Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मंजर-ए-सुब्हा उर्फ मांजरसुंबा किल्ला

B
Bhakti
Sat, 01/25/2025 - 07:50
💬 16 प्रतिसाद
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड! आ मी अजूनही हा गड पाहिला नव्हता.पण गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.विशालदादाला जेव्हा सांगितले की पहिल्यांदाच जाणार आहे.तेव्हा तो म्हणाला १० मिनिटांत चढून जाता येते.खरोखर १० मिनिटांत मी गड चढले.उगाच इतके दिवस घालवले असं वाटलं.गडावर गेल्यावर पूर्वेकडे एक मुख्य दरवाजा- कमान आहे .जिचे छत ,भिंती,खिडक्या आकर्षक आहे.सकाळचे ६.४५ वाजले होते.सूर्योदयाचे ते रंग उधळणीचे मोहक आकाश डोळ्यांत साठवत होते.सूर्याची लाल केशरी चमचमती बिंदी गोजिरी होती.सर्वांनी प्रजासत्ताक दिनाचा पूर्व सूर्योदय तिरंग्यासह फोटो घेत अनुभवला.पुढे आत गेल्यावर एक विस्तीर्ण पठार आहे.तिथेच एक अर्धवट सुरक्षित वास्तू बाकी आहे.समोर पूर्वेलाच पाण्याचे भव्य टाके आहे. अ इ उ क १ २ मांजरसुंबा हा गड- किल्ला १४ व्या शतकात निजामाच्या काळात सलाबत खान नावाच्या सरदाराने बांधला होता.संभाजीनगर त्याकाळच्या देवगिरी?नगरातून शत्रू सैन्यावर लक्ष देण्यासाठी हा उंचावर टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता.याचे मूळ नाव मंजर -ए- सुब्हा असे होते जे अपभ्रंश होऊन मांजरसुंबा /मांजरसुभा झाले.खरोखर सुबहाच सुंदर दृश्य जे इथून पाहिले ते विसरू शकणार नाही. ३ ४ या किल्ल्याला अजून एक ओळख आहे ती म्हणजे हत्तीची मोट! पठाराच्या दुसऱ्या बाजूला एक दुमजली हवा महाल/ बुरूज आहे.त्याला हत्तीची मोट म्हणतात कारण बुरूजाची खाली तीन पाण्याची टाके आहेत.तसेच तिथे मोट बांधायची सोय आहे.टाक्याकडे खाली जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे.पण नंतरची वाट थोडी अवघड आहे.वेळेअभावी आम्ही बुरूजावरूनच टाके पाहिले. हा फोटो अभ्यासक रोहन गाडेकर यांच्या सौजन्याने देत आहे. ७ ट्रेक कॅम्पने ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नोत्तरे घेतले.तसेच एका कागदावर स्वतःमध्ये काय बदल करू इच्छितो ज्याने स्वतःचे आणि समाजाचे हित साधले जाईल हे लिहून ही अँक्टिव्हिटी केली.राष्ट्रगीतासह छोट्याशा सुरेख ट्रेकची सांगता केली. ७

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3810 views

💬 प्रतिसाद (16)
क
कर्नलतपस्वी Sat, 01/25/2025 - 09:47 नवीन
लेखन, किल्ल्याची ओळख, प्रचि सर्व सुंदर आहे. घरा पासून जवळच आहे वाटते.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 01/25/2025 - 13:41 नवीन
हो,२५-२७ किमी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/25/2025 - 14:13 नवीन
अगदी हेच म्हणायला आलो होतो..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/25/2025 - 09:49 नवीन
मस्त. तो सुबहचा सूर्यबिंब. खरोखर १०००००००० नौबती झाडाव्या इतका छान आलाय. तुम्ही तेथे होतात. तो अनुभवायला.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 01/25/2025 - 13:43 नवीन
हो,हा सूर्योदय खुपच सुंदर होता.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 01/26/2025 - 09:24 नवीन
छान! अंबेजोगाईला जाताना अनेकदा मांजरसुंभा लागले, परंतु हा गड काही बघितला नाही कारण...
गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.
हेच 😀
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 01/26/2025 - 18:20 नवीन
लेख आणि प्रचि आवडले
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 01/27/2025 - 01:11 नवीन
सगळे फोटो खूपच छान आहेत. २५-२७ कि.मी. कुठून आहे ? पुण्याहून किती अंतर आहे ?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 01/27/2025 - 06:46 नवीन
पुण्याहून दूर आहे.पण कधी संभाजी नगरला किंवा शनिशिंगणापूर किंवा पैस मंदिराकडे अहिल्यानगरहून जात असाल तर वांबोरीकडे जाणारे वळण घ्या.मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड दोन्ही २ तासात करा आणि पुढे जाऊ शकता.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 01/27/2025 - 10:49 नवीन
मस्त लेख आणि फोटो. किल्ल्याचे नाव आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 01/27/2025 - 19:06 नवीन
मस्त माहिती ताई! अशीच फिरत रहा लिहीत रहा!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 01/28/2025 - 05:37 नवीन
माहिती आणि फोटो छानच
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 01/28/2025 - 11:54 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 01/28/2025 - 12:56 नवीन
छान लिहिले आहे, गड आणि गडावरील वास्तू पूर्वीच्या वैभवशाली निजामशाही काळाची कल्पना देतात.
संभाजीनगर त्याकाळच्या देवगिरी?नगरातून शत्रू सैन्यावर लक्ष देण्यासाठी हा उंचावर टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता
निजामशाही काळात आजच्या छत्रपती संभाजीनगरचे नाव खडकी होते. जे राष्ट्रकूट काळातील कटक (सैन्याचा तळ) ह्या मूळच्या नावपासून आले होते. मांजरसुंबा ह्याच नावाचा डोंगर राजमाची आणि ढाकच्या मध्ये आहे. त्याचं आभाळावेरी घुसलेलं शिखर फारच देखणं दिसतं.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 01/28/2025 - 17:13 नवीन
कटक ते खडकी काय अनोखा प्रवास दिसतोय ;) राजमाचीचा मांजरसुंबा पाहयला पाहिजे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/30/2025 - 20:05 नवीन
सुंदर छायाचित्रे अन वर्णन. मांजरसुंबा किल्ल्याची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा