Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

धनवर्षाव (शतशब्दकथा)

अ
अनन्त्_यात्री
Tue, 03/11/2025 - 06:50
💬 4 प्रतिसाद
सर्वपित्रीची रात्र गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या चर्मासनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड. शेवटच्या आहुतीच्यावेळी मांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे. ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही. अन्यथा गुप्तधनाची संधी कायमची जाईल. मांत्रिकानं दिलेली पंचधातूची सुरी महाआहुतीत भोसकून तिचं ज्वालार्पण तर केलं एकदाचं.. आता फक्त एक महिना..पुढच्या अमावास्येला धनवर्षाव..... पण अरे..हे सर्च लाईट? ह्या शिट्ट्या? हा मांत्रिक कुठं पळतोय? ~~~~~~~~~~~~~ ब्रेकिंग न्यूज .. फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल: फाशी ठोठावली... गुप्तधनासाठी . . कन्याबळी देणाऱ्या बापाला

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1407 views

💬 प्रतिसाद (4)
व
विजुभाऊ Tue, 03/11/2025 - 09:12 नवीन
फारच प्रेडिक्टेबल वाटली श श क. दुसरे म्हणजे त्यात दोन वाक्ये कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आणि फाशी ठोठावली... गुप्तधनासाठी..कन्याबळी देणाऱ्या बापाला.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 03/11/2025 - 10:04 नवीन
+१ इजुभो!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 03/11/2025 - 10:16 नवीन
श्या मजा नहीं आ रहा है. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 03/11/2025 - 10:47 नवीन
मांत्रिक किडनॅपर होता. आहुती देणाऱ्याला हे माहित नव्हते की आपलीच मुलगी किडनॅपरने आपल्यासमोर बळी देण्यासाठी ठेवलीय.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा