Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सहज सुचलं म्हणून

क
कंजूस
Fri, 12/20/2024 - 07:43
💬 113 प्रतिसाद
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील. _______________________________________________ * कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे. कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26339 views

💬 प्रतिसाद (113)
ट
टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 12:25 नवीन
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/03/2025 - 13:40 नवीन
चित्रकार मात्र शाम निळाच रंगवितात. त्यांना कोळसा सापडत नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/03/2025 - 10:16 नवीन
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/03/2025 - 11:24 नवीन
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/03/2025 - 11:54 नवीन
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 15:33 नवीन
या निमित्तने "मद्य पिऊन काळ्या समुद्रावर फिरणे" असा वेगळा धागा निघावा, अध्यक्ष महोदय !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/03/2025 - 11:56 नवीन
घरी बसूनच काही प्राणी पक्षी दर्शन करायचे झाल्यास..... यूट्यूबवर wildlife with Manish kadam. ( मराठीत माहिती).
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 13:17 नवीन
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/03/2025 - 13:46 नवीन
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 10:39 नवीन
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 01/04/2025 - 07:04 नवीन
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 03:48 नवीन
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 01/04/2025 - 07:13 नवीन
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/04/2025 - 08:40 नवीन
चालत घरी आले. "आता तुम्ही काय करणार?" "दाढी करणार आणि फिरायला जाणार."
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 15:40 नवीन
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/04/2025 - 12:40 नवीन
हंपीजवळच्या पुरातन दगडी समाध्या https://youtu.be/VBZifV13OVs?si=IYnzviHxzW5m9e77
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 01/05/2025 - 05:54 नवीन
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image Image removed. थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 03:45 नवीन
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 02/23/2025 - 19:58 नवीन
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/24/2025 - 02:51 नवीन
रोचक माहिती...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 02/23/2025 - 20:01 नवीन
इन्स्टाग्रामवर अजिंठाचे काही फोटो सापडले. लिंक - https://www.instagram.com/p/DGW9YFSoqpo/?utm_source=ig_web_copy_link
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/25/2025 - 06:19 नवीन
केरळमध्ये काय बघाल ....https://youtu.be/cnw4rcCSytQ?si=A-fh218kVmBJbe96 - स्वानंदी सरदेसाई
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/12/2025 - 06:08 नवीन
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/12/2025 - 06:26 नवीन
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/19/2025 - 14:02 नवीन
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/19/2025 - 14:05 नवीन
# खाजगी कार्यालयांना xxxxx खाजगी कारने येणाऱ्यांना
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 15:59 नवीन
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 08:40 नवीन
माझा कालचा WhatsApp Status Image removed. #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕ एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/21/2025 - 11:29 नवीन
हैदराबादी चाय रेसिपी त्यातील एक https://youtu.be/6tKZtRxNdaY?si=RSw8F9q2VDCb5R6O
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Fri, 03/21/2025 - 20:59 नवीन
वा, चित्र बघूनच तब्येत खूष!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/21/2025 - 11:31 नवीन
हैदराबादी चाय रेसिपी त्यातील एक https://youtu.be/6tKZtRxNdaY?si=RSw8F9q2VDCb5R6O
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 06/14/2025 - 11:11 नवीन
फस्क्लास ! पण मिल्क पावडर अन कन्डेस्न्ड मिल्क आणुन ठेवावे लागेल घरी !
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 07:25 नवीन
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 04/30/2025 - 10:47 नवीन
मेहकरचा बालाजी?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 12:26 नवीन
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/30/2025 - 07:50 नवीन
Image removed. कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांनी घोडपाण्याची नाळ हा ट्रेक पूर्ण केला.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 04/30/2025 - 10:48 नवीन
कुठेशी आहे ही घोडपाण्याची नाळ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/30/2025 - 10:49 नवीन
मुरबाड जवळ.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 10:14 नवीन
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 05/09/2025 - 10:24 नवीन
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2025 - 19:26 नवीन
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 05/10/2025 - 05:52 नवीन
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली.
तुमच्याकडून दुसरी अपेक्षा काय असणार? इथे सगळी मिपाखरे गुरुजींचा आयडी बॅन केल्याबद्दल नापसंती व्यक्त करत आहेत, त्यांचे ससंदर्भ लेखन, विस्तृत माहिती, ऐतिहासिक दाखले हे सर्व acknowledge करत आहेत आणि तुम्ही मात्र... असो, मिपावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 05/09/2025 - 11:13 नवीन
हल्ली गवि यांनी मिपासन्यास घेतलेला दिसतोय. गोव्याचे लेख लिहिले की ते हटकून हजेरी लावतात. पण ते कुणी लिहित नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/09/2025 - 11:55 नवीन
बोला कंकाका. माझ्यालायक काय सेवा?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 05/09/2025 - 16:30 नवीन
नमस्कार गवि, बरेच दिवसांत दिसला नाहीत म्हणून आठवण काढली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/07/2025 - 04:57 नवीन
Starlink - elan musk - satellite internet हे कसे काम करते याचा (अमेरिकेतल्या एक विडिओ) https://youtu.be/Vh5cDulKvZ8?si=DVOI113Bq-_2_-Bm हल्लीच दोन दिवसांपूर्वी इलान मस्कच्या स्टारलिंक कंपनीस भारतात सटेलाइटमधून इंटरनेट देण्याचे लायसन्स मिळाले. यांचे स्पेसएक्सचे जे उपग्रह आहेत त्यातून इंटरनेट देता येते. ( साधारणपणे अडीचशे टीवी चानेल्स देणाऱ्या उपग्रहांकडून आपण डिश टीव्ही पाहातोच आहोत). इंटरनेट देणारे वेगळे असतील. या कंपनीशी एअरटेल आणि जियो यांनी अगोदरच करार केले आहेतच. नेट स्पीड किती मिळू शकतो ते वरच्या व्हिडिओत दिले आहेच. आणखी काही वर्षांनी पुढची पिढी डोक्यावरच्या टोपीवर अँटेना बसवून आणि एका जागी बसून कुठेही इंटरनेट वापरणारी असेल. एक दोन वर्षांत यांचे रेटही आवाक्यात येतील सामान्य माणसाच्या.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 06/13/2025 - 10:48 नवीन
रोचक.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Fri, 08/01/2025 - 18:42 नवीन
आमचा पंधरा - सोळा जणांचा फॅमिली ग्रुप १ ५ ऑगस्टला माळशेज MTDC येथे मुक्कामी जात आहे . दुसऱ्या दिवशी नाणेघाट येथे जायचे आहे . जुन्नर बाजूने गाडी जाऊ शकते असे वाचले आहे . माळशेज घाटातून नाणेघाट येथे ट्रॅव्हलर गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे का आणि असल्यास रस्त्याची सद्यस्थिती कशी आहे याबद्दल माहिती हवी . नुकतेच कोणी तेथे जाऊन आले असल्यास मार्गदर्शन करावे. गाडीतून उतरल्यावर किती अंतर चालावे लागते व कठीण श्रेणी काय ? ग्रुपमध्ये ३ ते ६५ वयोगटातील पर्यटक आहेत म्हणून विचारणा .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/01/2025 - 19:21 नवीन
माळशेज घाट चढून आल्यावर चूल फाटा-गणेश खिंड - जुन्नर असा रस्ता आहे. ट्रॅव्हलर आरामात जाईल. दुसरा अजून लांबचा रस्ता म्हणजे ओतूर - जुन्नर. गाडी पार नाणेघाटाच्या नळीपर्यंत जाते. जेमतेम 100 मीटर फ्लॅट वॉकने उतरंड सुरू होते. अजिबात सवय नसलेल्यांना नळीचे प्रथम दर्शन भयप्रद वाटू शकते मात्र प्रत्यक्षात सोपे आहे. बिनधास्त जावा.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Fri, 08/01/2025 - 19:32 नवीन
तत्परतेने माहिती पुरवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा