Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

तुमच्या घरचा डाळ/कडधान्य/मांस/मासे/प्रोटीन मासिक खर्च किती?

म
माहितगार
Fri, 10/18/2024 - 09:19
🗣 58 प्रतिसाद
मी आहारशास्त्राचा आधुनिक विज्ञानाधारीत ज्ञाता नाही तरीही व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न सारख्या तुरळक चांगल्या चर्चा मिपावर झाल्या आहेत. सर्वसाधारणपणे भारतीयांचे दैनंदीन आहारातील प्रथिन सेवन आदर्श स्थितीपेक्षा बरेच कमी आहे अशी टिका वैद्यकीय क्षेत्रात ऐकण्यास येते. या चर्चेचा उद्देश अशी टिका योग्य कि अयोग्य अशा चर्चेचा नाही; तर उलटपक्षी तुम्हाला कोणत्या प्रोटीन / प्रथिन स्रोतासाठी प्रतिग्राम कुणाला कुठे (कोणत्या गावी) किती खर्च येतो आहे? हे ढोबळमानाने समजून घेणे हा तुमच्या प्रतिसातूनच एक सोपेसे ढोबळ सर्वेक्षण करणे असा आहे. उद्देश्य माहितीची देवाण घेवाण होऊन सुयोग्य दरात सुयोग्य प्रथिन पोषक आहाराने मिसळपावकर समृद्ध आणि तृप्त होऊन त्यांचे जिवन आरोग्यदायी व्हावे. * तुम्हाला कोणत्या प्रोटीन / प्रथिन स्रोतासाठी प्रतिग्राम किती खर्च येतो आहे? हा मुख्य प्रश्न उपप्रश्न यादी: * तुमच्या घरचा डाळ/कडधान्य/मांस/मासे/प्रोटीन मासिक ईत्यादी वरील ढोबळ खर्च किती? उदाहरणार्थ: माझ्या घरी ४ कुटूंबीय आहेत. आमच्या वजनाची गोळा बेरीज अदमासे २०० किलो आहे. महिन्याला डाळ/कडधान्य सहा किलो पनीर अंदाजे अर्धा किलो. यावरून ६५००/३० दिवस = प्रती व्यक्ती प्रति दिवस ढोबळ प्रथिन स्रोत २१६ ग्रॅम आहे. अर्थात प्रत्यक्ष प्रथिन स्त्रोतातील मात्रा १० ते २० % दराने बरीच कमी भरेल. ( या व्यतरीक्त दूध दही महिन्याचे अदमासे २० लिटर) महिन्याची यादी हाताशी नाही म्हणून प्रति घटक प्रति ग्राम खर्चाचे आकडे दिले नाहीत पण आकडे जसे जसे उपलब्ध होतील तशी माहिती प्रतिसादातून जोडेन * तुमच्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीचे वजनाची गोळा बेरीज किती ? * प्रथिन स्रोतांवरील मासिक खर्च /भागीले कुटूंबीयांच्या वजनाची गोळा बेरीज =/भागीले ३० दिवस =? म्हणजे तुमच्या कुटूंबात प्रतिव्यक्ती प्रति दिवस अ‍ॅव्हरेज किती प्रोटीन सोर्स कंझम्प्शन होते? * प्रत्येक प्रोटीन सोर्समध्ये प्रत्यक्ष प्रोटीन मात्रा कमी जास्त असते मिपावर कुणी जाणकार असतील तर त्यांनी प्रतिव्यक्ती प्रति दिवस अ‍ॅव्हरेज किती प्रोटीन सोर्स कंझम्प्शन वरून प्रत्यक्ष प्रोटीन कंझम्पशन मोजण्यास शक्य ती मदत करावी. माझे ढोबळ ज्ञानः आहारातील प्रथिने किंवा प्रोटीन्सचे महत्व आपण सारेच समजतो. माझ्या ढोबळ माहितीनुसार मानवी शरीराला एनर्जी प्रदान करणार्‍या कार्ब आणि फॅट पेक्षा प्रथिने किंवा प्रोटीन्स अधिक उजवे समजले जातात कारण प्रथिनयुक्त आहार सावकाश पण अधिक दिर्घकाळ एनर्जी सप्लाय चालू ठेवतो, इन्शुलीन स्पाईक कमी राहून इन्शुलीन क्षमता सक्रीय राहण्यास मदत होते, स्नायूंना अधिक बळकटी प्रदान करतात. डाळ/कडधान्य/दुघ्धजन्य पदार्थ- पनीर, चक्का, खवा, चीज/ मश्रुम/ अंडी/मांस/मासे/प्रोटीन सप्लीमेन्टस इत्यादी मुख्यस्रोत अभिप्रेत आहेत. सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या प्रती एक किलो वजनाच्या एक ग्राम रेशोने म्हणजे कुणाचे वजन ६० किलो असेल तर ६० ग्रॅमच्या आसपास मोजण्यास सोपे जाते. (आदर्श परिमाण मला वाटते काहीशा फरकाने वेगळे असते प्रतिव्य्क्ती आवश्यकता वजन वाढवायचे की कमी करायचे यानुसार कमी जास्त असू शकतात) चु.भू.दे.घे. * डिस्क्लेमर लागू : धाग्याचा उद्देश्य कोणताही व्यक्तीगत सल्ला देणे नाही. * कोणत्याही प्रथिने प्रोटीन स्रोत विकणार्‍या कोणत्याही व्यवसायाशी माझा कोणताही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध आतापावेतो नाही. इतर कुणाचा संबंध असेल तरी चर्चेत सहभागी जरूर सहभागी व्हावे पण प्रोटीन स्रोत विक्रीचा व्यवसायिक संबंध असेल तर तसे स्पष्ट नमूद करावे. * चर्चेत पदार्थांच्या विशेषतः शाकाहार, मांसाहार, सप्लिमेंट यातील अधिक काय चांगले या वादात प्रदिर्घ स्वरूपाने अडकणार नाही हे पहावे कारण ते वाद घालणे हा चर्चेचा मुख्य उद्धेश नाही प्रतिग्राम खर्च काय येतो आहे हे बघणे आहे. * शुद्धलेखन चर्चा किंवा अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा टाळण्यासाठी आभार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10933 views

🗣 चर्चा (58)
ग
गवि Wed, 10/23/2024 - 14:13 नवीन
हा वेगळाच अँगल दिसतोय.. :-)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/23/2024 - 14:42 नवीन
होय गेल्या एक-दोन वर्षात तो लेख वाचल्याचे मलाही आठवते. सगळ्या (सर्वपक्षीय) सरकारी क्लेम्स सहीत खाद्य तेलांच्या किमतींना आवाक्यात ठेवणे सरकारांना गेल्या ३० वर्षात जमलेले नाही. कारण लोक्संख्येची वाढ, मागणी आणि उत्पादनातील तफावत. खाद्य तेले जिवनावश्यक बाब नाहीत पण प्रथिने जिवनावश्यक बाब ठरतात.खाद्य पर्यायांची संख्या वाढवल्या शिवाय एकुण लोक्संख्येला पुरेसा पुरवठा येत्या दहा वर्षात आणखीनच अवघड रहाणार आहे. शेवटी सायकॉलॉजीकल आहे. माझ्या सारखी व्यक्ती मश्रुम्स ना सहज स्विकारू शकतात पण कुटूंबातील बाकी व्यक्ती नकार देतात हि मध्यमवर्गीय सायकॉलॉजीकल समस्या कोणत्याही देशात रहाणारच. कोरीया व्हिएतनाम मध्ये कुत्री आहाराचा भाग आहेत पण पाश्चिमात्य मंडळींना त्यांचे कुत्रे खाणे खुपते. चीन तर खाद्य डायव्हर्सिटी मुळेच टिकून आहे. काही कम्यूनिटीजनी नवीन खाद्य स्विकारण्यास नकार दिला तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येत माझ्यासारखे नवी चव ट्राय करणारी मंडळी आणि इन्फ्लुएन्सरही असतातच.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 10/23/2024 - 14:17 नवीन
आमचा विचार केला. दूध आणि डाळी मिळून प्रोटीनवर प्रत्येकी रोज तीस रुपये खर्च होतात.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/24/2024 - 05:47 नवीन
विशीष्ट दाळींच्या प्रमाणावर अवलंबून आहे पण २२ रुपये ५० पैसे दाळीचा भाग गृहीत धरला आणि प्रति ग्रॅम प्रोटीन रुपये १.५० ने धरले तर अदमासे १५ ग्राम पूर्ण मसूर दाळ धरली तर अदमासे २० ग्राम प्रोटीन डाळीतून मिळते आहे असे धरूया. ७.५ रुपयात १०० मिली लिटर दूध धरले तर त्यातून साधारणतः ३.५ ग्रॅम प्रोटीन मिळेल तर साधारणतः ३० रूपयात २५ ग्राम दूध-डाळ प्रोटीन बसवता येईल असे दिसते. सोबत ५० ग्राम वजनाची एक अशा चार पोळ्या (२०० ग्राम गहू) खाल्ल्यातर १० रूपयांच्या खर्चात २६ ग्राम गहू प्रोटीन मिळवता येऊ शकेल. म्हणजे ३० रूपये दूध-डाळ मधून २५ ग्राम प्रोटीन आणि २६ ग्राम प्रोटीन १० रुपयांच्या गव्हाच्या पोळ्यातून म्हणजे ५० ग्राम प्रोटीन ४० रुपयात प्रतिदिवशी मिळवता आले तर मस्तच. १२०० रूपये प्रतिव्यक्ती प्रति महिना चार जणांची फॅमिलीला प्रति महिना ४८०० रुपयात किमान प्रोटीन मिळवता येणे एक दिलासा दायक बाब म्हणण्यास हरकत नाही. (पण या हिशेबातत तूर डाळ धरलेली नाही. तूरडाळ मोठ्याप्रमाणात वापरली तर हिशेब कोलमडू शकतात)
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 10/23/2024 - 15:47 नवीन
व्यक्ती प्रति दिवस ढोबळ प्रथिन स्रोत २१६ ग्रॅम आहे
हे खुप आहे.१५०-१६० ग्रॅम हे ठीक आहे.आताच रणवीरने ब्रायन जॉन्सनची मुलाखत ऐकली.हा तोच जो ॲंन्टीएजिंगवर (बायो हॅकिंग)वर काम करतोय.तो तर व्हेगन आहे,डाळी -मटार हेम्प म्हणजे भांग डाळ? प्रोटीनसाठी वापरतो. https://youtube.com/shorts/QMpGSPmCgCM?si=7RqnYQul5JkTTuMR मुळात लो कॅलरी डाएट फॉलो केलं तर खुपच फायदा होतो.मी आठवड्यात तीन दिवस तरी करते, हळूहळू सातही दिवस करेन.हा मुद्दा नाहीये तरी ॲड करावा वाटला.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/23/2024 - 16:07 नवीन
व्यक्ती प्रति दिवस ढोबळ प्रथिन स्रोत माफ करा, प्रथिन स्रोत आणि निव्वळ प्रथिन यात गल्लत होत आहे का? प्रथिन स्रोत म्हणजे डाळी उदाहरणार्थ २१६ ग्रॅम पूर्ण तूर दाळ असेल आणि दर १०० ग्रॅम तूर दाळीत ७ ग्रॅम तूर प्रोटीन असेल तर २१६ ग्रॅम तूर दाळीतून मला अंदाजे केवळ १५ ग्राम प्रोटीन मिळते आहे. गहू आणि इतर मी अंदाजे ५ ग्राम प्रोटीन कव्हर करत असेन तर मला अंदाजे २० ग्राम प्रोटीन मिळते आहे. माझे वजन ६३ किलो होते. ६३ किलो गुणिले ०.८ ग्राम प्रोटीन पर केजी बॉडी वेट रिक्वायरमेंट केल्यास माझ्या शरीराची व्यायाम न करताही प्रोटीन गरज ५०.४ ग्राम आहे जेव्हा की मी केवळ २० ग्राम प्रोटीन वापरतो आहे. गेला दिड महिना मी लो-इंपॅक्ट पण लॉ वजन उचलण्यासहीत व्यायाम करतो आहे तर माझे वजन अदमासे दोन किलोने कमी झाले कारण मी कार्ब-फॅट मर्यादीत ठेवले आहे त्यातच माझा प्रोटीन इनटेक अदमासे अर्ध्याने तरी कमी पडतो. बाकी युट्ञूब बघतो
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 10/23/2024 - 16:28 नवीन
ओके समजलं.हो,२० ग्रॉम /दिन खुपचं कमी आहे.१.२ ग्राम/किलो तरी पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/24/2024 - 05:18 नवीन
ब्रायन जॉन्सन ज्या हेम्प प्रोटीनचा उल्लेख मुलाखतीत करतो आहे ते कदाचित आपण अनारशावर जी खसखस लावतो त्या खसखशीचे एक्स्ट्रॅक्ट असेल? ब्रायन जॉन्सन व्हेगान असल्यामुळे व्हे प्रोटीन घेत नसावा म्हणून हेम्प प्रोटीनचा महागडा प्रकारास त्याने अवलंबिले असण्याची शक्यता असू शकेल? कारण १०० ग्राम खसखशीत केवळ १८ ग्राम प्रोटीन आहे. खस्खशीचा दर ५०० रुपये किलो (५ वर्षापुर्वीचा) जरी धरला तर प्रती ग्राम खसखस प्रोटीन २ रुपये ८० पैसे पर्यंत पडू शकेल आणि प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट स्वरूपात आणखी बरेच महाग पडत असणार. खसखशीचा १०० ग्राम भूगाही खूप मोठा आणि खाण्यास अवघड होत असणार शिवाय खाली नमूद केलेल्या वृत्ताप्रमाणे त्यात फार मोठ्या प्रमाणात भेसळ होते असे दिसते. या (५ वर्षापुर्वीच्या) दैनिक भास्करच्या वृत्तानुसार भारतात खसखशीच्या उत्पादन आणि व्यापाराला लायसन्स लागत असावा. मध्यप्रदेशात अल्प प्रमाणात अधिकृत शेती आणि व्यापार होत असावा. खसखशीची मूळ किंमत ५०० रूपये किलोपेक्षा अधिक असल्यामुळे खसखशीसारखेच दिसणार्‍या कोबंड्यांचे अन्न भेसळ करून खसखस अर्ध्या किमतीत विकण्याचा व्यापार्‍यात प्रघात असल्याचे वृत्तार म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा