Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

इकडचं-तिकडचं

य
युयुत्सु
Tue, 11/12/2024 - 07:13
💬 60 प्रतिसाद
इकडचं-तिकडचं भारतात गोरक्षण हा सध्या कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच माझ्या आवडत्या DW-TV वर एक बातमी येऊन थडकली आहे. डेन्मार्क या छोट्या देशातील शेतकर्‍यानी गाईंच्या ढेकरातून होणार्‍या मिथेन वायूच्या प्रदूषणासाठी कर देणे मान्य केले आहे. https://www.youtube.com/watch?v=_s0dBrXJXuo भारतामध्ये ही कल्पना रूजेल का? मग मिथेन वाय़ू आणि हवामानबदल यात भारत कुठे आहे हे शोधण्यासाठी नासाचे हे कल्पनाचित्र बघितले आणि भारताचं गोवंशाकडून होणारं योगदान लक्षणीय आहे असे कळले. https://www.youtube.com/watch?v=74_8SIkx3nA कालच आणखी एक माहितीपट बघत असताना एक गोष्ट ठळकपणे जाणवली. भारतात कधी पर्यावरण, प्रदूषण यावर मोठी जन-आंदोलने होताना दिसत नाहीत. https://www.dw.com/en/india-why-some-states-want-people-to-have-more-children/a-70755632 आणखी एक अचंबित करणारी बातमी. भारतात दक्षिणेत प्रजननाचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. वास्तविक ज्या प्रदेशात आणि ज्या समाजामुळे हे शक्य झालं आहे, त्यांना पाठीवर थाप देऊन, शक्य असल्यास कर सवलती देऊन कौतूक केलं पाहिजे. पण इथे चंद्राबाबू नायडू वेगळाच सूर आळवत आहेत आणि मला ते चिंताजनक वाटते. "Nara Chandrababu Naidu, the chief minister of the southern state of Andhra Pradesh, recently shifted his focus from promoting population control to encouraging families to have more children. He even proposed a law that would allow only those with two or more children to run for local elections. A few days later, another chief minister, M.K. Stalin, from the neighboring state of Tamil Nadu, echoed similar thoughts and also urged people there to have more children. " https://www.dw.com/en/india-why-some-states-want-people-to-have-more-children/a-70755632

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10848 views

💬 प्रतिसाद (60)
र
रानरेडा Wed, 11/13/2024 - 17:31 नवीन
गाय आणि म्हैस सारखेच मिथेन उत्सर्जन करीत असेल का ?
  • Log in or register to post comments
म
महिरावण Wed, 11/13/2024 - 17:33 नवीन
तुम्ही रानरेडा असूनही तुम्हाला माहित नाही म्हणजे कमाल आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/14/2024 - 05:15 नवीन
त्यांना आपल्या लाडक्या भुऱ्या म्हशीबद्दल प्रेम आहे त्यातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. यावर तुमचे असे वाकडे प्रश्न? तुम्ही स्वतःला सर्वज्ञ समजताय का ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/14/2024 - 05:22 नवीन
What can be done to reduce methane emissions? Researchers are developing ways to reduce methane emissions from cows, including: Blocking microbes: Researchers are developing tools to block the microbes in a cow's gut from creating methane. Feed additives and probiotics: Japanese researchers are developing feed additives and probiotics to reduce methane emissions. Changing diet: Changing a cow's diet might help it release less methane. Improving productivity: Improving productivity could reduce emissions by 10% to 15% or more. हे कृत्रिम बुद्धिमत्तेने मिथेन कमी करण्याचे उपाय सुचवलेले आहेत. पण मुळात मानव हा दांभिक आहे. आम्ही हवे तितके इंधन जाळून उष्णता, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायॉकसाईड, सल्फर डायॉक्साईड निर्माण करणार आणि गायीच्या आहारात बदली करणार तिच्या पोटातील जिवाणू रचना बदलण्याचा प्रयत्न करणार. हे म्हणजे आम्ही बटर चिकन आणि शाही पनीर माखनी खायचा आणि कॅलरी कमी करण्यासाठी डाएट कोक पिण्यासारखेच आहे. म्हणतात ना कृत्रिम बुद्धिमत्ता ही नैसर्गिक मूर्खपणा पुढे किस झाड कि पत्ती आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 11/14/2024 - 05:49 नवीन
पण मुळात मानव हा दांभिक आहे. आम्ही हवे तितके इंधन जाळून उष्णता, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायॉकसाईड, सल्फर डायॉक्साईड निर्माण करणार आणि गायीच्या आहारात बदली करणार तिच्या पोटातील जिवाणू रचना बदलण्याचा प्रयत्न करणार.
अजून एक उदाहरण. एटीएम मध्ये पैसे काढताना.. त्या खोलीत भरमसाठ वीज वापरून आणि बाहेर उष्णता फेकत असणारे तिथे बसवलेले एक किंवा दोन एसी. खुद्द ATM यंत्राला लागणारी वीज, हे सर्व मुख्यतः औष्णिक विद्युत प्रकल्पाद्वारे, म्हणजे कोळसा जाळून प्रदूषण. बाहेर बँकेचा ब्रँड ठळक उजळ व्हावा म्हणून लखलखणारा साईन बोर्ड. दिवसरात्र आत दिवे चालू, कॅश आणून त्यात भरण्यासाठी डिझेलच्या गाड्या रोज धूर ओकत रस्त्यांवर फिरवणे अशी सर्व पर्यावरणीय उधळपट्टी करताना तिथेच ग्राहकाकडून काय अपेक्षा असते??.. टीचभर रिसीट मात्र मागू नका, कागदाचा वापर टाळा, त्याद्वारे झाडे वाचवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा असा डोस पाजतात स्क्रीनवर.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/14/2024 - 05:51 नवीन
तुमची डिग्री प्रतिष्ठित विद्यापीठातून आहे का? नसल्यास असे प्रतिसाद टाकण्याचा तुम्हाला हक्क नाही. (असल्यास माझा प्रतिसाद मागे घेऊन मी बिनशर्त माफी मागतो)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/14/2024 - 05:33 नवीन
CO2 accounts for about 76 percent of total greenhouse gas emissions. Methane, primarily from agriculture, contributes 16 percent of greenhouse gas emissions and nitrous oxide, mostly from industry and agriculture, contributes 6 percent to global emissions. During 2019, about 60% (360 million tons) of methane released globally was from human activities, while natural sources contributed about 40% (230 million tons) Since the Industrial Revolution, concentrations of methane in the atmosphere have more than doubled, and about 20 percent of the warming the planet has experienced can be attributed to the gas.[36] About one-third (33%) of anthropogenic emissions are from gas release during the extraction and delivery of fossil fuels; mostly due to gas venting and gas leaks from both active fossil fuel infrastructure and orphan wells Aquatic ecosystems, including lakes, rivers, streams, wetlands, and reservoirs, are estimated to contribute between 41% and 53% of the world's methane emissions: Animal agriculture is a similarly large source (30%); primarily because of enteric fermentation by ruminant livestock such as cattle and sheep. हे हि वाचून घ्या. हा विषय इतका प्रचंड आणि विस्तृत आहे. समुद्रकिनाऱ्यावर एक सुंदर शिंपला मिळाल्यावर एखाद्या मुलाला असा वाटतं कि जगातील सर्वात सुंदर भेटवस्तू आपल्याकडेच आहे ती कुणाकडेच नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/14/2024 - 06:44 नवीन
गोठ्यामध्ये गायींना डांबून, गवत आणि त्याज्य पदार्थ ( अभक्षण मांसाहारसुद्धा खायला घालतात अमैरिकेत असं वाचलं आहे) खायला घालून, शिवाय दूध वाढवायची इंजेक्शने देऊन त्यांचं एक यंत्र करून मिथेन वाढवत असतील. मग रानात फिरून चरणाऱ्या गायीचं दूध चौपट महाग विकतात. हे मात्र सांगता नाहीत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/14/2024 - 06:38 नवीन
Us च्या गायींना अपचन होते असेल आणि गॅसेस फार होत असतील. आता पुराणात शोध घ्यायचा तर गाय मुखाकडून अपवित्र आणि पुच्छाडून पवित्र समजतात. म्हणजे तिथपर्यंत मिथेन पोहोचत नसावा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/14/2024 - 06:42 नवीन
Cattle and other ruminant animals account for about 4% of U.S. greenhouse gas emissions, according to the U.S. Environment Protection Agency (EPA). In comparison, our transportation system — including cars, planes and more — accounts for more than 25.3 percent of U.S. greenhouse gas emissions. Even extreme dietary changes — such as switching to a vegan, all-plant diet — won’t have much impact on climate change and global temperatures, Place explains. Research shows that removing all livestock and poultry from the U.S. food system would only reduce global greenhouse gas emissions by 0.36%, she notes.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा