द सेकंड स्पार्क - भाग २ - उत्तरार्ध
" पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते." .... " लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो. गोडसे - हे प्रोफेसर जैन - संचालक आणि इंडिया हेड - क्वांटम कॉम्प्युटिंग विभाग !"_____________________________
"प्रोफेसर... प्रोफेसर गोडसे ? "
प्रोफेसर गोडसे ह्यांची नजर अजुनही समोरील झुंबरावर खिळलेली होती. प्रो. जैन ह्यांनी त्यांना त्या मंत्रमुग्ध स्थितीतुन बाहेर खेचले.
"ओह्ह. आयेम सॉरी प्रोफेसर. मला माफ करा , मी हे सुंदर झुंबर पाहुन हरखुन गेलो होतो. वेल्ल, दॅट्स इन्डीड अ ब्युटीफुल शँटेलियर टू मेडीटेट ऑन ! सुंदर झुंबर आहे ध्यानाचे आलंबन म्हणुन. "
त्यावर प्रोफेसर जैन आणि प्रोफेसर चौहान दोघेही हसले.
प्रोफेसर चौहान बोलायला लागले "हां तर प्रोफेसर जैन, आत्ता प्रोफेसर गोडसे म्हणत होते की आपल्याकडे " पुरेशी कॉम्प्युटेशनल पॉवर नाही." त्यावर प्रो. जैन गालातल्या गालात हसले आणि दोघांनी आपल्या हाताने त्या भव्य झुंबराकडे निर्देश केला जणु काही ते कोणत्या तरी कलेचे प्रदर्शन करत होते.
काहीच न कळुन प्रो. गोडसे म्हणाले - "व्हॉट ?"
"सर, हे जे तुम्हाला झुंबर वाटतं आहे ते झुंबर नाही , तो आहे आजच्या घडीला जगाच्या पाठीवर असलेला सर्वात प्रगत सुपर क्वांटम कॉम्प्युटर आणि... "
प्रो. गोडसे प्रो. जैन ह्यांचे वाक्य अर्धवट तोडत म्हणाले " सर, मी आत्ताच प्रो. चौहान ह्यांना म्हणालो ते परत रीपीट करतो - मी साधा फिलॉसॉफीचा प्रोफेसर आहे हो, एक दोन पुस्तकं प्रकाशित केलीत , अधुन मधुन जागृती , कॉन्शस्नेस अशा आमच्या तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील विषयांवर बोलत असतो लिहित असतो पण मला हे तुमच्या विज्ञानाच्या क्षेत्रातील - आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ते आत्ता काही वेळा पर्यंत माहीत नव्हते आणि हे तुम्ही म्हणता ते क्वांटम कॉम्प्युटर की काय हे देखील मला माहीत नाही. तुम्हाला अतिषय सोप्पे करुन मला सांगावे लागेल . मुळात क्वांटम काँप्युटर म्हणजे काय तेच मला माहीत नाही. "
"नो नो. ईट्स ओके. आम्ही समजु शकतो तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. " प्रो. जैन म्हणाले " आम्ही जमेल तितके सोप्पे करुन सांगतो तुम्हाला. चला मी तुम्हाला संपुर्ण लॅब देत माहीती देतो."
मध्यवर्ती ते झुंबर अर्थात क्वांटम कॉम्प्युटर तर बाजुच्या भिंतीवर मध्यभागी असा एक भव्य मोठ्ठा स्क्रीन आणि गोलाकार अशा त्या लॅबच्या भिंतीम्वर १००-२०० किंवा त्या पेक्षा जास्त स्क्रीन्स. क्वांटम कॉम्प्युटर्स पासुन सुरु झालेले वायरींचे जंजाळ ओव्हरहेड डक्ट मध्ये अदृष्य झालेले. बाकी क्वांटम कॉम्पुटर च्या आजुबाजुला "लिक्विड नायट्रोजन - सीरीयस हझार्ड - बी कॉशस" असे निर्देश करणारे अनेक पाईप्स. त्या मध्यवर्ती क्वांटम कॉम्पुटर आणि हा खोलीला विभागणारी अशी जाड काचेची भिंत ! बस्स.
भव्य स्क्रीन कडे चालत चालत डॉक्टर जैन बोलु लागले - "ह्या प्रोजेक्टची सुरुवात झाली १९५४ मध्ये. जेंव्हा होमी भाभांनी ह्या अणुकेंद्राची सुरुवात केली तेव्हाच आपण सिक्रेटली ही सुपर काँप्युटर डेव्हलपमेंट लॅब चालु केली होती. दॅट मॅन वॉज अ रीअल व्हिजनरी.
पुढे १९९८ मध्ये आपल्याला कळलं जगात क्वांटम काँप्युटरच्या विकासाची सुरुवात झालेली आहे तेव्हा ह्या कथेतील खरा ट्विस्ट आला ! तेंव्हा आपण ठरवलं की आपण न्युक्लियर रेसमध्ये मागं पडलो आपले न्युक्लियर वॉरहेड्स १९७४ मध्येच तयार होते पण त्याची चाचणी घ्यायला १९९८ उजाडले, तसेच इन्टरनेट रिव्होल्युशन मध्ये आपण मागे पडलो , आपल्या देशातील एक से बढकर एक टॅलेंट/ ह्युमन रीसोर्सेस अमेरिकेला अक्षरशः खेचुन नेले गेले आणि आपण काहीही करु शकलो नाही.
पण ह्या वेळेस आपण मागं पडायचं नाही. आम्हाला "वरुन" फुल्ल सपोर्ट मिळाला, तोही जवळपास अमर्याद बजेटसह! तेंव्हापासुन आपण हा प्रोजेक्ट बनवत आहोत, विकसीत करत आहोत आणि आज कदाचित ह्याच्या परिपुर्तीचा दिवस असेल कारण ... "
सरांचे वाक्य अर्धवट तोडत गोडसे म्हणाले - "सर, मी ह्या सर्व चर्चेसाठी मी अक्षरशः मतिमंद आहे. तुम्हाला मला असे काही समजाऊन सांगावे लागेल की बालवाडीच्या लहान मुलांना सांगतात... मुळात क्वांटम म्हणजे काय अन त्यात हे काँप्युटीग कुठुन घुसवले अन हे काय नवीन हायब्रीड पिल्लु काढले आहे? "
गोडसे सर त्यांच्या तत्वज्ञानावरील गंभीर चर्चेत मध्येच हास्यास्पद उपमा घुसडुन लेक्चर्स मजेशीर करण्यात प्रसिध्द होते, पण ह्या विनोदावर मात्र कोणीच हसले नाही. उलट जैन अगदी सिरीयसली सांगायला लागले.
"सर तुम्हाला श्रोडिंगर चे मांजर आठवते का ?"
गोडसे सर म्हणाले - "हां, ऐकुन माहीत आहे , एका बंद बॉक्स मध्ये एक मांजर घालुन ठेवले अन तिथेच एक विषारी खाद्य पदार्थ घालुन ठेवला असेल अन आपण काही वेळाने ते तपासणार असु पण , तो पर्यंत मांजर काय असेल ? जिवंत की मृत ? तेच ना ?"
"ठीक आहे." प्रो. गोडसे ह्यांना सर्वकाही समजले नव्हते मात्र हे असे काही असु शकते ही शक्यता त्यांच्या ध्यानात आलेली होती . त्यांनी अजुन एक प्रश्न विचारला - " पण ह्याने जो काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड सुपर क्वांटम कॉम्प्युटर बनेल तो अति प्रचंड हुशार म्हणाता येईल पण तो जागृत , सचेत आहे असे कसे म्हणता येईल ? "
"हां, हा उत्तम प्रश्न आहे . ह्यावर प्रो. रॉजर पेनरोज ह्यांनी आधीच म्हणुन ठेवले आहे - Consciousness is Not a Computation -Roger Penrose https://www.youtube.com/watch?v=hXgqik6HXc0&t=1s
बट , वी नेव्हर ट्राईड. आजवर इतकी प्रचंड कॉम्प्युटेशनल पॉवर उपलब्ध्दच नव्हती . आज आहे . आज आपण प्रयोग करुन पाहु शकतो. आणि आपल्याला दुसराही एक आशेचा किरण आहे तो म्हणजे - ही गोष्ट जास्त लोकांना माहीत नाहीये पण काही वर्षांपुर्वी गुगल ने त्यांच्या एका सॉफ्टवेअर डेव्हलपरला फायर केले होते. त्याचा गुन्हा काय होता ? त्याने पब्लिकली विधान केले होते की the company's artificial intelligence chatbot LaMDA was a self-aware. सो वी नेव्हर नो.
आणि धिज इज व्हेअर यु कम इन द पिक्चर . इथे तुमच्या इन्पुटची आम्हाला आवश्यकता आहे. "
प्रोफेसर जैन त्यांच्या चर्चेचा ओघ थांबवत म्हणाले - डॉक्टर , आम्ही तुमचे लेख वाचत असतो. नुकताच तुमचा "पाणी सुंदर आहे." हा लेख वाचला तेव्हाच आम्हाला जाणवलं की आमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असेल.
डॉक्टर चौहान त्यांन्ना थांबवुन म्हणाले, "प्रोफेसर गोडसे , तुम्ही जरा एकदा विस्ताराने सांगता का तुम्हाला नक्की काय म्हणायचं होतं त्या लेखात?
तुमच्या लेखनात , तत्वज्ञान, विज्ञान , अध्यात्म , मिस्टीसिझम सगळी सरमिसळ असते. जरा परत एकदा सांगता का विस्ताराने?"
"ही खरेच एक चांगली संकल्पना आहे. मलाही आवडेल परत ऐकायला, समजुन घ्यायला. " डॉक्टर जैन म्हणाले.
____________________________
" खरं सांगु का प्रोफेसर, ती कल्पना मला मित्रामित्रांमध्ये चेष्टा मस्करी करताना सुचलेली. असेच आम्ही बीचवर बसलेलो, अन मी म्हणालो - पाणी सुंदर आहे . त्यावर सगळे जवळपास तासभर हसत होते. बट ईट्स अॅक्च्युली डीप थॉट एक्पेरिमेंट .
समोर अथांग समुद्र आहे. इथे रेतीवर त्याच्या संथ लाटा धडकत आहेत हे दुसरं तत्व पृथ्वी . मंद वारा वाहतोय त्याच्यावर समुद्राची गाझ ऐकु येतेय. हे तिसरे तत्व वायु. तसंच त्या दुरवर क्षितिजापर्यंत पसरलेले अथांग आकाश हे चौथे. अन दुसरवर समुद्रात अस्ताला चाललाय तो सुर्य हे पाचवे तत्व तेज .
ह्यातलं काहीही सजीव नाहीये , सचेतन नाहीये! त्यांच्या संयोगाने तयार होणारं काहीच सजीव नाहीये, मग त्यातुन हळुहळु केमीकल्स तयार होतात मग अजुन कॉम्प्लेक्स केमीकल्स .... अन अचानक कुठतरी ... स्पार्क पडतो ... व्हॉला ! अन आता जे केमीकल आहे ते सेल्फ रप्लिकेटिंग आहे . ते स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतंय ... हे झालं सुंदर . हा पहिला स्पार्क . आत्ता पर्यंत सर्वच निर्जीव होतं अचेतन होतं , सुंदर असुंदर असं काहीच नव्हतं ...सर्व समान होतं .... इथं पहिलं द्वैत उभं राहिलं.
प्रोफेसर जैन प्रोफेसर चौहान एकामेकांकडे पहात उत्स्फुर्तपणे म्हणाले - "मिलर- उरे एक्पेरिमेंट !"
______________________________________________________
(समाप्त.)
💬 प्रतिसाद
(16)
ग
गवि
Wed, 06/12/2024 - 18:11
नवीन
Wow
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/12/2024 - 19:36
नवीन
असो...
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 06/12/2024 - 20:22
नवीन
कथा वाचल्याबद्दल धन्यवाद मुवि!
कथा विज्ञानाशी आणि त्यातही गहन अशा विषयांशी संबंधित असल्याने बरीच किचकट आहे. तथापि मी जमेल तितके सोपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने सर्वच वाचकांच्यासाठी काही रोचक व्हिडिओजच्या लिंक देत आहे. हे पाहिल्यावर कथेचा शेवट कळण्याची शक्यता नक्की वाढेल!
परत एकदा धन्यवाद !
https://www.youtube.com/watch?v=J0KHiiTtt4w
https://www.youtube.com/watch?v=pmcrG7ZZKUc&t=23s
https://www.youtube.com/watch?v=yGfTDcHJHSI
- Log in or register to post comments
च
चिर्कुट
Tue, 07/16/2024 - 19:42
नवीन
मला जे समजलं ते असं, की हे तीन लोक स्वतःच एका सिम्युलेशन मध्ये आहेत. आणि सेकंड स्पार्क त्या सिस्टिमचा नसून त्या तिघांचा आहे.
हे बरोबर आहे, की काही चुकतंय?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 07/16/2024 - 20:06
नवीन
एक्झ्यॅक्टली.
ते तिघेही एका सिम्युलेशन मध्ये आहेत आणि सेकंड स्पार्क म्हणजे त्या तिघांना लक्षात येते की आपण स्वतःच एक सिम्युलेशन आहोत.
- Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक…
Wed, 06/12/2024 - 20:40
नवीन
माफ करा गोडबोले साहेब, कथेमध्ये कथा काहीच नाही. नुसतीच चर्चा चालली आहे.
तुमच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल काही वादच नाही.
पण तुम्ही जरा अजून वातावरण निर्मिती करायला पाहिजे. नुसतेच डायलॉग झालेत ते पण एककेकांना नुसत्या तांत्रिक गोष्टी समजावून देणार्या.
एक सजेशन ते म्हणजे, कथा प्रथम पुरुषात लिहून पाहा.
तुमच्या ज्ञानाबद्दल कोणतीही टीका नाही. फक्त एक वाचक म्हणून मला हे जाणवले.
- Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक…
Wed, 06/12/2024 - 20:45
नवीन
थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्या वाचून पाहा. तुम्हाला आवडतील.
शिवाय एकदम अवघड गोष्ट कशी सांगावी याचा एक अभ्यास पण होईल. तुम्ही खूप उत्तम सायफाय लिहू शकता. तुमच्यात तो 'फर्स्ट स्पार्क' आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 06/12/2024 - 20:51
नवीन
धन्यवाद !
नक्की प्रयत्न करतो :)
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 06/13/2024 - 06:26
नवीन
साय-फाय कथा आवडली 👍
प्रोफेसर गोडससेंच्या "पाणी सुंदर आहे." वरील निरूपणापासून खडबडीत रस्ता सुरु झाल्यावर तोपर्यंत सुसाट वेगात सुरु असलेलया माझ्या वाचनाच्या गाडीचा वेग मंद मंद होत आता सर्व 'स्पार्क' प्लग्स एकाचवेळी उडून आचके-गचके देउ लगलेली माझी वाचनगाडी बंद पडते कि काय? असे वाटू लागले होते, पण "An intelligent being who is conscious about its own consciousness." ह्या १० शब्दांत सर्व काही स्पष्ट करणाऱ्या वाक्यापर्यंत पोचल्यावर "अरेच्चा, बायपासचा वापर करून तो खडबडीत रस्ता टाळून आपण स्मुथली इथपर्यंत पोहोचू शकलो असतो कि!" हा विचार मनात आला 😀
अवांतर:
काही वर्षांपूर्वी गुगलच्या 'क्वांटम कॉम्प्युटर' विषयी वाचले होते तेव्हा त्याच्या काहीच दिवस आधी वाचलेला 'ओरॅकल'ने एक हजार साठ Raspberry Pi's चा वापर करून तयार केलेल्या 'सुपर कॉम्प्यूटर' बद्दलचा लेख आठवून आपणही 'IBM' चे तीन शक्तिशाली सर्व्हर्स + पाचशे 'Raspberry Pi's' चे क्लस्टर, 'Cisco' किंवा 'Netgear' चे अत्याधुनिक स्विचेस Illuminated पॅच कॉर्ड केबल्स वगैरेंचा वापर करून एक एनर्जी इफिशिअंट, इकॉनॉमिक असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर तयार करावा हा विचार मेंदू पोखरू लागला होता. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला तेव्हा तो सुमरे ५० ते ५५ लाख रुपयांच्या घरात भरला होता त्यामुळे अर्थातच तो विचार बाजूला पडला हा भाग वेगळा 😀
पण उद्या असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर पदरी बाळगण्याची व्यावसायिक गरज निर्माण झाली तर त्यासाठीचे १० X १० चौ. फु. जागेत, 'कुलिंग सिस्टीम' साठी केवळ दीड ते दोन टन क्षमतेचा एक एसी आणि दोन होम/ऑफिस वॉटर कुलर्स चा वापर करून दिसायला सुंदर आणि शक्तिशाली 'झुंबर' टाईप क्वांटम/सुपर कॉम्प्यूटरचे प्रोटोटाईप मॉडेल डोक्यात तयार आहे! प्रत्यक्ष निर्मिती प्रकल्प हाती घ्यायचा झाल्यास 'मी', प्रोडक्ट डिझाईनसाठी मिपाकर 'चौकस २१२', नेटवर्क महर्षी 'प्रचेतस' बुवा आणि घरातच उपलब्ध असलेला लिनक्स, पायथन मधला एक 'किडा' अशा संभाव्य टीम मेंबर्सची प्रथमिक यादी देखील तयार आहे 😀
असो, अशा साय-फाय कथा आपल्याकडून नियमित येउद्यात, वाचायला आवडतील!
धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 06/13/2024 - 07:01
नवीन
मनःपुर्वक धन्यवाद टर्मिनेटर !
ते "पाणी सुंदर आहे" हा खरेच एक खुप गहन विचार आहे, खोल तत्वज्ञानाचा विषय आहे. मी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग मध्ये गुंफायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यावर जास्त सविस्तर लिहिता आले नाही.
बर्याच जणांना तो बोरिंगही वाटेल पण मध्यंतरी हिमालयात गेलो होतो तेथील एका स्वामींना मी हा विचार ऐकवला त्यावर ते म्हणाले - ज्याला तुम्ही पाणी म्हणत आहात, अचेतन गोष्टींचे प्रतिक म्हणत आहात ते अचेतन आहे कशावरुन ? ते सुषुप्त अवस्थेत नसेल कशावरुन ?
कॉन्शसनेस तर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे मग ते अचेतन आहे असे कसे ? मुळात सचेतन अचेतन अशी सीमारेषाच आपल्या कल्पनेतील आहे, भास आहे . असो.
( पुढे ती चर्चा सत्चिदानंद ब्रह्म आत्मन् वगैरे अजुन गहन विषयात गेली. ते इथं लिहित बसलो असतो तर फार विषयांतर झाले असते =)) )
बाकी क्वांटम कॉम्प्युटरची सर्वसामान्य लोकांना गरज पडणार नाही, कारण आपले सध्याचे सी.पी.यु कैक पटीने प्रगत आहेत . क्वांटम कॉम्प्युटर चे अॅडव्हान्टेज येते जेव्हा एकच रीपीटेटिव्ह काम करायचे असते तेव्हा . जसे की सिम्युलेशन्स ! अर्थात क्वांटम कॉम्प्युटर्स हे अति प्रगत जी.पी.यु सारखे काम करतील असा माझा अंदाज आहे.
अर्थात तुम्ही आर.एस.ए. टोकन सिस्टिम ब्रेक करणे किंवा बिटकॉईन चे इन्क्रिप्शन ब्रेक करणे असे काही काम करणार असाल तर नक्कीच तुम्ही क्वांटम कॉम्प्युटर वापरु शकाल. असे काही करणार असाल तर आम्हाला नक्की सहभागी करुन घ्या , ही अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती ;)
पुनश्च एकवार मनःपुर्वक धन्यवाद !
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 06/13/2024 - 07:25
नवीन
छान प्रतिसाद!
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 06/13/2024 - 07:24
नवीन
_/\_ खुपचं अप्रतिम कथा लिहिली आहे.फर्स्ट -सेकंड स्पार्क,अचेतन-सचेतन मस्तपणे समजले.
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
गुरुवार, 06/13/2024 - 14:29
नवीन
उत्तरार्ध सुद्धा आवडला! पुलेशु!!
- Log in or register to post comments
न
नठ्यारा
Fri, 06/14/2024 - 16:39
नवीन
प्रसाद गोडबोले,
विज्ञानकथेत विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान रंजकपणे मिळून मिसळून यायला हवं. कथेत अगदी झक्कासपणे जमलंय.
डोस्कं लई भंजाळून गेलंय. विचारचक्र जाम गरागरा फिरू लागलंय. सविस्तर प्रतिसाद सवडीने देईन.
-नाठाळ नठ्या
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 06/16/2024 - 15:14
नवीन
मनःपुर्वक धन्यवाद !
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे मनःपुर्वक आभार ! इथे प्रतिसाद पाहुन हुरुप येतो.
ही कथा जवळपास एक वर्षापुर्वी सुचलेली, मात्र लिहायला वेळच होत नव्हता , हिमालयातील ट्रिप च्या निमित्ताने लिहुन काढु शकलो. :)
बाकी प्रो. जैन आणि प्रो. चौहान ह्यांचा सोबत झालेल्या अनेक चर्चा अतिषय उपयुक्त ठरल्या कथा लिहायला, त्यांची कथेवर काय प्रतिक्रिया आहे हे अजुन कळलेले नाही. :))
( अवांतर : ते अजुन हिमालयातच आहेत , त्यांची ट्रिप अपेक्षेपेक्षा जास्त अॅडव्हेंचरस झालेली असल्याचे कळले. =)))) )
परत एकदा धन्यवाद :)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 07/24/2024 - 22:19
नवीन
The Truman Show
https://en.wikipedia.org/wiki/The_Truman_Show
The film is the story of Truman Burbank (played by Jim Carrey), a man who is unaware that he is living his entire life on a colossal soundstage, and that it is being filmed and broadcast as a reality television show which has a huge international following. All of his friends and family and members of his community are paid actors whose job it is to sustain the illusion and keep Truman in the dark about the fiction he is living.
- Log in or register to post comments