बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा
बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा
=======================
मंडळी,
युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली.
दर वेळेला लेखाच्या शेवटी मी सावधगिरीचा इशारा म्हणून "डोळे मिटून विश्वास ठेउ नये असे लिहीतो". असे का असा प्रश्न अनेकजण विचारतील. त्यासाठी माझा ताजा म्हणजे कालचाच अनुभव सांगणे आवश्यक वाटते.
युयुत्सुनेटची मी इंट्रा-डेसाठी पण चाचणी घेत आहे. भाकीते इथे टाकायला सुरूवात केल्यापासून "मी डोळे मिटून" इंट्रा-डेसाठी पोझिशन घेत आहे. मला ~७०% सक्सेस रेट मिळाला. पण तरीही माझा एकूण नफा कालच्या घसरगुंडीमध्ये गमावला. मनी/रिस्क मॅनेजमेंट्मध्ये काहीतरी चुकते आहे. ते सापडले की स्वर्गाचे दार उघडेल.
सांगायचा मुद्दा असा की काल इंट्राडेसाठी बाजार वर जाणार असे युयुत्सुनेट सांगत होते. म्हणून त्याप्रमाणे "बेल"मध्ये पोझिशन घेतली. पण बाजार उलटा फिरला आणि वाट बघत बसलो आणि मिळवलेला सर्व नफा गमावला. टॉप १% क्लबच्या दारापाशी पोचलो आहे, पण अजून दार उघडत नाहीये! ;)
पण हा सर्व उपद्व्याप करताना मला बाजाराचे जे मॉडेलमुळे दर्शन (आणि ज्ञान) झाले ते कोणत्याही क्लासमध्ये/पुस्तकात मिळत नाही. ते स्वत:चे स्वत:च हात बरबटून मिळवावे लागते.
असो!
आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक चार्ट
आकृती २ - निफ्टी वर जायची शक्यता ६५% असली तरी चालू पातळी पासून भूतकाळात (ठराविक) मार्केट फक्त एकदाच परत फिरल्याचे उदाहरण सापडले.
आकृती ३ - सोने वर/खाली जायची शक्यता २७/७३%
आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी (२२५०० पर्यंत?) चालू राहील...
मागिल भाकीताचा दुवा - https://www.misalpav.com/node/52814
वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.
विशेष आभार - - माझ्या या उपक्रमाला मनापासून प्रतिसाद देण्यासाठी आंद्रे वडापाव, वामन देशमुख यांना मनःपूर्वक धन्यवाद!

💬 प्रतिसाद
(2)
य
युयुत्सु
Sun, 04/06/2025 - 08:24
नवीन
मी तयार केलेले युयुत्सु-नेट लोकांच्या वापरासाठी अशी मला खासगी निरोप पाठवऊन विचारणा झाली. त्या संदर्भात हा खुलासा-
युयुत्सु-नेट लोकांच्या वापरासाठी अनेक कारणांनी उपलब्ध केलेले नाही (आणि तसा सध्या विचारही नाही). ते वापरणे तसे अजुनही किचकट आहे. शिवाय ते वापरण्यासाठी जो डेटा लागतो तो मी विकत घेतो. त्यासाठी दुस-या सॉफ्ट्वेअर वर अवलंबून राहावे लागते.
तरी या लेख-मालेतील १ला लेख बघितला तर त्याची रचना कशी केली याचा थोडाफार अंदाज येईल. आता ते सुरुवातीच्या रचनेपासून खुप विकसित झाले आहे. ते "आर" या भाषेत लिहीले आहे. ती पायथनपेक्षा शिकायला अवघड आहे, असे म्हणतात.
- Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव
Sun, 04/06/2025 - 13:23
नवीन
उलट आम्हीच तुमचे धन्यवाद केले पाहिजे ..
माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर (आप्लिइड आय टी ) पाहून मनाला आनंद होतो .
मी हे भाकीत नक्की वाचतो (पण त्यावर अवलंबून गुंतवणूक करत नाही ) मजा वाटते ...
- Log in or register to post comments