Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ घोषित

व
वेडा बेडूक
Tue, 04/30/2024 - 18:06
🗣 2 प्रतिसाद
बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्य संघातील 15 आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी 20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आयपीएल स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने टीकेचा धनी ठरत असलेल्या हार्दिक पंड्या याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ खालीलप्रमाणे:
  • फलंदाज - ४: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव
  • अष्टपैलू - ४: हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल,शिवम दुबे,
  • यष्टीरक्षक - २: ऋषभ पंत, संजू सॅमसन
  • फिरकीपटू - २: कुलदीप यादव, युजवेंद्र चहल
  • वेगवान गोलंदाज - ३: अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज
  • राखीव खेळाडू - ४: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.
हा तात्पुरत्या स्वरुपाचा संघ असून २५ मे पर्यंत प्रत्येक देशाला घोषित केलेल्या संघात बदल करण्याची मुभा आहे. या संघाविषयी क्रिकेटप्रेमी मिपाकरांचं काय मत आहे? कोणते खेळाडू यात नको होते? कोण असायला हवे होते? या संघात काही बदल होतील का? याविषयी चर्चा व्हावी. विनम्र विनंती: क्रिकेट मध्ये रस नसलेल्यांनी किंवा "कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट" अशी मतं असलेल्यांनी कृपया ती मतं या धाग्यावर व्यक्त करुन विषयांतर करु नये. विषयाला धरुन चर्चा करावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1339 views

🗣 चर्चा (2)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/01/2024 - 09:51 नवीन
हार्दीक पांड्याचा परफॉर्मन्स पाहिलाय आयपीएल मधे फोकलीच्याला घेतलं नसतं तरी चाललं असतं. संघात अजून एखादा वेगवान गोलंदाज पाहिजे होता. बुमराचं काय चाललं तर चालतो. बाकी, अजून लिहित राहीन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 05/01/2024 - 11:23 नवीन
क्रिकेट हा फालतू खेळ आहे. पाहून आजीबात वेळ घालवू नये असा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा