Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माझ्या मिपावरील लेखांचं इंग्रजी पुस्तक We are the Quarry, Fate is the Hunter

स
स्वीट टॉकर
गुरुवार, 04/11/2024 - 19:09
💬 10 प्रतिसाद
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात. दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. अनोळखी लेखकाच्या पहिल्या पुस्तकाची विक्री दुकानातून जवळ जवळ होतच नाही. जी काय होते ती ऑनलाइन. भरपूर विद्यार्थी आपले फॅन असण्याचा एक प्रचंड फायदा असतो. पुस्तक amazon वर विक्रीला आलं आणि बारा तासात out of stock दाखवायला लागलं! हल्ली पूर्वीसारख्या हजार प्रती छापून ठेवत नाहीत. print on demand पद्धत असते. घाईघाईनी आणखी प्रती छापल्या. आता उपलब्ध आहेत. तुम्ही त्या सर्व हकीकती वाचल्या आहेतच. कोणीही अजिबात ते पुस्तक विकत घेऊ नका. मात्र ज्याला इंग्रजीत त्या वाचायला आवडतील असा कोणी तुमच्या माहितीत असला तर त्याला ही amazon ची लिंक कृपया पाठवा. पुस्तकांचं नाव आहे 'We are the Quarry, Fate is the Hunter'. https://www.amazon.in/We-are-quarry-fate-hunter/dp/8197057885/ref=sr_1_1?crid=8OIRWDCHRX1E&dib=eyJ2IjoiMSJ9.WV6QsZyRA6_OHVo9RQnV_w.RBYYJsGTGeeByog1R0wYQfXb-iZlnGGcRiYMAMx-KY0&dib_tag=se&keywords=We+are+the+quarry%2C+fate+is+the+hunter+book&nsdOptOutParam=true&qid=1712729487&sprefix=we+are+the+quarry%2C+fate+is+the+hunter+book+%2Caps%2C213&sr=8-1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3630 views

💬 प्रतिसाद (10)
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/11/2024 - 20:28 नवीन
तुमचे अनुभवकथनपर लेखन कायमच आवडले आहे. ते लेखन आता इंग्रजीमधे पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध आहे ही खूपच आनंदाची बाब आहे. यासाठी हार्दिक अभिनंदन. 'We are the Quarry, Fate is the Hunter' हे पुस्तक या प्रकारचे लेखन वाचायला आवडणार्‍या व्यक्तिंना आवर्जून सुचवीन.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/11/2024 - 20:48 नवीन
मस्त अनुभवक आहेत ते तुमचे
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा गुरुवार, 04/11/2024 - 22:27 नवीन
लई झ्याक. तुमचे अनुभव म्हणजे एका वेगळ्याच जगाची खिडकी असते. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 04/12/2024 - 02:55 नवीन
नवीन इंग्रजी पुस्तकाबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Fri, 04/12/2024 - 05:23 नवीन
अभिनंदन सर, आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 04/12/2024 - 08:38 नवीन
अभिनंदन मराठी मंडळींनी असे प्रयत्न अधिकाधीक करावयास हवेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/12/2024 - 09:11 नवीन
अभिनंद्न आणि पुढील पुस्तकासाठीही खुप शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर Sun, 04/14/2024 - 08:17 नवीन
नठ्यारा, निनाद, खेडूत, माहितगार आणि डॉक्टरसाहेब, धन्यवाद! ह्या पुस्तकाला कसा रिस्पॉन्स मिळतो ते बघून मग मराठी काढायचं का ते ठरवीन.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 04/14/2024 - 08:58 नवीन
हार्दिक अभिनंदन ! आणखी एक नवं क्षेत्र पादक्रांत केलंत !
  • Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर Sat, 04/20/2024 - 01:58 नवीन
@चौ को - पादाक्रांत कसलं? पुस्तक प्रकाशित करणं सोपं असतं. विकणं कठीण!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा