Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एका तेलियाने(ऐसी अक्षरे-२२)

B
Bhakti
Fri, 12/27/2024 - 09:38
💬 4 प्रतिसाद
पुस्तकाचे नाव -एका तेलियाने लेखक - गिरीश कुबेर अ शेख अहमद झाकी यामिनी या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक कुतूहल निर्माण झालेच आहे. ज्याप्रमाणे ऐतिहासिक काळात वसाहतवादाचे रूप अनेक निसर्गनिर्मित साधनांसाठी होते तसेच तेलासाठीही बलाढ्य राष्ट्रांची आखाती देशांवर हुकूमत असणारच, ती कशी होती ?हा प्रश्न होताच. यासर्व कुतुहलाचे उत्तर 'एका तेलियाने..एका श्रीमंत शापित वाळवंट' या पुस्तकात मिळाले. वीस प्रकरणांचे छोटेखानी पुस्तक तेलाच्या व्यापाराची,तेल उत्पादक देश,तेल विक्री करणाऱ्या कंपन्या यांतील अनेक गुंतागुंतीची ओळख उत्तम पद्‌धतीने करुन देते. सुरुवातीलाच पहिला तेलिया मोसादेघ- इराणचा कडवा राष्ट्रवादी यांनी ब्रिटीश कंपनीचे राष्ट्रीयीकरण आणि या विरोधातला CIA, MI-5 यांनी तयार केलेला बागुलबुवा ,हे प्रकरण कसे घडले, नंतर कसे उजेडात आले हे रंजकपणे सांगितले आहे. यापुढच्या प्रकरणात सौदी अरेबियाची जन्मकथा, तिथे तेलाचा शोध, इजिप्त- इस्त्रायल युद्ध, सुवेझ कालवा प्रकरण या अनेक मोठमोठ्या घटनांचा वेध घेतला आहे. सौदीचे पहिले संस्थापक सौद आणि अमेरिका कंपनी अराम्को १९३७ साली सोन्याची काळ्या केलेली शोधमोहिम, तेल व्यापाराचा करार करते. यात सौदी देश सर्वात महत्त्वाचा होता कारण जगातील सर्वात अधिक तेल उत्पादन् तिथेच होणार होते. आ अराम्कोचा सौदीतला सुरूवातीचा काळ आता प्रवेश होतो ,शेख अहमद झाकी यामानीचा! या आंग्लविद्याविभूषित, मुत्सद्‌दी सौदी तेल मंत्री यांची उत्कंठावर्धक कहाणीचा म्हणजेच एका तेलियाची कहाणी. अर्थ विभागात काम करणाऱ्या यामानींची हुशारी पाहून राजे फैजल यांचा कायदेशीर सल्लागार नेमणूक करतात.जेव्हा फैजल यांच्याकडे नाट्यमय स्थितीत राजा होण्याची वेळ येते तेव्हा अर्थात तेलमंत्री होतात यामिनी.सौदीत तेलाच्या अर्थकारणात त्यांनी नेत्रदीपक कार्य केले. १९६० साली तेलकंपन्याच्या सततच्या नफेखोरीत वाटा मिळवण्यासाठी OPEC ची स्थापना झालीच होती. यात तेव्हा तेल देश होते सौदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत,व्हेनेझुला इत्यादी . ओपेकला पूर्वी तेलकंपन्या गिनतीतही घेत नसे तेव्हा यामिनी यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले.ज्यामुळे हळूहळू तेल कंपन्यांना ओपेकची दखल घ्यायला भाग पाडले. तरीही ओपेकमध्ये भाववाढीवरून सत्‌त तेल उत्पादक देशांमध्ये मतभेद असत. त्यात लिबिया, इराण यांना सतत चढा भाव पाहिजे असत. तर सौदीचा भाव त्याहून कमी असत. तसेच त्यांच्या तेल शुद्धीकरणाचा दरही कमी होता , त्यामुळे सौदीच्या तेलाला सर्व कंपन्यांची पसंती असे.तेव्हा याबाबत सर्वांना भाव योग्य मिळावा म्हणून 'तेल कोटा ठरवून द्यायचा ,या बाबत यामिनी ओपेकद्वारे आग्रही होते . ठरवलेल्या भावालाच ज्या त्या देशाने तेल विकायचे. जास्त हाव नसावी. सगळ्यांनी मिळून भाव ,कोटा ठरवला, तरच तेल विकत घेणाऱ्या देशाची दादागिरी मोडता येईल हे त्यांचे धोरण होते. इ पण हे हुकुमशाही' सत्ता असलेल्या अनेक आखाती देशांच्या पचनी पडतच नसे, त्यांचा एकच बाणा -अधिकाधिक सर्व नफा मिळवण्याकडेच, टोळी मानसिकतेतून हे देश अजूनही बाहेर आले नव्हते. तसेच 'अरब' व 'बिगर अरब' हाही वाद सुप्तपणे होताच त्यातून 'ओआपेक' अरब देशांनी उभी केली. अनेक तेल कंपन्या एक्झॉन, मोबील, ऑक्सी इ. यांचा या तेलउत्पादक देशांशी भावावरुन सततचा संघर्ष पुस्तकात मांडला आहे. त्यातच यासिर अराफत, सिरीया, रशिया ,इस्रायल, जॉर्डन मोसाद , इत्यादींच्या युद्धाच्याअनेक पार्श्वभूमी यात संक्षिप्त वाचायला मिळतात. कार्लोस द जॅकल या कुख्यात डाव्या गटाच्या पुरस्कारकर्त्याने यामिनी व इतर तेल व्यापारासंबधित मिटींगमध्ये जमलेल्या उच्च पदस्थ लोकांना ओलीस ठेवून केलेल्या कारवाईचे थरारक प्रकरण पुस्तकात आहे. तसेच जेव्हा तेलाचे भाव वाढले तेव्हा अमेरिकेत, सौदीत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्यात अनेकांनी या वाहत्या गंगेत हात धुतले व कोट्याधीश झाले. याच्याही रोचक गोष्टी,'भानगडी' यात आहेत. तेलाचा भाव वाढला की अमेरिका वाढत्या "पैशांमुळे इराण, सौदी इ.यांना कसे शस्त्रास्त्रे विकत घ्यायला भाग पाडत असे .भाव कमी झाला तरीही फायदाच अमेरिकेचा व्हायचा.'छापा पडला तर अमेरिका जिंकणार, काटा पडला असला तरी अमेरिका जिंकणार पश्चिम आशिया हरणार' दोन्ही बाजूंनी फायदा अमेरिकेचाच! या तेलवाढीला 'यामिनीच 'जबाबदार आहेत, ही टूम अमेरिकन जनतेत १९७३ ला पसरली. त्या दबावाखाली अमेरिकेला या तेल कारभाराची चौकशीसाठी एक समिती तयार करावी लागली. यात अगदी सुरुवातीपासूनचे लागेबंध अभ्यासले गेले. ते आताच्या काळापर्यंत येत होतेच. पण सौदी सारख्या अविकसित, राज्यकर्ते अशिक्षित अशांच्या माथी हे पाप मारण्याचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला? अमेरिकेने त्यांच्या तेलकंपन्यांना शिक्षा द्यावी.पण आमच्याकडे ढवळाढवळ करू नये अशी भूमिका यामिनींची होती. शेवटी बदललेल्या अमेरिकन सरकारने एवढ्या जुन्या घटनांत कशाला उतारा शोधून काय फायदा म्हणत थातूरमातूर अहवाल देत समिती गुंडाळली, खर म्हणजे सौदीशी वैर त्यांना झेपणार नव्हतं. उ फैसल राजानंतर आलेल्या फाहद यांच्याशी काही काळ यामिनींचे जुळले. यामिनींची समतोल धोरणे कधीच हावरट फाहदला आवडली नाही. हळूहळू तेल मंत्री म्हणून यामिनींनी कारभार समाप्तीकडे नेण्याची तयारी सुरूच केली होती. पुढे १९८६ ला त्यांना तेल मंत्री पदावरून दूर करण्यात आले ‌ इराक - सौदी लढाईच निमित्ताने 'लष्कराचा उंट' सौदीत रुजलाच. पण 'अल कायदा ' या दहशतवादी संघटनेच्या जन्माचे सुत्रेही अमेरिकेनी हलवली होती .धार्मिक विरोधही अमेरिकेविरुद्ध वाढले.शेवटच्या प्रकरणात ओपेक+ चा जन्म,रशियाचा यात प्रवेश,एबीसचं रक्तरंजित राजकारण यांचा थोडक्यात आढावा आहे.एक वेगळा सौदी घडू लागला होता. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी लंडनला यामिनी जग सोडून गेले. "खनिज तेलाच्या ऊर्जेवर जळणारं जग पुन्हा ज्वालाग्रही होत होते, ती आग,धग कमी करणारा तेलिया मात्र आता उरला नव्हता. क

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2617 views

💬 प्रतिसाद (4)
म
मुक्त विहारि Fri, 12/27/2024 - 17:04 नवीन
तूम्ही, पुस्तक परीक्षण अतिशय उत्तम रित्या केले आहे. मी फक्त पुस्तके किंवा सिनेमे सुचवू शकतो. परीक्षण हा माझा प्रांत नाही... बाय द वे, ह्या पुस्तका आधी, " हा तेल नावाचा इतिहास आहे," हे गिरीश कुबेर, यांचे पुस्तक वाचा. आखाती देशांत काम करत असताना, ह्या दोन्ही पुस्तकांच्या माहितीचा चांगला उपयोग झाला. सौदी अरेबिया मध्ये काम करण्या आधी किंवा काम करत असाल तर, खालील पुस्तक जरुर वाचा.. "सोन्याच्या धुराचे ठसके." (https://www.bookganga.com/ebooks/Books/details/5285083743043205896?BookName=Sonyachya%20Dhurache%20Thaske) सौदीत काम करत असताना, लेखिकेला प्रत्यक्ष भेटता आले आणि सौदी अरेबियात काय काळजी घ्यावी, हे पण सांगीतले...
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 12/27/2024 - 17:33 नवीन
नक्कीच आगामी काळात ही पुस्तके वाचेन.पण या पुस्तकात राजकारण सहज सोपे समजेल असे सांगितले आहे त्यामुळे गिरीश कुबेर यांचे 'हा तेल नावाचा इतिहास ' वाचायची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 12/28/2024 - 03:32 नवीन
संपादक म्हणून, एककल्ली लेखन करतात. पण, एखादा विषय घेऊन, त्याच्यावर चतुरस्त्र लेखन करतात... अधर्म युध्द आणि युद्ध जीवांचे, ही दोन्ही पुस्तके ही त्यांच्या चतुरस्त्र लेखनाची अजून दोन ठळक उदाहरणे.. टाटायन , हे पुस्तक पण ठीक आहे. बाय द वे, तेलाच्या बाबतीत अजून काही जाणून घ्यायचे असेल तर, "तेल नावाचे वर्तमान." हे पण पुस्तक वाचावे लागेल, असे वाटते. हे पुस्तक माझ्या संग्रही नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/14/2025 - 15:24 नवीन
आजच हे पुस्तक वाचून संपवले! अतिशय सुंदर पुस्तक आहे! मला जुनी आवृत्ती मिळाली असावी कारण शेवटचे एबिसचं रक्तरंजित प्रकरण ह्यात नाही. बाकी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला, कंपन्यांना, नी ओपेकला सांभाळून आणी त्याहीपेक्षा सौदीच्या काही राजाना सांभाळून यामानी ह्यांनी जगाची तेलाबद्दलची जी काही घडी बसवली ती वखाणण्याजोगी आहे. पुस्तकही छान लिहिलय! काही प्रकरणे वाचून पोट धरून हसत होतो, जसे सौदीच्या राजाच्या मूळव्याधीच्या ऑपरेशन वेळचे किस्से, राजाने असे विदेशी लोकासमोर उघडे जाऊ नये म्हणून नकारार्थी हललेल्या डाढ्या, त्यानंतर राजाचे पाहून अनेकांनी मुळव्याधीच्या ऑपरेशसाठी केलेली गर्दी, रेडिओ देशात आला तर सैतान रेडियोत घुसेल अशी मुल्लामौलवींची भीती, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष तेलाची काटकसर सांगतो तरीही अमेरिकन पेट्रोल पंपाच्या रांगांमध्येही गाड्या चालू ठेवून पेट्रोल जाळतच राहतात, अमेरिकेने हल्ला केला तर पेट्रोल विहिरी बॉम्बने उडवून द्यायची यामानी ह्यांची योजना, खोमेनी ह्यांचे एका झटक्यात देशातल्या सगळ्या तेलविहिरी बंद करणे, त्यावर “कुराणात तेल कसे काढायचे हे सांगितलेले नाही,नि जे कुराणात सांगितलेले नाही ते समजून घेण्याच्या लायकीचेच नाही” अशी लेखकाने केलेली टिप्पणी, यामानी ह्यांची किडनॅपिंग, गद्दाफींचा अडेलतट्टूपना हे सगळे वाचताना हसून हसून पोट दुखत होते! पुस्तक मस्त मस्त नि मस्तच!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा