Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

नाळ २-मराठी सिनेमा

B
Bhakti
Sat, 05/18/2024 - 08:53
💬 9 प्रतिसाद
क समथिंग इज मिसिंग असं वाटतं असतांनाच काही मराठी सिनेमे मन गाभाऱ्याशी पुन्हा नाळ जुळवून देतात.नाळ सिनेमाने आई आणि मुल या नात्याची वेगळीच कथा दाखवली होती.चैत्याचा गोड निरागस वावर ,त्याची आईच्या नजरेत भरण्याची हुरहूर सगळं कसं अलगद तरीही मनात वेगाने घडत होतं. त्याच चैत्याची मोठी झाल्यावर एकाच नाळाने जोडले गेलेले बहिण -भावंड यांची कहाणी "नाळ २" सिनेमात आहे. इथेही चैत्याची तिच तगमग आहे चिम्मी त्याची बहीण त्याला कधी राखी बांधणार.पण इत्तूशी चिमणी मस्त मिरची सारखीच तिखट, नाही म्हणजे नाही ऐकत.हळूहळू चिम्मी चैतू आणि 'मनीदादा' यांच्या नात्याची वीण बांधली जात राहते.पण हे सगळं या चिमुकल्यांच्या विश्वात घडतांना गावातल्या डोंगराच्या जादूई विहिरीने ऐकलं पाहिजे ना तर ते १००% घडणार.तेव्हा चिमूकले मोठं साहस करायला निघतात. खरं म्हणजे पहिल्या दृश्यापासूनच सह्याद्री मनात बिंबवला आहे.निसर्गरम्य जुन्नर,जीवधन किल्ला, नाणेघाट,तलाव परिसर निसर्गसौंदर्याची उधळण संपूर्ण चित्रपटात आहे.तसचं गावातली चूल, छोट्या छोट्या गल्ली, सारवलेल्या भिंती, पद्धतशीर त्या खोपट्यात मांडणीत मांडलेली भांडी,पाण्याच्या खळखळाट अगदी एकूण एक फ्रेम अप्रतिम आहे. गाणी डराव डराव भिंगोरी लहान मुलांसाठी आहे पण संगीत आणि गमतीशीर असल्याने परत परत ऐकावी वाटतात. चिम्मी चैत्याला धावत धावत राखी बांधते. जादूई विहिरीत मागितलेल्या इच्छांची भिरभिरणारी फुले एकाच नाळेने जोडलेल्या नात्यांना नवा सुगंध देतात.. -भक्ती

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3462 views

💬 प्रतिसाद (9)
च
चौथा कोनाडा Sat, 05/18/2024 - 13:57 नवीन
सुंदर लिहिलंय ! मंजुळ्यांच्या सिनेमातील गाव कायम लक्षात राहिल असं असतं, मग तो पिस्तुल्या असो, फॅण्ड्री-सैराट असो, किंवा पावसातील निबंध असो. आणि या सिनेमाचा दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंती हा मंजुळे स्कुलचाच प्रतिनिधी आहे !
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 05/18/2024 - 16:50 नवीन
धन्यवाद चौको.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 05/18/2024 - 19:48 नवीन
आधी नाळ - १ पाहतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 05/29/2024 - 05:17 नवीन
सुंदर लिहिलंय !
  • Log in or register to post comments
च
चक्कर_बंडा गुरुवार, 05/30/2024 - 09:11 नवीन
ऑक्टोबर २०२२ ची सुरुवात, नाळ २ चं चित्रीकरण पिंपळगाव जोगा धरण, खिरेश्वर भागात सुरू होतं त्यावेळच्या हरिश्चंद्रगड वारीवेळी नागराज मंजुळे हे नाव दरवाज्यावर असलेली व्हॅनिटी व्हॅन रस्त्याकडेला दिसली होती, अजून ही एक दोन व्हॅन होत्या आसपास. पुढे एका ठिकाणी मोठ्या संख्येने बरेचं लोक नाश्ता करीत होते, आम्हाला ते ट्रेकर्स ग्रुपचे लोक वाटले. आम्ही ही तिथे गैरसमजाने घुसलो होतो पण त्यांनी सांगितले की ती सोय फक्त नाळ सिनेमाच्या सहाय्यक लोकांसाठीचं आहे तेव्हा काढता पाय घेतला, त्या लोकांच्या मुक्कामाची सोय ही तिथेच होती बहुदा. परतताना दुसऱ्या दिवशी दुपारी मंजुळेंची व्हॅन धरणाच्या भरावाजवळ होती पण नेमकं चित्रीकरण कुठे सुरु आहे ते मात्र दिसलं नाही व आम्ही आमच्या मार्गाने निघून आलो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 05/30/2024 - 09:21 नवीन
ओह, पाहायला पाहिजे होतं थोडं शुटिंग.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/31/2024 - 05:13 नवीन

सिनेमाची ओळख थोडक्यात असली तरी (अजून दळन मोठं केलं पाहिजे)  छान आहे.
आता सिनेमा पाहणे आले. लिहिते राहा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. धन्स.

-दिलीप बिरुटे

  • Log in or register to post comments
य
यश राज Tue, 06/18/2024 - 06:10 नवीन
छान लिहिलय. परवाच नाळ २ बघितला, खुप आवडला. चैतू, चिमी व मणी यांची कामे खुप छान व निरागस. चिमुरड्या चिमीचे मणिदादावर असलेले प्रेम, त्याला इतर मुलांनी दिलेला त्रास तिला सहन होत नाही व त्यांना ती बारिक दगड मारते व ओरडते. एकदमच निरागस. चैत्याला भाऊ म्हणुन घेण्याअगोदर ती त्याला अगदी तावुन सुलाखुन घेते. चैत्याचे काम पण अप्रतिम, चिमिचे प्रेम मिळण्यासाठी तिळ तिळ तुटणारा चैत्या, तिच्या आग्रहाखातर जादुच्या विहिरीपर्यंत तिला घेवुन जाण्याची धडपड. खिशात राखि घेवुन फिरतो. एकदम मस्त. सर्व चित्रिकरण स्थळे अप्रतिम. एकंदरित खुप दिवसांनंतर अप्रतिम मराठी चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 06/18/2024 - 14:43 नवीन
मीही परवा पाहिला. चित्रीकरणाची दृष्ये पाहिल्यावर इकडे गेलो होतो ते आठवलं. पण मंजुळे सोलापुरजवळ करतील आणि तिकडेही असे डोंगर तलाव असावेत असं वाटलं. वरच्या खरडीतून नक्की झालं की तेच धरण आहे. ही जागा पावसाळ्यात सुंदर असते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा