Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ब्रेन इन अ व्हॅट!

भ
भागो
Tue, 08/13/2024 - 13:26
💬 55 प्रतिसाद
ब्रेन इन अ व्हॅट! क्वांटम फिजिक्सशी किंवा आईनस्टाईनशी थोडा परिचय असेल तर “थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. किमान “स्क्रोडिंजरचे मांजर” तरी माहित असणारच. “थॉट एक्स्पेरीमेंट” म्हणजे कल्पनेची उत्तुंग भरारी. कित्येक गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत त्याबद्दल “खयालोमे” विचार करायचा. अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते. “थॉट एक्स्पेरीमेंट” हे फक्त विज्ञानापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा तत्त्वज्ञानातही सढळ वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ देकार्तचा राक्षस- Descartes Evil Demon. किंवा प्लाटोचा “गुहेतील कैदी” दृष्टांत! ह्यांचा आधुनिक अवतार आहे “ब्रेन इन अ व्हॅट!” कल्पना करा कि एखाद्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाने (किंवा अतिप्रगत परग्रह वासियांनी) तुमचा मेंदू तुमच्या कवटीतून काढून फिश बाउल मध्ये ठेवला आहे. ह्या भांड्यात मेंदूचे पोषण करणारा द्रव आहे. तो मेंदूला जिवंत ठेवतो. ह्या मेंदूचा मज्जा रज्जुशी संबंध तुटला आहे. त्या ऐवजी मेंदू तारांच्या सहाय्याने सुपर संगणकाशी जोडला गेला आहे. आपल्याला संवेदना कशा होतात? आपल्या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूला विद्युत संदेश पाठवले जातात. आपण चुकून एखाद्या गरम भांड्याला बोटाने स्पर्श केला तर बसलेल्या चटक्याचे विद्युत संदेशांत रुपांतर होते आणि हा संदेश मज्जा तंतुतून मज्जारज्जुतून मेदुला पोहोचवला जातो. मेंदू तत्काळ हात बाजूला घेण्याचा संदेश हाताच्या बोटाच्या स्नायूंना देतो. समजा आपण संगणकाकडून “चटक्याचा” संदेश ह्या व्हॅट मधल्या एकाकी मेंदूला दिला तर त्या मेंदूची अशी कल्पना होईल कि आपण शरीरातच आहोत. आणि रोजचे जीवन जगत आहोत. शास्त्रज्ञ अशा एकाकी मेंदूबरोबर काहीही खेळ खेळू शकतील. समजा हा प्रयोग पुणे विद्यापिठातल्या न्युरोलोजीच्या प्रयोगशाळेत चालला आहे. पण मेंदूला वाटतंय कि आपण मित्रांबरोबर वैशालीत गप्पागोष्टी करत इडली वड्यावर ताव मारत आहोत. किंवा मुंबईत मरीन ड्राईववर मैत्रिणी बरोबर हवा खात आहोत. इथच थांबू नका. आपण चंद्रावर, मंगळ ग्रहावर आहोत. मनुष्याच्या कल्पना शक्तीला अंत नाही. हे वाचताना तुम्हाला एलओएल होत असणार, तुम्ही म्हणत असणार ह्याची आता सटकली आहे. मला कल्पना आहे. पण ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाहीये. तत्त्वज्ञानातील हा हॉट टॉपिक सुरु झाला रेने देकार्त पासून. (René Descartes in 1641 in the Meditations on First Philosophy,) त्याचे म्हणणे होते कि आपल्याला पंचेंदिरीयांतून जे ज्ञान प्राप्त होते ते खरे आहे कि तो निव्वळ भ्रम आहे. त्यतून ते सुप्रसिद्ध वाक्य आले, ‘Cogito, ergo sum’ (‘I think, therefore I am’). १९७३ मध्ये गिल्बर्ट हार्मन ह्याला आधुनिक स्वरून दिले.आणि १९८१ साली हिलरी पुटनामने त्याच्यावर अधिक काम केले. BIV म्हणजे ब्रेन इन अ व्हॅट चा कंसेप्ट ह्या दोघानीच पुढे आणला. मग आपण BIV मध्ये आहोत कि नाही? हे कसे सिद्ध करायचे? ह्यावर बरीच तात्विक चर्चा झाली आहे. ती केवळ ज्यांनी त्या विषयाचा कसून अभ्यास केला आहे त्यांनाच समजावी अशी आहे. अजून डोक्याला शॉट लावून घेण्यात अर्थ नाही. विज्ञानकथा लेखकांची मात्र चंगळ झाली. ही कल्पना वापरून अनेक कथा लिहिल्या गेल्या. अनेक सिनेमे बनवले गेले. त्यांची यादी आपल्याला विकिवर मिळेल. (https://en.wikipedia.org/wiki/Brain_in_a_vat) आपले कितीतरी आवडीचे सिनेमे ह्यात आहेत. ह्यात प्रमुख म्हणजे “द मॅट्रिक्स” ह्या सेरीज मधील तीन सिनेमे. ह्या यादीतील मला आवडलेला म्हणजे “डोनोवान’स ब्रेन” ही कथा १९४२ साली लिहिण्यात आली. त्यावर आधारित एकूण तीन पिक्चर आले. The Lady and the Monster (1944), Donovan's Brain (1953), and The Brain (1962). ह्या पैकी दोन The Lady and the Monster (1944), and The Brain आपण यू ट्युब वर बघू शकता. वेळ असेल तर अवश्य पहा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11349 views

💬 प्रतिसाद (55)
भ
भागो Wed, 08/14/2024 - 19:14 नवीन
आता चेक केले तर तो "आयडी" खारीज झाला आहे. दर है पर अंधेर नही है.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 08/15/2024 - 03:54 नवीन
?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 08/15/2024 - 04:00 नवीन
इनक्वीझिशन, देहदंड असे जडव्यागळ शब्द वापरलेत म्हणून म्हणतो. बाकी तुम्ही क्वांटम फिजिक्स, सिस्टीम डिझाईन तत्सम आशा कठीण विषयावर लिहीलेत तर सर्व सामान्य माझ्या सारखे अल्पमती वाचक काही शंका कुशंका काढणारच. ते मनाला लावून घेऊ नका.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/15/2024 - 10:15 नवीन
आता मोठा मेंदू {माणसाचा} वाडग्यात इतकी प्रगती झाली आहे. विज्ञानात किंवा साहित्यात. शंभर वर्षांनी डासाचा मेंदू टाचणीच्या डोक्यावर ठेवून त्यांच्याशी बोलतील.
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा गुरुवार, 08/15/2024 - 15:53 नवीन
कंजूसकाका,
कुणी मराठीत लिहिले तर स्वागतच.
हेच म्हणतो. मराठीतून लिहिलेलं सुकर वाटतं व आवडतं. जरी इंग्रजी समजायचा वांधा नसला तरीही. आ.न., -ना.न.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा