Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

दोसतार चे निमित्त

व
विजुभाऊ
Tue, 03/11/2025 - 15:08
💬 6 प्रतिसाद
काल अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला. तो कुठल्याशा गावात एका अभिवाचन स्पर्धेचा परिक्षक म्हणून तिथे गेला होता. तेथे एका मुलाने (वय वर्षे १४) माझ्या दोसतार कादम्बरीतील एक उतारा अभिवाचनासाठी निवडला होता. मित्राला सध्या सम्पर्कात नसल्याने दोसतार बद्दल काहीच माहिती नव्हती. पण पुस्तकातील उतारा धमाल वाटल्याने त्याने त्या मुलाच्या पालकांकडे चौकशी केली. त्याच्या पालकानी पुस्तक दाखवल्यावर त्याने थेट मला फोन लावला.त्या मुलाच्या पालकाना माझ्याशी बोलायचे होते. त्या मुलाला कोणीतरी दोसतार पुस्तक भेट म्हणूण दिले होते. मुलाचे पालक सांगत होते की मुलगा इअंग्रजी माध्यमात शिकतो आणि त्याला मराठी वाचनाची फारशी आवड नाही. पण दोसतार पुस्तक मिळाल्यापासून तो ते पुस्तक नेहमी वाचत असायचा. वाचताना गालात हसत असायचा. त्या मुलाने दोसतार कादम्बरी तीन चार वेळा वाचली असेल. पालकानी कुतूहल म्हणून दोसतार वाचले. आणि म्हणाले "मी पुस्तकाच्या प्रेमात पडलो" महत्वाचे म्हणजे माझ्या पिढीने अनुभवलेल्या गमती जमती माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलाला देखील आवडल्या. त्या मुलाचे पालक हे सांगताना इतक्या उत्साहाने बोलत होते की फोनवरून ऐकतानाही त्यांचा चेहरा मला समोर दिसत होता. दोसतार ज्या काळात घडले तो माझ्या लहानपणीचा काल आजच्या नव्या पिढीला ही आवडतो हे ऐकून खूप सुखावलो. मला हा एक आश्चर्याचा सुखद धका होता. थँक्स टंप्या , एल्प्या आणि विन्या ग्यांग. तुम्ही माझ्या मनात आहात तसेच लहान रहा. तुमच्यातला निरागसपणा जपत रहा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1948 views

💬 प्रतिसाद (6)
व
विजुभाऊ Tue, 03/11/2025 - 15:14 नवीन
https://www.misalpav.com/node/47099
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 03/11/2025 - 16:06 नवीन
छान !! आवडले.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 03/12/2025 - 03:16 नवीन
भारीच मोठ्या बक्षिसापेक्षा हे अनुभव जास्त आनंद देऊन जातात.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 03/12/2025 - 05:48 नवीन
व्वा! क्या बात है! मिसळपावची दोस्तार लेखमाला व त्यानंतर आलेले छापील पुस्तक, दोन्हींच्या आठवणी ताज्या झाल्या.‌
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Wed, 03/12/2025 - 09:25 नवीन
अभिनंदन । बादवे, मित्रा साठी नवीन मित्र जूना मित्र असे वर्गिकरण केले जाते तसे मुलांच्या बाबतीत केले जात नाही जसे हा माझा नवीन मुलगा हा माझा जूना मुलगा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/14/2025 - 09:45 नवीन
व्वा ..... भारीच की ! लेखणीची कमाल .... कथानक आपल्याशीच मेळ खातंय ... किती मोठं यश लेखकाचं ! Image removed. हार्दिक अभिनंदन विजूभाऊ !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा