गोल्ड आणि रिकामटेकडे उद्योग (अस्मादिकांचे )
गाभा:
हा लेख, टाइमपास म्हणून केलेल्या एका प्रयोगाचा आहे, सिरिअसली घेणे /न घेणे, वाचकांच्या मर्जीवर.
वाचकांनी गुंतवणूक हि मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून करावी. इथे उल्लेखलेली भांडवली बाजारातील गुंतवणूक साधने फक्त उदारहणादाखल दिलेली आहे. खरेदी विक्रीचा कोणताही सल्ला मानू नये. फक्त चर्चेपुरता वापर करावा. उत्तरदायित्वास नकार लागू.
तर मी काय केले, मागील दहा वर्षांचे प्रति मासी (पर मन्थ ) गोल्ड चा परतावा (रिटर्न ) गोळा केला , आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला भारावला ... आणि म्हटलं , "बाबा तुही वाच , मलाही सांग तुला काय दिसतंय ते "
(टीप : जास्ती सिरिअसली घेऊ नका हा लेख, धागा लेखकास टाइम पास करण्याचा असल्याने धागा काढलाय )


🗣 चर्चा
(14)
आ
आंद्रे वडापाव
Tue, 11/19/2024 - 05:44
नवीन
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Tue, 11/19/2024 - 06:50
नवीन
गोल्ड पेक्षा निफ्टी बरा इतकाच निष्कर्ष काढला आहे. बाकी कमोडीटी मधलं फारसं कळत नसल्याने पास....
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/19/2024 - 07:01
नवीन
कमोडीटी मधलं फारसं कळत नसल्याने
आं
आश्चर्य आहे
))=((
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Wed, 11/20/2024 - 08:15
नवीन
हा एक ग्राफ टाकतो आणि रजा घेतो ..
don't keep all eggs in one basket

- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Wed, 11/20/2024 - 11:02
नवीन
धन्यवाद! पण मला हे हिस्टॉग्राम बघूनच कळले होते.
- Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव
Wed, 11/20/2024 - 17:24
नवीन
म्हणुनच म्हणत होतो की, सगळी अंडी, निफ्टी च्या बास्केट मधे ठेवू नका...
थोडं थोडं फिजिकल गोल्ड सुध्दा घेतं रहा...
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Fri, 11/22/2024 - 08:41
नवीन
फिजिकल गोल्ड नाही ... प्रत्यक्ष सोने हे गुंतवणूक नाही (बायको कधीच विकू देणार नाही :) )
पण गोल्ड बॉण्ड जरूर घेतो.. ५% inevstment सोन्यात आहे
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Wed, 11/20/2024 - 20:23
नवीन
होपलेस.,. युसलेस अँड डोन्ट केअर फॉर धीस.. Lol
- Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव
गुरुवार, 11/21/2024 - 04:46
नवीन
तुमचं कांय ... तुम्ही पच्छास पच्छास तोला , गळ्यात घालुन फिरत असाल ..
आमच्या सारख्या मिडल क्लास साठी एक एक टक्का महत्वाचा आहे .. आम्हाला केअर करावी लागते ..
:)
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 11/21/2024 - 05:52
नवीन
तसं नाही हो... लिक्विडीटी हा मुद्दा विचारात घेऊन लिहिले आहे ते 😀
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 11/21/2024 - 06:09
नवीन
हाच आलेख मतदानाचा कल आणि तरूण उत्साह असा होता.
धागाकर्ता वपाडाव ने केवळ क्ष अक्ष आणि य अक्षावरील उल्लेख बदलले आहेत.
असे करणे त्यांच्या लेखनकिर्तीला शोभा देणारे असेल काय असा विचार मनात आला होता तो लगोलग काढून टाकावा काय असा विचार केला असत्गांना तसे करणे अयोग्य आहे असे वाटले आणि लिहीतांना हात आखडता घेतला.
- Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव
गुरुवार, 11/21/2024 - 07:53
नवीन
जरा चिकटवता का हिकडे तो आलेख ? मतदान कल .. मलाही पाहू देत ..
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 11/21/2024 - 22:33
नवीन
घ्या.
आधी लेखनातल्या विधानांसाठी विदा मागायचे, संदर्भ मागायचे. आता तर चित्र, आलेख यांचेही संदर्भ लागतात वाटतं.
लेख हलका फुलका लिहीला असे लिहील्याने मी तसे लिहीले.
असो. पुर्वीचे मिपा राहिले नाही.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Fri, 11/22/2024 - 02:15
नवीन
आहो नुकतेच संपादकांनी जाहीर केले की मिपा आठरा वर्षाचे वयस्क झाले म्हणून....
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
आमच्या काकांनी सुद्धा तुतारी हाती घेतली आहे.
जुने राग किती दिवस आळवायचे.
- Log in or register to post comments