचलो. मला वाटलं होतं की पाणी अतिशय घाण असेल, पण अपेक्षेपेक्षा खूपच स्वच्छ होतं. घाटावरच्या चार-पाच ठिकाणी पाहिल्यानंतर अतिस्वच्छ जागा बघून कपडे काढले आणि डुबकी मारली — पापं धुतली गेली! पाणी थंड नव्हतं, सुसह्य होतं.
सकाळी घाट गजबजलेला होता
पुन्हा कपडे करून नावेत बसलो. इथे एक गंमत पाहिली नाव वाले मराठी कुटुंबे दिसली की मराठीत बोलायचे, या आई या, पटकन बस, शंभर रुपये वगैरे. नाव आधी गंगेच्या पैलतीरी गेली. तिथं उतरून लोकांनी आंघोळी केल्या. तिकडचं पाणी जास्त स्वच्छ होतं कारण गर्दी नव्हती. मग नावेनं सगळे घाट फिरवून आणले. मी नावेत पुढच्या टोकावर जाऊन जागा पटकावली, आणि एका मुलीला फोटो नीट काढ म्हणून दम देऊन मोबाईल तिच्या हातात दिला. तिनंही बिचारीनं चांगले फोटो काढले.
नाव मधोमध आली तेव्हा मी बिस्लेरीच्या तीन बाटल्यांमध्ये गंगाजल भरलं. मध्ये तहान लागली म्हणून चुकून थोडं गंगाजल प्यायलो. नाव पुन्हा किनाऱ्याला लागली.
एक गोंडस बाळ दिसले, त्याच्या वडिलाना विचारून त्याचा फोटो घेतला.
वेळ कमी होता, पुढची ट्रेन होती. थोडं बनारस फिरलो — बऱ्यापैकी स्वच्छ होतं. साधू, भिकारी वगैरेचा काही त्रास नव्हता. वातावरण अगदी प्रसन्न होतं. गंगा आरती मात्र पाहायला मिळाली नाही. diet वर असल्याने गिठले खाद्यपदार्थ चाखले नाही.

बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही.खरे तर मंदिरातच इतकं महाभयंकर थकवा आला होता की इतर कुठे जायची ईच्छाच मेली.आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते.सहमत, पण पायपीट इतकी ठेवलीय की वरून अस्मानी नी खाली सुलतानी संकट भासावे.हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे.बरोबर पन अनेक जागा अश्या बनवलेल्या असतात की जिथे लोक आठवण म्हणून फोटो कधी शकतात, मूळ मंदिरात नाही पण मंदिर परिसरात. अयोध्येत अश्या गोष्टी जाणून बुजून न केल्यासारख्या वाटतात.सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे.मराठी माणसाने आजही ठरवले ना की फक्त मराठीतच बोलायचे तर अख्खा भारत वर्षभराच्या आत मराठी शिकेल.काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही.ह्याबद्दल माफी, काशी विश्वेश्वर हिंदूंचे सर्वात पवित्र मंदिर आहे ना? त्यामुळे उपमा दिली, पण अयोध्येत खरोखर हाल आहेत. :(लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात.नाही, उलट आहे कर्नल साहेब, पूर्वीचा गालीच्छपणा नी बकालपणा बहुतेक पर्यटन स्थळानवरुन गेलाय, हॉटेल्स चांगल्या नी स्वस्त मिळतात, रस्ते स्वच्छ आहेत, कर्मचारी नम्र नी प्रशिक्षित दिसत होते, पोलीस नी सैन्यही अदबीने बोलत होते, स्थानिकांचीही दादागिरी गुंडागर्दी नव्हती. गंगा कमालीची स्वच्छ होती, अगदी गंगेमध्येच फ्लोटिंग चेंजिंग रूमही होते! ह्याबाबतीत मी योगीजीना नक्कीच धन्यवाद देईन! अयोध्याही पायपीट सोडली तर मस्त केलीय. गैरसोय अशी नव्हती.वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष)खरेतर निपक्षपतिपणेच लिहिले आहे, ऊन सोडले तरीही पायपीट खुपच आहे राममंदिरासाठी, त्यामुळे जे जसे दिसले तसे लिहिलेय, गंगा स्वच्छ मिळाल्याचेही लेखात लिहिलेच आहे की.गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती.मंदिर भव्य नी सुंदर आहे, लेख लिहायचे मनात नसल्याने बाहेरील तळ्याचा फोटू घेतला नाही, मंदिराच्या भव्यतेसाठी रेफरन्स ला मी मंदिर समोर उभा आहे.आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता.ह्या बाबतीत सहमत, सकाळी ११ वाजता प्रचंड मोठी रांग होती, हे लेखात लिहायचे राहिले, आम्ही ४ ला जाऊनही आम्हाला १.५ तास लागले तर ह्या लोकाना दर्शनाला नक्की ८ तास लागले असतील, रंग केवढी असावी तर? मंदिर सोडून वाराणसीच्या ५ - १० गल्ली बोळा ओलांडून प्रत्येक गेटवर पुढे गेलेली होती, बरे झाले त्या गप्पिष्ठ प्रोफेसरने मला रात्रीच दर्शन घ्या असा मोलाचा सल्ला देऊन ठेवला होता.वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे .धन्यवाद, पैलतिराबद्द्ल नावड्यांनी नंतर सांगितले तो पर्यंत इकडे डुबकी मारल्या गेली होती, पण पाणी बरेच स्वच्छ मिळाले.संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी.वाराणसीम्हणजे मंदिर नी गंगेत डुबकी एवढेच मला वाटले होते नाहीतर आणखी एक दिवसाचा वाढीव प्लॅन केला असता. नंतर जसजसे कळत गेले तसतसे लक्षात आले, पुढील वेळी चांगला मोठा प्लॅन करणार.गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे.पुढीलवेळी जाणे झाले तर नक्की पाहीन, रंकाळाही पहायचाय.