Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मौन!

B
Bhakti
Sun, 05/12/2024 - 16:04
💬 62 प्रतिसाद
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही. भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो. मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात. सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात. ही पाखरं ब्रम्ह मुहूर्तावर नवीन दिवसाचं निसर्गाकडून आवतन देतात. अजूनही कोकिळा कुठेतरी संध्याकाळी सुद्धा गाते तेव्हा उगाच मरगळ झटकून संध्येचा घट प्यायला लावते. प्राणायाम मधल्या त्या प्रत्येक श्वासातून एक नवीन नवीन क्षण जन्म घेत राहतो. उन्हाळाची उष्ण हवा ह्रदयावर कंपण तरंग टाकत राहते,थंडीतली हुडहुडी हाडांचा रक्तांचा संवाद घडवते,पावसाच्या सरींनी कर्णमार्गे मेंदूला तृप्ततेत भिजवते. मौनाचा कृष्णविवरं अनंत शक्यतांचे दालन खुले करतो. -भक्ती

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12269 views

💬 प्रतिसाद (62)
प
प्रचेतस Tue, 05/14/2024 - 09:43 नवीन
मिडल इस्ट संदर्भात गिरिश कुबेरांची एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, अधर्मयुद्ध ही तीन पुस्तके वाचनीय आहेत. तर इस्लामचा इतिहास आणि त्या नंतरचे पहिल्या चार खलिफांचा इतिहास वाचण्यासाठी शेषराव मोरे यांचे मुस्लिम मनाचा शोध आणि चार आदर्श खलिफा ह्यांसारखी उत्कृष्ट, अस्सल आणि माहितीपूर्ण अशी दुसरी पुस्तके नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 05/14/2024 - 10:56 नवीन
धन्यवाद प्रचेतस सर
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 05/14/2024 - 10:33 नवीन
इरावती कर्वे यांचे समाजशास्त्राची पुस्तके उत्तम आहे,मी तर म्हणते वय १६-१८ मध्येच वाचायला पाहिजे. https://epustakalay.com/book/186065-maraathii-lokaanchii-sanskriti-by-iravati-karve/ इथे मराठी लोकांची संस्कृती पुस्तक पीडीएफ आहे. बाकी ओनलाइन वाचता येत नसल्याने विकत घेण्याचा मानस आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 05/14/2024 - 10:56 नवीन
धन्यवाद ताई
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Tue, 05/14/2024 - 10:59 नवीन
मक्केतील उठाव हे वाचलंत का?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 05/14/2024 - 12:10 नवीन
हो. हुप्प्या ह्यांच. आणखी कुठे लेखमाला आहे का? माबो मीपा ऐसी? किंवा प्रवासवर्णनात उल्लेख? जसे बिपीन कार्यकर्ते ह्यांचे मेज़ खोबार?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/14/2024 - 15:22 नवीन
अशी पुस्तके वाचनालयात बरीच आहेत.
मिडल इस्ट, तिथला इतिहास, इजिप्त, , संशोधन, इस्लामिक सत्ता, उमैय्यद खिलाफत, अब्बासीद खिलाफत, तिथल्या लढाया, वगैरे असे.
पण ती मी घेत नाही. तोचतोचपणा आला आहे. त्यांचा गोषवारा पाच दहा ओळीत सांगता येईल. ' Aljazeera world' documentary पाहा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 05/14/2024 - 15:52 नवीन
मागे निळूदामले ह्यांचे सीरिया सगळे विरुद्ध सगळे वाचले. त्यामुळे इंट्रेस्ट वाढलाय.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 05/14/2024 - 10:42 नवीन
च्यामारी मौनाच्या लेखावर लोक लै बोलू राह्यले... =))
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 05/14/2024 - 17:14 नवीन
ह्यालाच म्हणतात 'मौनाची शक्ती'!
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Tue, 05/14/2024 - 10:58 नवीन
खूप गहन लिहिलंत भक्ति, काही वाक्यांचे अर्थ लागायला अजून २-३ वेळा वाचावं लागेल :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/14/2024 - 15:16 नवीन
जिए नियतीकडे सतत वळतात कारण...... नियतीनेच त्यांच्या आयुष्यात खेळ केला. कडवटपणा आणला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा