सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स
प्रस्तावना :
१. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही.
२. मुळात कोणाला काही तरी कळावं ह्यासाठी काहीही खटाटोप करणे ह्यात आपला काय फायदा ? आपण आपल्या स्वानंदासाठी लिहावं . आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम !
३. स्वान्तःसुखाय म्हणतात ते हेच !
___
https://ritholtz.com/wp-content/uploads/2019/04/eso1907h.jpg
असो. तुर्तास टेक्निकल गोष्टी बाजुला ठेवा , आपल्याला फिजिक्सचा क्लास घ्यायचा नाहीये , आपण शब्दांच्या सिंग्युलॅरिटी विषयी बोलत आहोत!
हां तर कुठे होतो आपण ?
तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ह्या शब्दांच्या एव्हेंट होरायझॉन वर आहेत , तुम्ही निर्देशक अशा खंडीभर उपमा वारु शकता पण त्या सार्या केवळ निर्देशक आहेत , प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही .
आता तुम्ही थोडं ह्या इव्हेंट होरायझॉनच्या आत उतरा , प्रयत्न तरी करा . तुम्हाला फ्लॅशेस दिसायला लागतील अशा अनेक गोष्टींचे ज्या तुम्ही शब्दात वर्णनच करु शकत नाही. केवळ निर्देशक म्हणुन शब्द तयार केलेले आहेत बस्स...
झोप
जाग येणे
बेशुध्द होणे
वेदना
सुख
परमोच्च सुख
ऑर्गॅझम
बस शब्द आहेत , प्रत्यक्ष अनुभुती ह्या शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !
Are you getting what I am tying to say ?
अजुन थोडे आत उतरु अन सिंग्युलॅरिटीकडे जाऊ...
जन्मला येणे
मृत्यु
ध्यान
समाधी
विदेहस्थिती
जीवनमुक्तावस्था
आपल्याला बस शब्द म्हणुन माहीती आहेत ... प्रत्यक्ष अनुभुती कुठाय ?
अजुन खोल काहीतरी "त्या" तिथे आहे जे शब्दांच्या परे आहे .... पण नक्की काय आहे "ते" ? काय आहे ते जे की काहीही केल्या शब्दांच्या आवाक्यातच येत नाहीये
आत्मा ब्रह्म आणि स्वरुप ...जीव शिव आणि ईश्वर ... विश्वरुप विश्वंभर ... हेही नुसतेच शब्द ...
आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हें मायेचेंची रूप ।
रूप आणि अरूप । सकळ माया ॥ १६ ॥
जीव शिव आणि ईश्वर । हाही मायेचा विस्तार ।
विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥ १७ ॥ - आत्माराम - समर्थ रामदास
हे शब्द नुसतेच क्षितीजावर रेंगाळात आहेत , नुसताच निर्देश करत आहेत त्या सिंग्युलॅरिटीकडे ! पण नक्की काय आहे "ते " ?
सत् ... चित् ... आनंद... हे ही केवळ निर्देशक ...
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥
हिरण्यगर्भ ... भर्ग ... सवितृ ...
ओमित्येकाक्षर ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !
तत्वमसि !
तो तूच आहेच !
(ॐ)
सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स
वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥शब्द आणि अर्थ ज्याप्रकारे एकामेकात संपृक्त आहेत , ओतप्रोत भरलेलेआहेत , एकामेकापासुन वेगळेच काढता येत नाहीत तसेच जे जगताचे माता आणि पिता आहेत शिव आणि शक्ती ह्यांना मी माझ्या शब्दांना अन त्याद्वारे मला व्यक्त करायच्या अर्थाला सिध्दता प्राप्त व्हावी ह्यासाठी वंदन करतो !
१.स्थुलWhat exactly assigns the meanings to the words ? शब्दांना त्यांचे अर्थ कोण जोडतं ? म्हणजे कसं की मी पुरणपोळी म्हणालो की तुमच्या डोक्यात पुरणपोळीच येणार आहे . अशी मस्त टम्म पुरण भरलेली गुळाची पुरणपोळी , त्यात तो जायफळाचा सुप्त सुगंध . त्यावर तुपाची धार . अगदी पुरणपोळी चिंब भिजुन निघेपर्यंत . अहाहा . अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते ना ! आता पुरणपोळी म्हणल्यावर किती लोकांच्या मनात अमेरिकन चीज बर्गर आला ? किंवा किती लोकांच्या मनात जॅपनीज सुशी आली ? शक्यच नाही ! कारण पुरणपोळी हा शब्द आणि पुरणपोळी हा अर्थ अगदी अगदी एकामेकांत सामावलेले आहेत . अभिन्नपणे ! तसेच सर्व नामांचे. त्यात सामान्य नामेही आली आणि विशेष नामेही आली . आणि फक्त नामेच का , सर्वनामांचेही तेच ! तो असे म्हणल्यावर मनात डोळ्यासमोर तोच येतो , ती म्हणल्यावर तीच येते आणि ते म्हणल्यावर तेच येते . मग आता ते LGBTQIA+ वाल्यांनी कितीही गजहब माजवला तरी काही फरक पडत नाही. कारण हे शब्द आणि अर्थ मॅपिंग हे लोकोत्तर आहे. ज्यांना Zie/zir/zirs /Co/co/E/em/eir/ They/them/theirs वापरायचे आहे त्यांना वापरु दे बापडे. आजारी माणसांना जास्त त्रास देऊ नये. हेच सर्व किर्यापद , विशेषण, क्रियाविशेषण अव्यय, केवलप्रयोगी अव्यय , शब्दयोगी अव्यय , उभयान्वयी अव्यय सर्वच बाबतीत हे सत्य ! "आणि" ह्या शब्दाचा अर्थ "आणि" असाच आहे , "किंवा" ह्या शब्दाचा अर्थ "किंवा" असाच राहतो. तुम्हाला पटत नाहीये का ? तुम्ही एकदा AND च्या ऐवजी OR लाऊन तुमची SQL Query रन करुन पहा , लगेच पटेल तुम्हाला. ( सर्व्हर क्रॅश होऊन बॉसच्या शिव्या पडल्यास आमची जबाबदारी नाही. ) कर्ता , कर्म , क्रियापद , कर्तरी प्रयोग , कर्मणी प्रयोग , भावे प्रयोग ह्यांना त्यांचे असे विशिष्ठ अर्थ आहेत. आणि ते त्या शब्दांपासुन भिन्न करता येत नाहीत. एकवेळ शब्द नामशेष होईल, विस्मरणात जाईल , एकवेळ भाषा नष्ट होईल पण "शब्द : अर्थ" हे मॅपिंग नष्ट होऊ शकत नाही.
२. सुक्ष्मआणि हे मॅपिंग केवळ जड स्थूल वस्तुंबाबतच आहे असं नाही . हे सुक्ष्म वस्तुंबाबतही आहे. ओडीसामध्ये छेनापोडा नावाचा एक नितांत सुंदर गोड पदार्थ बनवतात , मी त्यावर खंडीभर लेख लिहिले तरी त्याची चव कशी गोड कशी , त्याचा सुगंध कसा होता , त्याचे टेक्श्चर कसे, हे समजाऊन शकत नाही. कस्तुरी म्हणाल्यावर कस्तुरीच आठवते , पारिजातक आठवत नाही ! रोमॅन्टिक जॅझ म्हणल्यावर मनात सॅक्सोफोन व्हायोलीनचे च सूर येतात , राग मारवा नाही येत की तांबडी चामडी चमकते उन्हातनं लकालकालकालकालका हे ही येत नाही! आणि हे मॅपिंग इतकं सटल आहे की तुम्हाला "त्याचा" प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय "ते" नक्की काय आहे कळुच शकत नाही. तुम्ही एकवेळ उपमा अलंकार वापरु शकाल पण तो केवळ निर्देशक असेल , प्रत्यक्ष नव्हे ! आता उकडीचे मोदक म्हणजे काय असं विचारल्यावर काही लोकं "स्वीट कोकोनट जॅगरी राईस स्टीम्ड मोमो " असं वर्णन करुन सांगतात. काय बोलणार ! असो.
३. अतिसुक्ष्मआणि हे शब्दः अर्थ मॅपिंग सुक्ष्माच्याही अजुन खालवर अतिसुक्ष्मातही आहे. प्रेम , राग , लोभ , क्रोध , आणि सर्वच मानवी भावना परफेक्टली मॅप्प्ड आहेत त्या त्या शब्दांशी . आणि इथे तर उपमा अलंकारही पांगळा पडतो . हा सारा अनुभवाचा मामला आहे ! मी कालिदासाप्रमाणे तिच्या नाभीला
"आवर्त मनोज्ञ नाभि:"अशी उपमा देऊ शकतो , अर्थात भोवर्यासारखी खोलवर नाभि: - की जसे भोवर्यामध्ये अडकलेला त्यातुन बाहेरच पडू शकत नाही तसे तिच्या नाभि मध्ये गुंतलेले माझे मन बाहेरच पडु शकत नाही असे काहीसे ! असं म्हणु शकतो ... पण त्याच मनोज्ञ आवर्ताचा मी तळ शोधताना तिच्या रोमरोमातुन उभारलेल्या रोमांचाला काय उपमा देऊ ? कसं सांगु ? आणि मी तरी काय सांगणार ? ती स्वतःच सांगु शकणार नाही शब्दात ! इतकं अतिसुक्ष्म आहे हे ! अर्थात There are things that are beyond words.
४. इव्हेंट होरायझॉनइव्हेंट होरायझॉन म्हणजे काय ? ही एक फिजिक्स मधील ब्लॅकहोल संदर्भातील कन्सेप्ट आहे. ब्लॅकहोलची ग्रॅव्हिटी इतकी प्रचंड असते की महाप्रचंड वेग असलेला प्रकाश देखील त्यातुन सुटु शकत नाही. जिथेपर्यंत प्रकाश गुरुत्वाकर्षणाच्या तावडीतुन सुटु शकतोय तिथे हे इव्हेंट होरायझॉन तयार होईल . त्याच्या पलीकडुन प्रकाशही बाहेर पडू शकत नाहीये , मग त्याविषयी काय बोलणार आपण . ती झाली सिंग्युलॅरिटी !
https://ritholtz.com/wp-content/uploads/2019/04/eso1907h.jpg
असो. तुर्तास टेक्निकल गोष्टी बाजुला ठेवा , आपल्याला फिजिक्सचा क्लास घ्यायचा नाहीये , आपण शब्दांच्या सिंग्युलॅरिटी विषयी बोलत आहोत!
हां तर कुठे होतो आपण ?
तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ह्या शब्दांच्या एव्हेंट होरायझॉन वर आहेत , तुम्ही निर्देशक अशा खंडीभर उपमा वारु शकता पण त्या सार्या केवळ निर्देशक आहेत , प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही .
आता तुम्ही थोडं ह्या इव्हेंट होरायझॉनच्या आत उतरा , प्रयत्न तरी करा . तुम्हाला फ्लॅशेस दिसायला लागतील अशा अनेक गोष्टींचे ज्या तुम्ही शब्दात वर्णनच करु शकत नाही. केवळ निर्देशक म्हणुन शब्द तयार केलेले आहेत बस्स...
झोप
जाग येणे
बेशुध्द होणे
वेदना
सुख
परमोच्च सुख
ऑर्गॅझम
बस शब्द आहेत , प्रत्यक्ष अनुभुती ह्या शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !
Are you getting what I am tying to say ?
अजुन थोडे आत उतरु अन सिंग्युलॅरिटीकडे जाऊ...
जन्मला येणे
मृत्यु
ध्यान
समाधी
विदेहस्थिती
जीवनमुक्तावस्था
आपल्याला बस शब्द म्हणुन माहीती आहेत ... प्रत्यक्ष अनुभुती कुठाय ?
अजुन खोल काहीतरी "त्या" तिथे आहे जे शब्दांच्या परे आहे .... पण नक्की काय आहे "ते" ? काय आहे ते जे की काहीही केल्या शब्दांच्या आवाक्यातच येत नाहीये
आत्मा ब्रह्म आणि स्वरुप ...जीव शिव आणि ईश्वर ... विश्वरुप विश्वंभर ... हेही नुसतेच शब्द ...
आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हें मायेचेंची रूप ।
रूप आणि अरूप । सकळ माया ॥ १६ ॥
जीव शिव आणि ईश्वर । हाही मायेचा विस्तार ।
विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥ १७ ॥ - आत्माराम - समर्थ रामदास
हे शब्द नुसतेच क्षितीजावर रेंगाळात आहेत , नुसताच निर्देश करत आहेत त्या सिंग्युलॅरिटीकडे ! पण नक्की काय आहे "ते " ?
सत् ... चित् ... आनंद... हे ही केवळ निर्देशक ...
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥
हिरण्यगर्भ ... भर्ग ... सवितृ ...
ओमित्येकाक्षर ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !
तत्वमसि !
तो तूच आहेच !
(ॐ)
५. सिंग्युलॅरिटीसोऽहम् (ॐ) आता ? आतां होणार तें होईना कां । आणि जाणार तें जाईना कां । तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४॥ जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥ हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥ - समर्थ रामदास योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फ़िटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंतरुपें अनंतवेषें देखिलें म्यां त्यासी । रखुमादेविवरीं खुण बाणली कैसी ॥३॥ - ज्ञानेश्वर माऊली मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥ जालों बरा बळी । गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥ दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥ - तुकाराम महाराज (ॐ) ||हरि ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ||
त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो.अगदी अगदी.. ब्रम्ह संकल्पनेच्या? यशाचे हे एक मोठे कारण आहे...आनंद! गोळीबंद संकल्पना नव्हतं माहिती, नवीन समजलं.- पक्ष
- साध्य
- सिद्धता
- निष्कर्ष
अध्यात्मात दुर्दैवाने पक्ष साध्य आणि निष्कर्ष ह्यांचा जयघोष केला गेलाय. अगणीत शब्दसंपदा केवळ ह्यावरच खर्च केलेली आहे. सिध्दता म्हणजे पक्ष आणि साध्य यांच्या निष्कर्षापर्यंत खात्रीने पोहोचण्याचा मार्ग, तंत्र, पध्दती, कार्यप्रणाली नेमकं हेच हरवलेलं आहे. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे नेमकं काय आणि तो खात्रीने नेमका कसा होईल हे ह्याची पध्दती, कार्यप्रणाली कोणीच सांगत नाही. त्याऐवजी शाब्दिक बुडबुडे सोडून निष्कर्षाचा जयघोष केला जातो. त्याने पंथ, गुरू, बुवा, (स्वयं)सिद्ध ह्यांची भरमार होते. बर्याच साधनाप्रणालींची अभ्यास केल्यानंतर विपश्यना साधनाप्रणाली ही सिद्धते वर भर देणारी आणि सुस्प्ष्ट मार्ग आणि तंत्र उलगडून सांगणारी साधनाप्रणाली आहे ह्याचा साक्षात्कार झाला.' शरीर आणि मन म्हणजे आपण नाही' म्हणजे नेमकं काय आणि त्याची अनुभूती (साक्षात्कार), आपली आपण, कोणतेही जयघोष करणारे ग्रंथ, पुस्तके, शास्त्र-पुराणे न वाचता, कशी करून घ्यायचे ह्याची कृती विपश्यना शिकवते. त्यामुळे, 'ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही' असं म्हणणं रास्त होणार नाही. - (साधक) सोकाजी