अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील?
आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका.
लेक लाडकी मोठ्या घरची
होणार सुन मी अंबाणीची
मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला
अनंतरावांसारखा जोडीदार भेटला
लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड
अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड
स्वप्नातला राजकूमार पाहीला होता
सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.
अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?!नाय वाचत,आमचे हेच देशपांडे हायेती,तवा देशपांड्यांना देशपांड्यांचा लई अभिमान,गावी देशपांड्यांकडं कपाट भरभरू पु.लं.ची बुकं पण गावी आम्हाला स्वैपाकघरातून फुरसत मिळाली असती तर वाचली अस्ती.. हेच बेस्ट :) पण रच्याकने पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.