Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

व
विवेकपटाईत
Tue, 04/30/2024 - 13:33
🗣 250 प्रतिसाद
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते. सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल. देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 49810 views

🗣 चर्चा (250)
क
कर्नलतपस्वी Wed, 05/01/2024 - 12:46 नवीन
सारे अनुमान, भाकीते फेल होतात का काय? काही भक्त कनफ्युजीया गेलेत. काही दुख्खी. चौथा का पाचवा स्तंभ सुद्धा विभाजीत झालायं. चार जुन लाच कळेल जेव्हां मतदाराने इ व्ही एम च्या कानात कय सांगीतले ते उघड होईल तेव्हां.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/01/2024 - 13:15 नवीन
पटाईत काकांचा नेहमीप्रमाणे ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ लेख !
जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
ख्या ख्या ख्या . मी मतदान करत नाही ( किमान गेले काही वर्षे तरी केले नाहीये) कारण मला अपेक्षित असलेली धोरणे कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोवर नाहीत , जसे की १. सर्वच्यासर्व मंदिरे हिंदु संस्थांच्या अखत्यारित देणे अन सरकार्ने पुजारी वगैरे नेमण्याच्या ट्रस्टी वगैरे नेमण्याच्या भानगडीत न पडणे. २. जिथे जिथे पुराव्याने शाबित करता येईल ती सर्व मंदिरे पुन्हा हिंदुंच्या ताब्यात देणे अन त्यांचा जीर्णोर्ध्दार करणे. + त्या बदल्यात कोणालाही पर्यायी जमीन वगैरे न देणे. ३. इन्डिव्हिजुअल इनकम टॅक्स पुर्णपणे अ‍ॅबोलिश करणे. ह्या मुळे निर्माण होणारा डीफिसिट हा जी.एस.टी. वाढवुन वसुल करणे. पेट्रोल आणि अल्कोहोल जी.एस.टी.च्या कक्षेत आणणे. वाहन खरेदी करताना वसुल केलेल्या रोड टॅक्स मधुन वापरानुसार टोलचे पैसे वसुल करणे. जिथे जिथे डबल टॅक्सेशन असेल तिथे तिथे ते ठरवुन संपवणे. ४. आरक्षणाची मर्यादा ५०% वर फिक्स करणे. त्यात सर्व ब्राह्मणेतर समुदायांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटणी करुन देणे. ५. पाकिस्तान ऑक्युपाईड कश्मीर आपण गमावलेला असुन तिथे हिंदुंना जगणे आता अन भविष्यत अशक्य प्राय आहे हे मान्य करणे अन तिकडे अन डिफेन्स वर होणारा खर्च अत्यल्प करणे. ६. बेसिक हेल्थकेअर आणि १२ पर्यंतचे शिक्षण ह्या व्यतिरिक्त सरकारने कोणतेही वेल्फेअर स्टेटचे काम न करणे. कोणत्याही विशिष्ठ समुदायांसाठी विशेष सरकारी संस्था न चालवणे. ७. शेतीला बिजनेस टॅक्स च्या कक्षेत आणणे आणि ज्या शेतकर्‍यांनी मागील वर्षी रीतसर बिजनेस टॅक्स फाईल केला असेल त्यांनाच शेती विषयक सबसीडी आणि कर्जमाफी देणे. ८. पोलीस आणि आर.टी.ओ आणि तत्सम सरकारी कर्मचार्‍यांना दंड रक्कम वसुल करण्याचा हक्क पुर्णपणे काढुन घेणे. कार्ड स्वाईप मशीन हातात घेऊन उभा असलेला सरकारी वर्दीतील माणुस हाच भ्रष्टाचाराचा पुरावा मानुन त्याला ताबडतोब सेवा मुक्त करणे. ९. mpsc upsc वगैरे सरकारी परीक्षांची कमाल वयोमर्यादा २५ करणे. सर्वच सरकारी सेंवांमध्ये लॅटरल इन्ट्री सुरु करणे. १०. इन जनरल , - सरकार चालवणे - देश चालवणे हा एक प्रकारचा बिजनेस चालवणे आहे असे समजुन , जसे कोणत्याही खाजगी कंपन्यांचा सी.ई.ओ आणि डायरेक्टर हे त्या कंपनीच्या शेयर होल्डर्स ना आन्सरेबल असतात तसेच पंतप्रधान अन मुख्यमंत्री अन सर्वच मंत्र्यांबाबत करणे. असो. ह्या सार्‍या स्वप्नवत अपेक्षा आहेत हे मान्य . म्हणुनच आम्ही मतदान करत नाही. पण त्यातल्यात्यात न्याय्य योजना अन मनरेगा सदृष समाजवादी प्रकल्प राबवणार्‍या काँग्रेस , आत्मघातकी कम्युनिस्ट , संधीसाधु स्थानिक राजकीय पक्षांच्या पेक्षा बरं म्हणुन आम्ही बीजेपी ला चीअर्स करतो बस इतकेच =))))
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/01/2024 - 14:34 नवीन
मला अपेक्षित असलेली धोरणे कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोवर नाहीत , जसे की
सहमत
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 05/01/2024 - 21:01 नवीन
४. आरक्षणाची मर्यादा ५०% वर फिक्स करणे. त्यात सर्व ब्राह्मणेतर समुदायांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटणी करुन देणे.
चालुद्या जातीवाद. जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक नाहीतच !!!
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 09:53 नवीन
>>>जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक नाहीतच !!! आहेत? अरेच्या हे काय नवीन... ब्रिगेडी पवाराव्हाडइत्य्तादी वेग्ळेच सांगतात ब्राह्मणांनीच उर्वरित समाजाला पिडले आहे म्हणून... =))
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/01/2024 - 14:20 नवीन
जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. १००%
  • Log in or register to post comments
भ
भागो Wed, 05/01/2024 - 15:27 नवीन
ह्या देशात अजूनही लोकशाही आहे. मतदान न केअने हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे. अजून नॉर्थ कोरीया, चायना, रशिया, इराण स्टाईल लोकशाही यायला वेळ आहे. ४ जून पर्यंत तरी थांबा. नंतर सुप्रीम लीडरला ९९% मते मिळतील.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/01/2024 - 15:33 नवीन
मतदान न केअने हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे. ? मतदान करणे हि जबाबदारी आहे जबाबदार नागरिकांची
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/01/2024 - 14:35 नवीन
जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही.
सहमत
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 05/01/2024 - 15:41 नवीन
मतदान कमी झाले की सत्ताधारीच सत्तेवर येतात हा इतिहास आहे. सध्या सत्ताधारी एनडीए आहे.. तेव्हा विरोधकांनी २०३४ च्या तयारीला लागावे.
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा Wed, 05/01/2024 - 18:38 नवीन
वामन देशमुख,
आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! संघप्रणीत भाजपचे मोदी दहा वर्षांपासून प्रचंड बहुमतासह सत्तेत आहेत!
मोदी तामिळनाडूत सत्तेत नाहीत. बाकी, प्रचंड बहुमतासह राजीव गांधीही सत्तेत होते. काय केलं त्यांनी? मोदींच्या शतांशाने तरी काम केलं का? बरं ते जाऊ द्या. तुम्ही काय केलं ते सांगा. हिंदूंच्या जिवाची काय किंमत आहे ते माहितीये ना ? मग मोदींना दोष कशासाठी ? -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
भ
भागो Wed, 05/01/2024 - 20:42 नवीन
जर हिंदू हिंदू खेळून झाले असेल तर मी काही बोलू इच्छितो. १ महागई चे आम्ही काय करावे? पेट्रोल डीझेल कुकिंग गॅसच्या औषधांच्या. किमती म्हणजे जवळ जवळ प्रत्येक गोष्टीने पाच पाच दहा दहा रुपयांनी जंप मारत आहेत. कसे जगावे माणसाने? २ नोकऱ्या कुठे आहेत? तुम्ही म्हणाल स्वतःचा व्यवसाय सुरु करा. आपल्या सुचणे बद्दल आभारी आहे. ३ जागतिक सर्वेक्षणात असे दिसते आहे कि बांगलादेश, श्री लंका आणि मध्ये मध्ये पाकिस्तान आपल्या पेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. तुम्ही म्हणणार ते साले चोर लोक आहेत. ४ आपण मंगळावर जाणार आहोत. पण इकडे मंगळी मुले मुली लग्नाच्या थांबल्या आहेत. ५ रुपयाची घसरण चालू आहे. ६ चीनची घूस खोरी चालू आहे. ती कोण थांबवणार? कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. ७ घुसके मारा म्हणायला मजा येते. पण सुसंस्कृत जगात आपली तुलना उत्तर कोरिया, रशिया अशा राष्ट्राशी होते आहे. चला आम्ही त्यांना फाट्यावर मारतो अस म्हणूया. ८ मालदीव पण आपल्याला भारी पडते आहे. आपण उगीचच तिकडे काडी टाकली. आत्ताच झालेल्या निवडणुकीत कुणाची वाट लागली. दोन महिन्या पूर्वी भक्त उड्या मारत होते. आता...? प्रश्न खूप आहेत. पण म्हणूनच हिदू मुस्लीम ढोल वाजवून लोकांची डोकी बधीर केली जात आहेत. बजाव रे. और जोरसे बजाव.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/02/2024 - 03:44 नवीन
जर हिंदू हिंदू खेळून झाले असेल तर मी काही बोलू इच्छितो. १ महागई चे आम्ही काय करावे? पेट्रोल डीझेल कुकिंग गॅसच्या औषधांच्या. किमती म्हणजे जवळ जवळ प्रत्येक गोष्टीने पाच पाच दहा दहा रुपयांनी जंप मारत आहेत. कसे जगावे माणसाने? काँग्रेस असते तर काय फरक पडलला असता? महागाई जगभर वाढली आहे, फक्त भारतात नाही , उलट मेक इन इंडिया सारखया उपक्रमांमुळे नोकऱ्या वाढल्या परकीय चलन मिळते २ नोकऱ्या कुठे आहेत? तुम्ही म्हणाल स्वतःचा व्यवसाय सुरु करा. आपल्या सुचणे बद्दल आभारी आहे. नोकरी हा काही हकक नाही ,अर्थ व्यस्था वाढत आहे त्यात नोकऱ्या वाढतच आहेत कि उद्धरण देतो तुम्हला भारत स्वतः किती गोष्टी बनवतो याचे कौतिक नाही .. नुकतेच आमच्या देशातील एकमेव पॉलिएथिलिन उत्पादक बंद पडला , आणि हा छोटा देश असून जगातील १० वि मोठी अर्थव्यस्था असून दरडोई उत्तप्प्न अंदाजे ६०,००० डॉलर प्रति व्यक्ती असून ,, भारतात काही वर्षांपूर्वी किती तरी गोष्टीत नोकऱ्या अस्तित्वात नवहत्या ( सपलाय चेन / रिटेल , फिनतेक इत्यादी आज आहेत ! वाहन उत्पादन ! ( अर्हताःत याचे श्रेय फ्क्त मोदींना नाही राव आणि मनमोहन सिंग यानं पण आहे ) ३ जागतिक सर्वेक्षणात असे दिसते आहे कि बांगलादेश, श्री लंका आणि मध्ये मध्ये पाकिस्तान आपल्या पेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. तुम्ही म्हणणार ते साले चोर लोक आहेत. श्रीलंकणकेच मध्ये आर्थिक अराजक नुकतेच झाले ते विसरलात का बांगलादेशने प्रगती केली आहे पण त्यात भाग स्वस्त मजुरी जास्त आहे , एकूण देश गरीबच आहे पाकिस्तान आणि प्रगती???? ४ आपण मंगळावर जाणार आहोत. पण इकडे मंगळी मुले मुली लग्नाच्या थांबल्या आहेत. हे म्हणजे राष्टपतीने देश गरीब आह तम्हणून झोपडीत राहिले पाहिजे असे म्हण्यासारखे आहे , अंतरिक्ष उड्डाण हा उद्योग हाड लांब पाल्याचाच उपक्रम आहे त्याकडे तसेच बघितले पाहिजे ५ रुपयाची घसरण चालू आहे. ती अनेक वर्षे चालू आहे त्याबरोबर उत्पन्न हि वाढत आहे , लोकांचे आणि देशाचे हि ६ चीनची घूस खोरी चालू आहे. ती कोण थांबवणार? कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. याबाबत मला माहिती नाही तुमचे म्हणणे कदाचित बरोबर असेल हि पण चीन ला भूभाग किंवा पाकिस्तान सारखे धार्मिक युद्ध भारताबरोअबर खेळापेक्षा आर्थिक व्यापारी युद्ध चढाओढ खेळण्यात जास्त रस आहे असे वाटते ७ घुसके मारा म्हणायला मजा येते. पण सुसंस्कृत जगात आपली तुलना उत्तर कोरिया, रशिया अशा राष्ट्राशी होते आहे. चला आम्ही त्यांना फाट्यावर मारतो अस म्हणूया. हे म्हणायची मानसिकता तरी आली? "डाव्या गालावर मारल्यावर उजवा गाळ पूढे करा शेवटी मारणारा थकेल आणि निघून जाईल" या वृत्ती पेक्षा बरे कि इस्राईल हे छोटुसे असून कितीतरी दशके "घुसेगें भी और मारेगें भी करीत आहे," अमेरिका करते इतर राष्ट्रांना एक सावधानतेचा इशारा म्हणून आशय गोष्टी सरकार करत असेल ,, असते ८ मालदीव पण आपल्याला भारी पडते आहे. आपण उगीचच तिकडे काडी टाकली. आत्ताच झालेल्या निवडणुकीत कुणाची वाट लागली. दोन महिन्या पूर्वी भक्त उड्या मारत होते. आता...? प्रश्न खूप आहेत. पण म्हणूनच हिदू मुस्लीम ढोल वाजवून लोकांची डोकी बधीर केली जात आहेत. गेली ६० वर्षे हा ढोल कोणी बजावत आहे ? मान्य देशाचे / समाजाचे धर्म हेच फक्त प्रश्न नाहीत पण म्हणून ८०% च्या भावनाना मुद्डमून डावललं गेलं तो तराजू परत मध्ये आणला तर काय बिघडले आणि १० वर्षे भाजप सरकार जे करते ते फक्त हिंडून साठी हा खोटा प्रचार आहे ... कोणता कायदा आहे कि ज्यात तुम्ही अल्पसंख्यांक म्हणून तुम्हाला एखादी सरकारी ओशट मिळणार नाही पण तो गोष्ट ८०% न्या सहज देऊ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/02/2024 - 06:40 नवीन
सर ऑस्ट्रेलियातील रस्तांवर खड्डे आहेत का?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/02/2024 - 06:46 नवीन
ए भौ अमरेंद्र बाहुबली लै झाला तुझा बाष्कळपणा ऑस्ट्रेल्यात खड्डे आहेत छान छान हॅगिंदाऱ्या आहेत .. यायचं बघायला ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/02/2024 - 06:56 नवीन
मी केंव्हा पासून सांगतोय कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय ?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 09:54 नवीन
सहमत आहे. ४ जुनला त्यांचे थोबाड फुटणारच आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 05/05/2024 - 06:36 नवीन
जर थोडी बहुत गुगल करून माहिती घेतली असती तर असला बिनबुडाचा प्रतिसाद दिला नसता. दहा वर्षात त्यापूर्वीच्या तीस-पस्तीस वर्षात जेवढ्या नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत त्यापेक्षा जास्त दहा वर्षात निर्मित झाल्या आहेत १ . रेल्वे कोच निर्मिती 2004 ते 14 फक्त 7000. 2014 ते 23 - 40000. साडे पाच पट. २. नवीन रेल्वे लाईन पूर्वीच्या३० वर्षांपेक्षा जास्त. ३. दोन्ही डीएफसी 90% पूर्ण झाले आणि इथे किमान एक लक्ष पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. याशिवाय नवीन रेल्वे पॅसेंजर गाड्या मोठ्या संख्येने सुरू झाल्या आहेत. ४. पूर्वीच्या 23 हजार किमी विद्युतीकरण जागे 26000 किमी विद्युतीकरण दहा वर्षात. ५. शेकडो रेल्वे स्थानकाचे नवीन करण झाले साफसफाईसाठी लाखाच्या वर व्यक्तींची नियुक्ती केल्या केली सर्व कोचेस बाय टॉयलेट झाले घाण रूळवर पडणे बंद झाले आज एकही बिना मनुष्याचे रेल्वे क्रॉसिंग नाही. ६. आज दरवर्षी चार हजार जास्त किसान रेल्वे चालतात त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भाव मिळतो. फक्त रेल्वेने लाखो नोकऱ्या दिल्या आहेत. वीज उत्पादन. १७० टक्के वाढले. आज गावात अकरा तास ऐवजी वीस तासांच्या वरती उपलब्ध आहे. गावांमध्ये रोजगार वाढला. वीज निर्मितीत ही रोजगार दीडपट वाढला असेल. ७. मोबाईल उत्पादन 18 कोटींपासून चार लक्ष कोटींच्या वर केले अर्थात वीस पट रोजगार इथेच निर्मित झाला. ७. महामार्गांची निर्मिती पूर्वीच्या 70 वर्षांपेक्षा जास्त झाली. ८. वाढत्या मेट्रो नेटवर्क ने २ लाखाच्या वर ई रिक्षा फक्त दिल्लीत चालतात. ९. फायबर केबल अडीच हजार किलोमीटर जागी पाच लक्ष किलोमीटरच्या वर टाकल्या गेले ज्यामुळे कारोना काळात भारतात उत्तराखंडच्या दुर्गंध भागातूनही वर्क फॉर होम होताना मी स्वतः डोळ्याने बघितले आहे. जगातील अधिकांश नेटवर्क बेस रोजगार भारताकडे वळला. ९. अधिक लिहीत नाही गुगल करून आकडे पहा तर तुम्हाला कळेल मध उत्पादन असो की मत्स्य उत्पादन दूध उत्पादन असो की अन्न उत्पादन सर्व क्षेत्रात दुपटीपेक्षा जास्त प्रगती झाली आहे. मेडिकल कॉलेज AIIMS सर्वांची संख्या वाढली. एवढे असूनही तुम्हाला नोकऱ्या दिसत नाही हे आश्चर्य आहे. देशातील सर्वोच्च स्तरांच्या सुरक्षा अधिकारी सोबत काम केल्यामुळे एवढे निश्चित सांगू शकतो २०१४ पूर्वी चीनने आपल्या भूभागावर कब्जे केले आहे त्यानंतर एक इंच ही कब्जा केला नाही. काही परत मिळवली असेल हे वेगळे. ६० कोटी नवीन बँक खाते, खात्यात सब्सिडी upi, त्यामूळे मुद्रा लोन सहित विभिन्न स्कीम मध्ये २० कोटींच्या वर छोट्या लोकांना कर्ज मिळाले. कोट्यावधी रोजगार निर्मित झाला. उत्तर देत गेलो तर एक मोठा लेख होईल. स्वतः ल शिक्षित म्हणाविणार्यानी प्रतिसाद देण्यापूर्वी तथ्य तपासावे पाहिजे.बाकी तुमच्या प्रतिसादाचा धग्याशी संबंध नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/10/2024 - 08:40 नवीन
धन्यवाद विवेक. प्रश्न पडतो की ही एवढे काम झाले आहे तर 'घटना बदलणे/हिंदु मुस्लिम वाद्/मंगळ्सूत्रे' ह्या विषयावर निवडणुकीत चर्चा का? ते सॅम पित्रोदा काहीतरी वाह्यात बोलले की त्याची एवढी चर्चा? नितिन गडकरी/अश्विनी वैष्ण्व/जयशंकर अशा अनेक मंत्र्यांच्या खात्यांनी चांगली कामे केली आहेत. हे नेते ह्यावर बोलत का नाहीत? गडकरी गेले ५ वर्षे अनेक परिषदांमध्ये दिसायचे."भारतात सर्वात जास्त सिमेंट माझे मंत्रालय विकत घेते. अमुक लाख लोकांना रोजगार मिळालाय.." वगैरे सांगायचे. हे सर्व आता सांगत का नाहीत?
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 05/10/2024 - 10:02 नवीन
या मंत्रालयांच्या कामाची लिटमस चाचणी आपोआप होतीय. बेतालपणे भांडवली गुंतवणूक करुन नेत्रदिपक प्रगती तर कोणत्याही सरकारांना करता आली असती. पण भांडवली गुंतवणुकीचा परतावा मिळण्याचा कालावधी जर प्रमाणबाहेरचा दीर्घ असेल तर सरकारच्या इतर योजनांवर त्याचा वाईट परिणाम दिसायला लागतो. आरोग्य आणि शिक्षणावरील किरकोळ तरतूद आणि कर्जाचा वाढता बोजा या गोष्टी आताच दिसायला लागल्या आहेत. संरक्षणाच्या बाबतीत प्रदीर्घ युद्ध छेडण्याची क्षमता नसल्यामुळे केवळ पाकिस्तानला बेटकुळी दाखवण्यापलीकडे भारत काही करू शकत नाही असे दिसतंय. वंदे भारतच्या चाहत्यांची फेसबुकवर तुफान धुलाई होतीय. सामान्य वेगाने जाणारी वंदे भारत दिसते आणि नया भारतवाल्यांचा बीपी इकडे वाढतोय असे मिम्स फिरतायत. पण सामान्य रेल्वे प्रवास अतिशय उबग येईल इतका घाणेरडा आणि त्रासदायक झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या कुठल्यातरी भारतातीलच परिषदांमधल्या डरकाळ्या ऐकून भक्तांना हर्षवायू होत असतो. अशी मग्रूरीची भाषा ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वापरू शकत नाहीत आणि महुआ मोईतरा तसेच राहुल गांधींची बडतर्फी, महाराष्ट्रातील सरकार पडतांना न्यायालय आणि निवडणूक आयोग तसेच सभापती यांच्या वागण्याचे समर्थन ते देशाबाहेर करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, भारतीय जनता हे विसरली देखील असेल पण आंतरराष्ट्रीय समुदायाकडे याचा हिशोब आहे. बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली का ते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/10/2024 - 16:39 नवीन
न्यायालय आणि निवडणूक आयोग तसेच सभापती यांच्या वागण्याचे समर्थन ते देशाबाहेर करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, भारतीय जनता हे विसरली देखील असेल पण आंतरराष्ट्रीय समुदायाकडे याचा हिशोब आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने भीक घालणं कधीच सोडून दिलंय. त्रुदो सारख्या भिकारड्या ला भीक घालत नाहीच. अमेरिकेने पनून बद्दल भरपूर आरडाओरडा केलाय पण पुढे काय झालं? काही नाही त्यांनी आपण S -४०० क्षेपणास्त्र प्रणाली घेऊ नये म्हणून catsaa ची धमकी दिली त्यांना भीक न घालता भारताने दोन बॅटरी (एक अपकिस्तान आणि एक चीनविरुद्ध) उभ्या केल्या सुद्धा रशिया कडून तेल घ्यायचं नाही म्हणून युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने सांगितलं त्यांना भारताने फाटा मारला यानि आज आपल्या गरजेच्या ४० % तेल आपण रशिया कडून घेतोय. युरोपीय देशांना स्वच्छ शब्दात सांगितलं तुम्ही आपलं तेल आणि नैसर्गिक वायू रशिया कडून घेणं बंद करा आणि मग आम्हाला सांगा. चीनच्या नाकावर टिच्चून फिलिपाइन्स ला ब्राह्मोस क्षेपणास्त्रे विकत दिली. व्हिएतनामशी बोलणी चालू आहेत. पाकिस्तानला तर असंच कुणीही विचारत नाही. अरब देशांना फाट्यावर मारून भारताने इस्रायल ला दारुगोळा विकला आहे. https://thewire.in/government/govt-owned-munitions-india-ltd-exported-ordnance-to-israel-as-gaza-was-reduced-to-rubble दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका त्यांना फुकट कोव्हीड लशी देऊन त्यांच्यवर उपकार करुन ठेवला आहे . आता कुठला आंतरराष्ट्रीय समुदाय राहिला फुकटचा बागुलबुवा कसला उभा करताय?
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Fri, 05/10/2024 - 17:40 नवीन
बंद डोळ्यांनि जग बघणारा तुमच्या सारखा वैचारिक गुलाम मि आज पर्यंत पाहिला नाही! कोणि कितिहि पुरावे दिले तरि तुम्हि मोदिद्वेश आणि नेहरु गांधी घराण्याची चाटुगिरि करणे सोडनार नाही!! त्यामुळे राहुदे!!!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 05/10/2024 - 17:50 नवीन
कंट्रोल अंधभक्ता कंट्रोल. थोडी सभ्यता पाळ.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sat, 05/11/2024 - 04:24 नवीन
Image removed. लोल! कंट्रोल आणि सभ्यतेच्या बाता तुम्हि मारताय?? उठाले रे बाबा,, मेरेको नही रे इस.... :)
  • Log in or register to post comments
भ
भागो गुरुवार, 05/02/2024 - 04:38 नवीन
ओके, सर. अजून काही?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/02/2024 - 06:48 नवीन
भागो अजून काय? तुमच्या प्रश्नांना थोडी उत्तरे दिली बस एवढेच
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/02/2024 - 07:18 नवीन
प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद.मुद्दा मध्यम वर्ग कमी मतदान करतो हा आहे. कुणाला करतो हा नाही. राजनीतिक प्रतिसाद देण्याची गरज नव्हती. कारण हा धागा राजनीतिक नाही.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 09:55 नवीन
असं कसं..? ४ जुनपर्यंत खांग्रेसींना ओका-या काढायची संधी आहे... ते काढत आहेत
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/02/2024 - 10:24 नवीन
अहिरावण हा डूआयडी लईच पेटलाय. डू आय डी असल्याने सन्माननीय सदस्यांनी ह्या आयडी कडे दुर्लक्ष करावे.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 10:27 नवीन
अरेरे ! आम्ही सहज हात फिरवल.. तुमच्या मुस्काटीत बसली.. खेद आहे.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 05/02/2024 - 10:28 नवीन
अमरेंद्र बाहुबली हा बिनडोक, अक्कल शून्य इसम आहे त्याच्याकडे मनोरंजन म्हणून पहावे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/02/2024 - 14:47 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 05/04/2024 - 12:51 नवीन
देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे?
२०१४ साली स्मार्ट सिटीज, २०१४ साली सर्वात जास्त ६६% मतदान झाले होते. मीडिया/विश्लेषक ह्यांना मध्यमवर्गाला ठोकुन काढायची जुनी सवय आहे.श्रीमंत लोक सरकार/मीडिया सर्वानाच फाट्यावर मारतात तर गरीब वर्ग कधी जातीचा आधार तर कधी रोकड्/बीयर/बिरियाणीचा आधार घेउन मतदान करतो. त्यामुळे संपादकीय/विशेष लेख वाचणे हे सुशि़क्षित मध्यमवर्ग करत असल्याने त्यालाच ठोकुन काढतात. वीशीतील्/तीशीतील अनेकानी ह्यावेळी उत्साहाने मतदान केले आहे असे ऐकले.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 05/07/2024 - 18:25 नवीन
सुशिक्षीत/उत्तम आर्थीक स्थितीतले लोकं मतदानाबद्दल उदासीन का असतात हा मूळ प्रश्न मोदि हिंदुविरोधी कसे आहेत या प्रश्नावर येऊन ठेपला. बाकी काहि बदल झाला असेल नसेल.. मिपा ने आपला स्वभाव काहि सोडला नाहि :) चांगलं आहे. वेगाने बदलणार्‍या जगात एकतरी व्यवस्था आपलं स्वत्व टिकवुन आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 05/11/2024 - 12:58 नवीन
गेल्यावेळपेक्षा मतदानाची टक्केवारी थोडी घसरल्याने अनेक 'सेक्युलर' पत्रकारांना आनंद झालेला दिसतोय. कारण मतदान जास्त झाले तर भाजपा सत्तेवर येणार असा हिशोब अनेक तज्ञांनी हयाआधी वर्तवला होता. दुसरीकडे भाउ तोरसेकर्,आबा माळकर, सूर्यवंशी वगैरे 'ह्या'बाजुचे पत्रकार ३५०+ म्हणत आहेत. भाउंचे विश्लेषण मलाही आवडते पण त्यांचे विश्लेषण हे दिवाणखान्यातले विश्लेषण वाटते. कपट्,कारस्थान्,टोला, त्या टोल्याचा अन्वयार्थ.. असे विश्लेषण असते. भाउंच्या विश्लेषणात सामान्य मतदाराला काहीही किंमत नसते. त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते. अर्थात सेक्युलर पत्रकारांचे विश्लेषण फार वेगळे नसते. भारतातील प्रत्येक समस्येला मोदी/शहाच जबाब्दार असतात. २ कोटी नोकर्या द्या.. म्हणणार्याना पानाची टपरीपण चालवता येइल की नाही ह्याची शंका आहे.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 05/11/2024 - 14:16 नवीन
अधिक वैचारिक आणि तात्विक वगैरे कधी वाटला नव्हताच. पण चुकून माकून सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्ही दहा वर्षाच्या अनागोंदी नंतरही कट्टर भाजपेयी असाल असं वाटलं नव्हतं. असो. अजून एका आयडीकडे दुर्लक्ष करायचे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 05/11/2024 - 14:37 नवीन
भाउ तोरसेकर्,आबा माळकर, सूर्यवंशी वगैरे 'ह्या'बाजुचे पत्रकार ३५०+ म्हणत आहेत. भाऊ तोसरेकर आणी पत्रकार?? खो खो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/11/2024 - 14:40 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Mon, 05/13/2024 - 10:37 नवीन
>>>भाउंच्या विश्लेषणात सामान्य मतदाराला काहीही किंमत नसते. त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते. सामान्य मतदार अपेक्षा, होणारी कामे यासाठी नगरसेवक, ग्रामसेवक, जीपसदस्य यांच्याकडे जातो. सामान्य मतदाराला अर्थव्यवस्था कशाशी खातात याचे काही देणे घेणे नसते नोक-यांसाठी आमदार जवळचा वाटतो. खासदार नक्की काय करतो हे बहुतांश खासदारांनाच माहित नसते तर सामान्य मतदारांची काय कथा !! तरीही लोकशाही झिंदाबाद !! चेहरा यासाठीच लागतो. मुद्दे निष्प्रभ असतात. चेहरा चालत असतो. मोदींचा चेहरा जनतेला आश्वासक का वाटतो याचा विरोधकांनी विचार करावा. पण विचार करता येणे ही एक अवघड कला आहे.
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा Sat, 05/11/2024 - 15:02 नवीन
माईसाहेब कुरसूंदीकर,
त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते.
नेमक्या याच कारणामुळे ते मर्मग्राही असते. उगीच फापटपसारा नसतो. थेट मतदाराच्या डोक्यात काय चाललंय याची झलक असते. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 05/11/2024 - 15:36 नवीन
भाऊ आपले म्हणणे संयमपणे मांडतात हे सोडलं तर त्यांच्या व्हिडिओमध्ये बाकी काही नसते. काहीही झालं तरी भाजपा आणि फडणवीस हेच कसे बरोबर आहेत हे पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यांचा २०१९ साली भाजपचे ३०० खासदार होतील हा अंदाज मात्र बरोबर ठरला होता.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 05/12/2024 - 11:16 नवीन
सहमत. ह्यावेळीही त्यांचे अश्वमेध हे पुस्तक प्रकाशीत झाले आहे. भाऊंची अनेक मते मलाही पटत नाहीत पण त्यांचे बोलणे, पटवुन देणे छान असते. निखिल वागळे,हेमंत देसाई,ध्रुव राठी ह्यांच्यासारखे आक्रस्ताळी बोलणे नसते. व्यक्तिगत टीका नसते.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 05/12/2024 - 16:45 नवीन
ध्रुव राठी ह्यांच्यासारखे आक्रस्ताळी बोलणे नसते ध्रुव राठी आणि आक्रस्ताळी? संयमित आणि मुद्देसूद मांडणी असते त्याची. भले त्याचे विश्लेषण एखाद्याला पटत नसेल परंतू आक्रस्ताळी लेबल लावणे पटत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 05/12/2024 - 16:49 नवीन
+१ भाऊ टोचरेकर सारखा कल्पना विलास नसतो तर फॅक्ट्स असतात.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 05/12/2024 - 17:27 नवीन
अमरेंद्रा, पण भाऊंचे २०१४,२०१९ मधील भाकीते अचूक आली. ह्याउलट आमचे कुमार केतकर "२०१९ मध्ये मोदी निवडणूकच घेणार नाहीत" असे म्हणायचे. मोदी निवडुन आले त्यामागे मोठा आंतरराष्ट्रीय व्यापक कट आहे असेही म्हणायचे. मात्र ४० वर्षे पत्रकारिता करणार्या केतकरांनी ह्याचे पुरावे द्यायची काही तसदी घेतली नाही. आमचे माहिमचे निखिल वागळेही असाच प्रकार. उद्धव ठाकरे बावळट आहेत ह्या विधानापासुन ते आता उद्धव ठाकरे मुत्सद्दि आहेत ईतपर्यंत आले. असो..
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sun, 05/12/2024 - 18:40 नवीन
हा पत्रकार चांगला किंवा वाईट ठरवण्याचा निकष होऊ शकतो? आणि हेमंत देसाई आणि ध्रुव राठी आक्रस्ताळे? प्रतिसाद नक्की मराठीतच आहे ना?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 05/12/2024 - 19:49 नवीन
ह्याउलट आमचे कुमार केतकर "२०१९ मध्ये मोदी निवडणूकच घेणार नाहीत" काय चुकीचे म्हणाले? सुरत आणि इंदोर पॅटर्नने ही सुरुवात आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/13/2024 - 06:01 नवीन
काय चुकीचे म्हणाले? २०१९ सळई निवडणूक झाली ना? का त्यावेळी तुम्ही परग्रहावर होता ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 05/13/2024 - 08:42 नवीन
२०१९ ला घडले नाही पण त्यांनी दिलेला इशारा आता खरा ठरतोय. २०२४ नंतरच्या लोकसभा निकालावर पुढील प्रगती अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 05/13/2024 - 08:54 नवीन
हां करा सारवासारव
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 56 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 8 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 12 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 15 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा