Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

हिंदोळे

ब
बिपीन सुरेश सांगळे
Wed, 06/05/2024 - 19:00
💬 6 प्रतिसाद
हिंदोळे आज तिचं लग्न होतं . तिचं - जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं . होतं ! कारण सकाळीच तिचं लग्न लागलं होतं आणि आता तर संध्याकाळ झाली होती . दिवसभर त्याने कसातरी तळमळत काढला होता . तो बाहेर पडला. हवा अजूनही उष्ण श्वास सोडत होती . त्याच्या मनातही उष्ण खळबळ. तो उगा इकडे- तिकडे भटकत राहिला . दुकानं , माणसं, गर्दी पहात . त्याच्या डोक्यात मुळात काही घुसतच नव्हतं . तो चालत एका बारपाशी आला . जुनाट ,कळकट बार .रया गेलेला . आधी त्याच्या ते लक्षातही आलं नाही . इतकं त्याचं डोकं गच्च झालेलं होतं . त्याच्या नकळत तो आत शिरलादेखील . एक मात्र होतं - आत गार्डन होतं . निवांत बसण्याची सोय होती. तो तिथे बसला . शांत . शांत होण्यासाठी . त्याने ऑर्डर दिली . पहिला घोट त्याने घेतला अन त्याचं लक्ष बाहेर गेलं . समोर एक बिल्डिंग होती . तिच्यावर मोठ्या लोंबत्या लाईटच्या माळा सोडलेल्या होत्या. त्या वाऱ्यावर हलत होत्या . पुढे- मागे . त्याच्या मनातही तिच्या आठवणी हिंदोळे घेऊ लागल्या . त्या लाईटच्या माळा म्हणजे - कोणाचं लग्न ? ... हा योगायोग असला तरी वाईटच होता . त्याने त्याचं दुःख दारूत बुडवायची सुरुवात केली . -------- त्याचा फोन वाजला . तिचा होता. अनेक वर्षांनी आजच . ‘ कसा आहेस ? ’ तिचा आवाज . त्याचा हात थरथरला . “ मी… मी… छान आहे. तू कशी आहेस ?’ त्याने विचारलं . मग ती बोलत राहिली .नोकरी, संसार ,सारी धावपळ .तो ऐकत होता . ती म्हणाली ,’आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे.’ ‘ओह ! … हॅपी वेडिंग ऍनिव्हर्सरी ! मग आज काय विशेष ?’ ‘काही नाही रे. किती वर्षं झाली आता लग्नाला .पण आज तुझी आठवण आली .माझ्या लग्नाच्या दिवशी मी तुला फोन करीन म्हणलं होतं .आणि तो राहिला ; पण माझ्या लक्षात होतं .’ पुढे ती बोलत राहिली . मग त्यांचं संभाषण थांबलं. तो निघाला .त्याच जुनाट बारकडे. तो बार अजुनी तसाच होता . तो त्यासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने ते पुसलं . मग तो स्वतःशीच हसला . तो आत गेला नाही . तो उलट फिरला आणि घराच्या दिशेने निघाला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1826 views

💬 प्रतिसाद (6)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/07/2024 - 09:01 नवीन
वाह ! आवडले. लिहिते राहा. मुझे किसी के बदल जाने का गम नही है, बस कोई था, जिससे ये उम्मीद नही थी. -दिलीप बिरुटे (नीट घराच्या दिशेने निघालेला)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 06/07/2024 - 09:42 नवीन
लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत. एक छानसा लघुपट बनवला जाऊ शकतो या कथेवर. प्रा.डाँ.नी दिलेला शेर पण चपखल.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 06/07/2024 - 16:18 नवीन
लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत.
+१ लहानशीच पण परिणामकारक कथा आवडलीच, फक्त मला मला मुकेश ऐवजी 'हा मैने भी प्यार किया है' चित्रपटातील काही गाणी आठवली!
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Fri, 06/07/2024 - 09:42 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 06/23/2024 - 10:43 नवीन
वाचक मंडळी मी आपला खूप खूप आभारी आहे .
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 06/23/2024 - 10:45 नवीन
बिरुटे सर चित्रगुप्त टर्मिनेटर अहिरावण विशेष आभार .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा