Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ट-२० विश्वचषक अंतिम सामना

स
सौंदाळा
Fri, 06/28/2024 - 07:54
💬 55 प्रतिसाद
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. २०२२ मधे उपांत्य फेरीत इग्लंडविरुद्ध झालेल्या एकतर्फी पराभवाची भारताने परतफेड केली. आता शनिवारी भारताची गाठ दक्षिण आफ्रिका संघाशी पडेल. यंदाची विश्वकरंडक स्पर्धा बर्‍याच अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तब्बल २० संघांचा सहभाग, अमेरीकेत झालेले साखळी सामन्यांचे आयोजन, तिकडची बॉलिंग फ्रेंडली पिचेस, सामन्यांची महागडी तिकिटे वगैरे. अमेरीकेतल्या लोकांशी बोलणे झाले तेव्हा त्यांना या विश्वकरंडकाबद्दल माहिती नव्हते. अमेरीकेने पाकीस्तानला धूळ चारली आणि नंतर सुपर एटमधे प्रवेश केला तेव्हा माध्यमातून थोडीफार चर्चा झाली. अमेरीकन्स फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल आवडीने बघतात, अमेरीकेतच त्याच्या स्पर्धा भरवून त्याला विश्वकरंडकासारखे प्रोजेक्ट करतात. अमेरीकेत क्रिकेटचा प्रवास येत्या काही वर्षात कसा होतो हे बघणे रोचक असेल. भारतीय, पाकिस्तानी, ब्रिटीश, साऊथ आफ्रिकन, कॅरेबियन लोक अमेरीकेत आहेत आणि वाढत चालले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या प्रसारावर आणि अर्थातच अमेरीकेतील मोठ्या अर्थकारणावर आयसीसीचा डोळा आहेच. भारतासाठी संघ म्हणून आतापर्यंतची स्पर्धा छानच गेली. भारतीय संघ कधीच दडपणाखाली वाटला नाही. सर्व गोलंदाज जबरदस्त फॉर्ममधे आहेत. मात्र विराट कोहली, शिवम दुबेचा खराब फॉर्म, क्षेत्ररक्शकांनी सोडलेले सोप्पे झेल ही थोडी चिंतेची गोष्ट आहे. आफ्रिका संघ आयसीसी विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच आला आहे. संघ सर्व आघाड्यांवर पूर्ण बहारात आहे. त्यामुळे भारताला सर्वोत्तम खेळ करायला लागेल. रोहीत आणि विराटची कदाचित शेवटची विश्वकरंडक स्पर्धा असेल त्यामुळे ते पूर्ण झोकून प्रयत्न करतीलच. दोन्ही चांगले संघ अंतिम सामन्यात आले आहेत मात्र भारताचे पारडे तुलनेने किंचित जड आहे असे वाटत आहे. उद्या सामना बघायला मज्जा येणार आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13945 views

💬 प्रतिसाद (55)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/28/2024 - 08:35 नवीन
अंतिम सामना भारतीय संघ जिंकणार इतक्या मजबूत स्थितीत भारतीय संघ आहे, कोहल्याचा बॅड प्याच सुरु आहे, कुठंही काहीही फटका खेळला तर, फोकलीचा तंबूत परतलेला असतो. रोहीत फार्मात आहे, आपण त्यांच्याकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो. समजा आज तो ढेपाळला तर, पंत, सूर्यकुमार, पांड्या, पंत, जड्डू सगळं देवभरोसे वाटतं. बूमबूम बुमराची गोलंदाजी चांगली व्हावी. अजुन काही खरडावे वाटले की धाग्यावर येईन, शनवारी फूल टाइम धाग्यावर पडिक राहु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
भ
भागो Fri, 06/28/2024 - 10:50 नवीन
भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय नाही. तुलनात्मक विचार करायचा म्हटले तर (माझ्या मते) दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी जास्त सरस आहे तर त्याला उत्तर म्हणून भारतीय फलंदाजी. बघुया सामना कसा रंगतोय ते.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Fri, 06/28/2024 - 11:58 नवीन
सहमत आहे!
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sun, 06/30/2024 - 03:13 नवीन
भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sun, 06/30/2024 - 03:40 नवीन
योगायोग.. जेव्हा जेव्हां बीजेपिला सिंगल ह्यांडेड मेजॉरीटि असतें... भारत विश्वचषक नाही जिंकत...
  • Log in or register to post comments
भ
भागो Fri, 06/28/2024 - 12:07 नवीन
सौंदाळा सर लेख समयोचित आहे पण, T-20 साठी ट-२० ? कुछ जम्या नही. कुणाच्या काही सूचना?
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 06/28/2024 - 12:34 नवीन
सर-बिर नको हो ट-२० हा मिपावर ज्यांनी क्रिकेटचे भरपूर लेख लिहिले आहेत त्या 'श्रीगुरुजी' या जुन्या मिपा सदस्याकडून उचलला आहे. बाकी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होतील का? मला तरी वाटत नाही. पण बरेच नेटकरी दुबेच्याऐवजी जयस्वालला घ्यावे आणि त्याला सलामीला पाठवून कोहलीला तीन नंबरवर पाठवावे असे म्हणत आहेत. काहीजण तर कोहली आणि दुबेला वगळून अनुक्रमे जयस्वाल आणि रिंकूला घ्यावे म्हणत आहेत.
  • Log in or register to post comments
भ
भागो Fri, 06/28/2024 - 12:52 नवीन
मला वाटत संघाच्या जडण घडणीत ऐन वेळी बदल करू नयेत. जयस्वाल आणि रिंकू ह्याना आधीच घ्यायला पाहिजे होते. आता नको. काय म्हणताय?
  • Log in or register to post comments
R
rahul ghate Sat, 06/29/2024 - 08:17 नवीन
अंतिम सामन्या वर पावसाचे सावट असून सामन्याचा दिवस व राखीव दिवस असे २ हि दिवस ७०-८० टक्के पावसाची शक्यता आहे .
  • Log in or register to post comments
भ
भागो Sat, 06/29/2024 - 16:11 नवीन
भारताने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. सुरवात तर छान झाली आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 06/29/2024 - 17:00 नवीन
तीन फलंदाज बाद, कोहली आणि अक्षर. आज कोहली खेळतोय वाटत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 17:13 नवीन
दोघेही चांगले खेळत आहे, किमान160 रन्स तरी हवेत.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 06/29/2024 - 17:16 नवीन
१० षटक ७५/३ कोहली आणि अक्षरने डाव सावरला आहे. अक्षरने दोन षटकार सुध्दा मारले आहेत. त्याला काय सूचना दिल्या आहेत आता पुढील ५-६ षटके महत्त्वाची आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 17:41 नवीन
नेमका स्वताच्याच चुकीच्या कॉलने धावबाद झाला. दुबे बेभरवशाचा.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 06/29/2024 - 18:09 नवीन
आज कोहली आणि दुबे चांगले खेळले. आतापर्यंतचा विश्वचषक अंतिम सामन्याचा सर्वात चांगला स्कोर. आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान. भारत जिंकायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 18:33 नवीन
बुमराने अप्रतिम चेंडू टाकला, आणि आता आर्षदीपने मार्करमला पण परतावले,
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/29/2024 - 18:33 नवीन
भारतीय संघ सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरला १७७ चं आव्हान तसं चांगलं आहे, आफ़्रीकीची २ बाद १२ आणि तिसरं षटकं सुरु आहे, अजुन दोन विकेट्स पडल्या तर सामना आपल्या दृष्टीने आपण विजयाकडे जाऊ... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 18:36 नवीन
पंतने रिव्ह्यू वाया घालवला.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 06/29/2024 - 18:57 नवीन
स्टब्ज बाद, मोठी विकेट
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 19:30 नवीन
गेली मॅच आता
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 06/29/2024 - 19:32 नवीन
हो, कलासेंची अफलातून फटकेबाजी. झोपा आता
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 19:52 नवीन
गेलेली मॅच बुमरा आणि आर्शदिपच्या टिच्चून केलेल्या बॉलिंगमुळे एकदम रंगात आली.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 06/29/2024 - 19:53 नवीन
पंड्या शेवटचे षटक, १६ जिंकायला बघू
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 19:56 नवीन
सूर्याचा भन्नाट कॅच
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 19:59 नवीन
२ मध्ये ९
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 20:00 नवीन
पांड्या पुन्हा हिरो, १ मध्ये ९
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 06/29/2024 - 20:04 नवीन
जिंकली खूप हेलकावे खाल्ले पण जिंकली कोहली, दुबे, बुमरा, अर्शदीप, पंड्या आणि सूर्याचा भन्नाट कॅच अभिनंदन टीम इंडिया
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 20:06 नवीन
जबरदस्त विजय.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/29/2024 - 20:07 नवीन
सूर्यकुमारने मॅच जिंकून दिला... भन्नाट कॅच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 06/29/2024 - 20:09 नवीन
गेली मॅच आता
निगेटिव्ह थिंकिंग टाळण्यासाठी प्रयत्न करा. जमेल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 20:13 नवीन
तुमची झोप झालेली दिसतेय.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 06/29/2024 - 20:30 नवीन
भारताच्या विजयाच्या अद्भुत क्षणात सामील होण्यासाठी पूर्ण उत्साहाने आणि सकारात्मक मनाने आम्ही सामना अवलोकित केला. काही लोकांसारखे (सुमारे एक मिपासदस्य) यांच्यासारखे नकारात्मक कॉमेंट्स न टाकता. कारण आमचा टीम भारतवर गाढ विश्वास होता. तुम्ही जावा तिकडे पाकिस्तानात.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 20:32 नवीन
तुमचा निर्देश खफकडे दिसतोय :) उत्तम खेळ केला आपल्या संघाने. हॅट्स ऑफ टीम इंडिया.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 06/29/2024 - 20:34 नवीन
आमचा निर्देश केवळ तुमच्याकडे आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/29/2024 - 20:35 नवीन
ओहह नो, झोपा आता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/29/2024 - 20:03 नवीन
टी -२० विजयी भारत..... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sun, 06/30/2024 - 03:14 नवीन
भारतीय संघाचे अभिनंदन. बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sun, 06/30/2024 - 03:40 नवीन
योगायोग.. जेव्हा जेव्हां बीजेपिला सिंगल ह्यांडेड मेजॉरीटि असतें... भारत विश्वचषक नाही जिंकत...
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 06/30/2024 - 07:37 नवीन
अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 07/01/2024 - 07:33 नवीन
अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय. बरोबर...त्याशिवाय अन्न पचत नाही व झोपही लागत नाही. जळी स्थळी केलेल्या निंदेने भाजपाच्या काही सिटा कमी झाल्या ह्याचेही त्यांना समाधान नाही. गंमत म्हणजे एरवी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला अंधश्रद्धा म्हणणारे हे लोकं, मोदींना पनवती म्हणतात. त्यावेळी हे म्हणताना त्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही.
  • Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड Sat, 07/06/2024 - 09:00 नवीन
३० बॉल ३० रन करायचे होते आफ्रिकेला. भारतीय बॉलर काय लायकीचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. तरीही आफ्रिका मॅच हरतेय. मॅच फिक्स असल्याशिवाय हे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड Sat, 07/06/2024 - 09:01 नवीन
ह्या बीसीसीआय च्या संघावर ( हा अधिकृत भारतीय देशाचा संघ नाही) आमचे टॅक्स चे करोडो रुपये उधळायचा हक्क शिंदे सरकारला कुणी दिला?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 07/06/2024 - 16:38 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड Sat, 07/06/2024 - 17:26 नवीन
तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला आहात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 07/07/2024 - 16:57 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.... मुद्दा नसला की वैयक्तिक पातळीवर उतरणे, साहजिकच आहे....
  • Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड Sun, 07/07/2024 - 19:01 नवीन
तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला आहात. (२)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 07/07/2024 - 20:15 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.... खास आपल्यासाठी एक लिंक... https://misalpav.com/node/36614
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 07/08/2024 - 02:41 नवीन
मुक्त विहारि, अगदी अगदी आपले म्हणणे पटले , एक " अ . बा " म्हणून होते त्यांचे पण तसेच ... आणि एक विद्वानांना तर मुद्द्दा मिळाला नाही कि हगीनदारी काढायची किंवा "तुमच्या देशांत असेच असते का हो" वैगरे असले निरर्थक काहीतरी चिकटवत राहायचे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 07/08/2024 - 05:04 नवीन
मिपा म्हणजे, डू-आयडी, हे समीकरण झाले आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/08/2024 - 06:36 नवीन
भारत देशात टी ट्वेन्टीनंतर, मुंबैत रसिकांनी जे उत्स्फ़ुर्त स्वागत केलं त्याला तोड नाही. मजा आगया. क्रिकेट खेळ असा आहे की, त्यात रममाण झालो की त्या खेळाचा पूर्ण आनंद घेता येतो. क्रिकेटचं वेड आम्हाला लहानपणापासून. क्रिकेट खेळलो. पंचगिरी केली. वगैरे. क्रिकेट फिक्सींग, क्रिकेट हा देशाचा संघ नाही, वगैरे हे सगळे वाद असले तरी, क्रिकेटचा आनंद देहभान विसरुन घेता येतो. अन्य खेळाबाबतही थोड्या फार फरकाने आमचं असंच आहे. बाय द वे, आपल्या देशात कसा असतो क्रिकेटचा विजय साजरा करणे ? क्रिकेट सामने पाहणे ? आपल्या देशात एखाद्या खेळात विजय मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संघाच्या सर्व खेळाडुबरोबर गोल रिंगन करुन गप्पा-टप्पा करतात का ? हार्दीक पांड्याच्या पहिल्याच चेंडुवर कॅच पकडल्यावर 'त्याला तु काय म्हणालास ?' असे प्रश्न विचारुन आत्मीय संवाद करतात का ? आमच्याकडे अशा प्रश्न आणि आत्मीय संवादाने डोळ्यातून पाण्याचे ओघळ यायला लागतात. दोन-ह्जार तेवीसला विजयाची संधी गेली होती, तरी भारतीय संघांतील खेळाडुंचं जे सांत्वन मा. पंतप्रधान यांनी केलं होतं ते आठवलं की अजूनही गदगदून येतं. ''दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे''.ती गळाभेट, हातात हात घेणे, खेळाडुंचे खिशातून हात काढून आपल्या हातात घेणे, हा जो आत्मीय स्पर्श असतो त्याने आपले रोम रोम फुलतात. डोळ्यातून पाण्याचे ओघळ वाहु लागतात. आपल्या देशात असे ओघळ येतात काय ? सॉरी असं खेळ प्रेम असतं का ? आमचे प्रश्न निरर्थक वाटल्यास दुर्लक्ष करा. उत्सुकता आहे. -दिलीप बिरुटे (क्रिकेटप्रेमी )
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा