Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

Lessons in Chemistry!

ल
लई भारी
Tue, 01/28/2025 - 03:14
बऱ्याच दिवसांनी एक चांगली heartwarming सिरीज बघितली. ८ भागांच्या ह्या सिरीज मध्ये ६० च्या दशकातील अमेरिकेतील काळ उत्तम उभा केला आहे. Brie Larson(Captain Marvel फेम) ने Elizabeth Zott हे केमिस्ट्री मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या पण विविध कारणांमुळे डावलले गेलेल्या आणि नंतर एक यशस्वी पण वेगळा कुकिंग शो चालवणाऱ्या कणखर स्त्रीचे पात्र साकारले आहे. सुरुवातीला तिच्या पात्रात एक टिपिकल आढ्यता जाणवते. थोडा एकसुरीपणा सुद्धा वाटू शकतो. पण हळू हळू कथेसोबत तिचा अभिनय पण उलगडू लागतो.एका चांगल्या कादंबरी चे रूपांतर असल्यामुळे कथा छान आहेच, पण सगळ्यात जास्त मला काही संवाद आणि पंच लाईन्स खूप आवडल्या. त्याशिवाय सगळ्या पात्रांच्या काही ना काही गोष्टी सांगत राहून पुढे त्या सगळ्याची मस्त गुंफण केली आहे. म्हणजे एखादा प्रसंग नंतर दुसऱ्या पात्राच्या नजरेतून बघताना त्यावेळी न कळलेल्या किंवा अर्धवट समजलेल्या गोष्टी उलगडतात. एखादा प्रसंग बघताना वाटते की काहीतरी अजून आहे इथे, आणि त्याची सांगड नंतर कधीतरी घातली जाते. त्यामुळे आधीचे बारीकसारीक संदर्भ कथेच्या ओघात पुढे छान वापरले आहेत. Brie Larson ने सुरुवातीला त्रासलेल्या, व्यवस्थेविरुद्ध चिडलेल्या, मदत नाकारणाऱ्या स्त्रीपासून, हतबल पहिलटकरीण आई, टीव्ही शो मध्ये अगदी वेगळा मार्ग निवडून तो यशस्वी करून दाखवणारी, आपल्या शो मधून चांगल्या-खऱ्या गोष्टींचा आग्रह धरणारी आणि कित्येक महिलांना प्रेरित करणारी, एकटेपणात सुद्धा चांगल्या आठवणीने स्वतःच उभारी घेणारी आणि येणाऱ्या सर्व गोष्टीना स्वीकारत शेवटी "मदत ही चांगली गोष्ट आहे" हे स्वीकारण्या पर्यंतचा प्रवास अगदी प्रभावीपणे दाखवला आहे. सोबत इतर सगळ्याच कलाकारांचा उत्तम अभिनय आहे. विशेषतः तिची कृष्णवर्णीय शेजारीण आणि एक बालकलाकार सुद्धा! एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध तात्कालिक सामाजिक विषयांना यामध्ये स्पर्श केला आहे आणि त्यामध्ये निश्चित यशस्वी झाले आहेत. सुरुवातच आहे ती म्हणजे स्त्रियांना विज्ञान, संशोधन क्षेत्रात त्यावेळी दिली जाणारी दुय्यम वागणूक किंवा नाकारले जाणे. एक संवाद आहे की "किती स्त्री संशोधक आठवतात?" तर हिरिरीने उत्तर दिले जाते, "आहेत की, मादाम क्युरी... आणि.... " पुढे काही सुचत नाही! अगदी चपखल आहे. त्याच बरोबर टिपिकल लाल फीतीचा कारभार म्हणजे डॉक्टरेट नसेल तर संशोधन पाठवू शकत नाही वगैरे. कृष्णवर्णीय समुदायाला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक, नोकरीची गरज पुरुषांनाच आहे, स्त्रियांनी घर सांभाळून फक्त नवऱ्याला खुश ठेवावे ही मानसिकता, समलैंगिक लोकांना कुटुंबाकडून अव्हेरणे, चर्च चा दांभिकपणा(फसवे दैवी चमत्कार आणि छुपी दारु निर्मिती, आपल्या स्वार्थासाठी एका मुलाचे भावविश्व उध्वस्त करणे), शाळांमध्ये असणारे पारंपारिक शिक्षण कुतुहल क्षमतेला कसे मारक आहे अशा अनेक विषयांवर छान टिपण्णी केली आहे.   दुसऱ्या भागाच्या शेवटी असा काही ट्विस्ट येतो की धक्का बसतोच आणि end credits बघताना अगदी भरून येते. (जास्त काही लिहिल्यास spoiler दिले जातील). तीच गोष्ट शेवटच्या भागाची. एका awkward प्रसंगात छोटी मुलगी असा काही प्रश्न विचारते की एकतर थेट विषयाला हात घातला जातो आणि आपणच अवघडतो. शाळेत 'फॅमिली ट्री' काढायला सांगितल्यावर आपल्या जन्मा आधीच गेलेले वडील आणि त्यांचे पूर्वायुष्य याबद्दल तिच्या कुतूहलातून खूप गोष्टी उलगडतात. या सगळ्या दरम्यान नशीब किंवा हे असे का घडत जाते याची टोचणी लागत राहतेच! आपल्या आयुष्यात अगदी थोड्या वेळासाठी आलेली व्यक्ती सुद्धा आपल्या आयुष्यावर किती प्रभाव टाकू शकते किंबहुना आपले आयुष्य बदलू शकते हे प्रकर्षाने जाणवते. अशा व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून तर टाकता येणार नाही पण त्यांचे विचार, लेखन आणि 'मी आहे' असा आशावाद किती आश्वासक असू शकतो हे पण जाणवते. "the only constant variable in a chemical reaction is change". हे सूत्र तर अतिशय मोलाचे आहेच! काही गोष्टी cheesy वाटू शकतात किंवा काही loose ends आहेतच. त्यामुळे ट्रेलर बघून अंदाज घ्या. खूप लिहिणार होतो पण मग अजून spolier येतील म्हणून थांबतो. अर्थात ही काही रहस्यकथा नाही आहे, पण आपोआप गोष्टी उलगडत जाताना जो अनुभव येतो त्यामध्ये बाधा येईल. OTT: Apple TV+ (Tata Broadband वर मोफत सब्सक्रिप्शन मिळाले आहे त्यामुळे '#ultrarich' अशी कमेंट करू नये ;-) ) पुस्तक वाचायची इच्छा झाली आहे, बघू जमते का.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1001 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा