Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

व
वेडा बेडूक
Mon, 07/15/2024 - 08:06
🗣 8 प्रतिसाद

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक शर्यतीत आघाडीवर असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्रचारादरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ते बालंबाल वाचले. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने महासत्ता अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली. हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी ठार केले. या गदारोळात दोन जण गंभीर जखमी झाले.

https://x.com/ANI/status/1812271060408230250

डोनाल्ड ट्रम्प यांची पेनसिल्व्हेनिया शहरात शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. ही प्रचारसभा सुरू असतानाच एका माथेफिरूने ट्रम्प यांच्यावर एका छतावरून गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. गोळीबाराचा आवाज येताच सभेत गोंधळ निर्माण झाला. सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांना गराडा घालत त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे निर्माण केले. तिथून त्यांना पीट्सबर्ग येथील रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचारानंतर ट्रम्प यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला सुरक्षारक्षकांनी ठार केले. थॉमस क्रूक्स असे त्याचे नाव असून त्याने रायफलने ४५० फुटांवरून ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. सभेच्या ठिकाणापासून जवळच उंच स्थानावरून क्रूक्सने व्यासपीठावर अनेक गोळ्या झाडल्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोर व्यासपीठानजीक कसा पोहोचू शकला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकी सुरक्षायंत्रणांतील त्रुटी यातून अधोरेखित झाल्या आहेत.

गंमत म्हणजे, या हल्ल्यानंतर लगेचच चिनी विक्रेत्यांनी ट्रम्प यांच्या नावाचे टी-शर्ट विशेष संदेशासह छापले आणि त्यांची ऑनलाइन विक्री सुरू केली. अवघ्या काही मिनिटांत, चीन आणि अमेरिकेत 2000 हून अधिक टी-शर्ट विकले गेले. हल्ला झाल्यानंतर तीन तासांपेक्षा कमी कालावधीत टी-शर्टची पहिली तुकडी ताओबाओवर विक्रीसाठी गेली. असोसिएटेड प्रेसने संध्याकाळी 6:31 वाजता ट्रम्प यांची मूठ हलवतानाचा आयकॉनिक फोटो प्रसिद्ध केला. या फोटोसह बनवलेल्या टी-शर्टची पहिली बॅच प्रसिद्ध चीनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ताओबाओवर रात्री 8.40 वाजता विक्रीसाठी गेली. "शूटिंगची बातमी पाहिल्याबरोबर आम्ही ताओबाओवर टी-शर्ट टाकले, तेव्हा आमच्याकडे ते छापलेले देखील नव्हते! आणि केवळ तीन तासांत आम्हाला चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून 2,000 हून अधिक ऑर्डर मिळाल्या," टी-शर्ट विक्रेता म्हणाला.

या टी-शर्टवर ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचे छायाचित्र आहे, आणि "शूटिंग मेक्स मी स्ट्राँग" असे लिहिले आहे.

https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/just-hours-af…

या सर्व घडामोडींवर मिपाकरांची काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्यास उत्सुक!


  • Log in or register to post comments
  • 3288 views


वाचनखूण लावा
| 3288 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (8)
ग
गवि Mon, 07/15/2024 - 11:19 नवीन
ट्रंप यांच्या बाबतीतली ही घटना खूपच धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. जे व्हिडिओ दिसत आहेत त्यानुसार ते एखादा इंच जरी इकडे तिकडे असते तरी कानावर निभावले नसते. डोके नेमके त्या क्षणी झुकले म्हणून वाचले असे भासते आहे. बाकी चीनच्या व्यापाऱ्यांची व्यावसायिक वृत्ती आणि कोणतीही परिस्थिती कमीत कमी वेळात एनकॅश करण्याची चपळता भारतीय व्यापाऱ्यांनी घेण्यासारखी आहे. ही घटना वाईट होती हा वेगळा विषय. पण कोणतीही गोष्ट व्हायरल होता होता अर्ध्या मिनिटात शर्टवर प्रिंट करून एक शर्ट नमुना वेब साईटवर लिस्ट करणे आणि ऑर्डर घ्यायला सुरुवात करणे हा व्यापाराचा एक विलक्षण प्रकार आहे. यात चीन कडे काही खास प्रिंटर असेल असे वाटत नाही. वेळ साधणे इतकाच फरक
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 07/15/2024 - 11:32 नवीन
मानलं बुवा चायनाला!!
  • Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड Mon, 07/15/2024 - 13:10 नवीन
तात्यांवरील हल्ल्याचा जाहीर निषेध.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 07/15/2024 - 15:27 नवीन
गोळी घालणारा रजिस्टर्ड रिपब्लिकन होता.
  • Log in or register to post comments
क
कोण Tue, 07/16/2024 - 04:40 नवीन
आणि त्याने democratic पक्षाला देणगी दिली.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 07/16/2024 - 07:12 नवीन
१५$. ते पूर्वी केलेले. त्यानंतर तो रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 07/19/2024 - 22:52 नवीन
विरोधी पक्षाच्या प्रायमरीज मधे गोन्धळ घालायला (म्हणजे विरोधी पक्षाचा जो उमेदवार अध्यक्ष्य पदाच्या निवडणुकीत पराभूत होईल, त्याला विरोधी पक्षाच्या प्राथमिक फेरीत जिंकुन देण्यासाठी बरेचदा डेमोक्रॅट, आणि रिपब्लिकन प्राथमिक फेरीपूर्वी विरोधी पक्षाचे सदस्यत्व घेतात)
  • Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड Mon, 07/15/2024 - 17:38 नवीन
गोळी घालणाऱ्या थॉमस म्याथ्यू कृक्स ह्याला जागेवर गोळी घालून ठार करण्यात आले. तात्यांशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं तात्याशी नीट त्याला सोन्याची वीट.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा