Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा

य
युयुत्सु
Sat, 04/05/2025 - 08:01
💬 2 प्रतिसाद
बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा ======================= मंडळी, युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली. दर वेळेला लेखाच्या शेवटी मी सावधगिरीचा इशारा म्हणून "डोळे मिटून विश्वास ठेउ नये असे लिहीतो". असे का असा प्रश्न अनेकजण विचारतील. त्यासाठी माझा ताजा म्हणजे कालचाच अनुभव सांगणे आवश्यक वाटते. युयुत्सुनेटची मी इंट्रा-डेसाठी पण चाचणी घेत आहे. भाकीते इथे टाकायला सुरूवात केल्यापासून "मी डोळे मिटून" इंट्रा-डेसाठी पोझिशन घेत आहे. मला ~७०% सक्सेस रेट मिळाला. पण तरीही माझा एकूण नफा कालच्या घसरगुंडीमध्ये गमावला. मनी/रिस्क मॅनेजमेंट्मध्ये काहीतरी चुकते आहे. ते सापडले की स्वर्गाचे दार उघडेल. सांगायचा मुद्दा असा की काल इंट्राडेसाठी बाजार वर जाणार असे युयुत्सुनेट सांगत होते. म्हणून त्याप्रमाणे "बेल"मध्ये पोझिशन घेतली. पण बाजार उलटा फिरला आणि वाट बघत बसलो आणि मिळवलेला सर्व नफा गमावला. टॉप १% क्लबच्या दारापाशी पोचलो आहे, पण अजून दार उघडत नाहीये! ;) पण हा सर्व उपद्व्याप करताना मला बाजाराचे जे मॉडेलमुळे दर्शन (आणि ज्ञान) झाले ते कोणत्याही क्लासमध्ये/पुस्तकात मिळत नाही. ते स्वत:चे स्वत:च हात बरबटून मिळवावे लागते. असो! आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक चार्ट  आकृती २ - निफ्टी वर जायची शक्यता ६५% असली तरी चालू पातळी पासून भूतकाळात (ठराविक) मार्केट फक्त एकदाच परत फिरल्याचे उदाहरण सापडले.  आकृती ३ - सोने वर/खाली जायची शक्यता २७/७३%  आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी (२२५०० पर्यंत?) चालू राहील...  मागिल भाकीताचा दुवा - https://www.misalpav.com/node/52814 वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत. विशेष आभार - - माझ्या या उपक्रमाला मनापासून प्रतिसाद देण्यासाठी आंद्रे वडापाव, वामन देशमुख यांना मनःपूर्वक धन्यवाद!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1003 views

💬 प्रतिसाद (2)
य
युयुत्सु Sun, 04/06/2025 - 08:24 नवीन
मी तयार केलेले युयुत्सु-नेट लोकांच्या वापरासाठी अशी मला खासगी निरोप पाठवऊन विचारणा झाली. त्या संदर्भात हा खुलासा- युयुत्सु-नेट लोकांच्या वापरासाठी अनेक कारणांनी उपलब्ध केलेले नाही (आणि तसा सध्या विचारही नाही). ते वापरणे तसे अजुनही किचकट आहे. शिवाय ते वापरण्यासाठी जो डेटा लागतो तो मी विकत घेतो. त्यासाठी दुस-या सॉफ्ट्वेअर वर अवलंबून राहावे लागते. तरी या लेख-मालेतील १ला लेख बघितला तर त्याची रचना कशी केली याचा थोडाफार अंदाज येईल. आता ते सुरुवातीच्या रचनेपासून खुप विकसित झाले आहे. ते "आर" या भाषेत लिहीले आहे. ती पायथनपेक्षा शिकायला अवघड आहे, असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sun, 04/06/2025 - 13:23 नवीन
उलट आम्हीच तुमचे धन्यवाद केले पाहिजे .. माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर (आप्लिइड आय टी ) पाहून मनाला आनंद होतो . मी हे भाकीत नक्की वाचतो (पण त्यावर अवलंबून गुंतवणूक करत नाही ) मजा वाटते ...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा