Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तो

म
मार्गी
Mon, 06/03/2024 - 12:47
दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं! सध्या कोकणात देवगडला एका निवांत जागी राहण्याचा व परिसरामध्ये फिरण्याचा योग आहे. इतका शांत आणि अप्रतिम निसर्ग. निसर्गाच्या जवळ येणं एक प्रकारे ध्यानाचा अनुभव देऊन जातं. आज देवगड- कुणकेश्वर किनारी रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद लुटला. अक्षरश: लुटला. स्वर्गसुख. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे झालेला हिरवागार आसमंत! देवगड बीच व पवनचक्की परिसरामध्ये असलेली भव्य शिव मूर्ती! तिथून किनार्‍यालगत कुणकेश्वरकडे जाणारा रस्ता! अवाक् करणारा अनुभव! नंतर पावसामध्ये चढणार्‍या व उतरणार्‍या रस्त्याची मजा! रस्त्याजवळ छोट्या वाड्या आणि गावात जाणारे लाल मातीच्या वाटा! अधिक काही बोलत नाही. फोटोजचा आनंद नक्की घ्या. आणि हो, हे फोटो विचलित करू शकतात. कृपया तुमच्या जोखमीवर पाहा! :)       आणि आज जागतिक सायकल दिवससुद्धा आहे! तेव्हा happy cycling and happy fitness! फायनान्ससाठी जे खरं आहे ते फिटनेसच्याही बाबतीत खरं आहे- थोडा ताण चांगला असतो- a little bit of discomfort is very comfortable in the long run! धन्यवाद. (निरंजन वेलणकर 09422108376)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 899 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा